होते आम्ही अंधारात निघाले आज प्रकाशात --बाबा जुमदेवजीनी हात दिला आणले जीवन जगण्यास या मानव धर्मात... परमात्मा एक

  
माझा सत्य अनुभव
                                         

         ▶माझा सत्य अनुभव▶


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

   *।।भगवान बाबा हनूमानजी को प्रणाम।।*
*।।महान त्यागी बाबा जूमदेवजी को प्रणाम।।*
                 *।।परमात्मा एक।।*

*मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेला अनुभव*
=============================
*🙏 नमस्कार सर्व दादा व ताई 🙏*


*【 होते आम्ही अंधारात निघाले आज प्रकाशात --बाबा जुमदेवजीनी हात दिला आणले जीवन जगण्यास या मानव धर्मात" 】*

 या भगवतकार्याच्या गृपवर अनुभव मलिकेतील माझा हा दुसरा अनुभव आहे यात मी मला मार्गात आलेला अनुभव सांगत आहे. माझे मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेला अनुभव सादर करीत आहे.

पहा सेवकांनो जेव्हा सर्व दरवाजे आपल्याकरिता बंद होतात तेव्हाच आपल्या एका भगवंताची आठवन येते व फक्त शेवटचा पर्याय म्हणुन हा मुक्तीचा मार्ग आपल्या जिवनाला एक नवी दिशा दाखवतो अश्याच एका दुख: साठी आम्ही या मार्गात प्रवेश केला व भगवंतानी आमच्यावर आलेल्या दुख:तुन आमची सोडवनुक केली व सध्या मी व माझा परिवार सुखसमाधानाने आपले जिवन आनंदात तत्व,शब्द, नियमाच्या आधारावर जगत आहो.

आमच्या गावाला बडोदा येथे कोजागिरीचा कार्यक्रम दिनांक १२ / आॅक्टोबर / २०१७ रोज गुरुवार ला ठेवण्यात आलेला होता त्याच आठ दिवसापुर्वी मी आपल्या हातावरील साप सारखे ट्याटू मेहंदी ने गोंदवून घेतले. व मी त्यावेळेस भगवंताच्या गाण्यांवर डान्स करायला जात होतो व एके दिवसी माझी प्रकृती खराब झाली व माझे डोके पण खुप दु :खत होते. व त्या दिवशी डॉन्सची प्रैक्टिस होती व मला सगळे सेवक फोन करुन बोलवत होते माझी जाण्याची इच्छा नाही होती तरी पण मी गेलो व डॉन्स केला व त्याच दिवसी मला रात्री एक स्वप्न दिसलं व स्वप्नात मला मी ज्या हातावरील साप मेहंदी ट्याटू गोंदवून घेतले होते. नेमक त्याच ठिकाणी मला साप चावला व मी घाबरलो. व सकाळला मी ते रात्रीचे स्वप्न आपल्या वडीलांना सांगीतले व माझे वडील म्हणाले की, तू हातावर कशाला ट्याटू गोंदवून घेतले असे आपल्या मार्गात चालत नाही. आणि त्याचवेळेस मी मेहंदी लावलेला ट्याटू तुरंत मिटवेल व नंतर परमेश्वराला माफी मागितले. मग माझे दु :ख पुर्णपणे नष्ट झाले. एवढे बोलून मि माझ्या शब्दाना इथेच विराम देतो. 

माझ्या लिहिन्यात किंवा बोलण्यात काही चूक झाली असेल तर मि भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी ला आणि मातोश्री आई वाराणसी ला माफी मागतो. तसेच सर्व सेवकांना माफी मागतो व आपला अनुभव येथेच थांबवतो मला माफ करावे.

नमस्कार जी सर्वांना.

========================
सेवक :- शेखर गुलाब चन्ने
पत्ता- मु. बोडंदा पोस्ट- तीमेझारी, ता- गोरेगांव, जिल्हा - गोंदिया
सेवक नंबर-४८८४४
मार्गदर्शक :- सोभेलाल जी कुसराम.
प.पु.परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपुर.
_________________________
----------------------------------------

{टिप :- वरिल अनुभव कुणीही काँपी करु नये त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावा.}

========================
   *!! भगवान बाबा हनुमानजी की जय!!*
*!! महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय !!*
               *!! परमात्मा एक !!*
     *सत्य मर्यादा प्रेम कायम करनेवाले*
     *अनेक वाईट व्यसन बन्द करनेवाले*
              *!! मानवधर्म की जय !!*
========================
मानव धर्म एकता परिवार  ( व्हाट्सअप्प ग्रुप व फेसबुक पेज) शी जुडुन भगवंत कार्याच्या ऑनलाईन चर्चा बैठकीचा लाभ घेण्यासाठी आणि आपले मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेले अनुभव सादर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.

गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
                   🔴सौजन्य🔴
   🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

2 comments:

Powered by Blogger.