भुतबाधेचे दुःख आले माझ्या जिवनावरी,भगवंता समक्ष सोडवणूक करताच, सुखसमाधान आले माझ्या दारी. परमात्मा एक

                  👉▶ आजचा अनुभव :-👉▶



 "भगवान बाबा हनूमानजी को प्रणाम"
 "महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
               "परमात्मा एक "

        [ माझा सत्य अनुभव ]


 【भुतबाधेचे दुःख आले माझ्या जिवनावरी,भगवंता समक्ष सोडवणूक करताच, सुखसमाधान आले माझ्या दारी.】

             माझे पुर्ण नाव खुशाल नामदेव पवार असुन मी मुक्काम पाहमी ता, भिवापुर जी नागपूर या गावाला सहपरिवार वास्तव्यास आहे. मानवधर्म एकता परिवार या भगवतकार्याच्या गृपवर "माझा सत्य अनुभव" या आनुभव मालिकेत हा माझा प्रथम अनुभव मी आपणासमोर सादर करित आहे.
   माझा छोटासा सुखी परिवार आहे माझ्या परिवारात आम्ही एकुन चार व्यक्ती आहोत मी माझी पत्नी व माझी दोन मुले मुलगा अनिकेत व मुलगी कु.आराध्या असा माझा लहानसा परिवार आहे.
मी अनेकात असतांना माझ्या परिवारामध्ये सर्व काही आनंदी व सगळ बरोबर होते परंतु आमच्या सुखवस्तू परिवारावर कुनाची वाईट नजर पडली कोण जाणे माझ्या परिवारावर दुःख ,परेशानी येणे सुरवात झाले.कुटुंबावर दुःखाची छाया आली व कुणास ठावूक माझी परिस्थिती एकंदरीत पुर्ण पणे बिकट होऊ लागली.
माझेकडे एक ट्रँक्टर होते त्यामध्ये एक दोन दिवस झाले की बिघाड ऊत्पन्न होत रहायचा व राही राहु काही ना काही बिघाड यायचा असे वारंवार होऊ लागले.  यामुळे मी अतिशय त्रासुन गेलो आणि त्यातचं माझ्या शेतामध्ये कोठा होता व शेता मधे बैल होते कडबा बाराशे पेंढी गवत पुर्ण साहित्य कुणितरी अज्ञात ईसमाने जाळुन टाकले त्यात वखर, नागर, बैलगाडी सुद्धा जळुन खुप मोठी हाणी झाली होती. मग काय  माझे संपुर्ण ताळतंत्र बिघडुन संपुर्ण कामच डामाडोल झाले. शेतामधे पिक पाणी बरोबर व्हायचं नाही आणि मग काय या प्रकारामुळे माझे दारू पिणे सूरू केव्हा झाले हे मला कळलेच नाही. व या दारुच्या नादापायी पैशापाण्याने व शरिराने पुर्ण खंगुन गेलो व यातच माझ्या वर कुणीतरी बाहेरबाधा पण केली वैदवाण्याची माझ्या वर नजर पडली आणि माझी तबेत खुप खराब झाली होती पुर्ण पने खालाऊन गेली व एकदम बारिक बारीक झालो होतो आणि यातच मला पिलीया पण झाला होता व अशाही परिस्थितीत माझे दारु पिने सुरुच होते यामुळे तबेतीला आराम लागायचा नाही आणि अशा भांबावलेल्या अवस्थेत कधी दवाखाना जायचा तर कधी तांत्रिक मांत्रिक जाणता वाल्या कडे जायचा.
असाच एकदा एका नागपूरला तांत्रिकाकडे गेल्यावर त्यांनी सांगितले  कि तुमचे घर कुणितरी पुर्णपणे बांधून ठेवले आहे आणि दोन जादु टोने वाले आहे एक गावचा आहे आणि दूसरा बाहेर गावचा आहे मी तुमच्या मागील बाहेर बाधा काढुन देतो याला खर्च तिन हजार रुपये लागतील आणि मग हो म्हटले मग काय या नदी ची रेती लागते त्या नदी ची निबं लागतात काळ्या कितेक रंगाचे साहित्य सांगितले आणि आम्ही सगळे जण एकत्र येऊन घरी एउन आपली पुजा सुरु केली आणि तो धुव्वा केला कोणी कोणाला दिसत नव्हते आणि माझ्या अंगावरुण उतरवुन एका शिवधूरा पलीकडे जाऊन गाडुन घ्यावे व मागे वळून पाहचे नाही असे सांगत होते आणि ते आपले पैसे घेऊन निघून गेले व काही दिवस तात्पुरता फायदा झाला व पुन्हा जैसे थे मग काय अजून काही  एक वर्षांपूर्वी जशाशे तशे च अजुन तबेत बिघडली आणि दवाखाना करायचा दवाखान्यात पण आराम मिळायचा नाही आणि पुन्हा वैध वाणी जाणते जाऊ लागलो पैशापाण्याने खुप बर्बाद झालो.
