परमेश्वरी कृपा प्राप्ती। पहिली परीक्षा आणि प्रतिसाद। साक्षात्काल आणि प्रचिती। परमात्मा एक।


परमेश्वरी कृपा प्राप्ती

             बाबांना हनुमानजिंच्या मंत्राची प्राप्ती झाल्यावर त्यांना असे वाटले की, पाच भावापैकी कोणीतरी एकाने याचा विधी पूर्ण करावा आणि परमेश्वरी कृपा प्राप्त करावी. जर कोणीही तयार झाला नाही तर आपण स्वतः हा विधी करावा. या उ उद्देशाने दोनतीन दिवसांनंतर पाचही भावांची बैठक त्यांनी बोलाविली. सर्वजण एकत्रित बसल्यावर बाबांनी तो मंत्र सर्वांसमोर  ठेवला आणि चारही भावांना उद्देशून ते म्हणाले की, या मंत्राने  आपणास परमेश्वराला जागवायचे आहे आणि त्यांची कृपा प्राप्त करायची आहे. 
Parmatma ek photo

परमेश्वरी कृपा प्राप्ती


         त्याकरिता विधी करणे आवश्यक आहे. म्हणून हा मंत्र मी आपल्या सर्वासक्षन ठेवीत आहे. हा मंत्र ज्यांनी मला दिला त्यांनी विधी केलेला नाही. याशिवाय त्यांनी असेही सागितले की, हा विधी करीत असतांना तो नीट न साधल्यामुळे काहीजण मरण पावले तर काही पागल झाले. परंतु या मंत्राचा विधी नीट साध्य झाला तर मात्र घरातील सर्व दुःखे नाहीशी होऊन  संपूर्ण कुटुंबाला नेहमी सुख व समाधान मिळेल. इतकेच नव्हे या मंत्राने दुसऱ्यांची दुःखे सुद्धा दूर करता येतील. आपण पाच भाऊ आहोत. उद्या माझ्यावर कोणीही आरोप लावू नये की, आपण स्वतः मंत्र मिळवल्यावर तो गुप्त ठेवला आणि स्वतःच त्याचा  उपयोग केला. ज्याची इच्छा असेल त्यांने हा विधी करावा. माझी पूर्ण संमती आहे.
             त्यानंतर तो मंत्र एकानंतर एक याप्रमाणे सर्व भावांनी वाचला आणि सर्वांच्याच तोंडून एकच विचार निघाला की, हा विधी एकेचाळीस दिवस करावा लागेल. तो हनुमानजीचा असल्यामुळे फार कठीण आहे. आणि विधी पूर्ण करावाच लागतो, तो मध्येच सोडून देता येत नाही. जर विधी पूर्ण झाला नाही तर आपण एकतर मरू अन्यथा पागल होऊ अशी आम्हाला भीती वाटते. म्हणून आम्ही हा विधी करीत नाही. हे ऐकून बाबा थोडे स्तब्ध झाले.
             थोड्या वेळाने ते चारही भावांना उद्देशून म्हणाले की, आपण पाच भाऊ आहोत. तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही करू नका. परंतु एक भाऊ मरण पावला आणि आपण चारव भाऊ आहोत असे समजा आणि तुम्ही माझ्या कुटुंबाचा प्रतिपाळ करण्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली. त्यावेळेस बाबांच्या कुटुंबात फक्त आई (बाबांची पत्नी) आणि मुलगा मनो हे दोघेच होते. त्यावेळी बाबांनी असा संकल्प सोडला की, मी हा विधी करून भगवंताची प्राप्ती करीन किवा याप्रमाणे निर्णय घेऊन बाबांनी घरातील मंडळींना घर चुन्याने स्वच्छ करण्यास सांगितले आणि विधी सुरू करण्याच्या दिवस व तारीख निश्चित केली. तो दिवस सोमवार होता व २६ नोव्हेंबर १९४५ ही तारीख होती. ठरल्याप्रमाणे बाबांनी त्या दिवशी पहाटेसच आंघोळ  केली. त्यांच्या घराजवळ हनुमानजीची मंदिर होते. त्या देवळात ते पाणी,अगरबत्ती व कापूर घेऊन गेले. तेथे हनुमानजीची पाण्याने आंघोळ करून अगरबत्ती व कापूर  लावला आणि एकदाच मंत्र म्हटले. त्यानंतर हनुमानजीला एकवीस प्रदक्षिणा घातल्या. हा कार्यक्रम सुयोदयापूर्विच पूर्ण केला. अशा प्रकारे एकेचाळीस दिवसाच्या विधीला (साधनेला)  प्रारंभ झाला.
            

