वाईट व्यसनाच्या नादी लागण ,झाली संसाराची राखरांगोळी ,परमात्मा एक ची ज्योत लावताच,आनंदाने खाऊ लागलो पुरण पोळी...

👉▶️ आजचा अनुभव




👇🏿👇🏿👇🏿👇🏿

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

  !! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
  !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
  !! परमात्मा एक !!


   [माझा सत्य अनुभव ]

[ वाईट व्यसनाच्या नादी लागण ,झाली संसाराची राखरांगोळी ,परमात्मा एक ची ज्योत लावताच,आनंदाने खाऊ लागलो पुरण पोळी...]

माझे नाव विजय नथ्थुजी कांबळे  आहे. आज मी माझे   मार्गात येण्याचे कारण व अनुभव मानवधर्म एकता परिवार या भगवत कार्याचा  गृपवर सादर करीत आहे.

मी डिझेल इंजिन मेक्यानिक आहे व ट्रक - गाड्या दुरुस्तिचे काम चंद्रपुरला करत होतो. चंद्रपुरमध्ये किरायाने रुम घेवुन स्वताःची  दुकान लावली व घर पण किरायाचे होते. माझ्या परिवारात मी, माझी पत्नी वैशाली व दोन मुली वैदेही व कस्तुरी असा परिवार माझ्या व्यवसायावर चालत होता. 

मी मीत्र मंडळीत कधी कधी दारु पीत होतो पण मला कधी दारुचे व्यसन सुरू झाले ते कळलेच नाही. मला दिवसभर दारू प्यायची सवय लागली व दारु पिऊनच मी काम करत होतो. अगोदर मला पैसा चांगाला मिळत होता व धंदा पण चांगला चालत होता पण दारुच्या व्यसनासोबतच मला  सट्टा व जुव्वाचे व्यसन लागले व ही सर्व व्यसने एवढ्या लवकर वाढली की काय करावे काय नाही कळत नव्हतं.  कारण आता माझ्याकडे पैसा शिल्लक उरत नव्हता, पैसाची खुप तंगी व्हायला लागली. माझी परिस्थिती खालावली व  किराया देण्यासाठी पैसा वेळेवर राहत नव्हता व त्यामध्येचे उसनेवारी व कर्जाची वाढ होत गेली व दिवस फार हालाखिचे येवु लागले. मी तर दारु पिउन मस्त असायचो पण ञास माञ परिवाराला सहन करावा लागत असे.
                    

मला हा दारु व सट्टा जुव्वाचा व्यसन जवळपास आठ वर्षे सुरु होता. मी पुर्णपणे कर्जबाजारी होवुन गेलो होतो व दुकान पण आता व्यवस्थित चालत नव्हते. 

मग नंतर जास्तच कर्ज झाल्यावर मी LIC वर लोन काढलें कि आपण लोकांचे पैसे परत करु पण तो पैसा काही कर्ज  देण्यात व काही दारू व जुव्यात गेला. ही गोष्ट पत्नीला माहीत झाली तर ती  म्हणाली कि आमचे सर्व जीवन बर्बाद झाले तुम्ही आतातरी दारु बंद करा. मग मी पण ठरविले आपण दारु बंद करायला पाहिजे. पण  दारु पासून जेवढं लांब जाण्याचा प्रयत्न करीत होतो तेवढ्याच जास्त मला दारुची आठवण येत होती. माझ्या कडून राहून झाले नाही आणि मी दारूचे व्यसन काही बंद केले नाही पण मनात ईच्छा होती की आपले हे व्यसन सुटले पाहीजे पण मला हे व्यसन कसं बंद होईल समजतं नव्हते. 

मी शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन पहले पासून पुजा पाठ करत होतो. देवाला सांगत होतो की दारू बंद झाली पाहिजे पण परिस्थिती जशिच्या तशीच होती. दिवसेंदिवस खर्चाची वाढ होत होती आणि माझे काम कमी कमी होत होते व घरी सुद्धा पत्नी मुलबाळ माझ्यापासुन ञासुन गेले होते. काय करावे काय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.
             
माझ्या चुलतभाऊचा मुलगा (माझा पुतण्या) चंद्रपूरला आला व  विचारत होता काका कसं काय आहे, कामधंदा कसा आहे. तेव्हा  मी दारू पिऊन होतो, मी त्याला आपली सर्व परिस्थिती सांगितली  तेव्हा तो म्हणाला चला गावाकडे काका, तुमचा घर किराया कमी होईल व  खेड्यात घर खर्च पण कमी राहते, आणि तुमचं काम पण चांगले चालते. मग मी व पत्नीने विचार करून त्याला होकार दिला. आठ दिवसांत पुतण्या गाडी घेऊन आला आणि आम्ही सर्व सामानासह गावाला आलो. गावात खाली जागेवर कच्चे घर बांधून राहू लागलो. माझी पत्नी लेडीज टेलर होती तिच्या कामाला सुरुवात झाली. आणि मी नवीन असल्यामुळे माझी जास्त ओळख नव्हती. नंतर मला हळुहळु हायवेच्या गाड्यां दुरुस्तिचे काम मला मिळायचे पण जाण्याची समस्या असल्यामुळे माझे काम करने कठीण झाले होते. माझ्या बाईक चे सुद्धा अपघात झाले असल्यामुळे व परीस्थिती कमजोर असल्यामुळे गाडी बनवु शकत नव्हतो, दुसरी घ्यायची परीस्थिती नव्हती महनुन मग मी देवगाव ला एका वेल्डिंगच्या दुकानात कामाला सुरुवात केली, पण  तो सुद्धा दारुड्याच होता. दिवसभर तो पण दारु प्यायचा. अर्धी दारू तो घेत होता, अर्धी मला देत होता, दिवसभरातुन दारू चार पाच वेळा  होत होती व माझे दारुचे व्यसन सुरुच होते.

मग काही दिवसांनी मी माझी स्वताःची दुकान किरायाने सुरू केली. काही दिवसांनी मला काम मिळाले. एक दोन दिवस आड कामं मिळत होते, आमच्या शेजारी असलेल्या नातेवाईक यांनी आमच्याशी वाद निर्माण केला व धमकीही देण्यात आली, कि तुम्हाला एका वर्षात इथुन पळून लावणार. मला असे वाटले रांगांमध्ये बोलले असेल. त्या दिवसापासून ते आम्हाला पाहून  शिवीगाळ करत होते. आम्ही घरात बसून त्यांच्या शीवी ऐकायचे. तेव्हासुद्धा माझे दारुचे व्यसन सुरूच होते. 

काही दिवसांनी त्यांच्या घरी जो जांनता येत होता तो आमच्या घरी आला तर आम्ही दोन मिनिटे एकदम चुप राहिलो कि हा कसा काय आला, आम्ही तर बोलावले नाही हा तर जादूजंतर वाला आहे, त्याच्यासाठी चाय बनविला व तो चाय पेउन निघुन गेला. पण त्यानंतर तर माझी दारू खूप वाढली, जेवण कमी झाले आणि मग मी फक्त दारूच दारु पिऊनच राहत होतो. त्यामध्ये माझी तब्येत खराब होने चालु झाली,  एकदम अशक्त आजारी व खुप दिवशापासुन बिमार असल्यासारख वाटु लागले. घरच्यांना बाहेरच्यांनी सांगितले की तुमचे पती दारु पितात म्हणुन असे वाटते. मला तर नशेमध्ये आत्महत्या करावी अशे विचार येत होते व मी एकदा प्रयत्न पण केला, व तिन चार महिन्यात तबीयत ऐकदमच जास्त खराब झाली. 

नंतर आम्ही आमच्या नातेवाईकांमध्ये सेवकांच्या घरी लग्नाला गेलो तर ते परमात्मा एक मार्गामध्ये होते व मला या मार्गाची काही माहीति नव्हती. तेथे सर्व नातेवाईक माझ्या पत्नीला रागावून म्हणाले की तुम्ही कशाला आले. मग माझ्या पत्नीने जे परीस्थिती होती ते सांगीतली कि मला बुवाबाजी लावली आहे व वैद वाणी यांच्या कडे बघीतले तर त्यांनी सांगितले कि  यांचा जादू टोना खूप भारी आहे, चार लोकांची दारु लावली आहे तर तुम्ही लवकर काळजी घ्यावी. हे ऐकून सर्व विचारात पडले.

माझ्या पत्नीची मोठी बहीण आणि माझी आकडसासु यांनी आम्हाला सांगितले तुम्ही परमात्मा एक मार्ग घ्या. हाच एक असा मार्ग आहे कि तुमचे सर्व दुःख दूर होतील. त्यांना मार्गाबदद्ल माहिती होती. मला विचारले असता मी सांगितले कि कुठेही यायला तयार आहे कारण मला दारु सोडायची होती. मला मार्गाविषयी माहिती नव्हती. माझे साळभाऊ कामठीला पक्के सेवक आहे त्यांच्याशी बोलने झाले त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल संपूर्ण माहीती दिली व  म्हणाले दारू न घेता तुम्ही माझ्या घरी या, बाकी सर्व पाहू.
   
मग आम्ही घराची साफसफाई करून देवी देवतांची फोटो मुर्तीं अनेकांना देऊन आम्ही माझ्या सासरच्या गावाला गेलो. तिथे माझी तब्येत ठीक नाही हे सर्वांना कळले व ते म्हणत होते की ऐवढी कशी तुमची तब्येत हालावली. मला एक रात्र साभाळने त्यानं कठीण झाले होते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझी पत्नी दोन्ही मुली माझा साळा व माझा साळभाऊ आम्ही सर्व जण माझ्या मोठ्या साळभा्वाकडे श्रीमान भगवानजी केवट मु. कामठी यांच्याकडे गेलो. तेथे गेल्यावर त्यांनी मार्गाविषयी माहिती दिली व नंतर १७/५/२०१८ ला आम्ही मार्गदर्शिका मोहतुरे काकु यांच्याकडे जाऊन त्यांनी मार्गदर्शन केले, वचनबद्ध केले व शब्द दिला. शब्द घेऊन आम्ही घरी पोहचलो व कार्य सुरू केले. 

प्रथमतः कार्य सुरु केल्यानंतर मार्गाचे परीपुर्ण नियमांची माहीती नसल्यामुळे आमच्या हातुन काही चुका झाल्यामुळे मला तीन चार लोक दिसत होते, ते मला बोलावण्याचा प्रयत्न करत होते व बाजूला स्वयंपाक होत आहे हे सर्व दिसत होते पण पत्नीला दाखवले तर तिला दिसत नव्हते. मला अलग अलग प्रकारचे गाने  ऐकायला येत होते, झोप लागत नव्हती व हा सर्व प्रकार  तीन दिवस असेच चालला आणि नंतर मला बरं वाटायला लागले. माझ्या तब्येतिमध्ये सुधारणा होत गेली व दारुचे व्यसन पण पुर्णपणे बंद झाले आणि एकविस दिवसाच्या कार्यामध्ये भगवंतांनी आणि बाबानीं मला पुर्ण पणे बरे केले. 

मी त्यांचा खुप आभारी आहो ज्यांनी मला "परमात्मा एक" चा मार्ग दाखविला व मला एक सुखी समाधानी जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. धन्य आहेत आपले महानत्यागी बाबा जुमदेवजी ज्यांनी अतोनात कष्ट सहन करुन गोरगरीब व्यसनी लोकांना या मार्गाद्वारे समाजात मानाचे स्थान मिळवुन दिले.

आता माझे राहणे यवतमाळ जिल्ह्यात होत आहे व आज माझे स्वताःचे छोटेसे गँरेज आहे, माझ्याकडे स्वताःची फोर व्हीलर सुद्धा झालेली आहे व त्यामुळे मी हायवे वरील मोठ्या गाड्या सुद्धा रीपेअर करीत असतो व ही सर्व महाणत्यागी बाबा जुमदेवजींची पुण्याई. आता आमचे साधे कार्य मार्गदर्शक श्रीमान ज्ञानेश्वरजी लादे काकाजी यांच्या कडून सुरू आहे आणी श्रीमान लादे काकाजी कडुनही आम्हाला वेळोवेळी खूप चांगले मार्गदर्शन मिळत असते.

माझ्या लिहिण्यात काही चूक झाली असल्यास  भगवान बाबा हनुमानजी, व महानत्यागी बाबा जुमदेवजीनां क्षमा मागतो.

सेवक: - विजय नत्थुजी कांबळे
मु.कोल्ही पो.फाळेगाव ता.बाभूळगाव जी.यवतमाळ

मार्गदर्शक :- श्रीमान ज्ञानेश्वरजी लादे काकाजी
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.

••••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]

भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...

गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
रोशन दादा काटेकर:-8956656210
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Wats app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.