चार तत्व, परमात्मा एक, मरे या जिये भगवत नामपर ,दुःखदारी दूर करते हुये उद्धार, इच्छा अनुसार भोजन #parmatmaekmargdarshan #parmatmaek
- चार तत्व
महानत्यागी बाबा जुमदेवजी हे एका परमेश्वराच्या प्राप्तीसाठी विदेह अवस्थेत असतांना शेवटी एका परमेश्वराने बाबांना दर्शन दिले आणि त्याना बेइमान म्हटले.
त्यानंतर बाबांनी परमेश्वराला इमानदारी आणि निष्काम भावनेने मानवाला परमेश्वराप्रती जागविण्याचे कार्य करीन असे वचन देऊन " परमात्मा एक, मरे या जिये भगवत् नामपर" हे वचन दिले. भगवंत बाबांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी बाबांना पुढील दोन वचने दिलीत." दुःखदारी दूर करते हुये उध्दार" आणि "इच्छानुसार भोजन"
हीच वचने या मार्गाचे सिध्दान्त ठरुन बाबांनी भगवत्प्राप्तीकरिता, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता आणि मानवाला जीवनात सफल होण्याकरिता ही चार तत्वे दिली आहेत.
१. परमात्मा एक
२.मरे या जिये भगवत् नामपर
३.दुःखदारी दूर करते हुये उध्दार
२. मरे या जिये भगवत नामपर
मानव हा पृथ्वीतलावर जन्माला आली तरी तो परमात्म्याचा एक अंश आहे.परमेश्वराने त्याला बुध्दी दिली असून इतर गुणांबरोबर त्याच्यात मोह, माया, अहंकार, निर्माण केला आहे. तो स्वतःला सर्वेसर्वा समजतो. तो परमेश्वराला मानत नाही. त्यामुळे तो त्याचा बुध्दीचा उपयोग करुन मोह, माया, अहंकारात फसतो. ज्यामुळे तो दुःखी होतो. दुःख निवारण करण्याकरिता तो नानातन्हेचे उपचार करतो. परंतु जेव्हा त्याचे दुःख नष्ट होत नाही तेव्हा मात्र त्याला परमेश्वराची आठवण येते व तो त्याची आराधना करतो. म्हणून महानत्यागी बाबा जुमदेवजी नेहमी सांगतात की, मनुष्य हा सर्वेसर्वा नाही. परमेश्वर ही शक्ती आहे. मानव हा कर्मकर्ता आहे. त्याने फळाची आशा करु नये.
फळ देणारा भगवानच आहे म्हणून मानवाने जीवंत असतांना परमेश्वराच्या नावाचे स्मरण करुन त्याला प्रिय असणारे कार्य करावे. म्हणजे त्याला मरण आल्यावर त्याचा आत्मा परमेश्वरात विलीन होतो. अन्यथा तो चौऱ्यांशी लक्ष योनी फिरत असतो. त्या आत्म्याला अशांती मिळते आणि चौ्यांशी लक्ष भोग येतात. परमेश्वराला समोर ठेवून मानवाने कार्य केले तर त्याच्या अंगातील मोह, माया आणि अहंकार नष्ट होतात. यालाच म्हटले आहे की, 'मरे या जिये भगवत नामपर।'
३. दुःखदारी दूर करते हुये उद्धार
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितले आहे की, मानवाने जर परमेश्वराला प्रिय असणारे कार्य केले आणि मोह, माया तसेच अहंकाराचा त्याग केला, सर्वांशी सत्य व्यवहार केले, तो मर्यादिने वागला आणि प्रेमाचे आचरण केले तर तो मानव परमेश्वराला नेहमी प्रिय असतो. प्राकृतीक वातावरणामुळे त्याला दुःख येते तसेच त्याला जीवन जगातना अनेक प्रकारच्या अडी-अडचणी येतात. अशा वेळेस तो अनेक उपचार करतो.
त्यावेळेस परमेश्वराला समोर ठेवून उपचार केले तर त्याचे दुःख लवकर नष्ट होते आणि त्याच्या अडचणी सहजरित्या नष्ट होतात. या कामात परमेश्वर त्याला साथ देतो.
सरतेशेवटी मानवाला परमेश्वराच्या चरणी स्थान मिळते. अशाप्रकारे परमेश्वर मानवाचे दुःख दूर करुन शेवटी त्याच्या जीवनाचा उध्दार करतो.
४.इच्छा अनुसार भोजन
मानव जन्माला आल्यावर त्याला पूर्ण आयुष्य घालविण्याकरिता खूप गोष्टींची आवश्यकता भासते. तो आपले जीवन सुखी आणि समाधानी कसे बनू शकेल याकडे जास्त लक्ष असते. तेव्हा त्याने भगवंताजवळ त्याला पाहिजे असलेल्या वस्तुंची इच्छा केली आणि परमेश्वराजवळ विनंती केली तर त्याला ती वस्तु सहज सुलभरित्या मिळते. हेच 'इच्छा अनुसार भोजन' होय. इच्छा अनुसार भोजन का अर्थ मानवाला केव्हाही, जेव्हा त्याला जे काही खाण्याची इच्छा झाली तर तेच खायला मिळाले पाहिजे असे होत नाही. जसे 'असेल माझा हरी, तर देईल पलंगावरी' हे चुकीचे आहे. त्याने ज्याप्रमाणे कार्य केले असेल त्याचप्रमाणे त्याने इच्छा केली तरच त्याला ती वस्तु मिळते, अन्यथा मिळत नाही. म्हणजेच इच्छा अनुसार भोजनाकरिता त्याला त्याप्रमाणे कर्म करणे महत्वाचे आहे.
.
Leave a Comment