Parmatma Ek Prathna | सायंकाळची प्रार्थना.. परमात्मा एक |
![]() |
Parmatma Ek Prathna | सायंकाळची प्रार्थना.. परमात्मा एक |
|
मानव धर्माची सायंकाळची प्रार्थना
भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम ।
महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम ।
परमात्मा एक ।
भगवत प्राप्तीकरिता, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता, बाबांनी चार तत्व दिले आहेत.
1) परमात्मा एक।
2) मरे या जिये भगवत नामपर।
3) दु:खदारी दूर करते हुये उध्दार।
4) इच्छा अनुसार भोजन।
बाबांनी भगवत गुणांचे ३ शब्द दिले आहेत. आपल्या कुटूंबात व सेवकांत
1) सत्य बोलणे
2) मर्यादा पाळणे
3) प्रेमाने वागणे
जीवनात चालण्याकरिता, गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी पाच नियम दिले आहेत.
1) ध्येयाने एक परमेश्वर मानणे.
2) सत्य, मर्यादा व प्रेम सेवकांत तसेच कुटूंबात कायम करणे.
3) अनेक वार्इट व्यसन बंद करणे.
(दारू, टॉनिक, सट्टा, जुआँ, लॉटरी, पट्टाची होड, कोंबड्यांची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे, बंद करणे)
स्त्रियांनी मुलांना व पतीदेवाला वाईट शब्दात
बोलू नये. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन बंद करणे.
4) कुटूंबात व सेवकांत एकता कायम करणे.
5) आपले कुटूंब मर्यादित ठेवणे.
याशिवाय बाबांच्या आदेशांचे वेळोवेळी पालन करणे.
मरे या जिये भगवत नामपर |
मरे या जिये भगवत नाम पर |
मरे या जिये भगवत नाम पर |
भगवान बाबा हनुमानजी की जय ।
महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय ।
परमात्मा एक ।
सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले ।
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले ।
मानव धर्म की जय ।
सर्व सेवक दादा ताईला तसेच बालगोपाल यांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी.

𝓝𝓪𝓶𝓪𝓼𝓴𝓪𝓻 𝓳𝓲
ReplyDelete