【"आईने मोजलेच नाही..."】 ... Mothers day

【"आईने मोजलेच नाही..."】 


परमात्मा एक फोटो


आयुष्याच्या तव्यावरती,
संसाराची पोळी भाजता-भाजता,
हाताला किती बसले चटके,
आईने मोजलेच नाही...

नवर्‍यासह लेकरा-बाळांचे
करता-करता,
मोठ्यांचा मान राखता-राखता,
कितीदा वाकले गेले ,
आईने मोजलेच नाही...

बाळाला किती झोके दिले,
आईने मोजलेच नाही,
बाळासाठी किती रात्री जागले,
आईने रात्री मोजल्याच नाही
जरा चुकले की घरच्यांची-बाहेरच्यांची,
किती बोलणी खाल्ली,
काळजाला किती घरं पडली,
आईने मोजलेच नाही...

याच्यासाठी-त्याच्यासाठी,
आणखीही कुणासाठी,
जगता-जगता,
स्वतःसाठी अशी किती जगली,
आईने मोजलेच नाही...

पाखरे गेली फारच दूर,
डोळा आहे श्रावणपूर,
पैशाचा हा नुसता धूर,
निसटून गेले कोणते सूर,
आईने मोजलेच नाही...

"सर्व आईंना समर्पित..."
🙏🙏🙏🙏

No comments

Powered by Blogger.