माझा सत्य अनुभव...जिथे विश्र्वास आहे तिथे परमेश्वरी कृपा आहे... परमात्मा एक


                   आजचा अनुभव.    
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿

Parmatma ek सेवकांचा अनुभव

    ‼️भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम‼️
  ‼️महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम‼️
              ‼️परमात्मा एक‼️

                  माझा सत्य अनुभव

      माझे नाव अर्जुन नारायणराव हातआगरे  मु. कान्होली बारा येथे परिवारसह वास्वत आहे आणि मानवधर्म एकता परिवार व्हाटशाफ गृप मध्ये हा माझा मार्गात येणाचे कारण व सत्य अनुभव सादर करत आहे.
            माझे मार्गदर्शक श्री. धनराजजी करणाके मु. देवळी(निस्ताने) मार्गदर्शकाच्या माध्ममातून मी मार्गाशी जुळलो. पूर्ण समाधान मिळाल्यानंतर त्यागाचे कार्य पोळ्याच्या पाडवा ला घेण्याकरिता मार्गदर्शकाच्या घरी गेलो. ते म्हणाले अर्जुन पोळ्याचा पाडवा आहे. दोन दिवस कार्य उशीरा घे. पण मला पोळ्याच्या पाडवाची गरज नाही. मला भगवंताच्या कार्याची गरज आहे. हे शब्द जेव्हा त्यांच्या कानी पडले तेव्हा मार्गदर्शन करून कार्य दिले. माझ्या कुटुंबात चर्चा करून कार्याला सुरुवात केली. मि. माझी पत्नी वैशाली, मोठा मुलगा जतिन ७ वर्ष लहान मुलगा श्रिजीत ५ वर्ष असा आमचा परिवार.
         कार्याची सुरुवात झाली. काही दिवस आनंदी सुखाचे गेले. मग झाली. बाबांची परीक्षेची वेळ ,माझा लहान मुलगा श्रिजीत त्याच्या मानेला एक फूनशी (फोड.) झाला. जसजसे दिवस जायचे तसतसी ती गाठ मोठी होत चालली. मानेची सुज कानापर्यंत पोचली मान व कानाचा भाग सुजून 
एकसारखा दिसायचा. आम्ही मार्गदर्शकांना फोनवरून मुलाच्या दुःखाबद्धल सांगितले. मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. की, त्यागाचे कार्य सुरू आहे. ज्योती मधले तेल व रक्षा लाव नंतर  काही करता येणार नाही. सांगितल्या प्रमाणे सर्व काही केले. पण सूज उतरायची नावच घेत नव्हती नंतर आम्ही खूब घाबरलो मनात विचार सुरू झाले. की, त्यागाचे कार्य बंद करून डॉक्टरी इलाज करावा का? सर्व कुटुंब एकत्र बसून विचार करू लागलो. काय निर्णय घ्यावा. कळत नव्हतं. आम्ही पती पत्नी ने विचार केला की, आपल्याला दोन मुल आहे. ते भगवंतांनी दिलेले आहे. आपल्याला भगवंत कार्य महत्त्वाचे आहे. हा निर्णय घेतला जे घडवायचे आहे  तो परमेश्र्वर घडवेल. आपण कार्य सुरू ठेऊ मनात जो विचार सुरू होता तो बंद केला. व सुखाने झोप आली. दुसऱ्या दिवशी पाहता त्या मुलाची  सूज आपोआप कमी होऊन नाहीशी झाली. 
   || जिथे विश्र्वास आहे तिथे परमेश्वरी कृपा आहे. ||
      दोन मुलं त्यात बालपण दोन्ही मुल खेडताखेडता  एकमेकाशी धक्काभुकी झाली. त्यात लहान मुलांनी मोठ्या मुलाला लाथ मारली ती त्याला इतकी जोरात लागली की, तो दुरवर शिलाई मशिनवर जोरात त्याचे डोके आपटले तो जोरात रडू लागला व आईच्या कुशीत बसला पाहता तर त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. 
|| वेड्या आईची वेडी ममता  || 
                ती खूप घाबरली काय करावं सुचत नव्हतं ती हळदीचा डब्बा/औषध पाहु लागली. तिला काही दिसतच नव्हत. ती मला पण थोडीफार रागावली तिथे उभे राहून काय करता?   ते स्वाभाविक आहे. थोडा वेळ थांबून मी तिला म्हणालो ती बाबांची रक्षा आहे. ते त्यांच्या डोकयाला लाव तिने एेेकले व रक्षा लावली. तो मुलगा शांत झाला खेळू लागला दुसऱ्या दिवशी थंड्या पाण्याने आंगोळ करून विनंती करू लागला.  
|| जीवनात काही घडामोडी घडतात पण  थोडावेळ थांबून त्यावर विचार केलातर परमेश्वर त्यातून मार्ग दाखवितो विश्वास जागवतो || 
            माझी पत्नी वैशाली हिला मासीक पाळी झाली आम्ही सर्व कुटुंब घरचे काम करायचे पाचव्या दिवशी गॅस ओट्यावर स्वयंपाक झाल्यानंतर मी गॅस पुसायचा विसरून आपल्या. कामावर निघून गेलो. तिला वाटले की कचरा आहे. स्वच्छ  करावं म्हणून तिने पुसायचा कापड घेऊन पुसून स्वच्छ केला. वापस कापड ठेवायला गेली तर विंचू जिवंत दिसला पाहा त्या विंचूवाला हाती घेऊन गॅस  
रगडूरगडून पुसणी परत नेऊन ठेवली तिला विंचू चावला नाही. व त्या विंचवाला परमेश्वराने मरुपण दिला नाही. 
|| ह्या मार्गाची सेविका सुद्धा कुण्या सावित्रीपेक्षा कमी नाही ते खरच ? || 
मला कामा निमित्त बाहेर गावी जायचे होते. तर मी जाते वेळी परमेश्वराजवर शब्द दिला बाबा बाहेर गावी जात आहो . मला कुठेही पाणी  प्यायची गरज भासु देऊ नका ? सकाळी आठ वाजता निघालो पूर्ण दिवस गाडी चालून ३०० किलोमिटर फिरलो काम केले व संध्याकाळी ७ वाजता घरी पोहचलो. पण कुठेही  पाणी प्याव /ताहान लागली असे मला कधीच जाणवले नाही.  घरी आल्यानंतर पाणी पिले.
मग सांगा ह्या शरीरात जवळपास ७०% पाणी आहे. मग ह्या शरीराची उनिव पूर्ण करणारा कोण? 
|| परमेश्वर शब्दावर कार्य कसा करतो ||
      माझ्या गावाच्या सेजारीच मांडवा हे गाव आहे. तिथे गेलो असता सेवक सेवकिन यांच्या सोबत चर्चा  झाली  ते म्हणाले आमच्या गावात त्याग सुरू होता व सेवटच्या दिवशी तो झोपूनच होते ५:३० वाजुन गेले आम्ही त्यांना आवाज दिला नाहीतर ते झोपूनच राहिले असते व वेळ चुकून गेला असता माझे त्यागाचे कार्य सुरू होते. ते शब्द ऐकले आणि माझे कार्याचे दिवस सेवटी-सेवटी आले तसतसे ते शब्द खूप आठवायचे त्याचा परिणाम असा झाला.
        सेवटचे दोन दिवस झोपच येत नोव्हती. डोळे बंद करून घणटोशी राहायचा  डोळे दुखुन यायचे पण झोप येत नव्हती. काय करावं   जेनेकरून झोप येईल. कुटुंबातील  सर्व सदस्य झोपायचे पण मी पूर्ण रात्र जागायचा. दुसऱ्या दिवशी आपले दैनंदिन काम करायचा पण झोप येत नव्हती. प्रसादी  झाल्यावर बाबांच्या कृपेने भवनात गेलो. विनंती/प्रार्थना, कार्यात पाळावयाची बंधने, मार्गात कशासाठी आले, काय समाधान मिळाले याची शाहनिशा झाल्यावर मला परमेश्वरी कृपेची प्रतिमा मिळाली. हवनकार्य घडले मग खूप झोप यायची. 
                नमस्कार जी......
माझे अनुभव सागतांना काही चुका झाल्यास भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, महान त्यागी बाबा जुमदेवजिला  
क्षमा मागतो, माता वाराणसी आईला क्षमा मागतो, मार्गदर्शक, सेवक, सेविका, बालगोपाल यांना क्षमा मागतो.

       सर्वांना माझा नमस्कार जी......

========================
माझ्या लीहीन्या मध्ये काही शब्द चुकले तर मी भगवान बाबा हनुमान जी ला तसेच महानत्यागी बाबा जुमदेवजी ला मातोश्री वाराणसी आईला माफी मागतो व सर्व सेवक दादा व सेविका ताईला क्षमा मागते सर्वांना माझा नमस्कार 
नाव :- अर्जुन नारायणराव हातागरे
मु.पो.:-कान्होलीबारा त. हिगणा जि नागपुर
सेवक नं.:-३६९४४
मार्गदर्शक :-मा.श्री.धनराज जी करणाके मु देवळी(निस्ताने)
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.

••••••••••••••••••••••••••••••••••
अनुभव लेखन:-वैभव दादा पाटील
--------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]

 भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...


गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Wats app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®









••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.