"होते आम्हीं अंधारात निघाले आज प्रकाशात ,बाबा जुमदेवजीनी हात दिला आणले जीवन जगण्यास या मानव धर्मात"

 👉▶️आजचा अनुभव



⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕

"भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम"
"महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम"
"परमात्मा एक "

       [ माझा सत्य अनुभव ]

[ "होते आम्हीं  अंधारात निघाले आज प्रकाशात ,बाबा जुमदेवजीनी हात दिला आणले जीवन जगण्यास या मानव धर्मात"]

माझे नाव मानिक नारायन माहूरकर असुन मी मू‌. मूजबि भंडारा या परिसरात वास्तव्यास आहे. व मानवधर्म एकता परिवार या गृपवर हा माझा प्रथम अनुभव मी " माझा सत्य अनुभव " या अनुभव मालिकेत सादर करित आहे.

               महानत्यागी बाबा जुमदेवजी नी दिवस रात्र  कष्ट केले आणि परमेश्वरी क्रूपा प्राप्त  केली व हि परमेश्वरीकृपा स्वतः जवळ न ठेवता निष्काम भावनेने सर्व  सेवकात फुकटात वाटुन दिली व आपल्या सारख्या कितीतरी सेवकांचे जीवनमान घर परिवार सुखी समाधानी  केले , आणि बाबानी विचार केला आपल्या देशात अनेक वाईट वेशन मूळे दुःखीआहेत मग त्यानी गोर गरिब सेवका फुकटात सेवा वाटून सुखी जीवन जगत‌ आहेत महान कृपा बाबा नि आपल्याला दिलेली आहे. फक्त आपल्याला तत्त्व शब्द नियमांचे पालन करायचे आहे.

तसे या मार्गात अनेक सेवक कोणत्या ना कोणत्या दुःखामुळेच आलेले आहे . मी पण या मार्गात दुःखीच आलो. ते दुःख असे की, मी अनेका मध्ये होतो तेव्हा मला दारु पीण्याचा खुप छंद होता या व्यसनामुळे घरी रोज भांडन सूरू रहात असत व माझ्या या अशा बेताल वागण्यामुळे घरातील सर्व परिवार त्रस्त होता आणि माझा लहान मुलाची प्रकृती नेहमी ठीक राहत नव्हती या कारणांमुळे   मूलाचा शिक्षन कपड़े दारु दवाखाने यामूळे पैसा जवळ वाचत नव्हता.
 
माझ्या परिवारात आम्ही एकुन  चार सदस्य आहोत मि , माझी पत्नी निर्मला मोठा मूलगा राकेश लहान मुलगा रोशन घरात रोजच्या भांडन तंट्यामुळे मुले आणि पत्नी त्रासुन गेले होते. पत्नि नेहमी चींताग्रस्त रहायची तीला वाटायचे हे असेच सुरु रहाले तर एक दिवस आपला संसार ऊघड्यावर पडेल. कारण माझे दारु पिण्याचे प्रमाण खुपच वाढुण गेले होते व लहान मुलगा नेहमु बिमार रहायचा. काय करावे कसे करावे काही कळतच नव्हते अशातच एके दिवशीं  माझ्या  पत्नी आणी मूलानि विचार केला कि आपन परमात्मा एक मार्ग घ्यायचा जेणेकरुण आपले ऊर्वरित आयुष्य तरी सुखसमाधानी होईल. आणि मला सांगु लागले , की तूमचा मित्र परमात्मा एक मार्गा मध्ये आहे तर आपन सुद्धा परमात्मा एक मार्ग मध्ये‌ जाऊं आपल्या मुलाचि तबियत बिघडल्यावर त्याणी तिर्थ दिले कि आराम होत असतो आणी त्यांचा परीवार सुखी समाधानी जीवन जगत‌ आहेत परंतु माझा विश्वास बसत नसल्यामुळे मी त्यांना टाळत जायचा आणि माझ्या दारू चा शौक वाढतच गेला त्या कारनामुळे  घरामध्ये वातावरण खराब  होऊ लागले आणि मग माझा लहान मूलगा परमात्मा एक सेवक श्री,वंसताजी सहारे यांच्या कडे रोज जाऊं लागला त्यामुळे त्याला सकाळची विनंती मूखपाठ झालि होती अशाप्रकारे माझी पत्नी आणि लहान मूलगा रोशन पहाटे  पांच 5 वाजता आंधोळ करुन विनंती करू लागले व  मग काही दिवसानि मी आणि माझी पत्नी त्या सेवक दादा सहारे यांच्या घरी जाऊन बसलो आणी मार्गा विषयी समजावून सांगु  लागला व मग माझा या मार्गावर विश्वास बसला आणी मग मी आपली संमती दर्शविली की आपण परमात्मा एक मार्ग वर जाऊं आणी मार्ग घेण्यासाठी जाण्यास तयार झालो.

       ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीं  सहारे जी सेवक दादा यांच्या घरी गेलो व त्यांना घेऊन दिनांक 15/8/2003 ला मार्गदर्शक आदरनिय श्री शिवदास जी निंबारते यांच्या निवासस्थानी सहपरिवार गेलो व  मग त्याणि आम्हाला या मार्गाची पुर्णपणे रुपरेषा समजाऊन सांगीतली व मला मनाले की या मार्गात मरावे लागते  व त्यांचे मार्गदर्शन ऐकुन मी तयार झालो आमची सर्व परिवाराची सहमती झाल्यावर  त्यांनी मला तिन 3 दिवसाचे कार्य दिले व तिन दिवसाचे कार्य समाप्त झाल्यावर मी मार्गदर्शका कडे गलो मग त्यांणि मला लगेच 7 दिवसाचे कार्य दिले ते कार्य सुद्धा व्यवस्थित पणे पार पाडले यानंतर मार्गदर्शकांनी मला 11अकरा दिवसाचे दिले व त्यांच्या शब्दांवर कार्य घेवुन घरी आलो तो दिवस बुधवार होता कंपनी बंद राहत असल्यामुळे मी घरीच होतो माझ्या घराच्या 5-6 घराचा बाजुला एक दवाखाना होता त्या दवाखाना मध्ये मुजबि गावचे आगासे भाऊ यांच्या योगेश नावाचा मूलाचि तबियत फार खराब होती  डाक्टर ने त्या आगसे भाऊला म्हनाला की तूमी याला नागपुर ला घेवून जा यांचा ईलाज माझ्या पासी होनार नाही त्या दवाखान्या मध्ये परमात्मा एक सेविका बाई आली आणि त्या बाईने मुलाचा वडिलाला सागींतले कि ईथे कूणी परमात्मा एक मार्ग वाला असेल तर तूमी त्याला त्यांचा घरी घेवुन जा  मग त्या मूलाला घेवून तो माझ्या घरी आला मी आणि माझी पत्नी आमी घरी होते मुलाचा वडिल मणाला कि माझ्या मूलाला तिर्थ बनवून द्या मी मुलाला पाहताच घाबरलो होतो माझी पत्नी म्हनाली की बाबा ची महान कृपा आहे तूमी त्याला 7 फूंकाचा तिर्थ बनवा आणी ध्या त्या मुलाची अवस्था मी पाहु शकत नाही असी झालेली होती त्यानी मला शद्ब दिला कि माझ्या मुलाची तबियत आराम झाला की मी पन या मार्गात येतो आणी मग मी त्याला 7 सात फुंकाचा तिर्थ बनवून दिला आणि पहातो तर काय मूलगा 5 मीनटात बोलु लागला मला मनतो काकाजी भुक लागलि मी भगवंताचे आभार मानले खरोखर भगवतकृपा महान आहे मग माझा पत्नीने त्याला जेवन दिले त्या वेळेस मला आश्चर्य झाले की खरोखरच बाबा परमेश्वरी क्रूपा महान‌ आहे मूलगा खेळू लागला त्या वेळेस मुलगा तो मुलगा चवथ्या वर्गात शिकत होता कालांतराने परत 15 दिवसानि त्या मूलाची तबियत खराब झाली आणी मुलाचा वडिल घरी आला आणी सांगु लागला की मी तूमाला शब्द दिला होता कि मी परमात्मा एक मार्ग मध्ये प्रवेश करिन  पण मी गेलो नाही माझी चुक झाली आपण सकाळी जावू तर आज माझ्या मुलाला तिर्थ बनवून द्या जर तूला ऊद्याला मार्ग घ्यायला जायचे आहे तर तू आपल्या घरी जा मुलाला काहि होनार नाही आणि मग तो सकाळि 7 वाजे आला व सांगू लागला कि माझा मुलगा शांत पणे झोपला आणि मग मी त्याला त्याच्या सहमतीनुसार मुजबि येथील मार्गदर्शक श्री शिवदास जी निंबारते यांच्या घरी घेऊन गेलो व त्यांचे जवळून त्याने कार्य केले आणि सुख समाधानाने जगत  आहेत.

माझी परिस्थिती सुधरु लागली व मी एका महिन्यात माझ्यावर असलेले कर्ज चुकता केला आणी घरी सगळे परीवार बाबा चा  क्रूपेने सुखसमाधानी आहोत.

मी मार्गदर्शकांच्या शब्दांवर त्यागाचे कार्य दि.7/9/2006 ला घडविला व त्याग व्यवस्थित पणे पार पडला त्यागाचि हवन केल्यावर माझे निवासस्थानी 9 हवन सुद्धा व्यवस्थित पणे पार पडले. आता सर्व सुखसमाधानी आहे. कोणत्याच गोष्टींची कमी नाही आहे. बाबांना मी जे मागीतलं ते मला माझ्या अपेक्षेपेक्क्षा जास्त मिळाले.

 माझ्या अनुभव लीवण्यात काही चुका झाल्या असतील तर सर्व प्रथम मी भगवान बाबा हनुमानजीला, महानत्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मांगतो व वाराणशी आईला माफी मागते आणी सर्व सेवक दादा व सेवीका ताईना पण माफी मांगते व आपला अनुभव येथेच समाप्त करतो.

🙏 नमस्कार जी सर्वांना🙏
 •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सेवकाचे नाव :- माणिक नारायन माहुरकर
पता  :- मु.मुजबी,पो.बेला,ता. भंडारा,जि.भंडारा.
सेवक क्र. :- 19331
मार्गदर्शक :- श्रि शिवदासजी निंबार्ते,मु.मुजबी,ता.जि.भंडारा.
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.

•••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]

भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...

गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Wats app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.