     विधीच्या एकविसाव्या दिवशी बाबा दुपारी घरी बसले असता बाबांचे दुसरे थोरले बंधू श्री. नारायणराव त्याच्याकडे आले आणि ते त्यांना सांगू लागले की, माझ्या मुलीची प्रकृती खूप खराब आहे. काही कळत नाही तरी तू माझ्याबरोबर चल, तिला बघ व तिला होणाऱ्या त्रासातून कसेही करून मुक्त कर. तेव्हा बाबांनी त्यांना सांगितले, भाऊ, मला यातले काहीच कळत नाही. मी फक्त पहाटेस बाबा हनुमानजीला कापूर लावून मंत्र म्हणतो आणि प्रदक्षिणा घालतो. याशिवाय मला तिळमात्रही कळत नाही. 
     तेव्हा भावाने बाबांना म्हटले, तू काहीच करू नकोस. पण एक वेळ स्वतःच्या डोळ्यानी तिला पाहून घे. त्यांच्या बंधूंनी त्यांना अशी गळ घातली. बाबांनी भावाची विनवणी ऐकून राहवले नाही. ते गहिवरले आणि मनाशी थोडा विचार करून म्हणाले,चल, तुझी इच्छाच आहे तर मी तिला पाहण्यास येतो. असे म्हणून बाबा उठले व बंधुबरोबर त्यांच्या घरी गेले. ते बाबांच्या घरासमोर राहत होते.
Parmatma ek photo

      दुसऱ्या दिवशी म्हणजे विधीच्या बाविसाव्या दिवशी बाबा ठरलेल्या वेळेनुसार विधी करायला देवळात गेले. तेथे त्यांनी बाबा हनुमानजीच्या मूर्तीला नेहमीप्रमाणे आंघोळ घालून कापूर व अगरबत्ती लावली आणि विनंती केली की हे, बाबा हनुमानजी, तुम्ही माझ्यावर फार मोठी आपत्ती आणून ठेवली आहे. मी आपणास विनंती करतो की, मला प्रथम आपल्या चरणी विलिन करा, अन्यथा त्या मुलीला मुक्त करा. त्यानंतर एकवीस प्रदक्षिणा घालून घरी आले. बाबांच्या मनात मात्र या दिवशी कोणताच विचार आला नव्हता. तो त्याचा दिवस असाच गेला.
परमात्मा एक फोटो
भगवान बाबा हनुमानजी

