परमात्मा एक मानव धर्म माहिती | PARMATMA EK MAHITI

परमात्मा एक मानव धर्म

PARMATMA EK MAHITI,परमात्मा एक  मानव धर्म  माहिती

परमात्मा एक  मानव धर्म  माहिती |  

महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना १९४९ साली फेब्रुवारी महिन्याच्या तान्ह्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या पर्वावर केली. मानव धर्माचा मुख्य उद्देश्य मानवाने मानवासारखे वागावे हा आहे. या धर्माची शिकवण म्हणून मानवाला भगवंत प्राप्तीसाठी, निष्काम कर्मयोग साधण्याकरिता, त्यांच्या आयुष्यात वागण्याकरिता बाबांनी चार तत्व, तीन शब्द, आणि पाच नियम दिले आहेत, ते खालीलप्रमाणे आहेत.
  • चार तत्व
१) परमात्मा एक २) मरे या जिये भगवत् नामपर ३) दुःखदारी दूर करते हुये उध्दार ४) इच्छा अनुसार भोजन

  • तीन शब्द
१) सत्य बोलणे २) मर्यादा पाळणे ३) प्रेमाने वागणे


  • पाच नियम
१) ध्येयाने एक परमेश्वर मानणे २) सत्य, मर्यादा व प्रेम सेवकांत तसेच कुटुंबात कायम करणे ३) अनेक वाईट व्यसन बंद करणे (दारु, टॉनिक, सट्टा, जुआ, लॉटरी, पटाची होड, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे, स्त्रीयांनी मुलांना व पतीदेवांना वाईट शब्दांत बोलू नये.याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करणे.) ४) कुटुंबात व सेवकांत एकता कायम करणे ५) मानव मंदिर सजविण्याकरिता दान देणे.

(आपले कुटुंब मर्यादित ठेवणे)

मानवाने भगवंताच्या चरणावर मरुन त्याला उभे केले पाहिजे आणि त्याने सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर तो नेहमी सुखी आणि समाधानी राहू शकतो.

बाबांनी या मार्गात एकच परमेश्वर मानला आहे. बाबा हनुमानजी हे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे गुरु आहेत. त्यांनीच बाबांना एका परमेश्वराची ओळख करुन दिली. परंतु बाबा हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाहीत. परमेश्वर ही व्यक्ती नसून चोवीस तास जागृत असणारी दैवी शक्ती आहे. ती निराकार आणि चैतन्यमय आहे.



प्रत्येकाच्या आत्म्यात ती शक्ती विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे.
या दैवी शक्तीला आकारात दाखविता येत नाही तर बाबांनी दिलेल्या तत्व, विश्वास आणि त्याग यामुळे ती आकारात दाखविता येते म्हणजेच त्याचे गुण दिसतात.

वंशपरंपरेनुसार रुढीवादाप्रमाणे या मार्गाची दिक्षा घ्यायच्या अगोदर सर्व देव देवतांचे विसर्जन करावे लागते. तेव्हाच परमेश्वर पाठीशी उभा राहतो. मुर्तीपुजा बंद करावी लागते. श्री. संत तुलसीदासांनी म्हटले आहे की, "पत्थर पुजे भगवान मिले ते में पूजूँ पहार" या म्हणीप्रमाणे बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव वस्तुमध्ये वास करीत नाही तर तो सजीव वस्तुमध्ये वास करतो. त्यामुळे त्याचा आत्मा हा चैतन्य असतो. परमेश्वराने बाबांना त्यांच्या आत्म्यात आपली ओळख करुन दिली आहे. म्हणून बाबा हे प्रत्येक मानवाच्या आत्म्यात परमेश्वर पाहतात. जो चोवीस तास त्याचे जीवन चैतन्यमय बनवितो. म्हणून बाबा स्वतःच्या आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा सारखाच आहे असे समजून कोणालाही आपल्या पाया पडू देत नाहीत. कारण एका आत्म्यापुढे दुसरा आत्मा झुकेल. त्यामुळे आत्म्याचा अपमान होईल आणि पर्यायाने परमेश्वराचा अपमान होईल असे ते समजतात. कारण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. हीच शिकवण त्यांनी मानवाला (सेवकाला) दिली आहे. या मार्गातील सेवकाला कोणत्याही देवळात नमस्कार करता येत नाही. तसेच तांत्रिक मांत्रिक यांचाही उपचार करता येत नाही. किंबहना या तांत्रिक मांत्रिकाचा इलाज या मार्गातील सेवकांवर चालत नाही. अनेक वाईट व्यसने बंद करावी लागतात. दारु पिणान्याला घरात प्रवेश देता येत नाही. दारु पिणारा घरात आला तर त्या घरात दुःख निर्माण होते.

मानवाने सर्वाबरोबर सत्य, मर्यादा आणि प्रेमान वागले पाहिजे. त्याने त्याच्यातील मोह, माया आणि अहंकार नष्ट करायला पाहिजे. त्याने निष्काम भावनेने कार्य करावे. आपल्या स्वा्थाकरिता दुसर्याचे नुकसान करु नये. 'अपनी अपनी करनी उतरो पार, बापबेटे का कौन विचार' या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आपले कर्तव्य करुन त्याचे परिणाम आपणच भोगावे. वडिल मुलाकरिता किंवा मुलगा वडिलांकरिता केलेल्या कार्याचे परिणाम भोगत नाही म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीत विचार केला पाहिजे.
प्रत्येक जण जसे कर्तव्य करतो तसेच त्याला फख मिळते. प्रसंग पडल्यास कोणी कोणाला साथ देत नाही. म्हणून प्रत्येक मानवाने स्वावलंबी दनणे आवश्यक आहे. त्याने निष्काम सेवा करावयास हवी.

"असेल माझा हरी, तर देईल पलंगावरी" ही म्हण या मार्गात खोटी ठरली आहे. येथे नुसता देव देव चालत नाही. देव मानवाला साहाय्य करीत असतो. परंतु आपल्या कर्तृत्वानुसार आपल्याला फळ मिळत असते. त्यामुळे कर्तृत्वच श्रेष्ठ मानल्या गेले आहे. स्वतःनुसते कर्तृत्व करावे पण त्याच्या फळाची आशा करु नये. बाबांनी
दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमाप्रमाणे कर्तव्य केले तर त्याला परमेश्वर साथ देतो आणि त्काचे चांगलेच फळ त्याला चाखायला मिळते. म्हणून देव देव म्हणून नुसते भजन करु नये. त्यामुळे त्याला दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाहीत आणि त्याचे जीवनमान सुध्दा उंचावणार नाही.
या मार्गाची दीक्षा घेताना दीक्षा घेणारा स्वतःच परमेश्वराची आराधना करतो आणि त्याचे गुण पाहतो. बाबा त्याला फक्त मार्गदर्शन करतात. दीक्षा घेणाऱ्याला स्वतःच आराधना करुन स्वतःच परमेश्वराचे चमत्कार पाहावे लागतात. हा मार्ग स्वीकारल्यावर स्वतःच हवन करावे लागते. दुसऱ्या कोणालाही हवन करता येत नाही. या मार्गात परमेश्वराने सेवकांच्या भावना संपवलेल्या आहेत. सेवकाने जर एखाद्या दुःखी आणि कष्टी माणसाला तीर्थ करुन दिले तर त्याचे दुःख क्षणातच दूर होते. मानव हा त्यागी असला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक सेवक कोणत्याही देव देवतांपेक्षा कमी नाही. तसेच या मार्गातील प्रत्येक नारी कोणत्याही देवीपेक्षा श्रेष्ठ आहे.

'आपल्या सारखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तया लागे' या म्हणीप्रमाणे बाबांनी प्रत्येक सेवकाला स्वावलंबी, निःस्वार्थी आणि त्यागी बनविले असून निष्काम सेवा करण्यादे धडे शिकविले आहेत. त्यागामुळे परमेश्वर लवकर प्राप्त होतो. म्हणून या मार्गातील प्रत्येक सेवक इतरांचे दुःख झटकन नाहीसे करतो.

मानव धर्म या मार्गात फक्त दोन जाती आहेत. नर आणि नारी. याशिवाय या मार्गात दूसरी कोणतीही जात पात नाही. यापुर्वी ज्या जाती निर्माण झाल्यात त्या जार्तीना येथे स्थान नाही. येथे फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानव धर्म. कारण परमेश्वराला हव्या असलेल्या सत्य, मर्यादा आणि प्रेमपूर्ण वागणूक यासाठी मानवाला कार्य करायचे आहे. मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्ती, शुध्द मन, स्वच्छ शरीर, शुध्द दागणूक, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार आणि त्यागमय जीवन इत्यादी गोष्टी या मार्गाची शिकवण आहे.

तत्व, निश्चय आणि त्यागाने परमेश्वर मानवाजवळ असतो. तत्वाने निष्काम कर्मयोग साधला जातो. निश्चयाने विश्वास वाढतो, तर त्यागाने धैर्य वाढते. या मार्गात भावना मुळीच स्थान नाही.

या मार्गाचे निशाण हे देशाचे निशाण आहे. प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे की, त्याने ज्या भूमीवर जन्म घेतला असेल ती त्याची कर्मभूमी मानली पाहिजे आणि त्याबद्दल त्याला अभिमान असला पाहिजे. त्याकरिता तिचे रक्षण करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे.

आपली सोडवणूक करावी आपणच' या म्हणीप्रमाणे या मार्गातील प्रत्येक सेवक त्याला येणाऱ्या दुःखापासून स्वतःला सोडवतो. मानव हा कार्य करणारा प्राणी आहे. तो कार्य करताना चुकतो आणि त्या चुकीमुळे त्याच्यावर दुःख येते. या दुःखातून मुक्त होण्याकरिता त्याला पुन्हा भगवंताजवळ आपली चुक कबुल करावी लागते. पुन्हा चुक करणार नाही असे वचन द्यावे लागते; कारण मानव हा क्षमेला पात्र आहे. वरील म्हणीप्रमाणे भगवंत त्याला क्षमा करुन दुःखातुन मुक्त करतो.

या माग्गात असाध्य रोग, उदा. टी.बी., कॅन्सर, कोड इत्यादी साध्य होतात.जे संसर्गजन्य रोग आहेत तेही या मार्गात नष्ट झालेले आहेत. तसेच वंशपरंपरागत रोगही नष्ट होऊन पुन्हा त्या कुटुंबात ते रोग होत नाहीत. याची अनेक उदाहरणे या मार्गातील सेवकांनाआलेल्या अनुभवावरुन आहेत.

बाबा हनुमानजी पुर्व मुखीच का?
या मार्गातील सेवक हवन करताना बाबा हनुमान जी प्रतिमा पुर्वमुखी ठेवतात आणि हवन करणाऱ्या सेवकांचे तोंड पश्चिमेकडे असते. सुर्य पुर्वेला निघत असल्यामुळे पुर्वदिशा नेहमी प्रकाशमय असते. परमेश्वर हा प्रकाशमय आहे. पश्चिमेला सुर्य मावळत असल्यामुळे अंधार पडतो. त्याचप्रमाणे मानव आपल्या जीवनात काही कारणास्तव बुडतो आणि त्याचे जीवन अंधकारमय बनते. दुःखी मानवाचे जीवन बुडू नये, त्याच्या जीवनात अंधकारमय वातावरणाऐवजी प्रकाशमय वातावरण निर्माण झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून त्याचे लक्ष नेहमी समोर असलेल्या प्रतिमेकडे म्हणजेच भगवंताकडे असले पाहिजे आणि भगवंताकडे पाहिल्यास त्याच्या मनाची एकाग्रता तयार होऊन एक लक्ष, एक चित्त, एक भगवान मानल्यास तो त्याचे जीवन प्रकाशमय बनवू शकतो.

मानवाने मानवासारखे वागावे हाच खरा या धर्माचा हेतु आहे. मानवाचे जीवन त्यागमय असून दया, क्षमा, शांती हे गुण त्याच्यात निर्माण होऊन सत्य, मर्यादा. प्रेम याचे आचरण त्याने सर्वांबरोबर केले पाहिजे, हीच या धर्माची शिकवण आहे आणि हाच खरा मानवधर्म आहे. या मार्गाचा सेवक हा, प्रकरण आठमध्ये सांगितल्याप्रमाणे महानत्यागी बाबा जुमदेवजी ज्या ज्या देवदेवतांनी दर्शन दिले. त्यापेक्षा कमी नाही किंबहना तो श्रेष्ठच आहे हे सिध्द केले आहे. त्या सर्व देवदेवताही मानव होत्या. परमेश्वर नव्हत्या असे बाबांनी सांगितले आहे.

Watch Video :-  


 







No comments

Powered by Blogger.