परमात्मा एक अनुभव

           (माझा सत्य अनुभव)


परमात्मा एक अनुभव
परमात्मा एक अनुभव

  ______ मला मार्गात जीवनदान मिळाले______


  ||  भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम ||
   || महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम ||
                   || परमात्मा एक ||
माझे पूर्ण नाव:- चेतन बालूजी महाबुदे
रा. दहेगाव (गो.)   त. सेलू.  जी. वर्धा

माझे मार्गात येण्याचे कारण मी सांगायला जात आहे.


          माझ्या घरात पाच सदस्य राहतात. मी, आई, बाबा, बहीण, आणि आईची आई म्हणजे माझी आजी असे पाच सदस्य राहतात.
         माझ्या घरी भूतबादेचा चा त्रास होता त्यामुळे आम्ही या मानव धर्माशी जुळलो. माझ्या आईला भूतबादेचा त्रास होता माझ्या आईला एक भुरकट रंगाची एक व्यक्ती तिला एकटीलाच दिसायची. जेव्हा आम्ही जुने घर विकून नवीन घर घेतल्यानंतर तीन वर्षानंतर माझ्या आईला तो त्रास सुरू झाला. माझ्या आईला तो व्यक्ती एकटीलाच दिसायचा आणि तो माझ्या आईला मरण्यास सांगायचा की तू काही पण कर आणि मर असा म्हणायचा. तो माझ्या आईला सगळ्या मारण्याच्या वस्तू खान्या योग्य असलेले असे सर्व वस्तू मरण्यास आणून द्यायचा आणि माझी आई खायची असं करता करता जे तो द्यायचा ते  माझी आई खायची माझ्या आईने उंदराचे लेंड्या, ईजगूर, जळलेले आ़़ईल, रॉकेल, नस, बेसरम चे पान-फूल खूप काही खाल्लं पण  तिला भूतावरी असलेले तिला काहीच उपयोग झाला नाहीत.
तिला नागपंचमीच्या दिवशी तिच्यासोबत साप सुद्धा बोलला. की तू माझ्यासोबत पंढरपूरच्या वारीला चाल 
असं माझ्या आईला साफ म्हणत असत. मग माझ्या आईने असे उत्तर दिले की ह्या वर्षी माझ्या मुलांना व पतीदेवाला
माझ्या हातच्या करंज्या लाडू खाऊ घालतो मने त्यानंतर  मग तुझ्यासोबत येईल मने त्यानंतर आम्हाला तिच्या अशा वागणुकीतून आम्हाला थोडं थोडं कळायला लागलं. मग आम्ही तिच्या उपचारा करिता आम्ही देव, धर्म, पूजा अर्चना वैदवानी, डॉक्टर हे सगळे आम्ही करून थकलो. त्यानंतर शेवटला प्रसंग असा घडला की तो म्हणजे.
       १४ ऑगस्त २०१५ ला माझ्या शेतामध्ये निधन्या करिता बाया होत्या तर त्यादिवशी ४:०० वाजता माझी आई शेतामधी असतानी. बाहेर जातो म्हणून सांगून आई त्याच्यापासून दूर निघून आली. आणि दूर आल्यानंतर आईला तो व्यक्ती मिळाली आणि त्यांनी माझ्या आईला डुक्कर मरण्याचं थिमेट असते ते माझ्या आई प्रसाद होय म्हणून तिला खाण्यासाठी दिले आणि आईने थिमेट खाल्ले.
त्यानंतर सर्व जण काम झाल्यावर 
इथे आणलं ते माझ्या आईचं माहेर, घरी येण्याअगोदर डॉक्टर मने की तुझ्या आईचा आवाज कधीच नाही येणार म्हणे, कायमचा आवाज गेला म्हणे, मी अजून पुन्हा भगवंताला योग मागितला व म्हटलं माझ्या आईचा आवाज वापस येऊ द्या म्हटलं. तर काय माझ्या आईचा आवाज  दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर आवाज आईला यायला लागला. व आम्ही आईला दवाखान्यात नेले व डॉक्टरांना दाखविले तर काय माझ्या आईचा आवाज यायला लागला व डॉक्टर लोक आमच्याकडे आश्चाने ने बघू लागले. व त्यानंतर मी माझ्या बाबासाठी योग मागितला की माझे बाबा चांगले होऊन चालत घरी वापस आले पाहिजे असे म्हटलं तर माझ्या बाबाचा न जगणारा जीव जिवंत होऊन चालत घरी वापस आले. अशा प्रकारे आमचा वरचे दुःख क्षणात दूर केले. व आम्हाला भगवंत मिळाला, मग आम्ही पूर्ण कुटुंब श्री. सदानंदजी तलमले यांच्या घरी जाऊन आम्ही कार्य घेतले. आज आम्ही आज दि. २८ मार्च २०२० ला वार. शनिवार नव्हे हवन आमच्या निवासस्थानी पार पडले. व आम्ही सुख समाधानीने जीवन जगत आहोत.
नमस्कार जी....
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

परमात्मा एक सेवक,
चेतन बालूजी महाबुदे. 
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपुर.
सेवक नंबर:- ५०४४७
मार्गदर्शक:- श्री. सदानंदजी तलमले काकाजी.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

[ टिप :- वरिल अनुभव कुणीही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावा.]

भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृपेचे अनुभव गृपवर प्रसारित करण्याकरिता खालील नंबरवर संपर्क साधावा....
गजानन दादा    :-  9850675766
वैभव दादा   :-  9623026362
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सौजन्य :-

"अँडमिन,सेवक, सेविका",
परमात्मा एक  एकता परिवार,
{वाट्स अँप गृप & 
फेसबुक पेज:www.fecebook.com/parmatmek435.com 

तसेच चॅनल:- https://m.youtube.com/channel/UCutN3hiwlV97ro0pEh0PqZw

युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
प.पु.परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपुर.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


No comments

Powered by Blogger.