दारुच्या नादामुळे झाली अधोगती, बाबाच्या मानवधर्मात येताच झाली जिवनात प्रगती....

आजचा अनुभव
👇🏾👇🏾👇🏾
Parmatma ek सेवकांचा अनुभव


 !!भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम!!
 !! महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
 !! परमात्मा एक!!

⭕⭕⭕⭕⭕ ⭕⭕⭕⭕⭕⭕

         ⭕🙏🏼माझा सत्य अनुभव🙏🏼⭕

[दारुच्या नादामुळे झाली अधोगती, बाबाच्या मानवधर्मात येताच झाली जिवनात प्रगती]

            माझे पुर्ण नाव आकाश केवलरामजी आष्ठणकर असुन मी सध्या जयताळा,नागपुर या परिसरात वास्तव्यास आहो.मानवधर्म एकता परिवार या भगवतकार्याच्या या गृपवर हा माझा पहीला अनुभव मी या गृपच्या माध्यमाद्वारे आपणा सर्वासमोर सादर करीत आहे.

          माझे मार्गात येण्याचे कारण मला दारुचा खुप छंद होता व यामुळे माझ्या परिवारातील वातावरण फार बिकट परिस्थितीत होते. मला दारु पिल्याशिवाय दुसरे काहिच दिसत नव्हते व यामुळे माझा परिवार माझ्या अशा वागण्याने खुप त्रस्त झालेला होता. माझे वडिल सुद्धा या व्यसनाचा आहारी आधिपासुनच गेलेले होते . यामुळे माझ्या परिवारात रोज भांडन, तंटे ,शिविगाळ हे रोजचेच झाले होते व दारुमुळे पैशाची पण फार तंगी भासायची काय करावे कसे करावे काही कळतच नव्हते.

           माझ्या या वाईट व्यसनामुळे माझे सर्व नातलग माझ्यापासुन दुरावत गेले व दिवसभर मी वाईट मित्रांच्या संगतीत राहुण दारु पिऊन येणे व घरातील वातावरण खराब करणे हि माझी दिनचर्याच होऊन गेली. परंतु दारुची नशा ऊतरल्यावर मनात नाना तर्हेचे विचार यायचे कि आपले हे असेच सुरु राहिले तर आपले जिवन हे असेच संपुन जाईल.

       मी वाइट संगती मुळे खुप दारु पित होतो. त्याच्यामुळे माझ्यासमोर खुप संकटही निर्माण झाले. मला या मार्ग विषयी पहिलेच माहिती होती कारण या परमात्मा एक मानवधर्माची सेवा आधीपासुनच माझ्या काकांकडे होती त्यामुळे मला मार्गाविषयी पुष्कळशी माहिती होती. एत दिवस मी खुप विचार केला कि आपण सुद्धा हा मार्ग घ्यावा असा मी  पक्का विचार केला व मी आपल्या काकांना घेऊन मार्गदर्शक आदरनिय स्व.शिवचरनजी माहुले काकाजी यांच्या कडे सहपरिवार जाऊन एप्रिल २०१० मधे या मार्गात प्रवेश केला. काकाजींनी मला आधी सर्व घराची साफसफाई करायला सांगीतली व नंतर तीन दिवसाचे माफीचे कार्य करायला सांगीतले व त्यानंतर सात, अकरा, एकविसअशा प्रकारे कार्य मिळत गेले व पहिल्या तीन दिवसाच्या कार्यातच मला पुरेपुर समाधान मिळाले. मला या मार्गाविषयी आधीपासुनच माहीती  असल्यामुळे मला कार्यात कोणतीही अडचण आली नाही,त्यागाचा कार्यात एक छोटासा आलेला अनुभव मी आपल्या समोर सादर करीत आहे. 
     माझे त्यागाचे कार्य चालू होते आणि २० दिवस झाले होते. सर्व काही चांगल चालू होते पण अचानक २२व्या दिवशी माझ्या मोठ्या मुलीला अचानक  खूपच भयंकर अशा खोकला आणि कफ निर्माण झाला. आम्हाला खूप काळजी होऊ लागली मार्गदर्शकांच्या सल्याने आम्ही बाबांना  समोर शब्द ठेवला की आमच्या मुलीला कफ आणि दमा कोणतेही दवाई व डॉक्टरी इलाज न करता पूर्ण पणे बरा झाला पाहिजे व आमचे त्यागाचे कार्य पूर्ण पणे चांगल्या प्रकारे पार पडले पाहिजे. परमेश्वरी कृपा जागृत आहे याचाचं छोटासा अनुभव आम्हाला मिळाला व योग मागितल्या प्रमाणे कोणतेही अडथडा न येता आमचे त्यागाचे कार्य पूर्ण पणे व चांगल्या प्रकारे पार पडले.  परतू परमेश्वरी कृपा सतत आपल्या सोबत राहून आपले रक्षण करते आपल्याला फक्त तत्व,शब्द, व नियमाचे पूर्ण पणे आणि  काटेकोर पणे पालन करायचे आहे. हेच मला माझ्या त्यागाचा कार्यातून आलेल्या अनुभवातुन कळले.
माझ्यावर आता कोणतेही दुख्ख नसुन माझी दारुची सवय बंद झाली.व अशा प्रकारे मी बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य केले व पक्कीचा सेवक झालो माझा सेवक क्रमांक ३६१७३ आहे. 

माझ्यावर आलेला असाच भगवतकृपेचा अनुभव मी आपणासमोर सादर करित आहे. ऐके दिवशी मि पेपर द्यायला भिवापुर ला गेलो. व परत येताना उमरेड च्या समोर  माझी गाडी बंद पडली व मि हैरान झालो कारण सायंकाळचे ४ वाजले होते.आणि जंगलाचा रस्ता होता मि माझ्या गाडीत चेक केले तर पेट्रोलच नव्हतं. मि लगेच प्रणाम केला व बाबाला विनंती प्रार्थना केली व तिथेच उभा राहिलो. अचानक माझ्या समोर एक अनोळखी बाइक येऊन थांबली. त्या बाइक वाल्या व्यक्ति ने मला विचारले की काय झाले? मि त्याना माझी सगळी हकीकत सांगितली. तिथुन पेट्रोल पंप ३०किमी अंतरावर होते. तरी त्या अनोळखी व्यक्तिने मला पूर्णपणे मदत केलि माझ्या गाडी मागे त्याने आपली गाळी लावली व आम्ही पेट्रोल पंप वर पोहोचलो. पोहोचल्यानंतर मि त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला. पन त्यांनी एकहि पैसे न घेता मला पूर्णपणे मदत केली. मि ज्या ज्या वेळेस परमेश्वराला विनंती केलि त्या त्या वेळेस परमेश्वर धावून आले.

आता मी सुखसमाधानाने आपले सुखमय जीवन बाबाच्या या कृपेमुळे जगत आहो, माझा संसार सुरळीत चालु आहे. असा हा माझा छोटासा अनुभव आहे.माझ्या लीहीण्यात काही चुका झाल्या असतील तर मी भगवंताला व बाबाला क्षमा मागुण माझा अनभव येथेच संपवितो चुकभुल क्षमस्व.

नमस्कार जी सर्वांना.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

नाव :- आकाश केवलरामजी आष्टनकर
सेवक क्र. :- ३६१७३
पता :-जयताळा, नागपुर
मार्गदर्शक:- स्वर्गीय शिवचरण माहुले (काकाजी)
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.

••••••••••••••••••••••••••••••••••

 --------------------------
 --------------------------
 [टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]

 भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...

 गणेश दादा बिडकर :-9766573410
 गजानन दादा लेन्डे :-9850675766
 मोहन दादा आस्वले:-9764989883
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.