माझे सत्य अनुभव आपल्या समोर सादर करीत आहे. परमात्मा एक

                      👉▶️आजचा अनुभव


PARMATMA EK IMAGE, PHOTO
परमत्मा एक मानवी अनुभव



⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

*"भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम "*
*" महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम "*
          *" परमात्मा एक "*

       *"माझा सत्य अनुभव "*


माझे नाव :- संजय वामनरावजी वाघाडे असून मी परिवारसह  मु. सावनेर  त सावनेर येथे वास्तवत आहे आणि मी मानवधर्म एकता परिवार गृपवर अनुभव मालीकेत
 माझे सत्य अनुभव  आपल्या समोर सादर करीत आहे.   माझे अनुभव 2007 चा आहे मि व माझा परिवार माझे आई व वडील एकत्रीत रहात होते पण घरातील वातावरण बिगडल्यावर असे मला वाटलेकी  घर सोडून दुर जाऊन रहावे व आपले परिवार घेऊन जावे दुर जाऊन बाबा चे कार्य करावे व वेगळे रहावे मि आपला परिवार घेऊन किरायाने रूम केली मि व माझी पत्नी व माझी 3 वर्षा ची मुलगी होती  व पत्नीला सातवा महिना चालू होता आम्ही घर सोडून आलो  माझे किराणा दुकान आहेत व घरा पासून 3 किलो मिटर दुर आहेत मला दुकानात सकाळी जाऊन संध्याकाळी वापस यायचे होते आणि मला खुब विचार यायचा कारण पत्नी च्या पोटात सात महिन्याचे बाळ आहेत व 3 वर्षा ची मुलगी आहे मि दिवस भर घराच्या बाहेर आहेत आता कसे होईल तरी मन पक्के केले व आंम्ही आपल्या नवीन घरी किरायाच्या घरात आलो त्या वेळेस आमची परीथीती फार खराब होती सोबत पैसे नव्हते काही नाही तरी आम्ही बाबा चे नाव घेऊन घराबाहेर पडलो होतो कारण छोटीशी दुकान होती परिवाराच्या खर्च व घर किराया व पत्नीच्या पोटात सात महिन्याचे बाळ दवाखान्या चे  खर्च बिजली बिल 
                 आम्ही घरातले सर्व सामान लावले मग आम्ही मार्गदर्शक काकाजी च्या घरी गेलो आणि आपली आपबिती सांगीतली त्यानी आम्हाला कार्य दिले दुसर्या दिवस पासून ज्योत लावुन आपल्या संसाराला सुरुवात केली बाबा ला समोर ठेऊन शब्द ठेवले की बाबा मि किरायाच्या घरात आहे व पत्नी ची डिलेवरी ची वेळ येणार आहे आनखी योग मागितले आणि कार्य   घेतले 3,7,11,21  अश्या प्रकारे दोन महिने कार्य चालू राहले व दोन महीन्यात डिलेवरी झाली व माझ्या घरी मुलगा झाला  व घरात आनंद झाला काही दिवसा नंतर कार्य चालू केले मग त्यागाचे कार्य केले हवन संपले नंतर 1वर्ष पुर्ण झाले व माझ्या परिवारात दुःख आले माझ्या पत्नी ची प्रकृती खराब झाली एका दवाखान्यात नेले तरी आराम नाही दुसर्या दवाखान्यात नेले तरी आराम नाही तरी तिसर्या दवाखान्यात नेले तरी आराम नाही 
                    मग आम्ही बाबा जवळ शब्द ठेवले होते माझ्या पत्नीला आराम पडत नव्हता आम्ही परेशान झालो भरपूर दवाखाने पण केले तरी आम्हाला आराम पडला नाही मग आंम्ही आपल्या कार्यकर्ता काकाजी ला सांगीतले  व 3 दिवसाचे कार्य केले तेव्हा आम्हाला एक व्यक्ती ने येऊन सांगीतले की तुम्ही नागपूर ला जाऊन लता मंगेशकर हाॅस्पिटला जा मग आम्ही लता मंगेशकर हाॅस्पिटल मध्ये गेलो तेव्हा आम्ही दवाखान्यात डाॅक्टर ला दाखवले त्यांनी टेस्ट व फोटोग्राफी केली आम्ही घरी आलो पुन्हा 15 दिवसात गेलो परत टेस्ट व फोटोग्राफी केली तेव्हा आम्हाला डाॅक्टर नी सांगीतले की तुमच्या पत्नी च्या पोटात गर्ब पिशवीत इन्फेकशन झाले आम्ही परत घरी आलो पुन्हा दवाखान्यात गेलो पुन्हा टेस्ट व फोटोग्राफी केली मग डाॅक्टर नी सागीतले की तुमच्या पत्नी च्या पोटात गर्ब पिशवीत कॅन्सर चा प्रकार आहे आम्ही घरी आलो रात्र भर झोपलो नाही रात्रभर विचार कारण 3 वर्षा ची मुलगी व 1 वर्षा मुलगा आहे आता कासे कराचे कसे होईल व आम्ही खुप परेशान झालो आणि पुन्हा दवाखान्यात गेलो डाॅकटर ला भेटलो त्यांनी ऑपरेशन करायला सांगितले व गर्ब पिशवी चा एक तुकडा कापुन तो तुकडा मुंबई ला पाटवा लागेल टेस्टिंग  करण्यासाठी  मग आम्ही ऑपरेशन करायला सांगितले व तो तुकडा मुंबई ला पाठवीला 3 दिवसाने सुट्टी घेतली घरी आलो आणि  5 दिवसानी कार्यकर्ता काकाजी च्या घरी गेलो आणि आपली आप बिती सांगीतले त्यांनी आंम्हाला चुकीचे कार्य दिले 3,7,11,21 दिवसाचे कार्य पार पाळले बाबा समोर शब्द ठेवले की बाबा आम्हांला कोनाच्या सहारा नाहीत फक्त तुमच्या सहारा आहे आणि तुम्ही काय करायचे आहे तुम्ही पहा  माझ्या कङुन काही भुल चुक झाली असेल तर मला माफी करा बाबा 
                   आंम्ही दवाखान्यात गेलो डाॅक्टर ला भेटलो त्यांनी रिपोट पहाला तो  निल होता त्यात कॅन्सर निघाला नाही ति बिमारी नाहीसी झाली 
            पहा बाबा ची किती  मोठी शक्ती आहे बाबा आपल्या सेवकाची परीक्षा घेतो सेवक काय करतो आपन चार तत्व तिन शब्द पाच नियमा चे पालन करणे आवश्यक आहे आहे माझ्या वर दुःख येन्याचे कारन माझा कडुन वागणूकित फरक पडला मि लाफरवाही ने कार्य करत होतो म्हणून माझ्या वर दुःख आले  
          तेव्हा पासून चार तत्व तिन शब्द पाच नियमाचा पालन करत आहोत आम्हाला चुक नावाची माहीती मिळाली आहेत 
माझा कडुन अनुभव लिहीताना काही भुल चुक झाली असेल तर भगवान बाबा हनुमान जी ला माफी मागतो व महानत्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मागतो मातोश्री आई वाराणसी आईला माफी मागतो तसेच सर्व सेवक दादा सेविका ताईना व बाल सेवक बाल सेविका सर्वाना माफी मागतो आणि आपल्या अनुभव येथेच समाप्त करतो
       *नमस्कारजी सर्व सेवक दादा  सेविका ताईना 🌹🙏*

*नाव:-संजय वामनरावजी वाघाडे मु.+पो.सावनेर त.सावनेर जि.नागपुर*
*सेवक क्रं:-25797*
*मार्गदर्शक :-मा.श्री.मोरेश्वरजी डाखोडे*
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.

*•••••••••••••••••••••••••••••••••*
*--------------------------*
*--------------------------*
*[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]*

*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*

*गणेश दादा बिडकर :-9766573410*
*मोहन दादा आस्वले:-9764989883*
*रोशन दादा काटेकर :-8956656210*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.