             माझी व माझ्या परिवाराची अशी अवस्था पाहुन माझे मामा मला म्हणाले की भासा एकदा माझ्या  गावाला ये आमच्या गावात एक भगत आहेत त्यांचे कडे दाखवुन पहा व आपली परेशानी सांगुन पहा त्यांच्या कडे बाहेरगाववरुन बरेचसे लोक आपले दुःख घेऊन येतात त्यांच्या अंगात नागोबा आणि शंकर जी येतात व ते तूला कोनी काय केलै ते सांगतात असे मला माझे मामांनी सांगीतले "मरता क्या न करता" या म्हणीनुसार मी मामांच्या आग्रहाखातर मामाचौया गावाला आलो आणी मामासोबत त्यांच्या घरी गेलो आणि भगत काकांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मनाले कि खरच तु फार मोठ्या  संकटात सापडलेला आहे. असे सांगितले आणि आसनावर बसले आणि त्यांनी कापूर अगरबत्ती लावली आणि दळनाचे जाते याचा वर पाहने चालू केले व त्यांनी सुद्धा तेच सांगितले एक गावचा आहे आणि दूसरा बाहेर गावचा आहे यांनी तुमच्या परिवारावर वार केला आहे. असे भगत काकाजी मनत होते आम्ही त्यांना मनाले कि याचावर काही उपाय नाही काय त्यावर ते म्हणाले की तुमच्या गावाला घरी जाऊन हे काम करावे लागणार आहे असृ त्यांचे म्हणने ऐकून आम्ही होकार दर्शविला व याकरिता खर्च किती येनार तला ते म्हणाले की तीन ते चार हजार रुपये लागतील मी सहमती दर्शविली व ठिक आहे असे आम्ही मनालो त्यांनी आम्हाला या कार्याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आनावयाला सांगितले आणि त्यांनी सांगितलेनुसार जे जे वस्तू सांगितली संपूर्ण वस्तू आणून दिली आणि मग घरी येऊन भगत काकांनी आपली पुजा मांडुन आपल्या अघोरी विधिला सुरुवात केली आणि भगत काकांनी इमानदारी ने काम केले आणि आम्ही त्यांना मनाले कि जे काही तुम्ही कबूल केले असेल ते द्यायला तयार आहे भगत काकांनी मनत होते की एक रिटी गाव आहे तिथे एक हनुमान जी ची मुर्ती आहे जर तुम्ही ची ईच्छा असेल तर पाच पात्र पाडू शकतात आणि आम्ही यांच्या म्हणण्यानुसार ते पण काम केले व पाच पात्र पाडले आणि सगळ बरोबर झाल पण पैशापाण्याने पुर्णपणे बर्बाद झाल्यामुळे  परिस्थिती एकदम डामाडोल झाली होती पार खचून गेलो होतो आशातच काही दीवसानी माझे वडील वारले व पूर्ण भार माझ्या अंगावर आला. काय करावे कसे करावे काही कळतचं नव्हते.     
आमच्या कुटुंबामध्ये एक ते दोन वर्षांनंतर माझे काका परमात्मा एक ह्या मार्गाशी जुडले ते पण बाहेरबाधा व भुत बाधे ने वैद वाण्यानी त्रासुन गेले होते. व या परमात्मा एक मार्गात येताच त्यांच्या परिवारातील दुःख क्षणात दुर झाले हे मी आपल्या डोळ्यादेखत पाहले व हा झालेला बदल पाहुन माझी पत्नी मला म्हणाली की तुमचे काका या मार्गात जुडले आणि सुखसमाधानी झाले तर आपण का बरं या मार्गात नाही जाऊ शकत अशी मला वारंवार म्हणायची कि आपन पण या मार्गात जाऊ परंतु मी तीला टाळायचो व हिनवायचो की तो कायचा मार्ग आहे आपल्या घरी पुर्ण ब्रम्हांड आहे मी तिला चिडवायचा माझा घरी शंकरजी आहे नागोबा आहे नवनाथाची सेवा आहे असे मी तिला म्हनायचा व टाळाटाळ करत रहायचा.
दिवसामागुण असेच दिवस लोटून गेले व अशा परिस्थितीत एक वर्ष निघुण गेला आणि माझा पत्नीला खराब खराब स्वप्न दिसू लागले कधी कधी एक बाई तीच्या छातीवर बसून दिसायची. आणि माझा मुलाची पण तबियत खराब झाली होती पहा सेवकानो मी  महामूर्ख आज मी त्या भंगवताची निंदा,चेष्टा,अवहेलना करत होतो आणि सेवक लोकांची सुद्धा टिंगल टवाळी करित निंदा करत होतो व म्हणत होतो की हा कायचा परमात्मा आहे आपल्या घरी कार्यक्रम करतात आणि आम्हाला बोलवत सुद्धा नाही असे परमात्मा एक वाल्याना म्हणत राहायचा कारण परमात्मा एक हे मला माहीत नव्हते पण मग विचार च केला की काका चे  सूधा भूत