मला मार्गात जीवनदान मिळाले___परमात्मा एक

_____ मला मार्गात जीवनदान मिळाले______



मला मार्गात जीवनदान मिळाले___परमात्मा एक
मला मार्गात जीवनदान मिळाले___परमात्मा एक

               माझे लग्न ९७४ मध्ये झाले. लग्नाअगोदर मी अगदी तंदुरुस्त होते परंतु १९७५ पासून मला खूपच त्रास व्हायला लागला. माझे पती खूपच दारू पीत होते. मला खूप त्रास द्यायचे आणि त्यातचा मला पदर विकार, चक्कर येणे सुरू झाले. मी लाजत असल्याने कुणालाही या बाबतीत सांगितले नाही व माझी प्रकृती खालावत गेली. मी भंडार्‍याची औषध १ वर्षे घेतली पण आराम नाही. माझे पती ड्युटी वर जात होते. मी दिवसभर झोपून राहायची मी त्यांना म्हटले आपण बाहेरच पाहू तर मला म्हणाले मी कोणाशी भांडलो नाही मग तुला कोण करेल? नंतर वैदाकरे  कळडीला ला गेलो त्यांनी सांगितले तुमच्याच घराशेजारीच गणपत तितीरमारेनी देवळात जाऊन केला जे सांगितले ते विधी मी केली पण तात्पुरता आराम वाटत भीतीपोटी आम्ही गाव सोडला व मनेरी गावी स्थायिक झालो. अडीच एकर शेती घेतली माती टाकली आमच्या जमिनींला लागून असलेल्या  व्यक्तीने आमच्या धुर्‍यावर तुळी लावले मी झाड उपडले आणि भांडण झाला. ज्याच्याशी भांडण झाला तो वैद् होता तो म्हणाला तुम्हाला पाहून घेईन. नेहमी घरी यायचा पण आमच्या मनात त्याच्याबद्दल काहीच नव्हते. माझी तब्येत बिघडली. मला वीशींला बोधनकर डॉक्टरकडे नेले त्यांनी मला गुंगीचे इंजेक्शन दिले मला विशिीवरून झोपेतच आणले मला भान राहत नव्हता. नंतर माझे पतीची बदली गिरोला येथे झाली. तेथे मी एका वैदाकडे जात होती त्याने धागे दोरे, नींबू करून दिले उलट्या बुऱ्याचे कोंबडे पूजापाठ करून दिला पण आराम नाही. 


          माझा भाऊ चीचगडला फारेष्टमध्ये होता त्याने सांगितले मुसलमान दुरुस्त करून देतो तो चांगला आहे आम्ही आठ दिवसांनी चीचगडला मुसलमानाकडे गेलो त्यानेही उलट्या बुऱ्याचे कोंबडे, दारू सांगून काम करून दिले. दोन तीन दिवस आराम वाटायचा नंतर तशची. मला नागपूरला कापसे डॉक्टरकडे नेण्यात आले तिथे वीस-पंचवीस डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. डॉक्टरने सांगितले डोक्याचे केस काढावे लागतील पण मी केस काढत नाही मनाली कारण माझीच मुले मलाच घाबरतील मला पागल म्हणतील, परंतु डॉक्टर म्हणाले की, एका महिन्यात केस येतील असे तेल देतो , माझे पती म्हणाले मी तुला विग घेऊन देईन.

          माझ्या डोक्यावरील केस पुर्ण काढले. दररोज तीन मिनिट गरम तेलानी डोके शेकत होते असे एक महिन्या चालले पोर्णिमा अमावस्या आली की काहीच समजत नव्हते दीड महिना मेयो हॉस्पिटलमध्ये होती, डोक्यानंतर डोळ्याचा त्रास वाढला डॉक्टरने डोळ्याचे ऑपरेशन करायला सांगितले म्हणून मला टी.टी.चे इंजेक्शन दिले तर माझा पूर्ण हात सुजना व पिकल्यासारखा झाला मग डॉक्टरने डोळ्याचे ऑपरेशन केले नाही माझ्या पतीने मला घरी आणले परत वैदवानी उपचार केले आराम झाला नाही.
                     माझ्या डोक्यावर गाठी लागायच्या खूप त्रास होत होता तळफळत होती मला स्वप्नात बाबांनी सांगितले शेतात सिताराम घरोट सोबत भांडण झाले बाळंतीन लावली तेव्हा मला जाग आली आणि पतीजवळ ही गोष्ट सांगितली त्यांनी म्हटले की आपली खरोखरच चूक झाली होती. भांडण झाले पण आपण बाबांना नाही म्हटले ही चूक झाली म्हणून जुने दुःख आले याचा खुलासा कार्यकर्त्याकडे केला तेव्हा आमचे दुःख दूर झाले. सर्व समजू लागले बडबड नाहीसी झाली मला जीवनदान मिळाले. या मार्गात येण्याअगोदर साठ-सत्तर हजार खर्च झाले. मार्गात काहीच खर्च लागला नाही आणि पूर्ण सुख समाधान मिळाला. तेव्हापासून बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाचे पालन करीत आहे आणि पुढेही करित राहील. 

नमस्कार जी.......!

                                   सौ. मुक्ताबाई देवरावजी तुमसरे

माझे अनुभव सागतांना काही चुका झाल्यास भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, महान त्यागी बाबा जुमदेवजिला  
क्षमा मागतो, माता वाराणसी आईला क्षमा मागतो, मार्गदर्शक, सेवक, सेविका, बालगोपाल यांना क्षमा मागतो.

       सर्वांना माझा नमस्कार जी......


No comments

Powered by Blogger.