भुतबाधेचे दु:ख आले माझ्या जिवनावारी, भगवंता समक्ष सोडवणुक करताच सुखसमाधान आले माझ्या दारी. परमात्मा एक अनुभव
▶ आजचा अनुभव
👇🏿👇🏿👇🏿
![]() |
| भुतबाधेचे दु:ख आले माझ्या जिवनावारी, |
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
*!! भवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!*
*!! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!*
*!! परमात्मा एक !!ग*
*"माझा सत्य अनुभव"*
*[ भुतबाधेचे दु:ख आले माझ्या जिवनावारी, भगवंता समक्ष सोडवणुक करताच सुखसमाधान आले माझ्या दारी.]*
नमस्कार ..🙏🌹
माझे नाव शिव भोजराजजी गभने , मु. भंडारा , मी आज मानवधर्म एकता परिवार या भगवतकार्याच्या गृपवर हा माझा पहिला अनुभव व मार्गात येण्याचे कारण व माझा परिवार मार्गात का आला यावर लिखाण करत आहे .
माझा परिवार माझी आई श्रीमती ताराबाई भोजराज गभने , एक मोठी बहीन , आम्ही दोन भावंड आणि माझ्या आईची आई श्रीमती तुळसाबाई मस्के असा आमचा मध्यमवर्गीय परिवार .. घर चालविण्यासाठी आणि उदारनिर्वाहासाठी घरी एक किराण्याची दुकान .
माझे वडील कै . भोजराजजी संभाजी गभने हे सन १९९१ ला हे परमेश्वररात विलीन झाले , त्यांना दारुचे व्यसन होते त्यामुळे त्यांना ह्रदयरोगाची बिमारी झाली होती, आईने जमेल ते प्रयत्न करुन वडीलांना वाचवण्यासाठी जिवाचे रान केले पण सर्व व्यर्थ , या सोबतच माझ्या आईला भुतबाधेचा त्रासही खुप होता आणि कालांतराने आई ज्या मस्जिदमध्ये श्रद्धेने जायची त्या मस्जिदीचे शजनशाहबाबा आईच्या अंगात यायला लागले .. परंतु आईला समाधान मात्र मिळत नव्हते .. अंगात बाबा येउनही समाधान न मिळु शकणारी माझी आई .. मांत्रीक , बुव्वाबाजी आणि मंदीराच्या चक्कर मारुन मारुन फार थकली पण समाधान मात्र शुन्य .. कमाई करायची आणि मांत्रीक , बुवाबाजी आणि मंदिरात खर्च करायची .. कर्ज वाढले , आर्थिक परिस्थिती बिकट झाली त्यातच वडीलांचे निधन यापेक्षा बिकट स्थिती जिवणात कोणत्यातच स्त्रिवर नसणार .
वडील गेल्यावर मी माझ्या मावशीकडे स/अर्जुनीला तर लहान भाऊ वडीलांच्या मावशीकडे लाखणीला शिक्षणासाठी गेलो सन १९९१ ला आणि माझी ताई आई आणि आजी सोबत भंडाराला .. परिवार पुर्ण विस्कळीत ..
असेच कर्जाने आणि आर्थिक परिस्थितीने झोडपलेले एकंदरीत दिवस निघत गेले पण समाधान मात्र मिळेना .. रिस्तेदार एकदम जवळचे बोलायचे हिचे मुले लावारिस निघतील , मुलगी कुणाला घेउन पळेल फक्त आणि फक्त द्वेष प्रगट करायला घरी यायचे पण धीर द्यायला मात्र टाळायचे .. कधी नकळत आम्ही भावंडे चुकलो तर टोमणा फेवरेट असायचा लावारिस ..असेच दिवस निघत होते .
एक दिवस महिणा नोव्हेंबर सन १९९१ ला आई स/अर्जुनीला मला भेटायला मावशीकडे आली आणि त्याच दिवशी ती थोडी समाधानी दिसली .. ती बोलली की मी तुमसरला जात असतांना शास्त्री चौक बस थांब्यावर माझी मैत्रिण मिळाली आणि तिने मार्गाबद्दलची माहीती आईला दिली .. आईच्या मैत्रीणीची परिस्थिती फारच बिकट होती पण मार्गात आल्यावर त्यांचे दिवस कसं पलटले ती माहीती सुद्धा आईला तिच्या मैत्रिणी नं दिली .. आई मार्गात जाण्यासाठी एकदम सज्ज होती .
पण यावर एकच गोंधळ उडला याविषयी सामोर वेळेनुसार सविस्तर लिहीण कारण ज्या मावशीने मार्गात जाउ नकोस तुझा आणि तुझ्या परिवाराचा नाश होईल बघितलेल्या अनुभवावरून असं बोलली तीच मावशी आमच्या मागेहुन मार्गात येउन लवकरच समाधानीही झाली आणि माझे मावशाजी श्री लालाजी चकोले हे स/अर्जुनी येथील परिसरातील मार्गदर्शक .
