मी मार्गात येण्याचे अगोदर मला दारुचे खुप वेशन होते.. PARMATMA EK 435
▶ आजचा अनुभव :-
👇🏿👇🏿👇🏿
।।भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम।।
।।महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम।।
परमात्मा एक।।
![]() |
▶माझा सत्य अनुभव▶ |
माझे नाव:-मारोती राजेरामजी मीसाळ आहे.
या मानवधर्म एकता परिवार वाट्स ग्रुप मध्ये हा पहिला अनुभव सादर करीत आहे.
मी मार्गात येण्याचे अगोदर मला दारुचे खुप वेशन होते. दारू पिऊन गावा मध्ये झगडा भांडण करायचे. कोणाला ही शिवी गाळ करायचे. बाहेर तर घरी आई वडील आणि पत्नी मुला मुलीला शिवी गाळ करायचे त्यांना मारहाण पण करायचे. नातेवाईकांनाही शिवी गाळ करायचे.आणि माझ्या मुळे पत्नी व मुले कंटाळून गेले होते. आणि मी माझी शेती गिरवी ठेवून ५०,००० रुपये आनले व जुव्वा मध्ये एकाच दिवशी हारलो त्या नंतर मी माझी ५०,०००रुपयाची स्प्लेंडर गाडी तेरा हजार रुपयांची विकुन ते पण लाॅटरी मध्ये हारलो. माझ्या पत्नीला व घरी कोणाला ही माहीती नव्हते. त्या नंतर काही दिवसांनी घरी माहिती झाली. त्या नंतर माझ्या पत्नीने मला परमात्मा एक मार्गात जायचे का म्हणून सांगितले पण मला मार्गा विषयी माहिती नव्हती की मार्ग कशाला म्हणतात. हे माहित होत की एक अगरबत्ती चा मार्ग घेतला तर दारु सुटते म्हणून मग मी मार्गात येण्यास तयार झालो.मग मी मार्गात आलो आणी मार्गात आल्यावर आयुष्या मध्ये ३८ वर्षात पहिल्यांदाच मेहनतीचे काम केले. मी भाजी पाल्याचा धंदा सुरू केला आणि दोन वर्ष जवळ पास भाजी पाल्याचा धंदा केला.
आणि भगवंता च्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या प्रेरणेने आणि माझ्या वागण्याने फरक पडत गेला आणि घरच्या लोकांना माझ्या वर विश्वास आला की आपला मुलगा पुर्ण पणे सुधारलेला आहे. मग मी आई वडिलांना आणि भावाला म्हटले. की आपण एक ले आऊट टाकु आणि त्या नंतर मी ले आऊट टाकले आणि माझा व्यवस्थित व्यवहार सुरू झाला आणि आज बाबांच्या कृपेने आमच्या कडे सर्व काही व्यवस्थित आहे. आम्ही आज सुखी समाधानी होऊ जीवन जगत आहो.
माझ्या लीहीन्या मध्ये काही शब्द चुकले तर मी भगवान बाबा हनुमानजी ला माफी मागतो महानत्यागी बाबा जुमदेवजी ला मातोश्री वाराणसी आईला व सर्व सेवक दादा व सेविका ताईला क्षमा मागतो
सेविकांचे नाव:-मारोती राजेरामजी मिसाळ
: पत्ता-मु.निंम्बा पो.कळमंना त.जि.नागपूर
मो.नं:-8698124639
सेवक नम्बर:-43446*
: मार्गदर्शक- शिवकुमारजी मडावी काकाजी रा.पाचगाव
मो.नं. 9545482651
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.
••••••••••••••••••••••••••••••••••
अनुभव संकलन:-गजानन दादा लेन्डे
-------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]
भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
========================
मानव धर्म एकता परिवार ( व्हाट्सअप्प ग्रुप व फेसबुक पेज) शी जुडुन भगवंत कार्याच्या ऑनलाईन चर्चा बैठकीचा लाभ घेण्यासाठी आणि आपले मार्गात येण्याचे कारण व मार्गात आलेले अनुभव सादर करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.
गणेश दादा बिडकर:-👉९७६६५७३४१०
गजानन दादा लेन्डे :👉 ९८५०६७५७६६
मोहन दादा आस्वले:-👉९७६४९८९८८३
<><><><><><><><><><><><><><><>
सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार,
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Namskarji
ReplyDelete