अनुभव मालिकेत मार्गात आल्यानंतर चा ‘दैवी शक्तीचा अनुभव‘ सादर करीत आहे.
👉▶️ आजचा अनुभव
👇🏿👇🏿👇🏿👇🏿
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
![]() |
परमत्मा एक मानवी अनुभव |
" भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम "
" महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम "
!!परमात्मा एक!!
["माझा सत्य अनुभव"]
माझे नाव रामू अंकुश सारंगपुरे असून मी या गावी परिवारसह मु.धांदरी पो.सरांडी येथे वास्तवत आहे. आज मी "माझा अनुभव" मानवधर्म एकता परिवार गृप या अनुभव मालिकेत मार्गात आल्यानंतर चा ‘दैवी शक्तीचा अनुभव‘ सादर करीत आहे.
हा अनुभव २६ जानेवारी २०२० चा आहे. या दिवशी आम्ही पाच जण म्हणजे मी माझा भाऊ आणि तीन सेवक मित्र सकाळी आठ ला आश्रमाला पोहोचलो. तिथे हवनात उपस्थित झाल्यावर दरवर्षीप्रमाणे स्वयंसेवक चे कार्य पण केले. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मी नागपूरला येण्यासाठी निघालो व माझा भाऊ आणि सेवक मित्र हे बाईक नी गावी परत पोहोचले. मी नागपूरला माझ्या मोठ्या ताई कडे गेलो. ३१ जानेवारी २०२० ला माझा साखरपुडा होता, त्याची निमंत्रण पत्रिका मला काही माझ्या नातेवाईकांना द्यायची होती. त्या पत्रिका वाटून व काम पूर्ण करून दुसऱ्या दिवशी सकाळच्या ट्रेनने मी गावाकडे यायला इतवारी स्टेशन वरून ट्रेन मध्ये जाऊन बसलो.
पुढे झाले असे की भंडारा स्टेशन वर एक बाई आपल्या छोट्या मुलाला घेऊन माझ्या सीट जवळ उभी होती. मला बरं वाटलं नाही तर मी सीटवरून उठलो आणि त्या बाईला आपल्या सीटवर बसवलं. तुमसर स्टेशन जवळ आल्यावर ट्रेन थोडी हळू व्हायला लागली पण थांबली नव्हती. तेव्हा त्या बाईने मला म्हटले की, "दादा मला इथे उतरायचे आहे, तर माझी बॅग उतरून द्या". त्या बाईची बॅग घेऊन मी गेटजवळ ट्रेन थांबण्याची वाट बघत उभा होतो. तेव्हा अचानक मागून मला एका व्यक्तीने जोरात धक्का मारला व मी ती बॅग घेऊन सरळ प्लॅटफॉर्मवर जाऊन जोरात पडलो. मी इतक्या जोरात पडलो की मला कुठे लागला आहे हे मला समजलं नाही.
जसा मी खाली पडलो तसे लोकं जोरात ओरडले आणि ट्रेन थांबली. ट्रेन थांबल्यानंतर काही लोकांनी मला उचलले व प्लॅटफॉर्मच्या खुर्चीवरून झोपवले. तिथे मी बेशुद्ध झालो व त्यानंतर काय झाले मला काहीच माहित नाही. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी तुमसरच्या सरकारी दवाखान्यात बेडवर झोपून होतो. थोड्या वेळात पोलीस आल्यावर त्यांनी विचारपूस केली व मी त्यांना माझ्यासोबत काय घटित झाले ते सांगितले. त्यांनी मला आराम करण्यास सांगितले.
शुद्धीवर आल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्या डोक्याला चार टाके लागले होते. तसेच हाताला बँडेज पट्टी केली होती व कमरेला पण खूप लागलं होतं. मग काही वेळाने डॉक्टर नी माझ्या घरी फोन केला व माझ्या घरून माझा लहान भाऊ गाडी घेऊन आला. माझी अवस्था पाहून तो पण हॉस्पिटलमध्ये रडायला लागला. मी त्या दयनीय अवस्थेमध्ये असून सुद्धा लहान भावाला म्हटलं की मला काही झालं नाही आहे. डॉक्टरांना बोल काय झालं तर आणि त्यांच्याशी बोलून आपण घरी जाऊ.
नंतर लहान भाऊ डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांशी बोलणे झाल्यावर त्यांनी मला सुट्टी दिली. त्यांनी जरी मला सुट्टी दिली तरी माझी हिम्मत होत नव्हती कि मी स्वतःहून गाडी पर्यंत जाऊ शकेल. म्हणून मग मी लहान भावाला बोलावले व त्याने माझा हात पकडून मला गाडीवर बसवले. मी आपल्या घरी धादरी या गावी रात्री अकरा ला पोहोचलो. घरी पोहोचताच माझी आई खूप रडायला लागली. येत्या तीन-चार दिवसात माझा साखरपुडा आहे व मी हे काय करून बसलो असे ती बोलू लागली. तेव्हा मी आईला घडलेले सर्व सांगितले व आईने अंघोळ करून मला २१ फुकांचे तीर्थ बनवून पाजले व फुक मारून दिली.
