विदेहावस्था महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती श्रावण वद्य
विदेहावस्था महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती श्रावण वद्य
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती श्रावण वद्य वष्टी दि.२५/८/१९४८ रोज बुधवारला केली. तेव्हापासून ते निराकार अवस्थेतच होते. त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली होती. ते पूर्णपणे परमेश्वरात विलीन झाले होते. बाबांची ही स्थिती पाहून त्यांच्या कुटुंबातील इतर मंडळी काळजीत पडले होते. त्यांनी आपणास विचार केला की, या स्थितीबद्दल परमेश्वराजवळ विनंती करुन बाबांना मुक्त करावे.त्याप्रमाणे ती सर्व मंडळी एका भगवत्प्राप्तीच्या दुसऱ्या दिवशी बाबांकडे आली. तेव्हा बाबा निराकार अवस्थेतच होते व परमेश्वरात विलीन झालेले होते.
घरच्या मंडळींनी बाबांना विनंती केली की, "हे भगवन् सेवक की यह स्थिती कबतक रहेगी? आप सेवक को इस स्थिती से मुक्त किजीये।" तेव्हा परमेश्वररुपी बाबाने उत्तर दिले की, "अगर आपका भाई आपको इतना प्यारा था, आपको उससे इतनी हमदर्दी थी तो आपने उसे भगवान सेवा करने क्यो लगाई? उस समय आपको उसे रोकना था । अब सेवक भगवान का हो गया, न की किसी का रहा और भगवान सेवक का हो गया है। मेरा सर सेवक का धड ओर सेवक का सर मेरा धड ऐसा विलीन हो गया है। इस तरह दोनोकी आत्मा एक हो गई है।"
भगवंताने बाबांच्या मुखकमलातून पुन्हा घरच्या लोकांना उद्देशून शब्द काढले की,"सेवक भगवान बन गया। इसलिये सेवक एक ही समय थोडासा साधा भोजन करेंगे। जिसमे दाल, चावल, सब्जी और घी होगा। और कोई भी औरत, घरकी हो या बाहर की, उसकी छाँव सेवक पर न पडे। नही तो सेवक कहीं का नहीं रहेगा। जिंदा नहीं रहेगा।"अशाप्रकारे भगवंताने सेवकाला (बाबांना) दैवी शक्तीची जागृती दिली. जिला आज समाजात बरेच लोक मानतात.
याच दिवसापासून बाबांच्या जेष्ठ वहिनी श्रीमती सीताबाई यांच्या अंगात प्रत्येक शनिवारी जी पार्वती येत होती ती त्यांच्या अंगात येण्याची क्रिया बंद झाली.कुटुंबात परमेश्वराची(हनुमानजी) प्राप्ती केल्यानंतरही दुःख येत होते. तेही याच दिवसापासून नाहीसे झाले. बाबांच्या कुटुंबात जी अनेक दैवते मानल्या जात होती ती मानणे बंद झाले. याशिवाय त्यांच्या घरातील भूतबाधा पण नष्ट झाली.
परमेश्वर प्राप्तीच्या अगोदर बाबांच्या कुटुंबात घरातील लोक परंपरेनुसार अंधश्रध्देमुळे काही सण मानत नव्हते. त्यातील पोळा हा एक सण होता. बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर लगेच आठ दिवसांनी पोळ्याचा सण आला. त्याच्या दोन दिवस अगोदर बाबा निराकारमध्ये आले आणि घरच्या मंडळींना त्या निराकार बैठकीत आदेश दिला की, यावर्षी पोळा हा सण घरच्या सर्व लोकांनी साजरा करावा. याप्रमाणे पोळा साजरा करण्याचे ठरले.
श्रावण अमावस्या आली. पोळ्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळीच बाबांच्या घरातील दारात एक मोठा भुजंग गुंडाळी मारुन दाराच्या आड लपून बसला होता. तो इतर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना दिसत नव्हता. परंतु तो कोणालाही डिवचण्याचा प्रयत्नही करीत नव्हता. तो साप कोणालाही दिसला नाही. परंतु बाबा दारात गेल्यावर बाबांचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो डोके वर काढून शांत होता. कुठलीही हालचाल करीत नव्हता. हे बाबांनी पाहिले. याही वेळेस बाबा विदेही स्थितीतच होते.
त्यानंतर बाबांनी स्वतःच छोट्याशा काठीने त्याच्या डोक्यावर मारले. त्या साध्या मारानेच साप मरण पावला. एवढा मोठा भुजंग आणि काहीही हालचाल न करता तो साध्या माराने मरतो, हे पाहून बाबा आश्चर्यचकित झोल. त्यांनी खूप विचार केला. तेव्हा ते म्हणाले, कित्येक काळापासून या घरात जे दुःख होते त्याला खरा कारणीभूत हा साप होता. कोणीतरी मरण पावल्यावर त्याला मोक्ष प्राप्त झाला नाही म्हणून तो सापाच्या रुपात भूत होता. एका परमेश्वराच्या प्राप्तीनंतर या घरात चोवीस तास जागृत असलेली शक्ती चैतन्य रुपात खेळत आहे. त्यामुळे त्याला येथे राहता आले नाही आणि त्या शक्तीच्या हातानेच त्याला मोक्ष हवा होता. त्याचप्रमाणे त्याला परमेश्वररुपी बाबांच्या हाताने मोक्ष मिळाला. अशाप्रकारे बाबांच्या घरातील शेवटचे भूतबाधेचे संकट नाहीसे झाले. तेव्हापासून आजतागायत त्यांच्या घरात कोणालाही भूतबाधा झाली नाही. बाबा आज ज्या घरात वास्तव्य करीत आहेत त्या घरात चोहोबाजूंनी प्रसन्नता आहे. तेथे आल्हाददायक वातावरण आहे. कारण तेथे चोवीस तास जागृत शक्ती चैतन्यरुपात खेळत आहे. तेव्हापासून त्यांच्या घरात सुखशांती लाभली आहे.
कोणताही सण मानू नये, कोणत्याही देवाला मानू नये, एकाच परमेश्वराची आराधना करावी, हे जरी ठरले होते, तरी विधिलिखीत काही असते या म्हणीप्रमाणे परमेश्वराला काहीतरी घडवायचे होते म्हणून पोळ्याच्या सणाचे निमित्त करुन त्या घरातील संकटाचे मुळ कायमचे नष्ट केले.
बाबा विदेह अवस्थेत असताना त्यांना रात्रंदिवस विश्वात खूप मोठा एकच डोळा दिसत होता. यामुळे ते खूप घाबरले होते. तो एकच डोळा बघण्याची त्यांची हिम्मत होत नव्हती. म्हणून त्यांनी त्यांचे जेष्ठ बंधु श्री. बाळकृष्ण यांना सांगितले की, "भैया, मैं तेरे घर आकर तेरे पास सोऊँगा। मुझे इस घरमें, विश्वमें एकही आँख दिखाई देती है। वह देखकर मुझे डर लगता है। इसलिये वह मैं देख नहीं सकता।" एवढा मोठा एकच डोळा बाबांना एक सव्वा महिना पर्यंत एक सारखा दिसत होता.
बाबा आपल्या जेष्ठ बंधुना सांगितल्याप्रमाणे ते त्यांच्या घरी जाऊन झोपू लागले. श्री. बाळकृष्णार्जीचे घर बाबांच्या घरासमोरच होते. बाबांना तेथे पण झोपेतून जाग येत होती, आणि त्यांना बाबा हनुमानजींची भली मोठी आकृती दिसत होती. तेव्हा बाबा बंधुंना झोपेतून उठवायचे आणि सांगितले की, तू बाबा हनुमानजीला सांग की तू माझ्या भावाच्या मागे लागू नकोस, तू देवळात जाऊन राहा." त्याप्रमाणे बाळकृष्णाजी तेवक्या रात्रीच हात पाय धुऊन भगवंताच्या नावाने कापूर लावायचे आणि विनंती करायचे की, "हे भगवंता, मी आपणांस विनंती करतो की, तुम्ही माझ्या भावाच्या मागे लागू नका. त्याला कुटुंब आहे. त्याला प्रपंच आहे. म्हणून त्यास मोकळे करावे." अशी विनंती करुत परत झोपायचे.
बाबांना एकच डोळा दिसणे, बाबा हनुमानर्जीची प्रतिमा दिसणे या लक्षणांवरुन हे सिध्द होते की, बाबा परमेश्वरात विलीन झाले आहेत. कारण भगवत् प्राप्तीकरिता सुरुवातीला बाबांनी जी प्रतिज्ञा केली होती की एकतर मरीन किंवा भगवंताला प्राप्त करीन पण मागे फिरणार नाही. त्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. परमेश्वराला प्राप्त करुन ते त्याच्यात विलीन झाले होते.
बाबांची ही विदेहावस्था जवळजवळ तीन महिने होती. या विदेह अवस्थेत एके दिवशी बाबांनी आपल्या कुटुंबातील लोकांना निराकार बैठकीत मार्गदर्शन केले की,"घरवाले सुनो, आप सब लोग तीन महीने तक भगवान से विनंती करो की, हमारे भाई की यह अवस्था समाप्त कर उसे गृहस्थी में रखो।" त्याप्रमाणे घरातील सर्व मंडळींनी रोज सकाळी सुर्योदयापूर्वी तीन महिनेपर्यंत एका भगवंताच्या नावाने अगरबत्ती व कापूर लावून वरीलप्रमाणे विनंती केली. तीन महिने पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी बाबा शुष्दीवर आले. त्यांची विदेह अवस्था संपली. त्यांना सर्वसाधारण गृहस्थाप्रमाणे सर्व समजू लागले आणि त्याचबरोबर त्यांचा अज्ञातवासही संपला. ते अज्ञातवासात परमेश्वराची(हनुमानजीची) प्राप्ती केल्यापासून म्हणजे जानेवारी १९४६ पासून जवळजवळ तीन वर्षे होते. कारण हा १९४८ सालच्या नोव्हेंबर महिन्याचा दिवस होता.बाबा दुसऱ्या दिवसापासून आपल्या कुटुंबाच्या निर्वाहाकरिता उद्योग करु लागले.अशाप्रकारे बाबांच्या कुटुंबाला शांती मिळाली. बाबांनी आपल्या वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी एका भगवंताची प्राप्ती केली. बाबांबद्दल लोकांना जसजसे हळूहळू माहिती होऊ लागली तसतसे लोक या मार्गात येऊ लागले. सेवक बनू लागले. याप्रमाणे सद्गुरु समर्थ बाबा जुमदेवजी या नावाने ते प्रसिध्द झाले. पुढे त्यांना ५ ऑगस्ट १९८४ रोजी या मार्गातील सेवकांनी 'महानत्यागी' ही पदवी बहाल केली आणि त्यांना १६ ऑगस्ट १९८४ पासून सद्गुरु समर्थऐवजी 'महानत्यागी बाबा जुमदेवजी' असे म्हणू लागले.

Leave a Comment