एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग..PARMATMA EK


बाबांनी भगवान बाबा हनुमानजी ची प्राप्ती केल्यावर सुद्धा त्यांच्या कुटुंबातील लोक हिंदूधर्मातील सर्व देवांना उदाहरणार्थ राम, कृष्ण, शंकर-पार्वती, देवी इत्यादी मानत असत. त्यांची पूजा-अर्चना करीत असत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील दुःख पूर्णपणे नाहीसे झालेले नव्हते. कुटुंबात दुःख आले तर बाबा मंत्रोच्चाराने फुक मारीत असत. मंत्रोच्चाराने तीर्थ करून देत आणि दुःख नष्ट करीत असत.  
एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग
एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग

परंतु ती तात्पुरतीच दूर करत होत असत. 
इतर लोकांना हे माहित झाल्यावर ते दुःखी कष्टी लोक बाबाकडे येऊ लागले. बाबा मंत्रोच्चाराने फुक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले. बाबा हे विधी पूर्ण करणारे असले तरी त्यांना यातील काहीही समजत नव्हते. ते अज्ञातवासात होते. परंतु त्यांच्या मंत्राने लोकांना भगवंतांचे गुण मिळत होते.
एके दिवशी रंगारी समाजाची शांताबाई नावाची एक बाई बाबाकडे आपले दुःख घेऊन आली. ती कैलास टॉकीज च्या मागे राहत होती. तिच्या अंगात खूप भूत येत होते. बाबा जुमदेवजी हे बाबा हनुमानजीचे नाव घेऊन, हातात झाडू घेऊन तो मंत्रोच्चाराने तिच्या डोक्यावर मारत होते पण तो मारती का लागत नव्हता. तिच्या अंगात येणारे भूत पलित निघत नव्हते. ही पलित काढण्याची क्रिया सतत अडीच वर्ष सुरू होती. इतरांना मात्र भगवंतांचे गुण मिळत होते. परंतु तिला मात्र गुण मिळत नव्हते. तिच्या अंगात एवढी जोरदार पलित येत होते की, या काळात स्वतःच्या गालाचे मास स्वतःच्याच हाताच्या नखाने ती ओरखडून काढायची आणि खायची. इतकी बेशुध्द अवस्थेत ी होती. तिच्या गालावर खूप मोठी जखम झाली होती. बाबांना विचार पडला की हनुमानजी या कल्पनारुपी शक्तीवर मात का करीत नाहीत त्यांनी बेचाळीस दिवस हवन करायचे ठरविले जेणेकरून तिला आराम मिळेल.
एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग photo
एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग


ठरल्याप्रमाणे बाबांनी दुसऱ्या दिवसापासून आपल्या घरीच सायंकाळी एक निश्चित वेळ ठरवून बेचाळीस दिवसांचे हवन  करण्यास सुरुवात केली. १९४८ सालचा जुलै महिना होता. ती बाई रोज हवनात येऊन बसायची. तिला या बेचाळीस दिवसाच्या हवनात रोज काही ना काही दिसत असे. याप्रमाणे ती सारखी बडबड करायची.
              हवन सुरु असताना ती असा उल्लेख करायची की हे हवन खोटे आहे. परंतु कृष्ण भगवान हवनात उभे आहेत. ते आकाशाला टेकले आहेत. बाबा हनुमानजी पाताळात फिरत आहेत.
 आणि भुतांना शोधून आपल्या शेपटीत गुंडाळून दहा हजार, वीस हजार, चाळीस हजार, सत्तर हजार, एक लाख इतके भूत आणून ते हवनात टाकत आहेत आणि ते सर्व जळत आहेत. जसजसे हवनांचे बेचाळीस दिवस पूर्ण होत होते. तस-तशी भुतांची संख्या वाढतच होती. बाबा हनुमानजी शेपटीत एक लाख, दोन लाख, पन्नास लाख भूत गुंडाळून आणून हवनात टाकत आहेत आणि ते हवनात जळत आहे. शेवटी शेवटी तर भुताची कोटी आणि अब्जात गणना करू लागली आणि हवनात टाकल्याचा उल्लेख केला. तेव्हा बाबांनी मनात विचारले 'इतने सैतान कहासे आये' बाबांना वाटले जेवडे लोक मरण पावतात ते सर्व भूत सैतान होतात. त्याना मुक्ति मिलत नाही, म्हणून मुक्ती मिळण्याकरिता परमेश्वरी कार्य करणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे बाबांनी बेचाळीस दिवस हवनविधि करून तिच्या अंगात येणारे भूत पलीत काढले. व काळात हवणाच्या अंगाऱ्याने तिच्या गालाची जखम पूर्ण भरली आणि मांस काढ़न्याची क्रिया बंद झाली.भगवंताची लीला न्यारी या  म्हणीप्रमाणे त्या बाईच्या अंगातुन पूर्णपणे भुत् येणे बंद झाले नोव्हते. ती पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रेचाळीसाव्या दिवशी सकाळीच सहा वाजता बाबांच्या घरी आली आणि आपले अंग फिरवु लागली.बाबा जेवतेम प्रात: विधी आटोपून बसले होते. त्यांनी हवनाचा अंगार उडविला आणि मंत्रोच्चारणे त्यावर फूंक मारून तो तिच्या अंगावर उडविला आणि तिच्या अंगात येणारे भूत बाहेर काढले. समाधान मिळाल्यावर ती घरी जावयास निघाली. परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यावर ती परत. बाबांकडे आली. पुन्हा अंग फिरवू लागली. बाबांनी मंत्रोपच्चाराने उपचार केले आणि अंग फिरणे बंद केले. ती शुध्दीवर येऊन घरी जावयास निघाली. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पुन्हा बाबांकडे यायची आणि अंग फिरवायची. बाबा उपचार करून तिला शुध्दीवर आणायचे. असे दिवसभर सुरू होते. बाबांनी मंत्रोच्चाराने संपूर्ण दिवस तिच्या अंगातील भूत काढून तिला शुध्दीवर आणण्याचे प्रयत्न केले. परंतु ते तिला पूर्णपणे समाधान देऊ शकले नाहीत. 

या दिवशी बाबांनी आंघोळ केली नाही. दिवसभर जेवण केले नाही आणि तिच्या अंगातील भूत नाहीसे करण्यातच पूर्ण वेळ घालविला. प्रयत्नांची परकाष्ठा केली. पण भूत निघाले नाही.तिला समाधान मिळाले नव्हते. सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते. दिवसभर बाबांनी संघर्ष केल्यावर ते त्रस्त झाले होते. सायंकाळी ती पुन्हा आल्यावर बाबा विचार करू लागले की, बाबा हनुमानजीच्या शक्तीपुढे ही कल्पनारुपी शक्ती टिकाव धरून आहे. ह्याचाच अर्थ असा की, हनुमानजी, राम, शंकर,देवी यांच्यात ह्या कल्पनारुपी शक्तीला नष्ट करण्याचे सामर्थ्य नाही.तेव्हा बाबांनी हनुमानजी ला विनंती केली की, ''हे हनुमानजी, आपने  सारे दैवत पैचान करायी ओर इस बाईका एक सैतान नही निकाल सकते। हे हनुमानजी, आप मुझे बताओ,  ऐसी कौनसी शक्ती है जो एक पल में इसे निकालेगा | मै इसके बाद किसी भी देवता को नहीं मानूगा |'' अशी बाबांनी प्रतिज्ञा केली आणि ते त्या बाईला म्हणाले,' यह आखरी फुंक है बाई | इसके बाद नही आना |' इतके बोलून तिच्या अंगावर अंगारा घेऊन मंत्रोच्चाराने फुंक मारली. तेव्हा तिच्या अंगातील भूत निघाले व ती जी घरी गेली ती पुन्हा परत आलीच नाही. अशाप्रकारे तिच्या अंगातील भूत नाहीसे झाले आणि तिला समाधान मिळाले. 


हे पाहून बाबांना आश्चर्य वाटले आणि त्यांचे लक्ष त्यांनी केलेल्या प्रतिज्ञेकडे गेले, त्यांना वाटले की, ही कोणती ती शक्ती आहे. त्यामुळे त्या बाईच्या अंगातील भूत नष्ट केले त्याप्रमाणे त्यांनी त्या शक्तीचा शोध घेण्याचे ठरविले. अशाप्रकारे बाबांना एक भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडला. 





.


1 comment:

Powered by Blogger.