भगवतकृपा महान आहे पहा सेवकांनो या मार्गात प्रत्येक सेवक हा कोणत्या ना कोणत्या दुख:साठीच येतो . परमात्मा एक
👇🏿👇🏿👇🏿
आजचा अनुभव:-
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🌻🙏माझा सत्य अनुभव🙏🌻
माझे पुर्ण नाव किशोर वारलुजी रंदई असुन, मी नरसाळा या परिसरात नागपुरला वास्त्यव्यास आहे. भगवतकार्याच्या या गृपवर हा माझा पहिला अनुभव व मार्गात येण्याचे कारण सादर करित आहे.
भगवतकृपा महान आहे पहा सेवकांनो या मार्गात प्रत्येक सेवक हा कोणत्या ना कोणत्या दुख:साठीच येतो अन्यथा कुणालाही या मार्गाची आठवन येत नाही व अशाच एका दुखासाठी या मार्गात प्रवेश केला व ते म्हणजे माझे व्यसन, मी या मार्गात यायच्या आधी दारुच्या ईतक्या आहारी गेलो होतो कि मला कशाचेच भान रहात नव्हते.सकाळपासुनच माझा हा कार्यक्रम चालु व्हायचा तर सायंकाळ केव्हा व्हायची याचे सुद्धा मला भान रहात नव्हते व मी घरुन डबा घेऊन कामावर जाण्याकरीता सांगुण निघायचो व कामावर न जाता दारुड्या मीत्रांसोबत दारु पीत टाईमपास करत सायंकाळी घरी परतायचो मला होश सुद्धा रहात नव्हता कि माझा एक छोटासा परिवार आहे कारण दारु हा माझ्या जिवनाचा एक अविभाज्य अंग बनुन गेलेला होता. त्याच्या पलीकडे मला काहिच दीसत नव्हते. मी वाट पहात रहायचो कि केव्हा सकाळ होईल व मी केव्हा केव्हा दारु ढोसायला सुरवात करिल. एकंदरित सर्व दिनचर्याच होऊन गेली होती.
एकंदरित परिस्थिती फार बिकट होत चाललेली पाहुन माझी पत्नी फार विचारमग्ण असायची व एक दिवस माझ्या पत्निने सासरकडिल लोकांना हाताशी धरुन मला कामठी येथिल एका बाबाकडे घेऊन गेले कि अशाने तरि माझे पतीची दारु सुटेल व तीथे गेल्यावर त्यांनी सांगीतल्या प्रमाणे ऊपाय केले व त्यामुळे मि एक ते दिड महिणा दारुला स्पर्श सुद्धा केला नाही व त्यानंतर परत तेच कार्य सुरु झाले. दारु पिने परत सुरु झाले.पत्निला असा भ्रम होता कि माझे पतीदेव आता सुधरले व आता आपला संसार सुरळीत होईल परंतु मी तीच्या विश्वासघात करुन आपली नेहमीची दिनचर्या सुरु केली कारण दारु ही माझ्या जिवनाचा अविभाज्य अंग बनुन माझ्या नसानसात समाऊन गेली होती व मला दारु पिली नाही तर माझे हातपाय थरथरायला लागत असत व एकदा तोंडाला लागली कि त्याची काहिच मर्यादा नव्हती व अशा परिस्थितीत मला कशाचेच भान राहात नव्हते कि माझा एक छोटासा सुंदर परिवार आहे व त्यांना माझी गरज आहे. अशाप्रमाने दिवसा मागुन दिवस लोटत होते व माझ्याकरिता जो दिवस निघाला तो सारखाच रहायचा.
मला या मार्गाबद्दल थोडिफार माहिती होती, कारण माझे एक साळभाऊ हुडकेश्वर परिसरात रहातात नारनवरे त्यांच्याकडे हा मार्गाची सेवा आहे.
त्यांच्याकडे हवन वगैरे होत रहायचे व मी त्या कार्यक्रमात सहपरिवार जात असायचो पण एक महत्वाची गोष्ट मला जाणवायची कि जेव्हा मी त्यांच्याकडील हवनाच्या कार्यक्रमात जायचो तेव्हा मी आवर्जुन दारुला स्पर्श सुद्धा करित नव्हतो हे विशेष व मला माझी पत्नी वरील कार्यक्रमात आवर्जुन आग्रह करुन न्यायची व तीथुनच मला या मार्गाची माहीती मिळाली व अशिच एकेदिवशी माझ्या साळभाऊ व माझे पत्निच्या मोठी बहीन यांनी हिला म्हटले कि तुझ्यावर एवढे दुख: आहे व तुझे पती एवढी दारु पितात व तुझ्यासमोर एवढे आयुष्य आहे तर तु हा मार्ग का बरं स्विकारत नाही. या मार्गात चांगले चांगले दारु पिणारयांची दारु सुटुन ते आनंदाने आपले जिवन जगत आहे. ताईचे म्हणने एैकुन माझी पत्नी घरी आली व तीने माझ्याशि वरिल विषयावर चर्चा केली परंतु तीचे म्हणने फारसे मनावर न घेता आपली रोजची दिनचर्या सुरुच ठेवली कारण माझा या गोष्टीवर काहिच विश्वास नव्हता.
अशा प्रकारे एक दिवस मी चांगल्या स्थितीत असल्यावर मला पत्नी म्हणाली कि आपण सुद्धा या मार्गाची सेवा घ्यायची व यावर मी पण थंड दिमाखाने तीच्या शब्दावर विचार केला कि आपल्या या बेताल वागण्याने व दारुच्या व्यसनामुळे आपल्या जिवनाचे वाटोळे होईल व आपला हा परिवार ऊघड्यावर पडेल व असेच आपले पिने सुरु राहिले तर आपली विकेट केव्हाही पडुन आपला परिवार निराधार होईल व या गोष्टिवर मी खुप विचार केला व शेवटी मि पत्निला म्हणालो कि आता मला मरायचेच आहे तर या मार्गात येऊन का बरं मरु नये असा विचार करुन एकदम मनाशी ठाम विचार केला कि आपण हा मार्ग घ्यायचाचं खुप झाले आता कारण या व्यसनामुळे माझी परिस्थिती एवढी वाईट झालेली होती कि मी शब्दात वर्णन करु शकत नाही.
अशा प्रकारे मी आणि माझ्या पत्निने ठाम विचार केला कि आता हाच एक असा मार्ग आहे कि ज्यात आपल्याला मिळालेल्या मानवजन्माचा ऊद्धार होऊ शकतो, धन्य धन्य ते महानत्यागी बाबा जुमदेवजी ज्यांनी अहोरात्र परिश्रम करुन एका भगवंताची प्राप्ती केली व हि सेवा दुख्खी ,कष्ठी सेवकात कसलाही मोबदला न घेता फुकटात वाटुन दिली मी खरोखरच स्वत:ला खुप भाग्यवान समजतो कि मी या परमात्मा एक मानवधर्माचा सेवक आहो. खरेतर मी या मार्गात आधीच यायला पाहिजे होते याची मला खंत वाटते.
अशा प्रकारे माझी पत्नी व मी एकमत करुन ठरविले की हा मार्ग पत्करायचाच व ठरल्याप्रमाने माझा परीवार आणि माझे साळभाऊ नारनवरे यांना घेऊन हुडकेश्वर परिसरातील मार्गदर्शक आदरनिय गोविंदरावजी सोनवाने काकाजी यांच्या निवासस्थानी गेलो व त्यांनी आम्हाला आदरपुर्वक बसवुन विचारले कि तुम्ही हा मार्ग कोणत्या दुख:साठी घेत आहात त्यावर मी आपल्या परिवारातील दुख: त्यांच्यासमोर वर्णन केले त्यावर काकाजी मला म्हणाले कि या मार्गात मरावे लागते व घरातील देवीदेवतांचे विसर्जन करुन फक्त एकाच भगवंताला मानावे लागेल तशी मला या मार्गाबद्दल थोडीफार माहीती होतीच कारण माझ्या पत्निच्या मोठ्या बहीनिकडे हा मार्ग आहे तर मी काकाजीचे म्हणने शांतचित्तानी एैकुन त्यांना मार्गात येण्याबद्दल सहमती दर्शविली व त्याचेकडुन या परमात्मा एक मार्गाची संपुर्ण रुपरेषा एैकुन घेतली व आपल्या घरी परत आलो त्यांनी आम्हाला दुसरया दिवशी बोलावले व घरातील देविदेवतांचे विसर्जन करायला लावले त्याप्रमाणे त्यांचे म्हणने एैकुन आम्ही दुसरया दिवशी काकाजाीच्या घरी मार्ग घेण्याकरीता गेलो व त्यांनी आम्हाला अगोदर साफसफाईचे कार्य दिले व नंतर तीन दिवसाचे कार्य दिले व खरोखर या तीन दिवसाच्या कार्यात माझी दारु पुर्णपणे बंद झाली व मला फार बरे वाटु लागले व नंतर आम्हाला सात, अकरा, एकविस अशाप्रकारे कार्य मिळत गेले व आम्ही वरचेवर कार्य पुर्णपणे व्यवस्थित पार पाडत गेलो मला आता दारुची आठवन सुद्धा येत नाही व ते दिवस आठवले तर असे वाटते कि माझ्या पत्निला माझ्या अशा बेताल वागण्यामुळे किती त्रास झाला असेल याची कल्पना सुद्धा करु शकत नाही. सध्या मी प्रायवेट कंपनीत काम करित आहे व आता माझ्या परिवारात कसल्याही दुख:ची छाया नाही.
आता भगंवंताजवळ एकच मागणे आहे कि मी ज्या ठिकाणी रहातो तेथे पाण्याची खुप टंचाई आहे व त्यामुळे मी त्यागाचे कार्य करण्यास दिरंगाई करित आहो. परंतु योग्य वेळ आल्यावर ती सुद्धा अडचन दुर होईल असा मला माझ्या भगवंतावर विश्वास आहे. व ती अडचन दुर झाल्यावर काकाजी कडुन शब्द घेऊन त्याग घडवायची एवढी एक ईच्छा मि परमेश्वरावर सोपवित आहो, सध्या मी सुखसमाधानाने तत्व ,शब्द, नियमा चे पालन करुन सुखमय जिवन जगत आहो.हाच माझा परमेश्वरिकृपेचा अनुभव मी आपणा सर्वांसमोर सादर केला आहे. माझ्या लिहीण्यात काही अनपेक्षीत चुका झाल्या असतील तर भगवंताला व बाबांना क्षमा मागतो व सर्व सेवकांना सुद्धा क्षमा मागतो व आपला अनुभव येथेच संपवितो.
नमस्कार जी सर्वांना.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
नाव :- किशोर वारलुजी रंदई
पत्ता :- मु.पो.नरसाळा(जुनी वस्ती) मु.नागपुर,जि.नागपुर.
मार्गदर्शक :- मा.गोविंदरावजी सोनवाने.
प.पु.परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपुर.
••••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]
भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
गणेश दादा बिडकर :-9766573410
गजानन दादा लेन्डे :-9850675766
मोहन दादा आस्वले:-9764989883
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Wats app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment