अंधश्रध्दा व वाईट व्यसनातु मुक्त करूनी - नवीन जीवनाची सुरुवात करुण दिली, बाबा तुमच्या तत्व शब्द नियमांनी.. परमात्मा एक मानव धर्म एकता परिवार

👉▶️आजचा अनुभव▶️👉


परमात्मा एक अनुभव

👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾
 !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
 !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !
 !! परमात्मा एक !

मार्गात येण्याचे कारण आणि मार्गात आलेला अनुभव.

=================
"माझा सत्य अनुभव" मानवधर्म एकता परिवार गृप या अनुभव मालिकेत माझा हा पहिला अनुभव आहे यात मी मला मार्गात आलेला अनुभव सांगत आहे.

【 अंधश्रध्दा व वाईट व्यसनातु मुक्त करूनी - नवीन जीवनाची सुरुवात करुण दिली, बाबा तुमच्या तत्व शब्द  नियमांनी 】

           _मार्गात येण्या अगोदर माझ्या कुटुंबात माझे आई=वडील ,मि व माझा लहान भाऊ असे ऐकुन 4 सदस्य आहोत, या मार्गात  येण्याचा निर्णय माझ्या आई चा होता तेव्हा मि जवळपास 16 वर्षाचा होतो,_
माझे वडील  कुटुंबामध्ये कमवते व्यक्ति एकटेच होते माझे वडील मच्छीचा व्यवसाय करतात त्या व्यवसायातून मिळणारा पैसा वरुण आमचे घर चालत होते पण माझे वडील बाजारामधे मच्छी विकुन झाल्या नंतर आपल्या मित्रा सोबत दारू पियाल जायचे व मित्रांना सुद्धा दारू पाजायेचे  रात्रि वाजेपर्यंत  घरि यायचे आई जेवन वाडताना माझे वडील म्हणायचे आज काशची भाजी केली म्हणून विचारांचे आईने म्हटले कारली ची भाजी आणि वरण केला आहे माझे वडील मनायचे कोन करायला सांगितले तुला ही भाजी असे मनायचे  त्यांना राग यायचा मग आई ला शिव्या गाळ आणि मारायचे मि बघताना मला खुप वाईट वाटायचे माझी आई खुप रडायची आणि माझ्या वडिलांचे त्रास सहन करायची हे दुःख माझी आई कोणालाही सांगत नव्हते एक दिवस रात्रि नेहमी प्रमाणे माझे वडील दारू पिऊन आले, आणि आई,मला, व माझ्या लहान भावाला घराच्या बाहेर काढले आणि आईला मारल सुद्धा आई,मि व माझा लहान भाऊ रडत रडत घराच्या बाहेर गेलो मग माझे मोठे बाबा टीकाराम दुमाने यानी रात्र भर आम्हाला आपल्या घरी आसरा दिला ,आणि सकाळी माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मोठे बाबांनी माझ्या आईला वाचवल आणि मोठे बाबांनी माझ्या घरी जाऊन माझ्या वडिलाना समजावले पण माझ्या वडिलाची सतत 10 वर्ष दारू सुटली नाई सतत आम्हाला माझ्या वडिलांचे त्रास सहन करावे लागले,माझ्या वडिलांनी दारू सोडण्यासाठी औषध सुद्धा खाली तरी पण 7 दिवस दारू नाई पीली  मग पुनः दारू प्यायला सुरुवात केली या दारू पासून आमचे कुटुंब उध्वस्त झाले होते,
            भरपूर पैसा या दारू मध्ये माझ्या वडिलांनी बरबाद केला, एक दिवस आमच्या घरी एक साधु आले आणि ते माझ्या वडिलांना म्हणू लागले तुमच्या घरी भूतबाधा केलेली आहे, तुम्हाला या या देवाला कोबड़े द्यावे  लागेल आणि पैसे द्यावे लागेल माझ्या वडिलांनी त्या  साधु वर विश्वास केला आणि पैसे व कोबड़े घेऊन दिले.पन दुसऱ्या दिवसी तो साधु परत आलास नाही, त्या साधुने आम्हाला लुटले अश्या प्रकारे आम्हच्या कुटुंबात अंधश्रद्धा होती.माझे काका मारोती दुमाने हे आमच्या घरा समोरस राहतात माझ्या काकाला भूतबाधा चा त्रास होता त्याच्या अंगामधे भुत येत होते ताजमेहंदी ची सेवा माझे मोठे बाबा टीकाराम दुमाने यांच्या घरी आहे ,त्याच्या घरी माझ्या काका ला भुत काढण्यासाठी न्यायचे काका च्या अगात आलेले भुत म्हणायचे मि अमुक अमुक आहो ते भुत आपला परिचय द्यायचे  आणि माझ्या काकाच्या अंगातुन निघून जायचे पण दुसऱ्या दिवसी परत यायचे सतत तेच कार्य कराये पण त्रास दरोज माझ्या काका ला व्हायच,एक दिवसी माझे मामा चिनेगाव वाले माझ्या काका ला बघण्यासाठी आले मामा हे परमात्मा एक चे सेवक होते   घराच्या सदस्यांनी त्यांना काका चा सपूर्ण त्रास व दुःख संगितले ,माझ्या मामा ने त्यांना मार्गदर्शका कडे  मरोतरावजी गोंधळे यांच्या कड़े नेला , आणि परमात्मा एक मार्ग त्यांनी स्वीकारला 3 चे कार्य पण दिले त्या कार्य मधे माझ्या काका ला परीपूर्ण समाधन झाले आणि समोरचे कार्य ते करू लागले माझ्या काका चे दुःख परीपूर्ण नाहिसे झाले.म्हणून या परमात्मा एक मार्ग वर माझ्या आई चा विस्वास बसला आणि माझ्या काका कडून या मार्गाची संपूर्ण माहिती घेतली , आईने मार्गात येण्याचा विचार केला ,रात्रि जेवन करतांना सर्व एकत्र होते आईने सांगितले की आपन मार्गात जाऊ माझ्या वडिलांनी होय म्हटले मला तर या मार्गची काहीही रूप रेषा माहित नव्हती,  सायंकाळी मार्ग घेण्यासाठी मारोतरावजी गोंधळे यांच्या कड़े गेले.
      त्यांनी सांगितले की तुम्हाला जुने देवी देवतांचे विसर्जन करावे लागणार आणि घराला नवीन पेन्ट करावे लागेल त्याच्या सांगीतल्या प्रमाणे माझ्या वडिलांनी जुने देवि देवतांचे नदी मध्ये विसर्जन केले आणि घराला  पेन्ट केला,मग आम्ही सर्व सदस्य मार्ग घेण्यासाठी गेलो आम्ही आपले दुःख त्यांना सांगितले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले.आणि 3 दिवसांचे कार्य दिले, त्या दिवसा पासून माझ्या वडिलांनी दारुला हात सुध्दा लावला  नाही आणि कुटुंबात असणारी अंधश्रद्धा व वाईट व्यसनाचा पारीपूर्ण  नाश झाला,चार वर्षा नंतर आम्ही त्यागाचे कार्य घेऊन आणि त्यागाचे कार्य बाबा हनुमानजी च्या कृपेने चांगल्या रीतीने पार पडले , व त्यागाचे हवन सुद्धा चांगले झाले, मार्गदर्शकांनि आम्हाला मासिक हवन कार्यची तारिक दिली ती तारिक 10 दिली आणि पुढील हवन १०/०७/२०१८ या तारखेला चांगल्या रीतीने  पार पडले , दुसऱ्या दिवसी माझा लहान भाऊ सकाळी लवकर उठला नाही  तर माझ्या आई ने त्याच्यावर रागावली व शिव्या दिल्या मग माझा लहान भाऊ उठला आणि अघोळ करून सकाळ ची विनंती केली तिसऱ्या दिवसी सकाळी माझ्या आई च्या गळ्यामधुन आवाज निघत नव्हता  व बोलता  नव्हते येत आई च्या गळ्यामधे बोलतानी त्रास होवायचे आणि बोलतानी आवाज पण छोटा निघायचा, माझ्या वडिलानी आईला डॉक्टर कड़े नेला डॉक्टर ने तपासणी केली आणि सांगितले की माझ्या आई च्या गळ्यामधे सूजन आली आहे असे डॉक्टर ने सांगितले व औषध दिली , 7 दिवस औषध खाली पण माझ्या आईचा त्रास कमी झाला नाही ,या औषधी उपचार मध्ये 5000 हजार रुपये खर्च झाले पण काहीही फायदा झाला नाही.
       मग मि मार्गदर्शकांना फोन केला आणि संपूर्ण दुःख त्याना सांगितले, त्यानी म्हटले तुझ्या आई ने चूक केली का ? मि म्हटले की आईने माझ्या लहान भावाला सकाळी उठला नाही तर शिव्या दिल्या म्हणून संघितले ,मार्गदर्शकांनी सांगितले की तुझ्या आई च्या बोलण्यात चूक झाली आहे तर भगवंनताला क्षमा मागायला सांगितले ,व त्यानी 3,7,11, चे तिर्थ व सूजन झाली आहे त्या जागी फुक मरन्यास सांगितले एक दिवस एक तिर्थ बनवायला संगीतले ,मग मि माझ्या वडिलांना संगतले ,तसे करायला  पण माझ्या आई ची मासिक पाळी होती ,तर आईला बसता येत नव्हते ,पुनः फोन केला मि मार्गदर्शकाला सांगितले त्यांनी म्हंटले कि बाजूला बसून मनातल्या मनात विनंती करण्यास सांग म्हटले आणि झालेल्या चुकाची सोडवनुक करण्यास सांगितले,त्यांनी  सांगीतल्या प्रमाणे आई आघोळ करून बाजूला बसली व मनातल्या मनात विनंती केली, व झालेल्या चुकाची क्षमा मागितली , मग माझ्या वडिलानी 3 फुका चा तिर्थ बनवून दिले ,त्या तिर्थ माझ्या आईला आराम होऊ लागला, दुसऱ्या दिवसी 7 च्या तिर्थ ने परीपूर्ण माझ्या आईच्या गळ्याला आराम झाला ,आणि माझ्या आईने भगवंताला व घरच्या सर्व सदस्यना वचन दिले की वाईट शब्दात कोणालाही बोलणार नाही, असे वचन दिले.

बाकीचे 8 हवन चांगल्या रीतीने पार पडले कोणतीही अड़चन आली नाही,

     मार्गात आल्यापासून आमचा परिवार पूर्णपणे सुखी समाधान आहे.

     अशी महान कृपा भगवान बाबा हनुमानजींची व महानत्यागी बाबा जुमदेवजीं ची आहे.

एवढे बोलून मि माझ्या शब्दांना इथेच विराम देतो

             माझ्या लिहिन्यात किंवा बोलण्यात काही  चूक झाली असेल तर मि भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी ला आणि मातोश्री आई वाराणसी ला माफी मागतो. तसेच सर्व सेवक दादा व सेविका ताईला माफी मागतो मला माफ करावे._

             🙏🏻नमस्कारजी🙏🏻

सेवक =  कु. अजय विठ्ठल दुमाने
पत्ता = मु.- आरमोरी ता.आरमोरी
जिल्हा.= गडचिरोरी
 सेवक क्र. = ४६४५८
मार्गदर्शक = मा.श्री सुधीर जी भोयर
प.पु.परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपुर.
_________________________
----------------------------------------

{टिप :- वरिल अनुभव कुणीही काँपी करु नये त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावा.}

========================
   !! भगवान बाबा हनुमानजी की जय!!
!! महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय !!
               !! परमात्मा एक !!
     सत्य मर्यादा प्रेम कायम करनेवाले
     अनेक वाईट व्यसन बन्द करनेवाले
              !! मानवधर्म की जय !!
========================
मानव धर्म एकता परिवार  ( व्हाट्सअप्प ग्रुप व फेसबुक पेज) शी जुडुन भगवंत कार्याच्या ऑनलाईन चर्चा बैठकीचा लाभ घेण्यासाठी आणि आपले मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेले अनुभव सादर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.

गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
                   🔴सौजन्य🔴
   🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

No comments

Powered by Blogger.