     तेविसाव्या दिवशी बाबा पहाटेस विधी आटोपून घरी येऊन सकाळीच बाहेरच्या खोलीत दाराजवळ  बसले होते. ज्या मुलीला त्रास होता ती मुलगी तिच्या घरातील अंगणात खेळत होती. बाबांचे लक्ष त्या मुलीकडे गेले. तिला पाहून बाबांना आश्चय वाटले. त्या मुलीचे सर्व फोड बसलेले होते. हे पाहून बाबांना समाधान वाटले. याप्रमाणे परमेश्वराने बाबांची पहिली परीक्षा घेतली आणि बाबांचे परमेश्वराविषयी  असलेले अतोनात प्रेम आणि श्रध्दा पाहून त्यांच्या विनंतीला परमेश्वराने  प्रतिसाद दिला. बाबांना पाहिली सफलता मिळाली.परमेश्वरी कृपा संपादन करण्याचे बाबांचे प्रयत्न साकार होण्यास सुरुवात झाली. अशाप्रकारे बाबांनी एकेचाळीस दिवसांचा विधी पूर्ण केला आणि बेचाळीसव्या दिवशी बाबांनी साखरेचा नैवद्य परमेश्वराला दाखवून त्याची समाप्ती केली व प्रसाद सर्वांना वाटला. ते दिवस ६ जानेवारी १९४६ रोज रविवार असून बाजाराचा दिवस होता. या वेळेस बाबा जेमतेम २५ वर्षाचे होते. यावरून बाबांचा आणखी एक गुण  लक्षात येतो की, परमेश्वराच्या बाबतीत त्यांच्या  मनात खूप आत्मीयता आणि जिध्द होती. 
  बाबांनी विधी समाप्त केल्यानंतर त्याच दिवशी ते मौदा येथे ज्या व्यक्तीने त्यांना मंत्र दिला होता त्या व्यक्तीकडे गेले.त्याने बाबांचे पाहुणे या नात्याने आदरातिथ्य केले. थोडा वेळ बसल्यानंतर त्याला बाबा म्हणाले की, एकेचाळीस दिवसांचा विधी काल  पूर्ण झाला आणि आज बेचाळीसव्या  दिवशी त्या विधीची समाप्ती केली. विधी सुरळीत पार पडला असे सांगून बाबांनी पुढील कार्य सांगण्याची विनंती त्यांना केली
  पुढच्या  कार्याबध्दल सांगताना ती व्यक्ती बाबांना म्हणाली की, रोज एक वेळा याप्रमाणे ७,११,२१,३१,४१,५१,६१,७१,८१,९१, आणि १०१ दिवस त्याच मंत्राने १०८ वेळा मंत्र म्हणून तितक्याच वेळा हवनात तूप आणि हवनपुडा याची आहुती टाकावी लागते. परंतु तो संन्याशी त्रित्राल (एका रात्रीतून तीनवेळा) हवन करीत होता. त्याचा विधी असा की, हवन संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुरू करून रात्रभरातच तिन्ही हवन सूर्यादयपूर्वी संपले पाहिजे.
जागा साफ करणे, आंघोळ करणे, हवनाची रचना करावी
पुन्हा प्रसाद करावा व हवन पूर्ण करावे. तो संपला की तिसरे हवन त्याच जागेवर,  ती जागा स्वच्छ करून व आंघोळ करून पुन्हा प्रसाद करावा. व हवन पूर्ण करावे. अशा प्रकारे  तीन हवन एकाच रात्रीत पूर्ण करावे. हे त्रित्राल हवन ७,११,२१, ते १०१ दिवस करावे लागते.    
महानत्यागी बाबा जुमदेवजी भगवत प्राप्ति
महान त्यागी बाबा जुमदेवजी 

        हवनाकरीता लागणारे साहित्य म्हणजे रानगोवऱ्या, पिंपळ, वड,संत्रा, मोसंबी, आंबा, उंबर इत्यादी झाडांपैकी पाच झाडांच्या काड्या, नारळ, फळे, पान, सुपारी, हार, बेलफुल आहूतीत सोडायला तूप ( ऐपतीप्रमाने साजूक किवा वनस्पती ), दही, दूध, फक्त बाबा हनुमानजीची प्रतिमा असलेला फोटो, गोमूत्र, चंदनचुरा,  हवनपुडा, अबीर, सेंदुरगुलाल, इत्यादी  सामान लागते आणि प्रसाद म्हणून कढई(हलवा)  करावी लागते.
   हे सर्व लिहून घेऊन बाबा सायंकाळी नागपूरला परत आले.
तेव्हा घरातील सर्वजण त्याची वाट पाहतच होते. घरी आल्यावर त्यांनी वरील सर्व माहिती सर्वांना सांगितली आणि म्हणाले ही खर्चाची बाब आहे. अगोदरच आपली आर्थिक परिस्थीती खूप खराब आहे. म्हणून आपण दिवसभर विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची खरेदी करून रात्री त्रीत्राल हवन करू. याशिवाय त्रीत्राल हवन असल्यामुळे रात्रभर जागरण होईल, म्हणून सर्वांनी जागायची आवश्यकता नाही. कारण सर्वांचे जागरण  झाल्यास दुसऱ्या दिवशी विणकाम होणार नाही. त्यामुळे मजुरी मिळणार नाही आणि सामान न आल्यामुळे हवनकार्य करता येणार नाही आणि हवनात खंड पडेल. यावर सर्वांनी गंभीरतापूर्वक विचार केला आणि दुसऱ्या दिवसापासून सात दिवस ्रित्राल हवन करायचे ठरविले.
          ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वांनी विणकरी करून संध्याकाळी मजुरी मिळाल्यावर सामानाची जुळवाजुळव मोठ्या मुस्कीलीने केली आणि संध्याकाळी सात वाजता पहिल्या हवनाला सुरुवात केली. या मार्गातील सेवक ज्याप्रमाणे हवनाची माडणी करतात त्याप्रमाणे त्याची माडणी केली आणि सागितल्याप्रमाणे हवन करीत पूर्ण सात दिवस त्रित्राल हवन  केले. पाहिले हवन संपल्यानंतर जेवण करीत. नंतर दुसरे हवन रात्री अकरा वाजता सुरू करीत.तिसरे हवन रात्री तीन वाजता सुरू करून पहाटे पाच वाजता संपत असे. परत दुसऱ्या दिवशी दिवसभर विणकाम करून सायंकाळी सामानाची जुळवाजुळव करीत. यावेळेस खूप त्रास होत होता. बाबा स्वतः हवन करीत होते. त्याशिवाय स्वतःच हवनात आहूती सोडायचे. दुसऱ्या कोणालाही आहुती टाकायची परवानगी नव्हती.
        हवन करतांना बाबा कोणाशीही बोलत नसत. एखादी वस्तू लागली तर इशाऱ्याने सांगायचे. जर काही विचारायचे  असेल तर पाटीवर पेन्सिलीने लिहून किंवा कागदावर पेनने  

त्रित्राल हवनाच्या पहिल्याच दिवशी दुसरे हवन चालू असताना ठरल्याप्रमाणे बाबांचे कनिष्ठ बंधू मारोतराव होपले होते. ते गाड झोपेत असताना जोराजोरात ओरडत होते की, 

लंगोटीवाले बाबा की जय |' हे शब्द जेव्हा बाबांच्या कानांवर पडले तेव्हा  बाबांनी ते एका कागदावर लिहून घरच्या लोकांना त्यांना विचारवयास सांगितले की, तू असे का ओरडलास तेव्हा बाबांचे वडील बंधू श्री. जागोबाजी यांनी त्यांना झोपेतून जागे केले आणि ते उठून बसल्यावर त्यांना विचारले की, ' तू ' लंगोटीवाले बाबा की जय |' असे का म्हणालास. तेव्हा त्यांनी सर्वांनाच सागितले की, बाबा हनुमानजी डोक्यावर चांदीचा मुकुट, घालून, उजव्या हातात चांदीचा गदा घेऊन घराभोवती फिरत आहेत. असे दुश्य स्वप्नात दिसले. नंतर त्यांनी बाबांना ही हकीकत सांगितली, दुसरे हवन संपल्यावर बाबांनी विचार केला की, परमेश्वर आता आमचे संरक्षण करण्याकरिता उभा आहे.

या त्रित्राल हवनात श्री. जागोबाजी हे जागेची साफसफाई 

करणे, रांगोळी घालने इत्यादी कामे करीत होते तर आपल्या सर्वांच्या आई सौ. वाराणसीबाई ह्या प्रसाद तयार करायच्या.

याप्रकारे सात दिवस  त्रित्राल हवन करून सातव्या दिवशी 
सर्वांनी भोजन करून सोहळा पार पाडला आणि बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली.
        
या परमेश्वरी कृपेचा फायदा ते इतरांना करून देत होते. त्यांच्याकडे जे कोणी दुःखी, कष्टी लोक येत होते  त्यांचे दुःख मंत्राने तीर्थ करून व मंत्रोच्चाराने फुंक मारन दूर करू लागले.
*********************************************






1 comment:

Powered by Blogger.