सध्या तीन युगे संपली असून चवथे युग म्हणजे कलियुग.... महान त्यागी बाबा परमात्मा एक

सध्या तीन युगे संपली असून चवथे युग म्हणजे कलियुग....

सध्या तीन युगे संपली असून चवथे युग म्हणजे कलियुग....

सध्या तीन युगे संपली असून चवथे युग म्हणजे कलियुग....


           परमेश्वराने आकाश, पाताळ, वायू, अग्नी व पाणी या पंचतत्वावर आधारित सृष्टी निर्माण करताना पृथ्वीची रचना केली. या पृथ्वीवर अनेक जीवजंतू, प्राणी आणि वनस्पती याची निर्मिती केली. मानव हा प्राणी असून परमेश्वराने त्याला ओळखण्यातकरिता बुद्धी दिली. जेणे करून तो आपल्या बुद्धीचा वापर करून परमेश्वराला ओळखील. त्याचबरोबर मोह, माया, अहंकार हे गुणही त्यांच्यात निर्माण केले. मानव घडवीताना  हेतू हाच होता की, तो आपल्या बुद्धीचा उपयोग करून मोह,माया व अहंकार यांना बाजूला ठेवून (विसरून) त्यांचे लक्ष परमेश्वराकडे राहील व परमेश्वरी कृपा संपादन करून आपले मानवी जीवन सुखी करील. पृथ्वीच्या रचनेप्रमाणे आणि निरनिराळ्या वातावरणामुळे मानवाने पृथ्वीचे अनेक खंड निर्माण केले आहेत. आणि या प्रत्येक खंडात अनेक राष्ट्र निर्माण झालेत.



             मानवाला परमेश्वराबध्दल जागविण्याकरिता अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. ही सृष्टी सदोदित सत्य मानवाची राहा-वि म्हणून परमेश्वराने कालचक्र निर्माण केले. या कालचक्रात सत्ययुग, व्दापार युग, त्रेतायुग आणि कलियुग अशी चार युगांची रचना केली. सत्ययुगात सर्व देव जन्माला आलेत अशी म्हण आहे. त्याप्रमाणे जे जे महापुरुष जन्माला आलेत त्यांनी परमेश्वराची आराधना करून परमेश्वरी सिद्धी प्राप्त केली. सिद्धीनुरूप त्यांनी आपापल्या परीने धर्म निर्माण केलेत. उदाहरणार्थ हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, सनातन धर्म इत्यादी आणि त्यांनी परमेश्वराला अग्नीत नावे दिलीत. जसे अल्ला, भगवान, येशू ख्रिस्त, बुद्ध इत्यादी, प्रत्येक धर्मात परमेश्वर हा एकच आहे असे सांगितले आहे हे इतिहासावरून आपण पाहतो. पण परमेश्वराची अग्नीत नावे असल्यामुळे मानव गोंधळतो व तो या सर्व नावानुरुप अग्नीत परमेश्वर आहे असे म्हणतो.
           हिंदू धर्मात तर छत्तीस कोटी देवदेवता आहे असे म्हटले जाते. परमेश्वर निराकार आहे. सत्य,नीती आणि आत्म्याच्या दृष्टीने अवलंबिलेली धर्मनीती हीच परमेश्वर प्राप्तीची खरे गुण आहेत. पुढे कालांतराने मानवाने महापुरुषांनी परमेश्वराची ओळख करून दिल्याप्रमाणे त्याची मूर्ती तयार केली. हिंदुनी देवळे, मुस्लिमांनी मज्जिद, ख्रिश्चनांनी गिरिजाघर, आणि बुद्धांनी बुद्ध विहार बांधलेत आणि या ठिकाणी त्या मूर्तीची स्थापना करून तिला देव म्हणून 'मूर्तिपूजा' करावयास सुरुवात केली. परंतु हे महापुरुष परमेश्वर नव्हते तर त्यांचे अनुयादी होते. त्यांनी मानवाला परमेश्वराबद्दल जागविण्याचे कार्य केले. मानव बुद्धीजीवी असूनसुद्धा खरा परमेश्वर कोण व कुठे आहे हे तो ओळखू शकला नाही. धर्म निर्माण झाल्यावर काही देश 'धर्मवादी' देश म्हणून उदयास आलेत. यांतील काही एकधर्मी, काही बहुधर्मी तर काही 'धर्मनिरपेक्ष' देश म्हणूनही संबोधण्यात येतात. यातील 'भारत' हा धर्मनिरपेक्ष' देश मानला जातो. कारण या देशात निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. धर्मा धर्मातील लोकांत रूढी, चालीरीती,आंधश्रद्धा, आणि प्रत्येकाला त्याच्या धर्माबद्दल वाटणारा अभिमान यामुळे आपापसात भांडण होऊ नये आणि देश एकसंघ राहावा हा त्यामागील मूळ हेतू होय. तसा  भारत हा देश       'हिंदू' चा देश आहे. जसजस युगपरिवर्तन होत गेले. तसतशी मानवाची वृक्ती बदलत गेली आणि यातील काही लोकांनी सर्व धर्मात आपणच परमेश्वराचे खरे भक्त आहोत. खरे रक्षक आहोत, या भावनेने त्यांनी मूर्तीपूजा करुन पूजा-अर्चना सुरु केली.

सध्या तीन युगे संपली असून चवथे युग म्हणजे कलियुग.... महान त्यागी बाबा परमात्मा एक
सध्या तीन युगे संपली असून चवथे युग म्हणजे कलियुग.... महान त्यागी बाबा परमात्मा एक


              मानवाला जीवन कंठताना  बऱ्याच गोष्टीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासू लागली. म्हणून त्यांनी मानवाला जे कार्य जमेल त्याप्रमाणे त्यांनी काम करावे, उदाहरणार्थ, अन्न हवे म्हणून शेती करणे, वस्त्र हवे म्हणून कपडे तयार करणे, राहावयास घर तयार करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे मानवांनी करायला सुरुवात केली. त्याप्रमाणे त्यांच्या कामधंद्यावरून जाती निर्माण झाल्या आणि कामाच्या स्वरूपावरून त्यांनी जातीमध्ये उच्चनीचता असा भेदभाव सुरू केला. जे लोक परमेश्वराची पूजा करण्याचे कार्य करीत होते ते  सर्वोत्तम मानू लागल.  अशा रीतीने तो उच्चभ्रू समाज मानला गेला. परमेश्वराची खरी आराधना करणारे लोक दूर राहील. परंतु परमेश्वराला प्राप्त करण्याच्या नावाखाली स्वतःला बुद्धिमान, परमेश्वरोच एक अंग म्हणून म्हणवून घेणारे संधीसाधू,  ढोगी असे काही लोक निर्माण झालेत व ते इतरांचा छळ करू लागले. त्यांनी मंत्र, तंत्र या विद्या हस्तगत करून लोकांच्या पिवळनुकीला सुरुवात केली. या प्रकारे संपूर्ण जगातील सर्व धर्मात अंधश्रद्धा निर्माण करण्यात आली. यामध्ये हिंदूहे अग्रेसर आहेत. अशा प्रकारे मानवाची सर्व दुःख दूर करण्याचे अधिकार आम्हास असून आम्हीच दुःख दूर करू शकतो असा गैरसमज इतर मानवात निर्माण केल्या गेला. या सर्व युगात जेव्हा जेव्हा अराजकता, अनिती, अनेती, असत्य, दुराचार,  अत्याचार, भ्रष्टाचार, स्वार्थीपणा, मोह, अहंकार,या युक्ती मानवत भयंकर वाढू लागल्या तेव्हा तेव्हा या गोष्टीचा नायनाट करण्याकरीत मानवाच्या रूपात जन्म घेतला आणि त्या गोष्टीबद्दल मानवात जागृती निर्माण करून त्याचा नाश केला. इतकेच नव्हते तर मानवाला परमेश्वरी गुणाबद्दल जागविले. आणि मानवाला मोक्ष कसा मिळेल याबद्दल त्यांनी शिकवण दिली. थोडक्यात अध्यात्मिक शक्ती नीती, सत्य, आत्म्याच्या दृष्टीने अवलंबिलेली धर्मनीतती हीच खरी 'परमेश्‍वरी कृपा' आहे हे शिकवण्याचे कार्य यामा महापुरुषाकडून घडविले. अशाप्रकारे प्रत्येक युगात कालपरत्चे सत्य, नीती टिकविण्यासाठी परमेश्वराचा अंश म्हणून महापुरुषांच्या रूपात परमेश्वराचा जन्म झालेला आहे. सध्या तीन युगे संपलेले असून चौथे युग म्हणजे कलियुग सुरू आहे. या युगाचा उत्तरार्ध सुरू आहे असे समजल्या जाते. या कलियुगात संपूर्ण जगात खूप मोठ्या प्रमाणात असत्य, अमर्यादा, अनैतिकता, भ्रष्टाचार,अत्याचार, अहंकार वाढत आहे.
            स्वार्थापायी जन्मदात्या आईवडिलांची, पोटच्या गोळ्याची पिळवणूक होत आहे. गरज पडल्यास त्याची हत्या करण्यास न कचणारे लोकही आहेत. धर्माच्या नावावर अनेक खोटे व्यवहार करणारे साधुसंत निर्माण झाले आहेत. ते तंत्र मंत्र मूर्तीपूजेला प्राधान्य देत आहेत. अंधश्रद्धा निर्माण करून गोरगरीब दुखीकष्टी जनतेला लुबाडणे सुरू आहे. मानवामध्ये अहंकार निर्माण झाला आहे. भारत हा 'धर्मनिरपेक्ष' देश असला  तरी या देशात धर्माच्या नावावर लोकांची पिळवणूक सुरू आहे. येथे मुख्यत्वेकरून हिंदूधर्माचे लोक जास्त राहतात. हिंदूधर्मात सुद्धा कामधंदावरून माणसाचे चार भेद निर्माण केले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे ते चतुभेद आहेत. यात सुद्धा अनेक जाती निर्माण झालेल्या आहेत. या जातीमध्ये  अनेक सत्पुरुष संत सद्गुरू निर्माण झाले आहेत आणि धर्माच्या नावावर परमेश्वराबद्दल जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करीत आहेत. परंतु ते खर्‍या अर्थाने परमेश्वरी ओळख करून देत नाहीत असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण त्याची चालीरीतीप्रमाणे तंत्र-मंत्र मूर्तीपूजा ह्याच रूढी ठेवलेल्या आहेत आणि परमेश्वर यातच आहे, असे ते सांगत असतात. अशा प्रकारे ते अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. यामुळे सत्याचा लोप  होत असून मानवात परमेश्वरी  कृपेची खरी जागृती होताना दिसत नाही. मानव हा आपल्या बुद्धीचा वापर करून त्याच्यावर येणाऱ्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करतो.
भगवान बाबा हनुमानजी photo
भगवान  बाबा  हनुमानजी


          बदलणार्‍या वातावरणाचा परिणाम होऊन त्याला अनेक शारीरिक दुःख निर्माण होतात आणि
ती दुःखे उपचारांने लवकर बरी झाली नाहीत तर तो मानसिक व आर्थिक दुःखाने पीडित होतो. सर्व प्रकारचे उपचार करूनही त्याला समाधान मिळत नाही तेव्हा तो निराश होतो. अशा वेळेस त्याला परमेश्वराची आठवण होते व तो परमेश्वराच्या प्राप्तीसाठी भटकत असतो. अशावेळेस त्याचा गैरफायदा संधिसाधू लोक धर्माच्या नावावर घेतात.
   ‌               परंतु ते त्याचे दुःख दूर करीत नाही. अशा परिस्थितीत, देशात किंबहुना जगात शांती निर्माण करण्याकरिता 'सत्याचे रोप' परत लावावे असे परमेश्वराला वाटले असावे. जेणेकरून मानवजागृती होऊन कालचक्राप्रमाणे कलियुगातून जग पुन्हा सत्ययुगात सत्य, नीतिमत्तेला धरुन प्रवेश करील आणि म्हणून सत्य, निती प्रस्थापित करण्याकरिता सत्यवादी, प्रेमळ, मोह, माया, अहंकापासून अलिप्त राहणीर, परमेश्वराची खरी ओळख करून देणारी व्यक्ती, जिचा कतुत्वाने आणि मार्गदर्शकाने मानवात परमेश्वराबद्दल जागृती निर्माण होईल आणि पुन्हा सत्ययुग निर्माण होईल, अशा एका निष्काम कार्य करणाऱ्या कर्मयोगी महापुरुषांची परमेश्वराने निर्मिती केली आहे. ती व्यक्ती मनुष्याला सत्य, मर्यादा, प्रेमाचे आचरण करण्याबद्दल निष्काम भावनेने सदोदीत मार्गदर्शन करते. आणि एका परमेश्वराची निराकार आणि चैतन्यात ओळख करून देते. इतकेच नव्हे तर नुसत्या आपल्या मार्गदर्शनाने मानवाची अनेक दुःख मग ती शारीरिक, मानसिक वा आर्थिक असो नष्ट करते. त्यांना रोग मुक्त करते ते परमेश्वराची ओळख करून देताना सांगतात की.,... परमेश्वर हा एकच आहे व व तो प्रत्येकात विराजमान आहे. तो निराकार आहेत ती व्यक्ती नसून जागृत शक्ती आहे आणि ती मानवत चोवीस तास चैतन्य आहे. ती निर्जीव वस्तूमध्येनसून सजीव प्राण्यांच्या आत्म्यात आहे.
              परमेश्वर दिसत नसून त्याचे गुण दिसतात. म्हणून मूर्तिपूजा हे शब्द ढोंग आहेत मानवाने परमेश्‍वराला प्रिय असणारे सत्य, मर्यादा,प्रेमाचे आचरण करावे. त्यागाने कार्य घडवावे म्हणजे खरा मोक्ष मिळतो. मानवाने मानवासारखे वागावे ही शिकवण ते देत असतात. म्हणून त्यांनी 'मानव धर्म' स्थापन केला, ज्याला जात-पात नाही. असे जे महापुरुष आहेत ते महानत्यागी बाबा जुमदेवजी....

‌ सर्व सेवक दादा ताईला माझा आदरपूर्वक  नमस्कार जी.........

‌...

No comments

Powered by Blogger.