मार्गात आलो धन्य झालो, मिळाला भगवत कृपेचा आधार, सुखि समाधानी झाला घर परिवार ].. परमात्मा एक

  👉▶️आजचा अनुभव▶️👉


परमात्मा एक सेवकांचा अनुभव



👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾
 !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
 !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !
 !! परमात्मा एक !!

▶माझा सत्य अनुभव▶

                         
सर्व सेवक दादा व सेवकीन ताईला  माझा नमस्कार जी.
            
[ मार्गात आलो धन्य झालो, मिळाला भगवत कृपेचा आधार, सुखि समाधानी झाला घर परिवार ]

माझे पूर्ण नाव:- सचिन इंद्रपालजी मस्के असुन मी सध्या मु.मारोडी येथे वास्तव्यास आहे.
मानवधर्म एकता परिवार या भगवत कार्याचा गृपवर हा माझा प्रथम अनुभव सादर करीत आहे.

पहा सेवकांनो जेव्हा परिवारात दुःख येतात तेव्हाच सर्वांना या मार्गाची आठवण येते अन्यथा नाही. कोणिच कामी पडत नाही कोणताच देविदेवता धाऊन येत नाही ,पैशाने पुर्ण  बर्बाद झाल्यावरच मानवधर्माची आठवण येते माझ्यासोबत सुद्धा हाच प्रकार घडला तो असा की फार दुःखाची गोष्ट आहे कि दि. 2/7 /2007 ला दिवस रविवार त्या दिवशी आमच्यावर फार मोठे संकट कोसळले आम्ही शेतावर असतांनी पेरणीचा तास शुरू होता तेवढयात खुप असे विजेचा गड़गड़ाहट व पाऊस सुरू झाला व पाऊस आल्यामुळे आम्हीं लपण्यासाठी एका दूसरा शेजारच्या शेतात गेलो नंतर तेथे सर्व माझा परिवार होता  त्या मध्ये माझे वडील आई काका काकू आणि त्या मध्ये मी सुध्दा होतो शेजारचे शेतकरी  सुध्दा होते   तिथे बसताच खुप खूब मोट्या आवाजाने विजेचा धक्का पोहचला तेथे माझे काका आणि शेजारचे  शेतकरी जेवण करण्याकरिता बसले होते आम्हीं त्यांच्या मागे बसले होता परंतु असा  एक आश्चर्याची धक्का पोहचला माझा काकाच्या अंगावर विज पडुन माझे काका स्वर्गवासी झाले व त्यामुळे  माझा परिवारा वर खूब मोटा संकट आला व या धक्क्या मुळे माझा आईच्या मनावर विपरित परिणाम झाला व यामुळे आई ची प्रकृति ठिक राहत नव्हती यानतंर आम्ही देवी देवतांचे पूजन केले वैध वाणी केले त्यांनी आम्हांला बाहर चा आहे म्हणून सांगितले दवाखाना करुन ही आराम लागत नव्हता म्हणून आम्ही प्रभाकरजी मस्के यांचा कडे गेलो त्यांनी या मार्गाबद्दल मार्गदर्शन केले आम्ही घरी आल्यावर एकत्र बसुन विचार केला व ठरविले की आता मरायचेच आहे तर या मार्गात येऊनच मरायचे.

सर्वानुमते ठरल्यानंतर खुशालजी फलके नावाचे सेवकासोबत  मार्ग घेण्याकरिता श्री पांडुरंग जी मदनकर काकाजी यांच्या कडे गेलो त्यांनी सर्व प्रथम आम्हांला तीन दिवसाचे कार्य दिले या तीन दिवसाच्या कार्यामध्ये पूर्णपणे आराम झाला काही दिवसानंतर  *"शब्द हे भगवान आहे शब्द हे शैतान आहे"* या मनी प्रमाणे पुन्हा दु:ख आले मी शेतावर होतो त्यावेळेस पाऊस आला व  पाऊस आल्यामुळे शेतावर ओला झालो त्या मुळे माझी प्रकृति बिगड़ली व प्रकृति बिघडल्या मुळे माझे वडिलांनी म्हटले की मरते तर मरू दे याला या शब्दामुळे  माझी प्रकृती ६ महिने  खराब राहाली औषध उपचार करुण ही आराम लागत नव्हता नंतर चुकी लक्षात आल्यामुळे आम्ही भगवतांला आणि बाबांला क्षमा मागतिले तिर्थ घेतला या तिर्थात आराम झाला आता सुखी समाधानी आहो असच सुख समाधानी मिळो.

काही कालावधिनंतर मार्गदर्शक यांच्या शब्दावर त्यागाचे कार्य घेतले व कार्य व्यवस्थित पणे पार पडले बेचाळीस दिवसाचे कार्य संपन्न झाल्यावर त्यागाचे हवन कार्य दिनांक १७/११/२०१० ला संपन्न झाले अशा प्रकारे माझा परिवार आता सुखसमाधानाने जिवन जगत आहो बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करित आहो.

 माझा अनुभव लिहिण्यात काही चुका झालेल्या असतिल तर मी भगवान बाबा हनुमान जी माफी मागतो महानत्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मागतो मातोश्री आई वाराणसी आईला माफी मागतो सर्व सेवक दादा व सेवकिन ताईला माफी मागतो.

 सर्वाना माझा नमस्कार जी.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*सेवक* :- सचिन इन्द्रपालजी मस्के          
 *पत्ता*:-मु .पो. मारोडी त.मौदा जि.नागपुर.
*सेवक क्रं* :-   २४७०३
*मार्गदर्शक*:- मा. श्री पाण्डुरंगजी मदनकर काकाजी मु. मौदा
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपुर.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अनुभव लेखन व संकलण:- मोहन दादा आस्वले
अनुभव एडिटिंग :-  गणेश दादा बिडकर

         *[वरिल अनुभव कुणिही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावा.}*

*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*

गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
                   🔴सौजन्य🔴
   🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार,
[Wats app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवक सेविकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.