चुकी एवढिच झाली, मनात वाईट भावना, आली , लालसेपोटी स्वताच्या पायावर दु:खाची कुदळ मारली... परमात्मा एक
👉▶️आजचा अनुभव▶️👉
👇🏾👇🏾👇🏾
- भगवान बाबा हनूमानजी को प्रणाम !
महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !
परमात्मा एक !
[ माझा सत्य अनुभव ]
🙏🏻 सर्व सेवक दादांना व सेवकीन ताईला माझा नमस्कार🙏🏻
[चुकी एवढिच झाली, मनात वाईट भावना, आली , लालसेपोटी स्वताच्या पायावर दु:खाची कुदळ मारली]
*[माझ्या सत्य अनुभव]*
सर्व सेवक दादांना सेवकीन ताई ला माझा नमस्कार🙏🙏
माझे पूर्ण नाव अमोल कवडुजी खराबे आहे.
मी मारोडी या गावी परिवारसह वास्ततव्यास आहे मानवधर्म एकता परिवार या भगवतं कार्याचा गृप वर माझे मार्गात येणेचे कारण व माझ्या जीवनात आलेला अनुभव मी सादर करीत आहे.
मी लहान असताना माझ्या घरी . बाबांच्या मार्ग होता. आणि मग नंतर आम्ही त्यागी झालो. दहा ते पंधरा वर्षे आम्ही मार्गात राहलो. नंतर काही दिवसांनी माझ्या आईची प्रकृती खराब राहायची.
पोटात खूप दुखत होतो. आम्ही खूप दवाखाने केले तरी पण तिला आराम लागत नव्हतं
डॉक्टरांनी आम्हाला सोनोग्राफी काढायला सांगितली. आम्ही ती काढली मग आम्हाला माहीत झालं की माझ्या आईला कॅन्सर आहे .
कॅन्सरच्या नाव एकता बरोबर आम्ही सगळे हलवून गेलो. नंतर मग आम्ही मेडिकल ला गेलो तिथे सिटीस्कॅन काढला सोबत माझे मामा माझे मोठे वडील आणि माझे वडील पण होते. सिटीस्कॅन रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी सांगितले की तुझ्या आईला लिव्हर मध्ये कॅन्सर आहे म्हणून लिवर पूर्ण खराब झाला आहे.
डॉक्टरांनी सांगितले की आता काहीच होऊ शकत नाही.
तर हे ऐकल्यानंतर सगळीकडे रडणे सुरु झाले खूप मोठा असा आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर आम्ही आईला दवाखान्या मधून घरी आनला तिला तीर्थ बनवून दिला तरीपण तिला आराम थोडाफार व्हायच्या मग काय अजून तशी तब्येत व्हायची मग आम्ही तिला खूप जागी घेऊन गेलो जडीबुटी ची दवाई पण दिली तरी पण तिला आराम नाही व्हायचा मग आम्हाला पण काही सुचेना आता काय करायचं काय नाही आमच्या दिमाग काम नाही करायचा.
मग एक दिवस आम्ही माझ्या भावजी च्या गावाकडे गेलो दवाई घेण्यासाठी तिथे एक महाराज होता तो जडीबुटीची दवाई देत होता त्याने आईच्या हात बघितला आणि सांगू लागला की तुझ्या आईला बाहेरच्या आहे म्हणून.
आम्ही म्हणालो की आम्ही बाबांच्या मार्गात आहो आम्हाला या गोष्टीवर विश्वास नाही दवाई न घेता तिथून आम्ही निघून आलो तर माझे जावई त्यांच्या गावी गेलो त्यांनी या गावी या म्हणून सांगितले आणि आईला पण घेऊन या असे सांगितले तिथे पण एक दवाई वाला होता पण तसाच सांगत होता.
मी म्हणालो की आमच्या मार्गात एवढी शक्ती आहे की वैद्यवानी आमच्या काहीच बिघडवू शकत नाही.
असे आम्ही तिथे म्हणालो नंतर काही दिवसांनी आईच्या तब्येतीत खूप वाढ झाली ती रात्रभर झोपत नव्हती रक्ताच्या उलट्या करायची. आम्हाला काही सुचेना की काय करायचे काय नाही. आम्ही पूर्ण बेभान झालो जिकडे पण जात होतो तिकडे तसेच औषध वाले तसेच सांगत होते.
तुझ्या आईला बाहेरच आहे म्हणून मग नंतर आम्हाला काय करावं काय नाही आम्हाला काही सुचत नव्हता.
आणि आमचे रिश्तेदार पण आम्हाला म्हणत होते. व् डोकं काम नाही करत काय करायचे काय नाही सुचत नव्हता.
नंतर जे करायला नाही पाहिजे होते तेच झालं. आम्ही खूप विचार केल्यानंतर बाबांच्या फोटोचे विसर्जन केले.
आणि बाबांच्या मार्ग सोडला माझ्या भाऊजींनी एका वैद्याला घेऊन घरी आले आणि तो आईला पाणी बनवून देत होता तरीपण काहीच झालं नाही.
शेवटी माझी आई मरण पावली. मार्ग सोडला या गोष्टीसाठी नव्हता भाऊजी आणि आमच्या मध्ये भांडण झाले माझे मामा पण माझ्या भावजी सोबत भांडत होते.
खूप मोठी चूक आमच्या हाताने झाली होती.
तर काही दिवस गेल्यावर आमच्या घरी सुखाच्या वातावरण नव्हतं घरी खूप चिडचिडपणा तब्येत खराब व्हायच्या.
नंतर आम्ही मार्गात जायचं ठरवलं.
आमचे कार्यकर्ते यांच्याकडे गेलो मते जी पेट्रोल पंप जे काही घडलं ते त्यांना आधीच माहीत होतं कारण ते आमचे रिश्तेदार लागत होते
तर त्यांनी आम्हाला कार्य नाही दिले.नंतर आम्ही घरी आलो व मला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप व्हायचा की आमच्या हाताने काय झालं खूप मोठी चूक केली आपण.
नंतर माझे वडील बाबांचे सेवक जय रामजी धुडसे.यांच्या कडे गेले तर त्यांना
आम्हाला घेऊन पाडुरंग मदनकर कार्यकर्ता मौदा यांच्याकडे घेऊन गेले जे काही घडले ते सगळं त्यांना सांगितलं.
तर त्यांनी आम्हाला कार्य दिले मग नंतर आमच्या घरी सूख समाधानी झाली तब्येत पण बरी राहायची आणि आता ठरवलं की अशी चूक आयुष्यात कधीच करायची नाही..
आणि बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्या बाबाच्या मार्गाचा प्रचार प्रसार करण्याच्या प्रयत्न करीन..
माझ्या लिहणाया मध्ये काही चूक भूल झाली असेल तर.
मी भगवान बाबा हनुमान जी ला क्षमा मागतो.महानत्यागी बाबा जुमदेवजी ला क्षमा मागतो.
व मातोश्री वाराणसी आईला क्षमा मागतो. व सेवक दादा सेवकीन ताईला क्षमा मागतो.
सर्व सेवक दादा व सेवका ताईला माझा नमस्कार🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वरील अनुभव लिहिताना जर माझ्या कडून काही चुका झाल्या असतील तर मी भगवान बाबा हनुमानजी ला क्षमा मागतो महानत्यागी बाबा जुमदेवजीला क्षमा मागतो तसेच आई वाराणसीला क्षमा मागतो आणि सर्व सेवक सेवकीनं यांना सुद्द्धा क्षमा मागतो.
सर्वाना माझा नमस्कार.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*सेवकाचे नाव :-अमोल कवडुजी खराबे*
*पता :- मु.पो. मारोडी तह. मौदा जिल्हा- नागपूर*
*सेवक क्र. :- 51568*
*मार्गदर्शक :- मा.श्री पाण्डुरंग जी मदनकर काकाजी मु.मौदा जि.नागपुर*
*परमपुज्य परमात्मा एक सेवक* *मंडळ,वर्धमाननगर,नागपुर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
*[वरिल अनुभव कुणिही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावा.}*
*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*
गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
🔴सौजन्य🔴
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार,
[Wats app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment