भगवंताला आवडणारा प्रथम गुण म्हणजे सत्य. सत्य हेच परमेश्वर आणि परमेश्वर हेच सत्य आहे.

____सत्य_____                               


          जीवन जगणे ही एक कला आहे. या कलेचा मुख्य पैलू म्हणजे सुंदर आणि सुरेख विचाराचा फुलोरा मनात सातत्याने फुलवत ठेवणे हा होय.
तर मग आपल्या मनात सुंदर आणि सुरेख विचार कसे येतील ?
बाबांनी दिलेल्या तीन शब्दाने वागले की आपले विचार चागले होतात. विचार चागले झाले की आपल्या आकारातील विकार बाहेर पडतात आणि आपल्या आचरणात सुधारणा होते.
मनुष्याच्या खरा गैरव त्यांच्या विचारातच असतो. म्हणुन सेवकांनी सदैव असे प्रयत्न करावे की आपले विचार चागले होतील. बाबांनी अपल्या ला भागवत गुनांचे तीन शब्द  दिले आहेत. आपण परमेश्वराला कधीही आकारामधे पाहीलेले नाही. बाबा पण मार्गदर्शनाद्वारे नेहमी म्हणायचे की भगवंत दिसत नाही तर त्याचे गुण दिसतात व याच तीन शब्दामुळे आपण परमेश्वराला जाणून घेऊ शकतो.
भगवंताला आवडणारा प्रथम गुण म्हणजे सत्य.सत्य हेच परमेश्वर आणि परमेश्वर हेच सत्य आहे.
आपण नेहमी ऐकत असतो की सत्य हे कडू असते. आपण भौतिक जगात वावरत असताना दररोज मोठ्या प्रमाणात खोटेपनाचा,फसवणुकीचा, वेव्हार चालतो आणि सत्य आपल्याला वास्तविकता दाखवीते म्हणून ते आपल्याला कडू वाटते.

सत्य हेच परमेश्वर आणि परमेश्वर हेच सत्य आहे.
सत्याचे आचरण

महानत्यागी बाबा जूमदेवजिंनी सागितले आहे की सत्य ही भगवान है, जो सेवक सत्य का आचरण अपने जीवन मे पायेगा भगवान चोवीस तास उसके साथ रहेगा...

सत्य बोलने ही एक कला नाही, शिक्षण नाही, तर ती आपली प्रामाणिकता आहे.
बाबांनी सांगितले आहे की तात्पुरत्या समाधानी करिता दुसऱ्या व्यक्तीची खोटी प्रशंसा करणे व नंतर त्या व्यक्तीबद्दल इतरांना सांगत फिरणे ही खूप मोठी चूक आहे जर आपण कोणत्याही व्यक्तीशी, सेवकांशी बोलताना खरे बोलावे एका वेळेला त्या व्यक्तीला सेवकाला वाईट वाटेल पण खरी समाधानी मात्र त्यांना तेव्हाच मिळेल. आपण जर आपल्या परिवारामध्ये नेहमी सत्याची वागणूक ठेवू सत्तेचे व्यवहार ठेवू तर आपली ग्रहस्थि ही उंचावर राहील व जीवन हे सुखी-समाधानी राहील. सत्य हे कधीही  ठरवलेले नसते. सत्य ही फसवणूक नसते. सत्य हे आत्मेमधून निघालेले खरे बोल आहे. जे कधीही ही पाठांतर करावे लागत नाही. व त्याकरीता आपले ध्येय एवढे मजबूत असावे की एखाद्या गोष्टीबद्दल झोपेत जरी विचारले तर तेच उत्तर आपल्याकडे असावे. जे आपण अगोदर सांगतो. व यालाच आपल्या अंतरात्म्याचा भाग म्हणतात. म्हणून बाबांनी आपल्याला ही सत्तेची वागणूक जोपासून ठेवण्यास सांगितली आहे कारण सत्य, मर्यादा, व प्रेम हे सत्ययुगातील तीन पाऊल-आहे जे वामन अवतार यांनी साऱ्या जगाला जाणवले आहे.           
सत्य, मर्यादा, प्रेम यामुळे मोह, माया, अहंकार,  नंतर यावर विजय होतो.

मानव हा समाजशील प्राणी आहे व त्याला समाजाशी जुडूनच कार्य करावे लागतात. त्यामुळे त्याला समाजाशी वस्तू, विचार, भावना, याची देवाण-घेवाण करावीच लागतेच. त्यामध्ये गुंतून जाऊन सेवक कधी कधी खोटेपणायाला बळी पडतो व स्वत:वर दुःख ओढून घेतो व
म्हणतात ना एक सत्य लपविण्यासाठी अनेक असत्य त्याच्या मुखातून निघतात व तो स्वत:ला परमेश्वरी कृपेपासून दूर करतो व दुःखास पात्र होतो.

‌सत्य म्हणजे परमेश्वर व परमेश्वर प्रत्येकाच्या शरीरात आहे मग सेवक कशाकाय  सत्याची साथ सोडून असत्याच्या  मार्गावर लागणार भगवंताला फक्त सत्तेची गोडी आहे व ज्याच्या मुखी सत्य तोच भगवंताला प्रिय असतो व भगवंत त्याच्या पाठीशी सदैव असतो.
‌ एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की "सत्य झाकले जाईल पण मावळले कधीच जाणार नाही"
‌ सत्ते हे सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी असते. प्रखर असते
‌ इतरांनी सत्य नाहीसे करण्याचा प्रयत्न केला तरी ते नाहीसे होत नाही. फार तर काही काळ लपविले जाते.
‌ पण एक ना एक दिवस सेवकांनसमोर येतेच.

‌ निखाऱ्यावर राख साठली, म्हणजे तो मावळला असे होत नाही, फुंकेने राख उडताच त्याची दाहकता जाणवू लागते, सूर्यढगा खाली झाकला म्हणजे तो मावळला असे होत नाही. ढग बाजूला होताच तो तेजाने तडपू लागतो. सत्तेचे ही तसेच असते, आता आपल्यालाच ठरवायचे असते की एक असत्य बोलवून व त्या असत्याच्या खाली दबून भगवंताला दूर करायचं की नेहमीच सत्य बोलून भगवंताच प्रिय बनून सुर्यासारखे तेजस्वी बनायचे आहे.

‌ दररोज आपण हजारो सेवक सत्याच्या मार्गाने चालण्याचा विचार करतोय पण त्यापैकी १०० सेवकचं सत्याच्या मार्गाने चालतात. बाकी ९०० सेवक विचार करून थांबून जातात. जे १०० सेवक सत्याच्या मार्गाने चालतात त्यापैकी फक्त १० सेवक सत्यापर्यंत पोहोचतात, बाकीचे ९० सेवक रस्त्यातच भटकतात किंवा त्यांची दिशाभूल होते. व जे १० सेवक सत्यापर्यंत पोहोचतात त्यापैकी फक्त एकालाच सत्याची प्राप्ती होते. कारण ते सत्य आहे व म्हणूनच म्हटले जाते की, सत्य हे एकमेव आहे. सत्तेचे दुसरे स्वरूप असुस शकत नाही. सत्य हे सत्यच असते.

‌ परमेश्वर एक आहे, महानत्यागी बाबा जुमदेवजी एक आहेत

‌ त्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही किंवा होऊ शकत नाही.

म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवजिंनी सेवकांना म्हटले आहे की १०० खोटे बोलण्यापेक्षा एकच सत्य बोला आणि स्वतःची कर्मभोगातुन सूटका करा. कारण सत्य हेच परमेश्वरी गुण आहे आणि परमेश्वराचे स्वरूप आहे.

ज्याप्रमाणे जिंकण्याची इच्छा तर सर्वांनाच असते. पण त्याकरिता मनाची तयारी करण्याची इच्छा फार कमी मी लोकांकडे असते. अगदी त्याच प्रमाणे मार्गात आल्यानंतर आपल्याला समाधान मिळावे आणि परमेश्वराचा वास सदैव आपल्या घरी असावा अशी इच्छा प्रत्येक सेवकांना असते. पण त्याकरिता मनाची तयारी म्हणजेच बाबांनी दिलेल्या तीन शब्दाचे पालन करण्याची इच्छा प्रत्येक सेवकाकडे नसते म्हणून ज्या घरी बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाचे.                                 

आचरण आहे तिथे भगवंताचा वास आहे आणि परमेश्वर त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढतो.
सत्याला स्पष्ट करायचे म्हणजे असे भरपुर उदाहरण इतिहासात आणि पुराणात ऐकलेले आहेत. जसे सत्यवादी राजा हरिश्चंद्र, पण त्यांच्याबद्दल आपण फक्त ऐकलेले आहे.

‌कधी डोळ्यांनी बघितले नाही. परंतु सत्तेचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबांचा पूर्ण जीवनप्रवास आपल्या डोळ्यासमोर आहे.  महानत्यागी बाबा जुमदेवजींनी  ज्याप्रमाणे वचन दिले की, मी या सर्व गरीब, दुःखी, कष्टी लोकांची आयुष्यभ इमाने-इतबारे सेवा करीन. बाबांनी हे वचन आयुष्यभर पाळले व निष्काम आणि  निस्वार्थ कार्य केले. आज कोणीही सेवक

‌किंवा अनेकातील व्यक्ती बाबांवर बोट उचलू शकत नाही. बाबांनी आयुष्यभर सत्याने कार्य केले म्हणूनच ही भगवंतकृपा बाबा परमेश्वरात विलीन झाल्यानंतर ही‌ २४ तास जागृत आहे. आणि सेवकांच्या शब्दावर उभी राहून त्यांचे दुःख दूर करते. यापेक्षा सत्तेचे योग आणि परिणामकारक उदाहरण दुसरे कोणतेही असू शकत नाही. हेच सत्य आहे.
https://parmatmek435.blogspot.com/2020/05/blog-post_78.html?m=1
भगवान बाबा हनुमानजी..

No comments

Powered by Blogger.