मेरे बाबांकी कृपा है सबसे न्यारी, एकही पल मे कर देता गायब हर बिमारी.. परमात्मा एक
भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम !!
महांनत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
परमात्मा एक !!
🙏[ माझा सत्य अनुभव ]🙏
[ मेरे बाबांकी कृपा है सबसे न्यारी, एकही पल मे कर देता गायब हर बिमारी ]
माझे पुर्ण नाव:- रोहित विलास बाजोले आज मी "माझा सत्य अनुभव" या मानवधर्म एकता परिवार गृप मध्ये अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव सादर करीत आहे.
आज मी आपणासमोर माझ्यावर घडलेला अनुभव सादर करित आहे. माझे 3 दिवसांचे कार्य सुरू असताना मी एका दिवशी सकाळी विनंती केल्यानंतर टीव्ही बघता बघता झोपून गेलो नंतर काही तासानंतर उठलो नंतर चेहऱ्यावर पाहिले की चेहऱ्यावर एका कडून बारीक बारीक फुंस्या दिसू लागले नंतर आई व बाबांना सांगितले की आई माझ्या चेहऱ्यावर हे काय बारीक बारीक फुंस्या झालेल्या आहे आई म्हणाली की हे कातणी रगडलेली असेल नंतर कातिणी रगडण्याचे घरगुती उपचार केले पण काहीही फरक पडला नव्हता. व चेहऱ्यावर पुटकुळ्या वाढतच होत्या चिंता वाटायची आपला चेहरा यामुळे खराब दिसेल.
यानंतर मी माझ्या गावातल्या दवाखान्यात बाबांसोबत गेलो बाबांनी डॉक्टरांना सांगितले की यांच्या चेहऱ्यावर हे बारीक बारीक फुंस्या कशाच्या आलेले आहेत त्यावर डॉक्टरांनी माझ्या चेहऱ्यावर बघितले आणी म्हणाले की ही नागिन ची बिमारी आहे आणि त्यांनी औषधी लिहून दिले आणि आम्ही घरी आलो आणि बाबांनी आईला सांगितले कि ही नागिन ची बिमारी आहे नंतर आई घाबरली कारण की माझ्या गावात एका आजीला ही बिमारी झालेली होती तिला पुष्कळ त्रास व्हायचा म्हणून आई पार घाबरली होती.
नंतर काही दिवस गावाकडच्या डॉक्टरांचा उपचार सुरू होता पण काहीही फरक पडले नव्हते.त्यानंतर आम्ही अचलपूर येथील आर्मी मधून रिटायर झालेल्या डॉक्टर चेरडे कडे गेलो त्यांनी माझा चेहरा बघितले आणि म्हणाले कि ही बीमारी नागिन ची आहे ही बिमारी सुधरायला 21 दिवसाचा कोर्स करावा लागतो नंतर डॉक्टरांनी मला 8 दिवसाचे औषध लिहून दिले आणि म्हणाले की आठ दिवसांनंतर मला परत दाखवायला यायचं.
डाँक्टरी ऊपचार करुण आम्ही घरी आलो आणि आई व बाबा आणि मी विचार केला की माझ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला 12 दिवस बाकी होते मी घरा बाहेर निघायचो तर रुमाल बांधून निघायचो नंतर मी बाबांजवळ प्रार्थना केली की बाबा मला घराबाहेर निघताना रुमाल बांधावा लागतो पण बाबा मला बोर्डाच्या परीक्षेत रुमाल बांधू देणार नाही पण बाबा तुम्ही मला रुमाल बांधण्याचा काम पडू देऊ नका आणि आई - बाबांना म्हणाली की आपण 3 दिवसाचे कार्य केले आहे आणि आपण आता 7 दिवसाचे कार्य करूया.
आम्ही 7 दिवसाचे कार्य करू लागलो आणि बाबांजवळ शब्द ठेवला की बाबा मला परीक्षेच्या अगोदर आराम पडलेल्या पाहिजे नंतर 7 दिवसाचे कार्य सुरू होते तेव्हा मला कार्यात खूप काही फरक पडला आणि माझी नागिन ची बिमारी खूप काही सुधारली होती नंतर 8 दिवसात डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी माझ्या चेहऱ्याला बघितले आणि अचंबित झाले व म्हणाले की ही बिमारी 21 दिवसांपर्यंत सुधरत नाही ही बिमारी 8 दिवसात कशी काय सुधारली मी म्हणालो की माझ्या भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची कृपा आहे.
पाहा कि आपल्या बाबांची कृपा किती महान आहे की माझ्या 21दिवसाची बिमारी 8 दिवसात बरी केली.
माझ्या अनुभव लिहिण्यात काही चूकभूल झाली असेल तर मी भगवान बाबा हनुमान जी व महानत्यागी बाबा जुमदेवजी व मातोश्री वाराणसी आई आणि सर्व सेवक दादा व सेविका ताईंना मी शमा मागतो व आपला अनुभव येथेच संपवितो.
नमस्कार जी सर्वांना.
•••••••••••••••••••••••••••••••
*सेवकांचे नाव*: - रोहीत विलास बाजोले.
पत्ता : मु.+पॊ. परसापूर ता. अचलपूर जि. अमरावती
सेवक क्रमांक : 39678
मार्गदर्शक : मारोतराव राऊत { गुरुजी }
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
*[वरिल अनुभव कुणिही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावा.}*
*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*
गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
🔴सौजन्य🔴
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार,
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Namaskar ji dada
ReplyDelete