नाहीशे झाले  एक वर्ष होऊन गेले चला आपन ही घेऊ पत्नी आणि मी आम्ही दोघांनी मिळून एकत्र येऊन विचार केला मार्गात जाऊ असे आम्ही विचार केला आणि दुसऱ्या दिवशी गावचे  सेवक विठ्ठल भाऊ गजभे यांच्या कडे गेलो आणि त्यांना मनालो कि आम्हाला मार्गात यायचे आहे आणि विठ्ठल भाऊ ला सर्व हकीकत सांगितली आणि त्यांनी कार्यकर्त्यांना फोन केला त्या दिवशी कार्यकर्ता काकाजी नागपूर ला होते बाबाची जयंती होती फोन वर म्हणत होते तुम्ही सांयकाळी या आणि आम्ही सांयकाळी उमरेड ला गेलो विठ्ठल भाऊ ने आपल्या च गाडी ने आम्हाला नेले कार्यकर्ता श्री बबनजी झोडे काकाजी यांच्या घरी गेलो आणि त्यानी आम्हाला विचार पुस केली कशा साठी मार्गात येत आहे आम्ही म्हणालो दारु पितो आणि भुत बाधे मुळे खुप परेशान आहोत परिस्थिती खुप गंभीर आहे असे मी सांगितले मार्गदर्शक काका जी मनाले की हा मार्ग मरण्याचा आहे असे काकाजी ने आम्हाला सांगितले आणि तुम्ही उद्याला या संपूर्ण परीवार मिळून या आणि आम्ही गावी वापस आलो आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी मी माझी पत्नी आणि एक मुलगी आणि एक मुलगा आणि आमच्या गावचे बाबाचे सेवक विठ्ठल भाऊ गजभे हे सर्व आम्ही मिळुन मार्गदर्शक काकाजी कडे उमरेड ला गेलो आणि त्यानी आम्हाला तिन चे साफ सफाई चे कार्य दिले आणि माझा कडे सामान घेण्याकरिता पैसे सुध्दा नव्हते  घरून चन्याची दाळ आणली होती ती विकुन सामान घेतले आणि आम्ही घरी वापस आलो आणि दुसऱ्या दिवशी पासून तिन दिवसा च्या कार्याची सुरुवात केली तिन च्या कार्यात च पुर्ण पणे समाधानी झाली आणि सात अकरा एकवीस असे कार्य सुरू ठेवले आणि असेच साधे कार्य घडवित होतो आम्ही 2015 या वर्षी परमात्मा एक मार्गात जुळलो आणि एका भगंवताच्या कृपेने त्यागाचे हवन कार्य पण पार पाडले आणि त्यागाच्या कार्यात कोणतीही अडचण आली नाही आणि दि.27/3/2019 ला त्यागाचे हवन कार्य व्यवस्थित पणे पार पाडले आणि नऊ हवन सुद्धा चांगले झाले आणि नव्वै हवन दि.28/12/2019 ला घडवले आणि आज माझी परिस्थिती खुप चांगली आहे सुखी समाधानी आहोत आणि शेती वाडी चांगल्या प्रकारे पिक घेत आहे आणि भगत काकाजी सुध्दा मार्गात आले आहे माझे त्यागाचे हवन कार्य आदरनिय मार्गदर्शक श्री प्रभाकरजी कहालकार काकाजी रा,उमरेड यांच्या मार्गदर्शनात घडविण्यात आले माझा सेवक क्र. 50019 आहे व अशाप्रकारे त्याग घडवुन मासीक नऊ हवन सुद्धा व्यवस्थित पार पडले व त्यागी सेवक झालो आता सर्व सुखी समाधानी आहे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही.
अनुभव लीहीण्यात माझ्या  हाताने कळत नकळत लिहण्या मध्ये काही चुका झाल्या असेल तर सर्व प्रथम  भगवान बाबा हनुमान जी ला माफी मागतो आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मागतो आणि वाराणसी आई ला सुध्दा माफी मागतो व सेवक सेविका ताई ना माफी मागतो व आपला अनुभव इथेच संपवीतो.

  नमस्कार जी 
  •••••••••••••••••••••••••••••••••••••••••

 सेवकाचे नांव :- खुशाल नामदेवराव पवार
 पत्ता  :-मु.पो.पाहमी,ता.भिवापुर,जि.नागपूर.
 सेवक क्र. :- 50019
 मार्गदर्शक:- श्री प्रभाकररावजी कहालकर (काकाजी), ऊमरेड.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.

••••••••••••••••••••••••••••••••••
 --------------------------
 --------------------------
 [टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]

 भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...

गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.