मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेला अनुभव.. परमात्मा एक

👉▶️ ▶ आजचा अनुभव :-
👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾

Parmatma ek image


।।भगवान बाबा हनूमानजी को प्रणाम।।
।।महान त्यागी बाबा जूमदेवजी को प्रणाम।।
।।परमात्मा एक।।


मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेला अनुभव
=============================

 【 महान त्यागी जुमदेव मेरे
 आया शरण मै द्वारे तेरे
 दूर करो दुःख सारे
  वर्धमाननगर वाले बाबा मेरे 】

माझा नाव:- स्वराज मोतीलाल साटोने असून मी तेली मांगली या गावात परिवारसह वास्तवत आहे हा मानवधर्म एकता परिवार या भगवंत कार्याचा गृपवर हा माझा पहिला अनुभव आहे, ह्यात मी आपल्या मार्गात येण्याचे कारण आणि मार्गात आल्यानंतरचे अनुभव सादर करू इच्छितो..

ज्या प्रकारे सर्व या मार्गात येण्याचा आधी दु;खी असतात. त्याच प्रकारे आम्ही पण ह्या मार्गात दुखीच आलो होतो. व दु;खाने खूप त्रासलो होतो. 

आमच्या कुटुबांमध्ये आठ व्यक्ति आई-बाबा, तिन भाऊ, एक बहिन, आणि आजी-आजोबा अशी आमची कुटुंब प्रणाली आहे. पण कुटुंबामध्ये काम करणारे आणि सर्वांचे पोट भरणारे व्यक्ति म्हणजे माझे आजोबा होते. पण कुटुंबा प्रमुखावर दु:ख आले की सर्वस्व घराचा पाया खचून जाते. माझे आजोबा नेहमी आजार राहायचे आणि माझ्या आजोबाची प्रक्रुती बिघडत राहायची आणि ते रोज पोट दुखते म्हणुन घरी सागांयचे आणि आम्ही त्यांना डाॅक्टराकडे घेऊन जायचो व तिथं माझ्या आजोबाला आराम लागत होता पण घरी आल्यावर जसेच्या तसे होत होते. व डाक्टर नेहमी दवाखान्यात बोलवत असायचा व आम्हाला पैस्याने लुबाडत होते. कारण ५० हजार रुपये खर्च करून सुद्धा माझ्या आजोबाला काहिही आराम मिळाला नव्हता. त्या नंतर आम्ही माझ्या आजोबाला गवळी हास्पिटल मध्ये एडमीट केले तिथे माझ्या आजोबाला आराम झाला. पण मग आणखी दोन तीन दिवसानंतर दवाखान्यात न्यावे लागले. आम्हाला वाटलं की काही बाहेरचे भूतबाधाचे प्रकार असेन म्हणून माझ्या वडिलांनी घरी त्रातीक मांत्रिकाला बोलवून आणले त्यांनी सुद्धा दुःख दूर होण्याकरिता काही प्रकरणे सांगितले पण आराम लागला नाही.

 तसेच काही बाहेरचे आहे काय बघितले व त्याचप्रमाणे प्रयत्न केले पण माझ्या आजोबाला आराम मिळाला नाही म्हणून आम्ही दुसऱ्या देवीकडे गेलो आजोबाला देवीकडे नेल्यावर काही तरी आराम लागायचा. आणि पुन्हा तसाच व्हायचा प्रकृती जशीच्या तशी राहायची घरी जादूवाले आल्यावर आजोबाच्या अंगावरून उतारे काढायचे, ताद्री हलवायची कोंबडे कापावे लागत होते. पण काहीच आराम लागायचं नाही आम्ही जिकडे तिकडे फिरलो पण अराम लागायचा नाही. आम्ही थकून गेलो.त्या वेळी माझी आत्या परमात्मा एक मार्गामध्ये होती. ते आम्हाला नेहमी म्हणत होती की या मार्गात येऊन जा माझा पण विचार होता आणि घरी सुद्धा म्हणायचे की आपण या मार्गात जाऊ पण माझे आजोबा दारू पित होते त्यामुळे माझे आजोबा नाही म्हणायचे पण काही दिवसानंतर असा काही घडलं की आम्हाला मार्गात यावे लागले. माझ्या भाऊजीला पण या मार्गात यायचे होते मग आम्ही सर्वजण मार्गदर्शकाकडे गेलो तिथं गेल्यावर आम्ही आमच्या घरची संपूर्ण माहिती मार्गदर्शकाला सांगितली आणि त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल मार्गदर्शन केले व म्हणाले की या मार्गात यायचे असेल तर मरावं लागते आम्ही म्हंटल की हो आम्ही या मार्गात मरायला तयार अहो.. व सर्व देवीदेवतांची विसर्जन करून मार्गदर्शककडे गेलो व त्यांनी आम्हाला तीन दिवासाचे कार्य दिले त्या कार्या मध्ये माझ्या आजोबावर जे काही दुःख होते ते त्या कार्यामध्ये कमी झाले. आम्ही कार्य करतच गेलो आणि बाबाला माझ्या आजोबांच्या दुखासाठी योग मागत होतो. सकाळच्या विनंती मध्ये योग् मागत होतो सायंकाळी च्या प्रार्थने मध्ये योग् मागत होते काही दिवसातच आम्हाला परिपूर्ण समाधान मिडाले आम्ही सतत ३-७-११-२१ दिवसाचे कार्य करत गेलो आणि आम्हाला एकामागे एक योग प्राप्त झाले काही दिवसात आमच्या परिवाराची त्याग घडवण्याची इच्छा झाली आणि आम्ही सहपरिवार त्यागाचे कार्य घ्यायला मार्गदर्शका कडे गेलो मग आमचे ४१ दिवसाचे कार्य सुरू झाले व त्या कार्यात आम्हाला आराम झाला आणि आमच्या आजोबाला आराम झाला आणि आमच्या परिवाराला आराम झाला आणि आमच्या येथे १४-१२-१९९२ या दिवशी माझे आजोबा आणि कडुजी हे नागपूरला भवनामध्ये गेले तेथून भगवंताची प्रतिमा मिळाली व दुसऱ्या दिवशी दोन वाजताच हवन पार पडले आता आमच्या कुटुंबां मध्ये सुख समाधान आहे..

माझ्या अनुभव लिहिण्यात काही चुका झाल्या असेन तर मी भगवंताला, बाबाला आणि सर्व सेवक बांधवाना माफी मागतो आणि आपले शब्द सम्पवतो.
भूल चूक क्षमस्व..

========================

 सेवक:- स्वराज मोतीलाल साठवणे.
 पत्ता- मांगली तेली,पो-धानला, ता-मौदा,जी- नागपूर
 सेवक क्र. ४२१८
 मार्गदर्शकाचे नाव:- धनराजजी डांगरे
*मु. मांगली(तेली)
*परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर*

टिप:- ही पोस्ट कुणीही कॉपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेयर करावी.

सौजन्य:-
"सर्व सेवक-सेविका"
 मानवधर्म एकता परिवार
【युवा व जेष्ठ सेवकांचा ग्रुप】

"ऍडमिन सेवक-सेविका"
मानवधर्म एकता परिवार,
प.पु.परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपुर.
_________________________
--------------------------------------

========================
   *!! भगवान बाबा हनुमानजी की जय!!*
*!! महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय !!*
               *!! परमात्मा एक !!*
     *सत्य मर्यादा प्रेम कायम करनेवाले*
     *अनेक वाईट व्यसन बन्द करनेवाले*
              *!! मानवधर्म की जय !!*
========================
मानव धर्म एकता परिवार  ( व्हाट्सअप्प ग्रुप व फेसबुक पेज) शी जुडुन भगवंत कार्याच्या ऑनलाईन चर्चा बैठकीचा लाभ घेण्यासाठी आणि आपले मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेले अनुभव सादर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.

गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
                 सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार,
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.