एका भगवंताचा पहिला गुण परमात्मा एक |


 एका भगवंताचा पहिला गुण

एका भगवंताचा पहिला गुण परमात्मा एक

एका भगवंताचा पहिला गुण


         बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली. त्यानंतर ते जवळ जवळ तीन महिने विदेही अवस्थेतच होते. ते परमेश्वरात विलिन झाले होते. रंगारी समाजाच्या शांताबाईच्या अंगात येणारे भूत पलित खूप प्रयत्न करुनाही ते नष्ट करु शकले नाहीत. तिला समाधान देऊ शकले नाहीत. शेवटी बाबा हनुमानजी प्राप्ती करनही बाबांना तिच्या अंगात येणारे भूत नाहीसे करता आले नाही. परमेश्वरच मानवाचे कोणत्याही प्रकारचे दुःख दूर करु शकतो. त्यालाच अनन्यभावे शरण जाणे आवश्यक असते है लक्षात घेऊन त्या बाईला पूर्णपणे समाधान देण्याकरिता बाबा हनुमानजीजवळ पुन्हा प्रतिज्ञा केली की यापुढे जीवनात मी कोणत्याही देवाला (दैवत) मानणार नाही. यानंतर त्या शांताबाईला तिच्या दुःखापासून बाबांनी मुक्त केले. नंतर बाबांनी ते दुःख दूर करणाऱ्या शक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि बाबांनी एका भगवंताची प्राप्ती केली.

     त्याच शांताबाईच्या घरात याच तीन महिन्यांच्या काळात, बाबा निराकार अवस्थेत असतानाही पुनः दुख आले. एके दिवशी या बाईची सासू बाबांच्या घरी रडत रडत आपले दुःख घेऊन आली. बाबा घरी नसल्यामुळे ती बाबांचे कनिष्ठ बंधु श्री.मारोतराव यांच्याकडे गेली आणि रडत बसली. त्या वेळेस बाबा हे त्यांचे जेष्ठ बंधू बाळकृष्णाजी यांचे घरी बसले होते. तिला रडताना पाहून मारोतरावांचे मन गहिवरले. ते बाबांना हे सांगायला गेले आणि त्यांनी बाबांना विनंती केली की, "बाबा एक औरत रोते हुये आई है। बहोत रो रही है। लगता है बहुत बडे संकट में फँसी है। आप चलिये।" तेव्हा बाबा त्यांना म्हणाले की,"ठीक है। मैं आ रहा हूँ। तुम उस बाई को बगल में खडे रखना ताकी उसकी छाँव हमपर न पड़े।" कारण बाबा निराकार अवस्थेत असताना परमेश्वराने त्यांना अशी जागृती दिली होती की, "सेवकपर किसी भी औरत की छाँव न पडे वरना वो जिंदा नही रहेगा।" त्याचप्रमाणे मारोतरावांनी त्या बाईला बाजुजा उभे केले. बाबा घरी आले आणि आपल्या आसनावर बसले.

          बाबा घरी आल्यावर त्यांनी त्या बाईला विचारले की,"कहो बाई, आप कैसी आई? क्यों रो रही हो?" तेव्हा बाबांना विनंती केली की, "बाबा आप जान लो में क्या रो रही हूँ। आप बाबा है।" बाबा काहीच बोलले नाहीत. यावेळेस बाबा निराकार अवस्थतच होते. ते परमेश्वरात विलीन झाले होते. त्यामुळे ते त्या बाईची अवस्था आळखत होते. थोड्या वेळाने बाबांच्या मुखकमलातुन खालील वाक्ये निघालीत.

बाबा म्हणालेः
"नाथ गोरख, हाजिर हो जाओ।"

"हाज़िर बाबा।"
"जाओ, यमराज को बुलाकर लाओ।"
"चला बाबा।"
त्यानंतर दहा मिनिटे ते स्तब्ध राहिले. त्यानंतर ते पुनः ते म्हणाले,
"यमराज आ गये।"
"हाँ बाबा, मैं आ गया"
"देखो यमराज, उस बच्चे के गले में फासा डाला है। उसे निकालो, नहीं तो तेरे साथ यमपुरी उल्टी कर दूंगा।"
"नहीं बाबा, मै अभी उस बच्चे के गले का फाँसा निकालता हूँ।"
"नहीं, तुम पहले जाओ, उसे निकालो, तो बेइमान है।"
"नहीं बाबा, आप मेरे साथ मेरी यमपुरी उल्टी कर दोगे। मुझपर विश्वास किजीये बाबा!
मैं अभी फांसी निकालता हूँ।"
"तुम अभी जाओ और उसका फांसी जल्दी निकालो।"
"चला बाबा!"

        त्यानंतर बाबा थोडा वेळ थांबले. सगळीकडे शांतता पसरली होती. काही वेळाने बाबा त्या बाईला म्हणाले, "बाई, तुम्हारा बच्चा उठकर बैठा है। उसे अभी ले जाओ" त्या बाईचे रडणे थांबले. तिने बाबांना नमस्कार केला आणि हसत हसत घरी गेली आणि आश्चर्य हे की, खरोखरच त्या शांताबाईचा मुलगा उठून बसला होता. तिला खूप समाधान वाटले. ती बाई त्या मुलाला(नातवाला) घेऊन बाबांकडे आली. तिने बाबांसे दरुनच दर्शन घेतले. अशाप्रकारे एका परमेश्वराने त्या मुलाला मृत्यूच्या दाढेतुन बाहेर काढले. हा पहिलाच अनुभव या एका परमेश्वराने प्रथम त्या घरातच दिला. याप्रमाणे बाबांनी केवळ पीडित आणि दुःखी लोकांचे दुःख दूर करण्यासाठी एका भगवंताची प्राप्ती केली.

No comments

Powered by Blogger.