सेवकांनी मानवधर्म पाळा.. परमात्मा एक बाबांचे जिवन चरित्र
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी परमेश्वरी कृपा प्राप्ती केल्यावर मानवधर्म स्थापन केला . या कृपेचा फायदा अनेकांना त्यांचे सर्व प्रकारचे दुख दूर होण्यासाठी होऊ लागला .हा धर्म नवीन संस्कृती निर्माण करणारा ,सत्याचे रोप लावणारा असल्यामुळे हि परमेश्वरी कृपा लिखित स्वरुपात असावी आणि तिचा प्रसार व्हावा म्हणून लिहिण्याचे ठरविले .
सेवकांनी मानवधर्म पाळा
सर्व सेवक बंधू व सेविकांना तसेच बालगोपाल यांना माझा नमस्कार
बघा ! आधुनिक आध्यात्मिक जीवन पध्दतीत तरी ब्रम्हज्ञान म्हटलं कि कंटाळवाणे विषय वाटतो. जास्त ब्रहमज्ञान वाढले कि मी पण येऊन अहंकारच वाढला आहे, त्याचा असे हमखास लोकं बोलण्याला घाबरत नाही. ब्रम्हज्ञाना बदल अनेक समज गैरसमज आहेत. स्वत:चे ज्ञान होणं किंवा मी असं ज्याला आपण म्हणतो ते नेमकं काय आहे याबद्दल बरचं लिहिल, बोललं गेलंय त्याबद्दल टीकात्मक बरंच काही लिहिता येऊ शकते. त्याला चेष्टेचा विषयही केला जाऊ शकतो. जे दिसंत किंवा दाखवला येतं तेच सत्य आहे., अशा कल्पना वैज्ञानिकांनी सुध्दा सोडायला हव्यात. सत्य ब-याचवेळा दाखवता येत नाही. श्रद्वा, करूणा, प्रेम दाखवा म्हणल तर तळ हातावर घेऊन दाखवता येणार नाही, दिसत नाही म्हणून ते नाहीच, असं मानणा-यांनीच ही मुल्ये पायदळी तुडवली आहेत,
माणूस फार दुबळा आणि अल्पमती आहे. त्यातला त्यात कमी जास्त हुशार मार्णस असतील, पण त्यांचा ब्रह्मांड समजून घेणाचा आवाका हा फार छोटा असतो. एकून ज्ञानाचा आवाका हा समजलेल्या ज्ञानाच्या आवाक्यापेक्षा फार प्रचंड व विशाल असतो, हे विसरता कामा नये ! | प्लेगचे जंतू सापडले, टी.बी.चे. सापडले, पॅरेंटाइफॉइडचे नवे जंतू सापडले, डेंग्यू सापडला, एडस आला. स्वाइन फ्लयू सापडला. हे खरं आहे आणि विज्ञानाला त्याबाबत धन्यवादही दिले पाहिजेत. पण बाकीचेही असे अनेक विषाणू आहेत ते दिसत नाहीत किंवा विज्ञानाला समजले नाहीत. या सा-या विषाणूंना अर्धसत्य मानून सोडून देता येत नाही. मणसांन विज्ञाननिष्ठ | असायलाच हवं पण विज्ञानानं सिध्द केलं आहे तेवढेच सत्य असा दुराग्रही असता कामा नेय. आता गमंत बघा विवेक हा एक शब्द आहे. विवेक नसेल तर माणसाचे वाटोळे हाते हे सर्वमान्य आहे. आता हा विवेक म्हणजे नेमके काय हे सिध्द करता येईल काय?माणसोपचार तज्ज्ञांनी त्याच्या हजारो व्याख्या असतीलही केल्या. म्हणून नेमक काही लागेल काय ? आकाशात हजारो स्फोट होत असतात. त्यातून ज्वाळा
आणि अश्मांच्या फुलबाज्या आकाशगंगेत उडत असतात. त्यांचे आवाज ऐकायला येत नाहीत किंवा ते दिसत नाही, म्हणून ते खोटे ठरवू काय ? आपल्या आवतीभोवती सत्याचा विस्फोट होत असतो. आपण अल्पमती असल्यामुळे त्याची जाणीवही आपल्याला होत नाही. नेणीव तर पुढली गोष्टी अनुभूती तर त्याही पुढची भोवताली
होणारे हे सत्याचे स्फोट या:कचित आहेत, | असं समजणं म्हणेजे विज्ञानाला न | समजलेल्या सत्याचा अपमान करण्यासारखं | आहे. आपल्याला समजलेलं सत्य हे

सीमित आहे. एक असीम असं सत्यं ब्रम्हाडात पसरलेलं आहे. त्याचे ज्ञान होणं नेणिवेच्या पातळीवर, अनूभुतीच्या पातळीवर महत्वाचे आहे आणि त्यालाच ब्रम्हज्ञान असं म्हटलं असावं.
अशा अनुभूती शब्दांत व्यक्त करता येत नसतातच आणि कागदावर मांडता येत नसतात. नकळत आपण आपल्या पायाशी बघांव आणि फणा काढलेला नाग दिसल्यावर आत काय होत ते शब्दात किंवा कागदावर सिध्द नाही करता येत. म्हणून ते होत नाही काय?जरी ते व्यक्तीसापेक्षा असंल तरी ते सत्यच असतं.
अख्यां जगाला, गेल्या अडूसठ वर्षापासून माहित झालं आहे, कि महान अवतरित पुरूष, परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर नागपूर चे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी' चा
मार्ग मानव धर्मात हजारों कुटुंबीय सेवकांचे | सारे दु:ख म्हणजे ते कोणत्याही प्रकारचे
असो आज ते कल्याणमयी व खुषहालीचे जीवन जगतं आहेत. मानव धर्माची विशेषता जेवढी सांगावी तेवढी कमीच आहे. मानव कुटुंबात (जन्म मृत्य सोडून ) दु:खा पायी कसल्या ही प्रकारचे व कितीही वर्षांचे मोठे दु:ख असेल, ते तर नष्ट होतेच त कुटुंबातील सदस्यांना समाधान प्राप्त झाल्यानंतर अमूक-अमूक त्या सेवकांस बेचाळीस दिवसांचे ‘त्यागाचे कार्य संपादन झाल्यानंतरच त्याचे पंजीयकरण होते. त्या सेवक कुटुंबास परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर च्या कार्यालयातून ' भगवान बाबा हनुमानजी, तत्वाचा, आई, बाबाचा आणि मानवधर्माची शिकवण असे पाच फोटो आणि कुटुंब प्रमुखास माळ देण्यात येते. कुटुंब प्रमखास त्यागाचे कार्य संपादित झाले त्याचे हवण कार्य घडवावे लागते का हवन संपल्यावर लगेच चर्चा बैठक, सुरू होते व त्यावेळे से सर्व सेवकांच्या उपस्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना आपले अनुभव सांगावे
लागते, कि कोणत्या दु:खापयी मार्गात यावे लागले. भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी व सर्वाच्या लाडक्या आई सौ. वाराणासी ठुब्रीकर च्या उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम मंचकावर विराजमान मार्गदर्शक जेष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ता सेवक च्या प्रत्यक्षांत समस्त विराजीत सेवकांन समोर घडविल्या जाते.
या जगात बरेच लोक आहेत जे आप आपल्या परीने मानतात.आपल्या मार्गात ‘परमात्मा एक परमेश्वर एका विशेष त-हेनी प्रगट झालेला आहे आणि अख्या जगाला एक विशेष त-हेनी संदेश देत आहे.
परमपूज्य पमरात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर चे सदगुरू व संस्थापक महात्यागी बाबा जुमदेवजी' नी आपल्या समोर ‘मिल्ट्री सैनिक संगठना सारखे, छत्तीस हजार कौंटुबिक सेवकांची फौज तयार केली. संपूर्ण जगात असल्या प्रकारची गुरूकृपा कोठेच मिळणार नाही, | आणि हा मानव धर्म मार्ग हा एकच कलीयुगामध्ये सतयुग निर्माण करून अजरामर झाला आहे. व पुढेही दिवसे-नदिवस झपाटयाने वाढत राहणार ......! म्हणून जगांत घोषणा सुरू आहे कि जबतक सूरज चाँद रहेगा बाबा! तेरा नाम रहेगा !

Namaskar dada
ReplyDeleteNamskar dada
ReplyDeleteनमस्कारजी
ReplyDelete