आई बोलली की तुझे वडील दारुपायी आणि भुतबाधे पायी गेले आता मला तुम्हांला काळाच्या भोवर्यात असंच सोडायचं नाही ... अजुन बरेच बोलली .. मला त्यावेळी अक्कल नव्हती मी खोडकर वृत्तीचा आणि लवकर कुणाशीही पटवुन न घेणारा होतो पण आईचे ते भावनिक शब्द एैकुन मी बोललो तूला जर अगरबत्तीचे मार्ग घ्यायचं असेल तर मला काहीच त्रास नाही .. तेव्हा आई बोलली तु घरचा मोठा आहेस तुला सोबत मार्गदर्शकांच्या घरी यावे लागेल ... आणि मी आई सोबत दुसर्या दिवशी लगेच भंडार्याला आलो .
आईने मला मार्गदर्शकांच्या घरी नेले , त्यांच्या घरी हवनकार्य नुकतेच संपत होते अश्यावेळी आम्ही पोहचलो व त्यांनी आम्हालाही हवनकार्यात बसायला लावलं आणि हवनकार्य पार पाडलं .. आम्ही ज्या मार्गदर्शकांकडे गेलोत ते श्री प्रभाकरजी वैरागडे गुरुजी , मु . भंडारा .. आईने त्यांना परिवाराची पुर्ण माहीती दिली आणि ते कार्य द्यायला तयार झाले पण शेवटी त्यांनी दोन्ही मुले इथे राहत नाही म्हणुन मी आज तुम्हांला कार्य देउ शकत नाही , मी अगोदर बाबा जुमदेवजी यांच्याशी या प्रकारावर नीट चर्चा करतो नंतर तुम्हांला मार्ग देतो तो पर्यंत तुम्ही तुमच्या घराची साफसफाई मार्गाच्या हिशेबाने करा व बाबा हनुमानजी , बाबा हनुमानजी या नामाचाच जप करा असं बोलुन त्यांनी आम्हांला निरोप दिला .. आम्हीही त्यांच्या सांगण्यानुसार घराची नीट सावरासावर केली आणि बाबा हनुमानजी या नावाचा जप केला आणि काय आश्चर्य बघा जे भुत आणि मस्जितीतील बाबा आईच्या अंगात कधीही कोणत्याही वेळी यायचे ते त्या वेळेपासुन तर आजपर्यंत कधीच माझ्या आईच्या जवळही भटकले नाहीत .. नुसत्या उच्चारानेच माझ्या घरची भुतबाधा नष्ट झाली ..
तीन दिवसांनी आम्ही पुन्हा मार्गदर्शकांच्या घरी गेलो आणि आम्हंच्या परिवारावर झालेला चमत्कार त्यांना सांगितला ते ही आनंदी झाले आणि म्हणाले आपलं मार्ग हे सदैव जागृत मार्ग आहे .. ते म्हणाले की मी बाबांशी माझ्या परिवाराबद्दल सखोल चर्चा केली आणि बाबा म्हणाले की त्या बाईला तुम्ही मारता का ? अगोदर त्यांना कार्य द्या आणि कसे द्यायचे ते बाबांनी त्यांना नीट समजावुन सांगितले .. मार्गदर्शक म्हणाले तुम्हांला कार्य देता येतील .. आणि त्यावेळेपासून च पुरुष ज्या परिवारात नसेल त्या परिवारातील स्त्रियांना सुद्धा कार्य देण्याची मोकळीक बाबांनी आपल्या मार्गदर्शनातुन मोकळी केली .
१)स्त्री ही रोज मार्गाच्या आचरणानुसार पुजापाठ करु शकते .
२)जर त्या स्त्रीला मासीक पाळीचा त्रास झालातर ती स्त्री आठ दिवस कापुर , दिवा व अगरबत्ती सुद्धा लावणार नाही फक्त बाबा हनुमानजी या शब्दाचा जाप करीत राहील आणि जर त्याच घरात दुसरी स्त्री असेल तर आणि तिला जर तसा प्राब्लेम नसेल तर ती स्त्री मात्र मार्गाच्या रुपरेषेनुसार कार्य चालु ठेवु शकेल .
३)माझ्या घरी दोन कुळाचे लोक राहत असल्याने आणि माझ्या आजीचीही ईच्छा मार्गात यायची असल्याने आम्हंच्या घरी दोन ज्योती दोन ठिकाणी लावाव्या लागतील .
आणि मार्गाची रुपरेषा वगैरै , वगैरे आणि सरत शेवटी संकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना याची प्राक्टीकलही मार्गदर्शकांनी त्यांच्या घरी करुन घेतले .
आणि दुसर्या दिवसापासून आम्ही कार्याला सुरवात केली .. आई , बहीण आणि माझी आजी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत होते आणि आम्ही दोघे भाउ फक्त बाबा हनुमानजी या शब्दांचा जाप करुन आपले कार्य करीत होतो कारण आम्ही परिवारापासुन दुर राहत होतो ..
*मार्गात येण्याचे फायदे ..*
मार्गात आल्यावर आईला कधीही भुतबाधा जाणवली नाही .. आर्थिक परिस्थिती झपाट्याने सुधारत गेली .. कर्जाचे बोझं कमी होत गेले .. मातीच्या घराचे रुपांतर स्लाँपच्या घरात झाले .. माझ्या बहीणीचे लग्न बाबांच्या आशिर्वादाने चांगल्या घरी झाले , माझे जिजाजी चिखला माईन येथे नौकरीत कार्यरत होते आणि आज एमपीत माईन मध्ये असुन मार्गात आहेत आणि सुखी समाधानी आहेत .. माझा लहान भाऊ श्री . अँड . अजय गभने आज वकील असुन आपल्या वकीलीत तो निपुण आहे आणि आज वकीलीच्या क्षेत्रात तो सामोर आहे .. मी सुद्धा एसटी त वाहक पदावर असुन समाधानी आहे , आम्हा दोघाही भावांचे लग्न झाले असुन दोघांनाही दोन दोन मुले आहेत ... जीवणाच्या काही अडचणी सोडल्यास माझा परिवार आजचा घडीला बाबांच्या कृपेने आणि आम्हंची बाबा वरी असलेली एकनिष्ट भक्ती यामुळे प्रगतीवर आहे .
*प्रगती साधण्याचा मंत्र*
मानवधर्मात राहुन स्वतःची व परिवाराची प्रगती साधायची असेल तर भगवंतावर निष्ठा ठेवावी लागते , वेळोवेळी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करत राहावे लागतात , कोण काय बोलतो आपल्याला , आपल्या परिवाराला याकडे लक्ष न देता निष्काम भावनेने सेवा करावी लागते .. स्वहीत साधता साधता दुसर्यांचे हितही साधावे लागतात .. चर्चा बैठकीला नेहमी उपस्थित राहवं लागते कारण चर्चा बैठकीत सेवकांना सर्व प्रकारचा मार्गदर्शन हा मोफत मिळतो आणि स्वतःच्या प्रगतीच्या मार्गाचे द्वार तर चर्चा बैठकीत उघडतात सोबतच मार्गाच्या विकासासाठी आपलाही थोडा हातभार लागतो ..दिवा जसा चिर अंधारातही कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान प्रकाश देतो , कापुर जसा कुणीही पेटवीला तर त्यात जे औषधीय गुण आहेत ते हवेच्या माध्यमातुन भेदभाव न करता सर्वांच्या शरीरात हवेच्या माध्यमातुन पोहचुन त्याच्या शरीराला निरोगी बनविच्याच प्रयत्नात असतो .. आणि अगरबत्ती .. अगरबत्ती ची एक मर्यादा असते ती एका विशिष्ट क्षेत्रा पुरतीच मर्यादीत राहुन तिच्यात असलेला सुगंध ती दरवळत असते.
सागण्याचे तात्पर्य एवढेच जो सेवक नियमीत मार्गाच्या रुपरेषेनुसार , सत्य , मर्यादा व प्रेम यानुसार मर्यादित राहुन चालेल आणि आपले कार्य अविरत करीत राहील त्याच्या प्रगतीला आणि विकासाला कसलीही बाधा नाही .. पण ज्या दिवशी मीपणा तुम्हंच्या वर स्वार होईल त्या क्षणापासून भगवंतही तुमच्यापासुन दुर जाईल .. एकंदरीत गणित लावलं तर आपल्या विनाशाला कारणीभुत आपणच ठरतो .
वर उल्लेखित माझ्या घरची परिस्थिती आणि वेळेनुसार माझ्या लिखाणातुन निघलेले मार्गदर्शन यात लिहण्यात जर काही चुक झाली असेल तर महानत्यागी बाबा जुमदेवजी मला क्षमा करा तसेच सर्व सेवक दादा व सेविकाताई आपणही मला क्षमा करावी ..🙏
नमस्कारजी सर्वांना.
धन्यवाद ..🙏
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*नाव :- शिव भोजराजजी गभणे*
*पता :- लाला लजपतराय वार्ड, संताजीनगर, भंडारा.*
*सेवक क्र. :- 8750*
*मार्गदर्शक :- श्रि.प्रभाकररावजी वैरागडे (गुरुजी) भंडारा.*
परमपुज्य परमात्मा एक
सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपुर
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
*[वरिल अनुभव कुणिही काॅपी करु नये, त्यापेक्षा जास्तीत जास्त शेअर करावा.}*
*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*
*१} गणेश दादा बिडकर :-9766573410*
*२} मोहन दादा आस्वले :-9764989883*
*३} रोशन दादा काटेकर :-8956656210*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
अॅडमिन,सेवक,सेविका,
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page, sherchat group}
युवा आणि जेष्ठ सेवक सेविकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment