लागला मनी एकच ध्यास, धरु आता मानवधर्माची कास,झाले सारे दुःख दुर,कुटुंबात आला सुखाचा महापुर.. परमात्मा एक

    👉▶️आजचा अनुभव▶️👉


Parmatma ek hd wallpapers


👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾
 !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
 !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !
 !! परमात्मा एक
        ▶माझा सत्य अनुभव▶


         [ लागला मनी एकच ध्यास, धरु आता मानवधर्माची कास,झाले सारे दुःख दुर,कुटुंबात आला सुखाचा महापुर]  

                         🙏नमस्कारजी🙏

     
माझे पूर्ण नाव:- दिपक डोमाजी पेटकुले मु.पो.मारोडी येथे वास्तव्यास आहे.
मानवधर्म एकता परिवार या भगवत कार्याच्या  गृपवर हा माझा पहीला अनूभव सादर करित आहे.

माझी आई खुप दयाळू ,प्रामाणिक ,कष्टाळू व प्रेमळ स्वभावाची पण कूठे कर्म चूकले तर माहित नाही .सतत तीला पोटाचा त्रास होता .सतत पोट दुखायचा ,हातपाय सूद्धा दूखायचे पोटामधे नेहमी काहीतरी भारी वस्तू हलण्याचा त्रास जाणवत होता .व या ञासामुळे कानामधे सू-सू-सू असा सारखा आवाज यायचा .त्यामुळे माझेवडिल कुणी जीकडे सांगत तिकडे माझ्या आईला  उपचारासाठी नेत असत.परंतु काही दिवसानंतर आणखी तोच त्रास व्हायचा .वैद वाणीकरूनही थकलो होतो वैद सांगायचा की निंबू बनवून नदीला किंवा नाल्याला सोडायचे हि विधी रात्री व सकाळी  करायची असे सांगत होता व काहीतरी धागा आणि गाळ्यामधे ताबिज बनवून द्यायचा व कोंबड्याचा जेवन आणि पैसा  घेवून जायचा .व माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होते म्हणून वैदालाही दारू पाजावी लागत होती.अशा प्रकारे वैद माझ्या वडिलांची व माझ्या परिवाराची पिळवणूक करितअसत.आणि इकडे डाँक्टर उपचार सूद्धा सूरू होता .आमचे दोन्ही भावांचे शिक्षण ,घर चालविणे वआईच्या प्रकृतीला पैसा लावने व त्यांचे दारूचे व्यसन पूर्ण करणे यापासुन ते सूद्धा ञासले होते .व कधी कधी आईला शिविगाळ करुन मारतही होते.माझ्या वडिलांना दारूचे व्यसन असे होते की,१०रू.च्या मच्छ्च्या आणत होते पण २०रू.दारू पित होते म्हणजे "चाराण्याची कोंबडी व बाराण्याचा मसाला ""असा माझ्या वडिलाचा दारूचा व्यसन होता मात्र ते दारू पिऊन असल्यास कूनालाही त्रास देत  नव्हते .अशा परिस्थितीत आम्हच्या गावातील सेवकांकडून मार्गाविषयी माहिती मीळाली.व ही माहिती जेव्हा माझ्या आईने माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा माझे वडिल म्हणत होते की हा मार्ग कोण धरिल तूला मार्गात जायचे असेल तर तू आपले दोन्ही  मुलांना घेऊन मार्गात जा मी येणार नाही  मी तूला सोडीनपण मी मार्गात येणार नाही असे म्हटल्यावर माझी आई खुप नाराज झाली व मला म्हणाली "दिपक आपणच मार्गात जाऊ" तेव्हा मीही नाही  म्हनालो ,वआईजवळून खाली मान घालून बाहेर फिरायला गेलो .कारण मला वाटत होते की,आम्ही मार्गात जावं  व उद्या चालून वडिल दारू पिवून घरी येणे म्हणजे हा परमेश्वराचा अपमान होईल त्या पेक्षा नाही मार्गात गेलं तेच बरं .
त्या नंतर मी सायंकाळी गावातील हनूमानजी च्या मंदिरात  भजनाच्या कार्यक्रमात गेलो  आणी श्रिरामाच्या मूर्तीला हात जोडून विनंती केलो.परंतु कोनताही देव माझ्या आईचे दूःख दूर करू शकला नाही .वअसेच काही दिवस निघुन गेले.
त्यानंतर आम्हच्या गावातील  सेवक श्री रमेशजी नागापुरे यांच्या सोबत माझे वडील शेतामधे काम करित असतांनी नागापुरे काकाजींनी मानव धर्माबद्दल सविस्तर समजावून सांगितलं व त्याच दिवशी माझ्या वडिलांच्या मनात परिवर्तन झाले.आणि सांयकाळी घरीयेवुन खुप दारू पिली व सट्टा सूद्धा लावला  योगायोगाने १०००रू.चा सट्टाही आला जनू भगवंत माझ्या वडिलाचा कसच पाहत असेल परंतू माझे वडिल जबानिचे पक्के होते  व दुसऱ्या दिवशी वडिलांनी आम्हाला प्रश्न केला की,"दिपक आपण मार्गात जावून का ? तेव्हा आम्हांला खुप आनंद झाला व मनातच म्हनालो की "आज कोनता देव पावला "आम्ही वेळ न करता वडिलांच्या शब्दाला होकार दिला .

त्यानंतर वडिल जेव्हा गावातील सेवकांच्या घरी मार्गदर्शनाकरिता जात होते तेव्हा गावातील लोक मला मार्गात जाण्यासाठी मनाई करित होते कारण  त्या वेळेस मी मंदिरात जाऊन  सकाळसंध्याळ आरती करित होतो ,भजन करित होतो व मंदिराच्या कामाकाजात हातभार लावित होतो .त्यामूळे गावातील लोकांचा आवडता झालो होतो.परंतू जे मला मार्गात जाण्यासाठी रोकत होते .त्यांच्या शब्दांत न जाता वडिलांना दिलेल्या शब्दातच राहिलो.व गणपती स्थापनेच्या पर्वावर  २००५ साली श्री माननिय खुशालजी फलके यांच्या सोबत जाऊन मौदा येथिल मार्गदर्शक श्रीमाननिय पांडुरंगजी मदनकर यांच्या कडून आम्ही ३,७,११,२१,३१अशा दिवसाचे साधे कार्ये करित गेलो व हळूहळू माझ्या आईच्या प्रकृतीमधे सूधारणा झाली आणि माझ्या वडिलाचा दारूचा व सट्याचा व्यसनही बंद झाले .तेव्हा पासून आम्ही सूखसमाधानाने वआनंदाने जीवन जगत आहो .धन्य तो परमेश्वर व धन्य ते महानत्यागी बाबा जुमदेवजी आम्हच्या सारखे दुःखी अज्ञानी मानसाला सेवक बनविले  व आम्हच्या दूःखाचे निवारण केले .

त्यानंतर आम्ही २००८ मधे त्यागाचे ४२दिवसाचे कार्य केले कार्य सूरळीत पार पाडुन दिनांक २६/११/२००८ ला त्यागाचे हवनकार्य पार पडले व आम्हाला १९८४९ हा सेवक नंबर मिळाला .व त्याचवर्षी माझे लग्न दि.२/०५/२००८ ला झाले  आणि नंतर माझ्या लहान भावाचेही लग्न झाले .व मला दोन मुली व माझ्या भावालाही दोन मुलीच झाल्या .त्यामूळे आम्हच्या कुटुंबात चारही मुलीच असल्याने आम्हाला थोडी नाराजी वाटत होती .पण मी भगवंताला समाधानी आहे असे सांगत होतो.काही दिवस आम्ही सर्व जन एकत्र राहून  काढले  परंतू माझ्या पत्नीचे व माझ्या भावाच्या पत्नीचे  आपसात पटत नसल्याने माझ्या वडिलांनी मला वेगळा राहायला सांगितले व मी मार्गदर्शकाच्या सल्यानूसार वेगळा  पूजेचा पाठ ठेवून विनंती प्रार्थना करित होतो .परंतू घरी भगवंताची फोटो नाही व आईवडिलांपासून वेगळे राहिल्यामुळे मला खुपच एकटेपणा वाटत होता.म्हणून मी मार्गदर्शकाच्या शब्दाने ११दिवसाचे त्यागाचे कार्य करून भगवंताची फोटो आणून हवनकार्य दि.१/११/२०१६ला पार पडले व आम्हाला ४०८५३सेवक नंबर मिळाला .
नतंर डिसेंबर २०१७ ला माझी पत्नी गरोदर राहिली व तीने मला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा मला विचार आला व मी तिला  म्हटले आपण दवाखान्यात जावून आबोशन करून घेऊ .कारण आपल्याला दोन मुली आहेत.आणि तिसऱ्या ही वेळेस मुलगी झाली तर काय करायचे ? पण  माझी पत्नी माझे मानायला तयार नव्हती शेवटी आम्ही दोघेही मार्गदर्शकाकडे जाऊन सर्व हकिकत सांगितली. व त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि अनूभव ही सांगितले व मलाही काही अनूभव माहित होते त्यामूळे मीही त्यांच्या शब्दावर विश्वास केला व भगवंताचे साधे कार्य केले .व डाँक्टरच्या औषधीशिवाय इतर कूठलीही औषधी घेतली नाही .नाहितरआज आपण पाहतो की,बाबाचे सेवक असुन सूद्धा अंधश्रदेच्या मागे धावतात व मुलगा व्हावा म्हणून पालटची औषध घेतात नाही तर पैसा असलाकी "अल्ट्रासाऊड मशिनद्वारे"तपासणी करतात व बाळ जन्माला यायच्या अगोदरच त्याचा जीव घेतात.मी असे काहिच केले नाही फक्त भगवंतावर विश्वास ठेवुन कार्य केले.परंतू गावातील काही सेवक म्हणाले  की, मुलगी  झाली तर काय  करणार ?  त्यावर त्यांना माझे एकच ऊत्तर होते .तुम्ही इतके दिवसाचे सेवक असून भगवंतावर विश्वास नाही का.आणि बघा मी केलेले कार्य व भगवंतावर केलेल्या विश्वासाचे मला फळ मिळाले .व गरोदर महिलेस गरोदरपणाचा जो त्रासहोतो तो त्रास सोडून इतर दुसरा कोणताही त्रास न होता दि.२७/८/२०१८ ला सांय.५. ५९मी .प्राथमिक आरोग्य केंद्र मौदा येथे माझ्या पत्नीची डिलेवरी झाली व एक सूंदर मुलगा जन्माला आला. मला,सर्व सेवकांना , सर्व रिश्तेदारांना व गावातील लोकांना खूप खुप आनंद झाला व भगवंतावरचा विश्वास माझा कायम राहिला आणि दि.६/१०/२०१८ला बारश्याच्या कार्यक्रमानिमित्य भगवंताचे हवनकार्य व मानवधर्माच्या प्रचार प्रसारासाठी चर्चा बैठक घेतली .या चर्चा बैठकिचे अध्यक्ष  श्री माननिय शामरावजी वाघाये, प्रमुख पाहूने गवतुजी शेंडे , कवडूजी शिन्दे, गृपचे अँडमिन महेशदादा हटवार ,व सेवक पाहूणे आप्तगन,गावातील सेवक व आजणगांव येथिल भजनमंडळ इत्यादींच्या उपस्थित बाळाचे नाव *"आदेश"* ठेवून कार्यक्रम पार पाडला.

हे माझे मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेला अनूभव  आपल्यासमोर  सादर केला यात काही चूका झालेल्या असतील तर मी सर्वांना माफी मागतो व आपला अनुभव येथेच संपवितो.

नमस्कार जी सर्वांना.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*सेवकांचे नाव: दिपक डोमाजी पेटकुले*
*पत्ता :- मु.मारोडी त.मौदा जि.नागपुर*
*सेवक क्र.:४०८५३*
*मार्गदर्शक :- मा.श्री पाण्डुरंगजी मदनकर काकाजी मु.मौदा*
*परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर, नागपूर.*

••••••••••••••••••••••••••••••••••
*अनुभव एडिटिंग :-*
*गणेश दादा बिडकर*
*रोशन दादा काटेकर*

         *[वरिल अनुभव कुणिही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावा.}*

*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*

गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
                   🔴सौजन्य🔴
   🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार,
(वाट्सअप ग्रुप &फेसबुक पेज)
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.