महानत्यागी बाबा जुमदेवजीनचे जन्म व जीवन चरित्र महानत्यागी बाबा जुमदेवजीनचे जन्म व जीवन चरित्र, परिचय पुस्तिका
महानत्यागी बाबा जुमदेवजीनचे जन्म व जीवन चरित्र महानत्यागी बाबा जुमदेवजीनचे जन्म व जीवन चरित्र, परिचय पुस्तिका :-
नागपूर हे शहर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून भारत देशाच्या सीमेनुसार मध्यभागी वसलेले शहर आहे. हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात गोळीबार चौक नावाचा मागासलेला समजला जाणारा प्रसिद्ध असा भाग आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य सुरू असताना त्यांच्यापासून त्याला स्वातंत्र्य करण्याकरिता भारतवासियांनी नानाप्रकारे सत्याग्रह केले. त्यातलाच एक झेंडा सत्याग्रह १९२१ साली करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून या परिसरात तो सत्याग्रह झाला. त्यात नागपूरवासियांनी भाग घेतला होता. या सत्याग्रहात लोकांनी इंग्रजांविरुद्ध त्यांना हा देश सोडून त्यांच्या देशात जाण्याचा नारा दिला होता. तेव्हा इंग्रजांनी या सत्याग्रहींना सळो की पळो करण्याकरिता बंदुकीच्या गोळ्या लोकांवर झाडल्या होत्या. या शूरविरांनी त्या गोळ्या आपल्या छातीवर झेलून देशाकरिता आत्मबलिदान केले आणि ते शहीद झाले. तेव्हापासून या भागाला गोळीबार चौक असे नाव पडले.
आजही या चौकात शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ शहीद स्तंभ उभारण्यात आलेला आहे. हा गोळीबार चौक पुढे मोहल्ला म्हणून प्रचलित झाला. या मोहल्ल्यात हिंदू संस्कृतीतील हलबा या आदिवासी जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या चौकाच्या बाजूलाच एक उदाराम महाराजांचा प्रसिद्ध मठ आहे. या मठाच्या मागे आदिवासी जमातीतील हलबा जातीतील ठुब्रीकर घराण्यातील चार सख्खे भाऊ राहत असत. त्यांची नावे तानबा, महादेव, विठोबा आणि बालाजी अशी होती. त्यांचा मूळ धंदा विणकारी (पातळ विणणे) हा होता.
![]() |
| महानत्यागी बाबा जुमदेवजीनचे जन्म व जीवन चरित्र, परिचय पुस्तिका |
चारही भावंडे संयुक्त कुटुंब पद्धतीप्रमाणे एकत्रित राहत होती. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. रोज विणकरी करून सायंकाळी मजुरी मिळाल्यानंतर ते घरगृहस्थी चालवीत असत. अशा या गरीब कुटुंबात महानत्यागी बाबा जुमदेवजी ३ एप्रिल १९२१ रोजी श्री विठोबा राखडूजी ठुब्रीकर आणि सरस्वतीबाई या दांपत्याच्या पोटी जन्माला आले. या दांपत्याचे बाबा हे चवथे अपत्य होय. बाबांपेक्षा तीन भावंडे बाळकृष्ण, नारायण आणि जागोबाजी ही मोठी होती. तर एक भाऊ मारोती हा सर्वात लहान होता. अशी पाच अपत्ये या दांपत्याला होती. बाबांचे लहानपणाचे नाव जम्मन असे होते. घरची परिस्थिती हालाखीची आणि एकत्रित कुटुंब यामुळे बाबांचे शिक्षण मराठी चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. खर्च जास्त व मिळकत कमी यामुळे पुढील शिक्षण मध्येच सोडून घरच्या परिस्थितीला हातभार लावण्याचे ठरवून त्यांनी अगदी वयाच्या बाराव्या वर्षी वाडवडीलांच्या चालत असलेल्या विणकरी च्या धंद्याला सुरुवात केली. लहानपणापासूनच बाबांचा उमदा स्वभाव होता. चेहऱ्यावर तेज होते सौष्ठव देहयेष्टी होती. लहानपणापासूनच त्यांच्यात. कणखरपणा आहे. ते लहानपणापासूनच नीतिमत्ता बाळगतात. ते दयाळू स्वभावाचे असून परमेश्वरावर त्यांच्या बालपणापासूनच विश्वास आहे. त्यांना लहानपणी हनुमान चालीसा वाचत असत. प्रायमरी शाळेत शिकत असतान शाळेतून आल्यानंतर स्वयंपाक घराचे दार बंद असल्यास ते दाराच्या फटीतून ते अात बघत असत. तेव्हा त्यांना त्या खोलीत भुरकट रंगाची व्यक्ती असल्याची दिसत असे. तसेच त्या व्यक्तीला एकच फार मोठा डोळा असलेला नेहमी त्यांना दिसायचा. जुन्या काळात देहयष्टीला फार महत्त्व होते. म्हणून ठीकठिकाणी आखाडे बांधले गेले होते. या आखाड्यात लहान-मोठी मुले मेहनतीसाठी जात असत. त्याप्रमाणे बाबांना पण आपल्या बालपणी आखाड्यात जाण्याचा छंद लागला आणि बघता बघता ते त्या परिसरात पहेलवान या नावाने प्रसिद्ध झाले.
![]() |
| महानत्यागी बाबा जुमदेवजीनचे जन्म व जीवन चरित्र महानत्यागी बाबा जुमदेवजीनचे जन्म व जीवन चरित्र, परिचय पुस्तिका |
त्यांना कुस्ती खेळण्याचा शौख होता. बाबांचे लग्न त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे १९३८ साली मे महिन्यात नागपूर जिल्ह्यातील खापा गावातील प्रतिष्ठित निवासी श्री. बापूजी बुरडे यांची सुकन्या आणि तडफदार व अग्रगण्य विणकर नेते श्री. सोमाजी बुरडे यांची धाकटी बहीण वाराणसीबाई हिच्याबरोबर झाले. बाबांनी लग्न झाल्यावर वयाच्या एकविसाव्यावर्षी विणकरीचा धंदा सोडून दिला व सेठ केसरीमल यांच्या दुकानात वहीखाते लिहिण्याचे काम मासिक तीन रुपये पगारावार करू लागले. दुकानमालक मारवाडी समाजाचे होते. सेठ केसरीमल मरण पावल्यामुळे त्यांचा मुलगा मदनसेठ पुगलिया हा त्याच्या मामा सेठ सरदारमल यांच्या देखरेखीखाली दुकानाचा कारभार सांभाळत होता.
बाबांनी तिथे पाच-सहा वर्षे नोकरी केली. बाबा जेथे नोकरी करत होते ते दुकान सोन्या चांदीचे होते. एक दिवस बाबांना दुकान साफ करताना दहा तोळ्याचा सोन्याचा हार दुकानाच्या कपाटात ठेवलेला दिसला. तो हार उघड्यावर बघून बाबांना धक्का बसला. बाबांनी तो हार सेठ सरदारमलकडे देऊन दिला. त्यांनी डागाजीला बोलावले. तो त्याचा भाचा होता. त्यांनी हारा बद्दल विचारले आणि त्याला एक जोरदार थापड लावली. ते त्याला म्हणाले की, तो (बाबा) इमानदार आहे. म्हणून हार आणून दिला. नाहीतर हा हार चोरीला गेला असता किंवा हरवला असता तर त्याला कोण जिम्मेदार राहीले असते? यावरून बाबांचे सत्य आणि इमानदारी हे गुण दिसून आलेत. तेव्हापासून बाबाकडे त्या घरातील लोक इमानदार म्हणून पाहू लागले. मदनसेठचा लहान भाऊ पैसे उधळतो हे बाबांना माहित होते म्हणून बाबांनी स्वतः विचार केला आज जरी इमानदार म्हणतात परंतु उद्या हीच स्थिती राहील हे कशावरून? नोकर माणूस इमानदार असून सुध्द्या उद्या प्रसंग आल्याच हेच लोक भाच्याचा पक्ष घेऊन मला बदनाम करू शकतात. असा विचार मनात येताच केवळ सत्य जपून ठेवण्याकरिता बाबांच्या मनात त्या विचारांनी जोर धरल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि पूर्ववत ते साडी विणण्याचा उद्योग करू लागले.
बाबा दिवसातून एक रेशमाची नऊवार साडी विनत असत. ती साडी इतकी चांगली असायची की, दुकानदार लोक आपला माल खपविण्यासाठी ती गिऱ्हाईकाला दाखविण्यासाठी वर ठेवत असत परंतु हातमागच्या धंद्याला मिल मुळे उतरती कळा आली. बाबांचे मेहुणे श्री. सोमाजी बुरडे हे विदर्भ विणकर केंद्रीय सोसायटी नागपूर येथे अध्यक्ष होते. म्हणून त्यांनी बाबांना तेथे सुपरवायझरची नोकरी दिली. बाबांचे कामातील चातुर्य आणि महत्ता बघून त्यांना सोसायटीतर्फे गद्दीगोदाम, नागपूर येथे पायानी चालवावयाच्या चादर तयार करण्याच्या मशीनच्या ट्रेनिंगकरीता पाठवले. तेथे बाबांनी ट्रेनिंग पूर्ण केले.
पिवळी मारबत्याच्या जवळ सोसायटीचा एक कारखाना होता. त्या कारखान्यात बाबा कामाला लागले. बाबा इतके हुशार होते की, स्वतः एकटेच कोणाचीही मदत न घेता संपूर्ण मशीन उघडून तिचे पार्ट वेगवेगळे करून जशीच्या तशी पूर्ववत स्थितीत तिची जुळवाजुळव करीत असत. याच सुमारात बाबांनी दैवी शक्तीही प्राप्त केली होती.
एके दिवशी याच कारखान्यात काम करणाऱ्या वासुदेव नंदनवार नावाच्या, बाबांच्या घराजवळ राहणाऱ्या आणि बाबांचा मित्र पण असलेल्या गृहस्थाला काम करताना सारखे जुलाब आणि उलट्या होऊ लागल्यात. तेव्हा आपल्या मित्राचे होत असलेले हाल बाबांना पाहवले नाही. म्हणून त्यांनी त्याला जवळ बोलावून एका ग्लासात पाणी घेऊन त्यास अकरा वेळ फुक मारून तीर्थ दिले. त्यामुळे त्याला होणारा त्रास एकाएकी बंद झाला. तेव्हापासून बाबाजवळ काहीतरी शक्ती आहे हे लोकांना माहीत झाले. पुढे बाबांनी त्या कारखान्याची नोकरी सोडली आणि महानगरपालिकेत ठेकेदार म्हणून काम करू लागले.
ही घटना १९७६ ची आहे. नागपूर येथील दिघोरी या भागात महानगरपालिके तर्फे नहर खोदण्याचे काम बाबांना मिळाले होते. ते काम करताना त्यांना त्या कामात खूप त्रास झाला. त्यांना त्या ठिकाणी बेईमानी दिसू लागली. त्यामुळे पुन्हा बाबांचे मन त्या बेईमानीला कंटाळले. त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटत नव्हते. याच सुमारास बाबांचा मुलगा डॉ. मनो ठुंब्रीकर यांना व्हजिनीया मेडिकल सेंटर, व्हजिनीया(अमेरिका), येथे नोकरी लागली होती. त्यांना पहिला पगार मिळाल्यावर त्यांनी बाबांना सागितले की आता काम बंद करून आपण परमेश्वराचे मानवजागृतीचे कार्य करावे. बाबांनी विचार करून आणि सद्याच्या बेईमानीच्या व्यवहाराला कंटाळून त्यांनी ठेकेदारीचा धंदा बंद केला. त्यानंतर त्यांनी अध्यात्मिक कार्याकडे आपले संपूर्ण जीवन वळविले.
बाबा जेव्हा काम करत होते तेव्हा ते मित्राबरोबर राहूनही स्वतःचा आणि त्यांचा खर्च स्वतःच करीत होते.
ते कोणालाही खर्च करू देत नव्हते. बाबा सुरुवातीपासूनच भगवतकार्याकरिता स्वतःच्या पैशाने खेडोपाडी ऊन, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता पायी, सायकल, बैलगाडी, बस मिळेल त्या साधनाने प्रवास करून मानव जागृतीचे कार्य निष्काम भावनेने सतत करीत आहेत. त्यांचे नानातऱ्हेचे दुःख निवारण करीत आहेत. ते गुरुपूजा घेत नाहीत. आत्म्याचा अनादर होऊ नये म्हणून पाया पडू देत नाहीत. अध्यात्मिक कार्याद्वारे, खंगलेल्या गरीब, कष्टकरी लोकांना सुख व समाधान मिळवून दिल्यानंतर त्याला जीवनात चालण्याकरिता त्यांचे ग्रहस्थी उंच आणण्याकरिता त्यांनी आपले सर्व लक्ष सामाजिक कार्याकडे वळून सहकारी तत्वावर बँक, बहुउद्देशीय.
![]() |
| महानत्यागी बाबा जुमदेवजी |
ग्राहक भंडार, दूध डेरी, मानव मंदिर इत्यादीची स्वकष्टाने निर्मिती केली. परंतु हे सर्व केल्यावर सुद्धा त्यांनी स्वतःच्या ग्रहस्थीकरीता या संस्थेचा लाभ कधीच करून घेतले नाही. त्यांनी अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी त्याग केलेला आहे. म्हणूनचं त्यांनी आपल्यासारखे अनेक शिष्य तयार केले आहेत
आणि आपल्यासारखे करीत तात्काळ, नाही काळवेळ तया लागि' ही मन सिद्ध केली आहे. आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या शिष्यांनी महानत्यागी ही पदवी दिली आहे . बाबांनी ग्रहस्थी सांभाळून परमार्थ साधला आहे.
बाबा आजही वयाच्या ७१ व्या वर्षी मानव जागृतीच्या कार्याकरिता सतत दौरे करीत आहेत. बाबा आपले आयुष्य आज ऐश्वर्यात घालवीत आहेत. देइ तोच घेइ.. या म्हणीप्रमाणे बाबांनी सुरवातीला मेहनत केल्यामुळे त्यांचे चांगले फळ भगवंत बाबांना चाखायला देत आहे..



Leave a Comment