महांणत्यागी बाबा जुमदेवजी च्या समतुल्य बॅनर /होल्डिंग वर सेवकांनी स्वतःच्या फोटो टाकू नये आणि सेवकांनी वैयक्तिक घरगुती कार्यक्रमातील निमंत्रण पत्रिकेवर मंडळाच्या सिम्बॉल भगवान बाबा हनुमान जी व महानत्यागी बाबा जुमदेवजींचा फोटो छापू नये.


परमात्मा एक अनुभव

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 |भगवान् बाबा हनुमानजी को प्रणाम|
 ||महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम||
 ||परमात्मा एक।।

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
🌻 मानवधर्म एकता परिवार व्हाट्सअप ग्रुप तर्फे दिनांक १०/०६/२०२० बुधवार दिवशी घेण्यात आलेल्या चर्चा बैठकिचा  विषयावर गृप मधील आलेले विचार एकदा अवश्य वाचावे🌻
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
मार्गातील साध्या व पक्क्या सेवकानं करिता नियम क्रमांक 70 पेज नंबर 24

     महांणत्यागी बाबा जुमदेवजी च्या समतुल्य बॅनर /होल्डिंग वर सेवकांनी स्वतःच्या फोटो टाकू नये आणि सेवकांनी वैयक्तिक घरगुती कार्यक्रमातील निमंत्रण पत्रिकेवर मंडळाच्या सिम्बॉल भगवान बाबा हनुमान जी व महानत्यागी बाबा जुमदेवजींचा फोटो छापू नये.


 विचार क्रमांक 01:-

👉 आजचा विषय छान आहे.  सर्व प्रथम आपण विचार करायला पाहिजे, आपण महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांना काय वचन दिले.रोज सकाळी विनंती मध्ये म्हणतो मी बाबांच्या आदेशांचे वेळीवेळी पालण करीन असे सत्य वचन देतो. हे वचन कोणी दिले यांचा आधी विचार करायला पाहिजे. जेणेकरुन आपल्या हातुन चुका होणार नाही. 
        महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपले जीवन दु:खी कष्टी मानवाला जागविण्यासाठी निष्काम कार्य केले. "निष्काम" हा शब्द माहाण शब्द आहे. त्या शब्दाचा कोणीही पालन करू शकले नाही व कधी करणारही नाही असे जगाच्या पाठीवर गुरू आपल्या मानवधर्माचे संस्थापक महाणत्यागी बाबा जुमदेवजी आपल्याला मिळाले हे आपले भाग्यच. मग विचार करा .
     बाबांनी म्हटले "ईस संसार को बदलणे वाला एकही शब्द हैं! वैचारीक क्रांती" आपण मानवधर्माचे सेवक आहो तर आपले विचार बदलायला पाहिजे.
 
        वरील शब्दाचा अर्थ आपण सेवक समजुन घेतला तर (७० वा नियम, पेज नं. २४) यांचे तंतोतंत पालन करु असे मला वाटते.

        माझ्या लिखाणात चुकीचे वाटल्यास भगवान बाबा हनुमानजी यांना क्षमा मागतो महाणत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो माता वाराणसी आईला क्षमा मागतो सर्व सेवक सेविका बालगोपाल यांना क्षमा मागतो क्षमा कराल अशी अपेक्षा करतो. नमस्कारजी 🙏

सेवक :-  अर्जुन हातआगरे

 विचार क्रमांक 02:-

नमस्कार जी सर्व सेवक दादा आणि ताईला 
आजचा विषय खूप सुंदर आहे सर्व सेवकांना शिकण्या योग्य आहे कारण मार्गात सेवक भरपूर झाले पण सेवकांची जबाबदारी काय आहे हे जाणून घेणारे सेवक फारच कमी आहेत.वरिल नियमाया प्रकारचा मोबदला घेतला नाही. कुठे आपली ओळख व्हावी याकरिता बाबा कधी झटले नाही तर प्रत्येक नरनारी चे दुःख दूर व्हावे आणि त्याची अंधश्रद्धा जुने विचार दूर होऊन सुख समाधानाने जीवन जगावे हा बाबाच्या उद्देश होता आणि ते कार्य बाबाने पूर्ण केले परंतु आपण सेवक ते समजू शकत नाही व जे कार्य आपल्याला बाबांनी करायला सांगितले ते कार्य न करता एका महान विधात्याची फोटो आपण आपल्या समतोल ठेवून आपणच आपला अपमान करीत आहोत.

बाबांनी केलेल्या कार्याची पावती बाबांना मिळाली आहे परंतु आपण बाबांनी सांगितल्या प्रकारे बाबाच्या शिकवणीप्रमाणे आपण कार्य केले तर बाबांसारखा मान सन्मान मिळू शकतो आणि आपला नाव मोठा होऊ शकतो निव्वळ फोटो दिल्याने आपला नाव मोठा होणार नाही तर आपण केलेल्या चांगल्या कार्याने आपला नाव मोठा होतो व आपली चांगल्या प्रकारे ओळख होते व मानसन्मान मिळतो.
तसेच नियमा मध्ये दिल्याप्रमाणे सेवकांनी वैयक्तिक कार्यक्रमा च्या पत्रिकेवर मंडळाचा सिम्बॉल भगवान बाबा हनुमान जी व महांनत्यागी बाबा जुमदेवजी चा फोटो छापू नये कारण ते कार्यक्रम आपले घरगुती परिवारामध्ये रिश्तेदारी मध्ये ते होत असते आणि त्या कार्यक्रमाची पत्रिका आपण प्रत्येकाला देत असतो जर आपण ती पत्रिका इतरांना दिली तर त्या पत्रिकेचा काम झाल्यानंतर ते लोक ती पत्रिका इकडे तिकडे टाकून देऊन त्यावर कुठल्याही प्रकारची घाण किंवा पाय पडू शकते आणि पत्रिकेवर असलेल्या भगवान बाबा हनुमान जी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या फोटो चाअपमान होऊ शकतो म्हणून सेवकांना विनंती आहे की अशा प्रकारचे कार्य कोणीही करू नये व दुःखास पात्र होऊ नये. असे आजच्या विषयावर  माझे विचार आहे चुकले असेल तर प्रथम भगवान बाबा हनुमान जी महानत्यागी बाबा जुमदेवजी मातोश्री वाराणसी आई आणि सर्व सेवक दादा व सेविका ताई यांना माफी मागतो नमस्कार

 दिपक दादा पेटकुले

 विचार क्रमांक 03:-

नमस्कार जि दादा वरील विषयावर थोडक्यात महान त्यागी बाबांनी  मानवधर्म मार्गामध्ये वाईट विचार वाईट विकार अंधश्रद्धा यांचा त्याग करून सेवकांना तत्व शब्द नियमांची शिकवन दिली परंतु प्रत्येक सेवक हा बाबांच्या शिकवनुकिनुसार वागत नसतो म्हनजेच बांबाच्या तत्व शब्द नियमांनुसार सेवक घडत नसतो बाबांच्या प्रतिमेचा बँनरचा अपमान होउ नये आनी लग्न पत्रिका बँनर कार्यक्रम पत्रिका यांच्या वर बाबांचा फोटो टाकु नये कारन की पत्रिका बँनर हे अनेक वाल्यांच्या पन घरी पन जात असतात अनेक वाल्यांना बाबांचे नियम माहित नसल्याने आपल्या मार्गाचा अपमान होत असतो आनि दु;खास पात्र सेवक सेविका होत असतात विचार देण्यात काही चुक भुल झाली असेल तर सर्व सेवक दादा सेविका ताईं बालगोपाल सर्वांना क्षमा मागतो सर्वांना नमस्कार जि

🙏सेवक;विजय रोकडे🙏

 विचार क्रमांक 04:-

आजच्या विषय छान आहे यावर मी माझे विचार व्यक्त करीत आहे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत आणि स्वलंबी व त्यागी जीवन जगून या मानवधर्म ची स्थापना केली आणि ही सेवा फक्त स्वतः पूर्ती मर्यादित न ठेवता इतर गरीब व दुखी लोकांना मोफत वाटून दिली. त्यानंतर बाबा नी दिवसेंदिवस वाढतच असणाऱ्या सेवकांची संख्या लक्षात घेता बाबा जूम्देव परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर ची स्थापना केली आणि संपूर्ण अधिकार मंडळाला दिले बाबांनी मार्गदर्शकाची आमसभा घेऊन मंडळ तर्फे नियमावली ठरवून दिले आणि आज आपण सर्व त्या नियमावली नुसार मार्गात आल्यावर पालन करत आहोत परंतु काही मार्गदर्शक आणि सेवक मंडळाचा नियमावली चा अनादर करतो आहे स्वतःला बाबा जुमदेव जी चा बरोबरी करायचा प्रयत्न करीत आहे आणि हे चुकीचे आहे असे मला वाटते कारण नियम सांगतो की महान त्यागी बाबा जुमदेवजी च्या संतुलित बॅनर सेवकांनी स्वतःचा फोटो टाकू नये परंतु निदर्शनात येते की या नियमाला कोणीही मानत नाहीत आणि सर्व स्वतःला बाबा जुमदेवजी पेक्षा मोठा आणि त्यागी समजायला लागले आहेत , मला वाटते की या कडे मंडळाने या बाबी वर प्रचार करून सेवकांना या नियमाची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि काही सेवक स्वतः छ कार्यक्रमात किंव्हा लग्न पत्रिकेवर बाबा हनुमानजी व बाबा जुमदेवजी चा फोटो लावताना दिसतात हे खूप चुकीचे आहे सेवकांनी या नियमांना गंभीरतेने विचार करून कार्य करायला पाहिजे आणि बाबांनी दिलेल्या सर्व नियमाचे पुरे पुर प्रयत्न करायला पाहिजे मी पण करणार इतके लिहून माझे विचार व संपवत आहे माझा लीहण्यात काही चूक झाली असेल तर मला माफ करावे नमस्कार
रोशन विनोदराव काटेकर
मानवधर्म एकता परिवार

 विचार क्रमांक 05:-

 वरील विषयावर मि आपले थोडक्यात आपले विचार माडत आहे माझा लिहण्यातुन काहि चुक झालिश मला माफ करा.

महानत्यागी बाबा जुमदेवजीनी आपल्या जीवनात परिक्षम कष्टकरुन प्रपंच साधुन परमार्थ कार्य केले आहे आणि आपला परिवार नव्हे तर ईतर या जिवनात दु:खी कुटुबात असेलेल्या लोकांना सुद्धा सुख समाधानी मिळवुन दिलि आहे हे सर्वाचेच आत्म अनुभव आहे.
 महानत्यागी बाबा जुमदेवजीनी एकाच परमेस्वँराना मानिन आणि भंगवताला आपल्या जीवनातील त्यानिच भंगवतांलाच गुरु मानले 【 आता गुरु म्हणजे काय 】
 ( गु = म्हणजे अंधकार )
 ( रु = म्हणजे प्रकाश मय )
 जो अंधकारातुन , प्रकाशमायात आणतो त्याला गुरु असे म्हणतात
 यावर आपल्या कडे अशे भरपुर अनुभव आहे आणि उदारण सुद्धा आहे.
उदारणार्थ : आपल्याला जन्म देणारे कोण आपले आई वडिल हे जन्म देणारे गुरु
 शाळेतिल शिकवणारे शिक्षक गुरु या दोन गोष्टितुन थोडक्यात आपण काय शिकलो कि आपण आपल्या जिवनात आई,वडिला पेक्षा आपण मोठा नाही गुरु पेश्रा आपन मोठाच राहु शकनार नाहि कारण नाहितर आपण सुद्धा माळ जपतानी गुरु मणी सुद्धा जपला असता म्हणुन आपन बाबा सारखा किवा गुरु शारखा होउ शकत नाहि म्हणुन आपन महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या समतुल्य बरोबर बँनर / होल्डिंगवर सेवकानी फोटो टाकु शकत नाहि सेवकानि घरघुती कार्यक्रम पत्रिकेवर मंडळाचा सिम्बाँल, भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजीचा फोटो पत्रिकेवरती टाकु नये, आपण अस काहि केले कणेक वाल्याकडे ति पत्रिका गेलि आणि त्या गोष्टि पत्रिकेवरती छापुन असल्यास ती पत्रिका मातिमोल फेकण्या कुणाच्या पायाखाली येईल आणि ते आपल्याला दुख वाटेल कारण आपणच आपल्या भंगवाताचा आणि बाबाचा अपमान केल्या सारखा होईल,
 क्रुपया अस कोणतेहि क्रुत सेवकानी करु नये मंडळाच्या आदेशाच पालन करावे आणि मर्यादा बाळगावी हिच अपेक्षा करतो आहे

 माज्या लिहण्यातुन काहि चुक झाल्यास मला माफ करावे सर्वाना माझा 🙏 नमस्कार 🙏

 शरद दादा दुधनकर
 मानवधर्म एकता परिवार


 [टिप :- वरिल विचार कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]

भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत चर्चा बैठकी चा लाभ व प्रश्न मंजुषा मध्ये पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...

 गणेश दादा बिडकर :-9766573410
 गजानन दादा लेन्डे :-9850675766
 मोहन दादा आस्वले:-9764989883
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Whattsup  group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
 
 
 

No comments

Powered by Blogger.