भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला भाग दुसरा.. परमात्मा एक।

भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला
१९३३ साली, जुन्या ठिकाणी राहत असताना मोहल्ल्यात शेजाऱ्यांशी नेहमी भांडण होत होते. म्हणून तेथे ठूब्रीकर घराने कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी दुसरीकडे घर विकत घेण्याचे ठरविले. रंभाजी रोड, टिमकी, येथील रामेश्वर तेल घाणीच्या मागे असलेले झुनके सावकार यांचे घर विकाऊ होते. ते घर ठूब्रीकर बंधूंनी घेण्याचे ठरविले आणि घरमालकाशी सौदा केला. त्याअगोदर त्या घराबद्दल अशी हकीकत होती की, ते घर सैतानी आहे. त्या घरात भुताटकी आहे. एक मुसलमान त्या घरात पाय ठेवता बरोबर मरण पावला. म्हणून ते घर विकत घेऊ नये, असे त्या मोल्ल्यातीलतील लोकांनी त्यांना सागुण घर घेन्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबांचे घराने हिंदू सस्कृतीप्रमाने गुरुमार्गी होते. त्यांचे गुरु श्री. यादवराव महाराज, धापेवाडा हे होते. बाबांच्या वाडवडिलांनी असा विचार केला की, आपण होमहवन, पूजा अर्चना केल्यावर ती भुताटकी नष्ट होईल आणि आपण सुखात राहू शकू असा विचार पक्का करून त्यांनी घर विकत घेतले. यावेळेस बाबा बारा वर्षाचे होते. सध्या बाबा ज्या घरात राहतात तेच हे घर होय.
![]() |
भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला |

ठरल्याप्रमाणे त्या घरात राहावयास येण्यापूर्वी त्यांनी घराची शांती करण्याकरिता गुरु मंत्राने होम-हवन, पूजा-अर्चना केली आणि आनंदाने त्या घरात राहावयास आले. 'आगीतुन निघून फूफाट्यात पडणे' या म्हणीप्रमाणे या घरात राहावयास आल्यानंतर कोणालाही सुख-शांती लाभत नव्हती. ते वर्षभर सुद्धा सुखी राहू शकले नाहीत. घरातील लोकांना सारखे स्वप्नविकार होत होते. जेवताना पायरीचा आवाज ऐकू येत होता. पायरीवर कोणीतरी सारखा चालतो आहे असा त्यांना भास होत होता. घरासमोर रात्रभर कुत्री ओरडणे वगैरे भुताटकीचे प्रकार सुरू होते. त्यांच्या घरात जन्माला आलेली मुलेही बाहेर खेळत असतांना कुत्र्यासारखी ओरडून मरत असत. अशाप्रकारे संपूर्ण कुटुंब दु:खी होते. बाबांचे वडील श्री. विठोबाजी यांनी बरेच उपचार केलेत. औषधोपचार केला. गुरुविद्येद्वारे होम हवन केले. मांत्रिक, तांत्रिक या लोकांकडून उपाय केलेत. कित्येक नवस केलेत. नानाप्रकारे उपाय करूनही कुटुंबात समाधान व शांती लाभत नव्हती. हजारो रुपये खर्च झाले होते. भुताटकीमुळे कित्येक जीवन देवाघरी गेले. यामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झाले होते. परिवारात शांतता नव्हती. बाबा जुमदेवजी हे हनुमानजीची सेवा करीत असत. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पाठ होता. त्यात असा उल्लेख आहे की, जेथे हनुमान चालीसा वाचल्या जातो तेथे भूत राहू शकत नाही. तेव्हा भुताटकीचा नाश व्हावा म्हणून बाबा दररोज दोन तीन वेळा हनुमान चालीसा वाचीत होते. परंतु घरात सुख समाधान नव्हते.
लहान मुले सारखी आजारी पडत व त्यांना काहीतरी दिसत होते. या भुताटकीचा खेळ सारखा बारा वर्ष सुरू होता. १९४५ सालच्या नोव्हेंबर महिन्याची गोष्ट बाबांचे रोज दोन तीन वेळा हनुमान चालीसा वाचणे सुरू होता. त्याबरोबर हनुमानजिला ते विनंती करीत होते. की, 'बाबा हनुमांजी' तुम्ही काहीतरी योग द्या आणि हे दुःख दूर करा.