मी थोड्या वेळाने झोपून उठलो, तेव्हा आईने २१ पासून खाली ७ पर्यंतचे तीर्थ पाजले. मग मला थोडा आराम वाटायला लागला. संध्याकाळी वडील कामावरून घरी आल्यावर त्यांनी पण विचारले काय झालं म्हणून. त्यांनी पण आंघोळ केली आणि मला आपल्या सोबत सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये बसवले. त्यांनी मला म्हटले की बाबांना सांग की आजची २७ तारीख आहे व येणारे ३१ तारखेला माझा साखरपुडा आहे, तेव्हापर्यंत माझे सर्व दुःख दूर करा. मग मी भगवंता समोर हात जोडून विनंती केली की भगवंता माझ्या सर्व दुःख या ३१ तारखेपर्यंत नाहीसे करा व रात्री मी झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी थोडाफार आराम मिळाला. पण मी स्वतःहून कुठे जाऊ शकत नव्हतो किंवा स्वतःहून झोपेतून उठू शकत नव्हतो. एक दिवस निघाला, माझ्याकडे आता तीन दिवस उरले होते. त्या तीन दिवसात किती आराम होईल व साखरपुडा होईल की नाही असा विचार आई-वडील करू लागले. तेव्हा त्यांनी साखरपुड्याची तारीख समोर वाढवण्याचा विचार केला. पण मी आई-वडिलांना नाही म्हंटले. तारीख तीच राहील कारण माझा भगवंतावर पूर्ण विश्वास होता व या तीन दिवसात मी स्वतःहून उठून चालायला लागेल, असे मी त्यांना सांगितले.
मग मी आपल्या जागेवर दिवसातून पाच ते सहा वेळा तीर्थ बनवायचो आणि पूर्ण अंगावर लावायचो व प्यायचो. मग संध्याकाळी पुन्हा वडील कामावरून घरी आले की प्रार्थनेमध्ये २१ फुकांचे तीर्थ बनवून मला प्यायला द्यायचे. दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ तारखेला मी स्वतःहून चालायला लागलो व स्वतःहून झोपून उठायला लागलो. २९ तारखेला डॉक्टरकडे गेलो व त्यांना सांगितले की ३१ तारखेला माझा साखरपुडा आहे, तर मला पूर्ण बँडेज पट्टी सोडायची आहे.
डॉक्टर म्हणाले की पट्टी करून जाऊन तुला चार दिवस व्हायचेच आहे आणि तू म्हणत आहे की मला पट्टी सोडायची आहे. डॉक्टरने तेव्हा हाताची व पायाची पट्टी सोडली व ते पण विचारात पडले. ते म्हणाले की तुमचे हात-पाय हेच आहेत काय ज्याची मी पट्टी केली होती. मी डॉक्टरांना काय झाले विचारले असता त्यांनी मला म्हटलं की तू कोणते औषध खाल्ले की ज्याने तुला इतक्या लवकर आराम झाला, तुझ्या हात आणि पायाचे दुःख पूर्ण दूर झाले. तेव्हा माझा लहान भाऊ म्हणाला की, "सर, आमच्या घरी खूप मोठा डॉक्टर आहे" व हसायला लागला. डॉक्टरांनी मला इंजेक्शन वगैरे दिले. माझ्या डोक्याला जे चार टाके लागले होते ती पट्टी सोडली नाही. तेव्हा मी डॉक्टरांना म्हटलं की, "सर, परवा माझा साखरपुडा आहे. इतक्या पाहुण्यांमध्ये नवरदेव बँडेज पट्टी बांधून जाईल तर मग कस होईल?" त्यावर डॉक्टर म्हणाले की डोक्याला रुमाल बांधून घेशील. मी हो म्हटलं, पण किती वेळ असं करू शकणार असं विचारलं. खूप विनवणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले "ठीक आहे. साखरपुड्याला जाण्याआधी भेटून जाशील."
मग मी घरी आलो आणि संध्याकाळी अजून २१ फुकांचे तीर्थ बनवून प्यायलो. मला या चार दिवसात इतका आराम झाला की मी स्वतःहून चालायला लागलो, स्वतःहून उठायला पण लागलो. मग त्याच दिवशी माझा साखरपुडा पण झाला. असे ‘भगवान बाबा हनुमानजी‘ च्या कृपेने व ‘महानत्यागी बाबा जुमदेवजी‘ च्या आशीर्वादाने आता सुख-समृद्धी आम्हाला लाभलेली आहे.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर “भगवान बाबा हनुमानजी” व “महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.
नमस्कार...!
नाव:- रामू अंकुश सारंगपुरे
मु .:-धांदरी पो.सरांडी त.तिरोडा जि.गोदिया
सेवक क्रं.:-7221
मार्गदर्शक : -मा.श्री.मंगल जी पारधी मु. कवलेवाडा तिरोडा
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.
•••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]
भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
रोशन दादा काटेकर :-8956656210
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment