[ माझा सत्य अनुभव ] परमात्मा एक. PARMATMA EK

    👉▶️आजचा अनुभव▶️👉


PARMATMA EK IMAGE PHOTO

  ▶माझा सत्य अनुभव▶


 
👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾
 !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
 !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !
 !! परमात्मा एक !!

  ▶माझा सत्य अनुभव▶       


माझे पुर्ण नाव :- गजानन केशवरावजी लेन्डे आहे. मी आज मानवधर्म एकता परिवार  गृपवर मार्गात आल्यावर चा अनुभव सादर करीत आहे.


आमच्या घरी त्यागाचे हवन कार्य होवुन मासिक नऊ हवन कार्य पार पडले.त्या नंतर एक वर्षाच्या नंतर माझी लहान मुलगी खुशी ही दोन ते अडीच वर्षांची असेल तेव्हा ती बाजूच्या घरी खेळत होती आणि त्या घरीच हनुमान जी चे मंदिर आहे. त्या मंदिरात मुलगी खेळत होती आणि तिथे अगरबत्ती ची रक्षा खात असेल तर आम्हाला माहीत नाही.आणि आमच्या कडे गाय पण होती तर आमच्या कडे गोमुत्र आणि शेनाच्या गवरी करता कोणी पण येत होते. आणि आम्ही त्यांना गोमुत्र आणि शेनाची गवरी देत होतो व त्याचे काही पण पैसा वगैरे घेत नसल्यामुळे ते पन आमच्या कडुन चुकी झाली. तर आम्हाला ते कळले नाही आणी एक दिवस झाले असे की माझी मुलगी खुशी नेहमी प्रमाणे खेळत होती आणि खेळताना बाहेर बसून होती मी तीच्या कडे पाहाल तर ते तोंड फिरवून माझ्या कडे पाहुन राहीली होती. मला वाटल की ती नाटक करत आहे.मी जवळ गेलो आणि तीला उचलून घरी आणले तर तीची आई म्हणाली की ही मुलगी खेळाला गेली आणि काही खांल नाही म्हणून तीला बिस्कीट दील तर ते गीळत नव्हती पाणी पाजले तर पीत नव्हती आणि तोंड परत फिरवून तोंडातून लाळ गाळत होती.हात पाय पण वाकडे तिकडे करत होती आम्ही घाबरलो.आणि आमच्या कडे दिनेश दादा मारबते बाबा चे सेवक हे आम्हाला काही समजत नव्हते तर ते मार्गदर्शन करायचे तर मी त्यांना घरुन फोन केला दिनेशभाऊ म्हटलं तुम्ही कुठे आहे. तर ते म्हणाले की काय झाल जी मी त्यांना सांगितले की खुशी कशी तरी करत आहे भाऊ ते ताबडतोब आमच्या कडे आले आणि तीला जवळ घेवुन पाहल तर ते एकदम चांगली होती.

दिनेश दादा म्हणाले की ही मुलगी नाटक करत आहे काही नाही झालं काही घाबरू नका आणि मग आम्ही चहा पीत बसलो होतो तेव्हा ती परत तसेच करायला लागली. दिनेश दादा म्हणाले की तीला झटके येत आहे. तर त्यांनी विचारले की चुका झाल्या का तर सांगा आम्हाला काय झाल कळत नव्हतं आणि त्यांनी मार्गदर्शक सदानंदजी तलमले काकाजी ला फोन केला तर ते म्हणाले की तीला तिर्थ रक्ष करून द्या तर आम्ही तीर्थ रक्क्षा दीली तर ते पण गीळत नव्हती मग दिनेश दादा म्हणाले की तीला सचिन पावडे च्या दवाखान्यात घेऊन जा आणि ती ला दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टर म्हणाले सीटीकॅन आणि ईसीजी करून रिपोर्ट आल्यावर पाहु तर डॉक्टर च्या म्हणण्या प्रमाणे टेस्ट करून सीटीकॅन चा रिपोर्ट आणुन दाखवला तो नार्मल आहे असे सांगितले मग ईसीजी चा रिपोर्ट आल्यावर पाहु असे सांगितले दोनशे रुपये फी घेऊन एकही औषध उपचार न करता घरी घेऊन जा असे म्हटले व मुलीला घरी आनल्यावर परत ते तशीच करायला लागली मग आम्ही डाॅ. कश्यप यांच्या दवाखान्यात नेलं तिथे त्यांनी सांगितले की सकाळ पासून जेवन केल नाही म्हणून तीला कमजोरी आली आहे. मग सलाईन लावली इंजेक्शन दिले मग डाॅ.ने सांगितले की घरी घेऊन जा आम्ही फीस देण्यासाठी गेलो तर परत तीला झटके येत होते मग डाॅ. म्हणाले की तुम्ही सावंगी किंवा सेवाग्राम ला ताबडतोब घेऊन जा डाॅ. फीस कीती झाली तर सांगा तर ते म्हणाले की नाही पाहिजे पहीले ताबडतोब जा मग आम्ही घरी आलो आणि तलमले काकाजी ला फोन केला आणि सांगितले की मुलगी तशीच करत आहे.  त्यांनी सांगितले की तुम्ही किलबिल (खंनके च्या)दवाखान्यात घेऊन जा डाॅक्टरशी काकाजी बोलले आम्ही गेलो तर त्यांनी सांगितले की तीला भरती करून घ्या डाॅ. म्हणण्या प्रमाणे भरती केले तिथे सलाईन लावून दीली काही वेळा तंच सायंकाळी तलमले काकाजी आणि काकू दवाखान्यात आले .आम्हाला त्यांनी सांगितले की काही चुका झाल्या असतील तर निरीक्षण करा आणि काकाजी  डॉक्टरांना भेटायला गेले तर ते म्हणाले की तीला फिट सारखा आजार आहे.तर तीला बारा वर्ष औषधी सुरू ठेवावे लागते.औषध दिले नाही तर फिट कधी पण येऊ शकते. तर त्यांनी एक महिन्याची औषधी दीली तर ते आम्ही पुर्ण औषध अगोदरच घेतलं होतं आणि काकाजी मला म्हणत होते  डॉक्टर म्हणतात की औषध बंद करता येत नाही कस करायचे मी म्हटल ठीक आहे आपण एक महिन्याची औषधी घेतलेली आहे ते देऊन झाले की मग पाहु तर काकाजी म्हणत होते की ठीक आहे.

 मग परत काकाजी डॉक्टरला भेटायला गेले तर ते म्हणाले की औषध पुर्ण बंद केली तर जमत नाही तर आपण औषध कमी कमी करत बंद करून पाहु जर असे काही झाले तर मग पुर्ण कोर्स बारा वर्ष औषधी सुरू ठेवावे लागते. तर आम्हाला तलमले काकाजी म्हणत होते की काही होत नाही पाहु भगवंत आहे. तर आम्ही जे औषध होती ते दीली नंतर त्या आजारा करता तीला नेल नाही आता ती नऊ वर्षाची आहे. तीला अश्या प्रकारे कोनता ञास नाही. अशी ही भगवंताची महिमा आहे. आणि मार्गदर्शक काकाजी चे मार्गदर्शन मिळाले त्या प्रमाणे आम्ही कोनता ही मणात विचार केला नाही की काही होनार तर नाही. मरे या जिये भगवत नामपर या वचना प्रमाणे.

माझ्या कडुन लिहीण्यात काही चुका झाल्या असतील तर भगवान बाबा हनुमान व महानत्यागी बाबा जुमदेवजी तसेच मातोश्री वाराणसी आईला क्षमा मागतो व सर्व सेवक दादा व ताईला क्षमा मागतो. क्षमा करा.

सर्वांना माझा नमस्कार.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*सेवकाचे नाव :- गजानन केशवराव लेंडे*
*पता  :- रामनगर,भगतसिंग चौक,वर्धा*
*सेवक क्र. :- 25833*
*मार्गदर्शक :- मा.सदानंदजी तलमले काकाजी वर्धा परिसर*
*परमपुज्य परमात्मा एक*
*सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपुर*

••••••••••••••••••••••••••••••••••
*अनुभव एडिटिंग:-*
*गणेश दादा बिडकर*
*रोशन दादा काटेकर*

*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*

गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
                   🔴सौजन्य🔴
   🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार,
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.