एकेदिवशी बाबांचे लहान बंधू मारोतराव हे घरी एकटेच झोपले होते. माजघरात कोणीच नव्हते आणि बाबा छपरीत घरी बसले होते. बाबा छपरीतुन माजघरात गेले. तेव्हा मारोतराव उठून बसले होते. तेव्हा बाबांनी मारोतरावांना विचारले की, माझे पाय कोणी हलविले आणि मला कोणी उठविले. तेव्हा बाबा पुन्हा मारोतरावयांना म्हणाले की, मी आत्ताच घरात आलो आणि घरात कोणीही नाही. मग तुझे पाय कोणी हलविले हे मला माहीत नाही. इतके बोलून बाबा आचार्य चकित झाले. त्यानंतर त्यांनी त्याचा छडा लावण्याकरिता मांत्रिकाकडे जाण्याचा विचार केला.
बाबा मांत्रिकाकडे जाण्याच्या तयारीत असताना बाबा हनुमानजिला विनंती केल्याप्रमाणे त्यांना योग प्राप्त झाला आणि त्यांच्याकडे कधी न येणारी एक साधी व्यक्ती त्यांच्या घरी आली. त्याने बाबांना विचारले कि, तू कुठे जात आहेस. तेव्हा बाबांनी वरील घडलेला प्रकार त्या व्यक्तीजवळ कथन केला. ते त्यांना म्हणाले, मी मांत्रिकाकडे जात आहेत. हे ऐकून त्या व्यक्तीला दया आली. ते बाबांना म्हणाले, तुम्ही कशाला जाता, माझ्याजवळ 'परमेश्वरी कृपा' संपादन करण्याचा एक मंत्र आहे तो एका संन्याशाने दिलेला मंत्र आहे. त्याचा विधी केल्याने परमेश्वरी कृपा संपादन करता येते आणि सर्व दुःखाचे निवारण होते. त्या मंत्रांने जर मी कोणालाही तीर्थ करून दिले तर त्याचे दुःख दूर होऊन तो चांगला होतो. असे मला बरेच अनुभव आलेले आहेत. तेव्हा बाबांनी त्या व्यक्तीला विचारले ती हा संन्याशाचा मंत्र तुमच्याजवळ कसा आला. कारण तुम्ही तर संन्याशी दिसत नाही. तेव्हा त्यांने उत्तर दिले की, माझे वडील हे एका संन्याशाबरोबर राहत होते.
. तो संन्याशी मरण पावल्यानंतर माझ्या वडिलांनी त्याच्याजवळ असलेले सर्व ग्रंथ घरी आणले. वडिलांनी हनुमानजीच्या या मंत्राद्वारे अनेकांचे दुःख दूर केले. हे करीत असताना ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे झालेत. मी स्वतः या मंत्राचा विधी कधी केली नाही. ज्यांनी ज्यांनी हा विधी केला व करण्याचा प्रयत्न केला त्यातील काही विधी करताना मरण पावले तर काही पागल झाले. त्यानंतर बाबा विचारात पडले आणि त्यांनी मांत्रिकाकडे जाण्याचे रद्द केले. थोडा वेळ थांबून तो मंत्र आणि त्याचा पत्ता बाबानि त्या व्यक्तीकडून लिहून घेतला. ती व्यक्ती मौदा या गावात राहणारे होती. त्या मंत्रांनी तीर्थ तयार करून ते मारुतराव यांना पिण्यास दिले. तीर्थ घेण्यानंतर मारुतरावांना समाधान वाटले. त्यामुळे बाबांच्या मनात आले की, आपण किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी या मंत्राचा विधि पूर्ण करावा आणि आपल्या कुटुंबाला होत असलेल्या दुःखातून मुक्त करावे. कशाप्रकारे बाबांना भगत प्राप्तीचा मार्ग सापडला. यावेळेस बाबा एन तारुण्यात म्हणजेअवघे चोवीस वर्षाचे होते.
भगवत प्राप्तीचा मार्ग सापडला ही माहिती लिहितांना काही चुका झाल्यास भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, महान त्यागी बाबा जुमदेवजिला क्षमा मागतो, माता वाराणसी आईला क्षमा मागतो, मार्गदर्शक, सेवक, सेविका, बालगोपाल यांना क्षमा मागतो.
*********************************************
Leave a Comment