परमात्मा एक मार्गातिल वेळेचे महत्त्व...।

वेळेचे महत्त्व


            बाबांनी परमेश्वरी कृपा संपादन केल्यावर सुद्धा त्यांच्या घरची मंडळी हिंदू धर्मात असलेल्या सर्व देवांना मानत होती. त्यांची पूजा करित होती. सर्व सण साजरी करीत होती. एकादशा, चतुर्थी या दिवशी उपवास करीत होती.
श्री. बाळकृष्ण आणि नारायणराव यांच्या घरी अकरा दिवसाचे हवन कार्य सुरू असताना भारतीय संवत पौष महिना सुरू होता. या हवनाच्या काळातच पौष वैद्य चतुर्थी आली होती. तो रविवार असून १९४६ च्या जानेवारीची 20 तारीख होती. 

Parmatma ek


ही चतुर्थी हिंदीमध्ये मोठ्या   चतुर्थ्यांमधून एक चतुर्थी मानली जाते. या दिवसाला वैदिकदुष्ट्या फार महत्त्व आहे असे समजतात. या दिवशी बाबांच्या घरातील बाया मंडळींना उपवास होता. हवन संपायला रात्री बराच उशीर होत होता. साधारण अकरा वाजत असत. त्यामुळे घरातील पुरुष मंडळींनी बा बाबांना विनंती केली की, आज बायांना निर्जला उपास आहे. आणि रात्री अकरा वाजता हवन संपते. त्यामुळे त्यांना जेवायला खूप उशीर होईल. त्यामुळे त्यांना रात्री खूप उशिरापर्यंत उपाशी राहावे लागेलं.
        म्हणून आमची अशी विनंती आहे की, अगोदर जेवण करून
नंतर हवन करावयास जावे. त्यामुळे स्त्रियांना त्रास होणार नाही. बाबांची त्यांचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि स्वतःच असा विचार केला की, देवाची पूजा नंतरही केले तरी काय फरक पडणार आहे! परमेश्वराला आवडणारे कार्य करणे हीच खरी परमेश्वराची आराधना, असे मनाशी ठरवून त्यांच्या विनंतीला त्यांनी मान दिला. संध्याकाळी जेवण आटोपल्यावर हवनकार्य करायला ते आपल्या ज्येष्ठ बंधूकडे गेले. त्यावेळेस हवन सुरु करायला अर्थातच बरा उशीर झाला होता. हवन आटोपून बाबा घरी आले. बाबांची झोपण्याची एक वेगळीच १६:३० चि खोली होती. त्या खोलीत बाबा एकटेच झोपत असत आणि घरची इतर मंडळी दुसऱ्या खोलीत झोपत असत. नेहमीप्रमाणे बाबा मनात काहीही विचार न आणता खोलीचे दार बंद करून झोपले. साधारणता मध्यरात्रीनंतर एक दोनच्या सुमारात बाबा चोर चोर म्हणून जोरातजोरात ओरडू लागले. हे ओरडणे ऐकून बाजूच्या खोली झोपणाऱ्या मंडळीची झोप उघडली. सर्व पुरुष मंडळी जागी झाली. ती बाबांच्या खोलीकडे धावत आली आणि पाहतात तर खोलीचे दार बंद आहे आणि बाबा झोपेत जोरातजोरात ओरडत होते. 

      त्यांनी बाबांना जागे केले आणि विचारले की कुठे चोर आहे? खोलीला दुसरे दार होते. त्या दाराकडे जाऊन पाहिले तर तेही दार बंद होते. त्यांनी बाबांना विचारले,"तुम्ही चोर चोर का ओरडत आहात ?" हे ऐकून बाबांच्या लक्षात आले की,आपण स्वप्नात होतो. आपल्याकडे कोणीही चोर आले नाहीत. त्या अगोदर ते स्वप्नातच बडबडले की, मी माझ्या उजव्या हाताच्या मुठीत चोराला धरून ठेवले आहे. ती मूठ घट्ट  धरलेली असून पोटावर आहे. तो पळण्याची धडपड करतो आहे. हे पाहत असतांनाच त्यांना घरच्या मंडळीचा आवाज आला आणि ते जागी होऊन उठून बसले. त्यांनी संपूर्ण खोलीच्या चोहीकडे पाहीले. त्यांना त्यांच्या घरची मंडळी उभी असलेली दिसली. याशिवाय त्यांना काहीही दिसले नाही. ते त्यांना सांगू लागले की, माझ्या अंगाशी खूप वानर भिडले  होते. 

मी जिकडे करवट बदलत होतो तिकडे ते माझ्या शरीराने दाबल्या जात होते. त्यातील एक वानर जो मुख्य वाटत होता तो माझ्या पोटावर बसला होता हे सर्व माझ्या अंगाशी खेळून पळण्याच्या तयारीत होते. म्हणून मी त्या मुख्य वानराचा एक पाय उजव्या हाताच्या मुठीत घट्ट पकडला. तो पळण्याची खूप धडपड करत होता. मला असे वाटले की, हाच बाबा हनुमांजी आहे आणि तो मला सोडून जात आहे. याशिवाय काहीही सांगितले नाही आणि त्यांना आपल्या खोलीत परत जायला सांगितले. सर्वजण आपआपल्या खोलीत गेल्यावर बाबा शांतपणे झोपले. 

दुसऱ्या दिवशी बाबांनी घरच्या सर्व मंडळीना एकत्र जमविले आणि नंतर त्यांना रात्री घडलेल्या घडामोडीबद्दल सविस्तर सांगण्यास सुरुवात केली.
              काल जेवण झाल्यावर हवन कार्य उशिरा सुरू केले. नेहमीची ठरलेली वेळ टळून गेली होती. त्यामुळे बाबा हनुमानजी नाराज झाले होते. त्यांनी मला स्वप्नात दर्शन दिले. ते आपल्या दारात येऊन तेथेच उभे राहिले. तेव्हा मी माझ्या खोलीत झोपलो होतो. ते म्हणाले,"मै तेरे बाप का नोकर नही हुॅ | मैं समयपर तेरे यहाँ आया हु |मै भुका प्यासा तेरे द्वार पर हू  |और तू खाना खा रहा है  | "इतके बोलून ते वानरसेना घेऊन माझ्या अंगाशी आले आणि त्या वानरसेनेसह माझ्या शरीराशी खेळून ते चालते झाले. तेव्हा मी बाबा हनुमांजीचे पाय धरले व  क्षमा मागितली. ते जाण्याची धडपड करत होते. पण मी त्यांना सोडले नाही. याचा मी संपूर्ण विचार केला असता मला असे वाटले की, परमेश्वर योग्य वेळेस धावून येतो.

 आपण ठरवलेली वेळ ही त्याचीच वेळ असते. म्हणून संपूर्ण काम वेळेवर करावे. आज जी परिस्थिती उद्भवली त्यामुळे परमेश्वरी कृपेयापासून बरेच दूर जावे लागले असते. मी त्यांना क्षमा मागितली व परमेश्वराला जवळ ठेवले आहे. तरी आपण यापुढे याची जाण ठेवावी असा घरातील मंडळींना त्यांनी उपदेश केला. 
यावरून हे सिद्ध होते की, वेळेचे महत्व किती असते, आपण नेहमी पाहतो की, बाबा सर्व काम वेळेवर करतात आणि वेळेचे पूर्णपणे बंधन पाळतात. आपण ही यापासून वेळेचे बंधन पाळण्याचे वक्त घेऊन या.










No comments

Powered by Blogger.