PARMATMA EK- बाबांनी दिलेली तीन शब्द १) सत्य बोलणे २) मर्यादा पाळणे ३) प्रेमाने वागणे महानत्यागी बाबा जुमदेवजी
![]() |
| PARMATMA EK- बाबांनी दिलेली तीन शब्द १) सत्य बोलणे २) मर्यादा पाळणे ३) प्रेमाने वागणे महानत्यागी बाबा जुमदेवजी |
बाबांनी दिलेली तीन शब्द :--
महानत्यागी बाबा जुमदेवजी ची भगवत कृपेची प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी निराकार बैठक होत होती. प्रथम कुटुंबातील लोक आणि नंतर जसजसे या मार्गाचे सेवक वाढत गेले तसतसे तेही या बैठकीला उपस्थित राहत असत. या बैठकीत बाबा निराकार अवस्थेत येत असत आणि मार्गदर्शन करीत असत. प्रत्येक वेळेस ते तत्वावर बोलत असत. याच निराकार बैठकीत निराकार अवस्थेत असताना मानवाचे जीवन वर आणण्याकरिता, त्याच्या कुटुंबात आचरणात आणण्याकरिता तीन शब्द दिलेले आहेत.
१) सत्य बोलणे २) मर्यादा पाळणे ३) प्रेमाने वागणे
'शब्द' भगवान आहे. शब्द हेच भूत (सैतान) आहे. सेवकांचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहेत. फोटो देतांना ते सेवकांना सांगत असत की, कुटुंबात व सेवकांत सत्य, मर्यादा व प्रेमाने वागा आणि त्याबद्दल त्यांचेकडून तसेच वचन घेत असत. याबरोबरच वाईटाचा नाश करण्याबद्दल सुध्दा सांगत असत.
१. सत्य बोलणे:-
सत्य म्हणजे आत्म्यातून निर्भीडपणे निघालेले शब्द. समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम होवो त्याची तमा न बाळगता निघणारे शब्द. नाहीतर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलणे जे वारंवार बोलल्या जातात. ते सत्य शब्द नव्हेत. हे सर्राट खोटे बोलणे आहे. अशा शब्दामुळे मानवाची फसवणूक होते. मानवाच्या मानेवर जरी कुणी सुरी ठेवली तरी सत्य बोलले पाहिजे. सत्य कटु असते. पण ते परमेश्वराला प्रिय असते. 'भगवान के घर में देर है अंधेर नही या म्हणीप्रमाणे सत्यसुध्दा फार उशिरा कळते. या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे. या मार्गात खोटे बोलणे वज्ज्य आहे. व्यावहारिक नियम काहीही असले तरी सत्यानेच व्यवहार केले पाहिजे. सत्य कार्याची भिती मनात ठेवू नये. कारण त्याच्याकरिता भगवत्कृपा नेहमी जवळ असते. सत्य 'परमेश्वर' आहे आणि परमेश्वर 'सत्य' आहे. सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात.
२. मर्यादा पाळणे:-
बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की, त्यांनी आपल्या कुटुंबात मर्यादा पाळली पाहिजे. स्त्रियांनी पतीशी नेहमी मर्यादा बोलले पाहिजे. प्रत्येक मानवाने मर्यादाशील असणे आवश्यक आहे. लहानांनी मोठ्यांशी वागतांना किंवा मोठ्यांनी लहानांशी वागतांना एकमेकांविषयी मर्यादा ठेवली पाहिजे. सेवकांनी सेवकांशी वागताना मर्यादिने वागावे. इथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित, अशिक्षित किंवा गरीब-श्रीमंत ही मर्यादा नव्हे तो भेदभाव आहे. सर्व सेवक परमेश्वराला सारखे आहेत. बाबांनी सर्व पुजा बंद केल्या आहेत आणि एकाच परमेश्वराबद्दल सांगितले आहे. ही खरी मर्यादा आहे ती पाळली पाहिजे. मर्यादा पाळल्यामुळे घरात, आपआपसांत प्रेम निर्माण होते. त्यामुळे सर्वाना आयुष्यात सुख, समाधान मिळते. एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते. त्यामुळे सत्य व्यवहार होतात.
३. प्रेमाने वागणे:-
सेवकांनी आपल्या कुटुंबात सर्वांबरोबर प्रेमाने वागले पाहिजे. कोणावरही रागावू नये. कुणी चुकले तर त्याला समजावून सांगावे. लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते पण रागावले तर त्यांचे आत्मबल कमी होते. जेणेकरुन तो घाबरतो आणि त्यामुळे मर्यादाभंग होतो. प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे. प्रत्सेक मानवाच्या मनात प्रत्येकाविषयी प्रेम असावयास पाहिजे. म्हणून म्हटले आहे,"ढाई अक्षर प्रेम का पढ़े सो पंडित होय"।

Leave a Comment