सर्वेसर्वा परमेश्वर महानत्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वरी कृपा | PARMATMA EK
![]() |
| सर्वेसर्वा परमेश्वर महानत्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वरी कृपा | PARMATMA EK | |
महानत्यागी बाबा जुमदेवजींनी परमेश्वरी कृपेचा मानवाला परिचय करुन दिल्यामुळे या मार्गाचे अनेक उपासक झालेत. त्यामुळे बाबांच्या शिष्यमंडळींची संख्याही वाढू लागली. बाबा त्यांना नेहमी उपदेश करीत असत. भेटीला येणाऱ्या शिष्यांकडून कसल्याही प्रकारची फी किंवा गुरुपुजा ते स्वीकारीत नाहीत. बाबा निष्काम भावनेने जनसेवा करीत आहेत. त्यामुळे बाबांकडे येणाऱ्या शिष्यांची सारखी रीघ असते.
१९६४ सालची ही घटना आहे. बाबांना एकुलता एक मुलगा आहे. त्याचे नाव मनो उर्फ मनोही आहे. तो बी.ई.(मेटली) प्रथम वर्षाला शिकत असतानाची ही गोष्ट आहे. बाबांकडे मार्गदर्शनाकरिता शिष्यमंडळी रोज सकाळपासून सतत येत असत. तसे बादांचे घर लहानच होते. तेथे सर्व प्रकारची वेगवेगळी व्यवस्था करणे अशक्यच होते. त्यामुळे बाबा ज्या खोलीत सेवकांना मार्गदर्शन करीत असत त्याच खोलीत एका कोपऱ्यात मनोचे अभ्यासाकरिता टेवबल ठवेले होते. मनो रोज तेथेच अभ्यास करीत असे. बाबांचे सतत मार्गदर्शन, सेवकांची होणारी गर्दी यामुळे त्याचे लक्ष अभ्यायात लागत नव्हते. त्याच्या अभ्यासात दररोज काहीना काही अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे त्याची मनःस्थिती बिघडत होती आणि तो नाराज होत होता तो बाबांना सारखा म्हणायचा, "बाबा आपण मानवांना परमेश्वराबद्दल मार्गदर्शन करता पण भगवान कुठे आहे? कोण भगवान आहे? परमेश्वर कोणीही नाही. आपण मार्गदर्शन करता ते सत्र व्यर्थ आहे. मानव हाच खरा कर्मकर्ता आणि उपभोक्ता आहे. सर्व काही मानवच करतो व तोच घडवतो. त्यामुळे मानव हा सर्वेसर्वा आहे. आपण उगीच या गरीब, भोळ्या बाभळ्या लोकांना फसवत आहात." तेव्हा बाबा त्याला समजावत होते की, मानव फक्त कर्मकर्ता आहे आणि त्याचे फळ देणारा परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वर सर्वेसर्वा आहे. इतके समजावूनही तो समजत नव्हता आणि आपलेच तत्वज्ञान सांगत होता. बाबांनी खूप विचार केला, पण त्याला ते कधीही अपशब्दाने बोलले नाहीत. उलट नेहमी समजावत होते. तुझ्याकडून जेवढा अभ्यास होईल. तेवढाच कर, माझा भगवंत तुला काहीच कमी पडू देणार नाही. माझ्या मार्गदर्शनापासून तुला कोणताही त्रास होणार नाही, किंवा तु अभ्यासात मागे राहणार नाहीस. भगवंत तुला नेहमी साथ देईल, याखी मी तुला खात्री देतो, भगवंताविषयी घरात एवढ्या घडामोडी घडून देखील त्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही हे बघून बाबांना दुःख होत होते तरी ते समंजसपणा दाखवून शेवटी असा विचार करीत की, त्याचे विचार त्याच्याजवळ राहू द्यावे आणि आपण आपले कार्य सुरु ठेवावे. परंतु घरचे वातावरणए बिघडू नये याचीही दक्षता ते घेत असत. त्यामुळे दोघांत कधीही अबोला निर्माण झाला नाही.
भगवंताला काहीतरी घहवायचे होते. मनोच्या मनातील अहंकार नाहीस करावयाचा होता. म्हणून त्याने घडामोधी केल्या. त्याच्या मनात या मार्गावदल तिरस्क निर्माण केला व तो खूप वाढू दिला.
एके दिवशी तो सायमा पाहून आला. जेवण करून नेहमीप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करुन झोपला. त्याला झोपेत स्वप्न पहले स्वप्नात त्याला दिसले की, त्याचा विद्युल राऊत नावाचा मित्र भेटायला आला आहे त्यावेळी तो अभ्यास करीत होता. त्याचवेळेस एक भजन मंडळ घरच्या बाज गल्लीतनू आले आणि समोर असलेल्या हनुमानर्जीच्या देवळात गेले. त्याच सुमारास बाबांच्या परी मार्गदर्शनाकरिता दहा बारा लोक आले होते. दोन मित्रांची चर्चा झाल्यात त्याचा मित्र निपुन गेला, त्यानंतर ते लोक मात्र वसूनच होते. बाबा भजन मंडळीबरोबर देवळात निपुन गेले होते. तेव्हा स्वप्नातच तो आलेल्या त्या लोकांवर खूप रागावला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कशाला बसले आहात? तुमचे इथे काहीच काम नाही. तुम्ही जा आपल्या घरी. हे ऐकून त्याचे डोळे चढले होते. स्वप्नातच त्याला त्याची काक सौ सखूबाई (श्री. मारोतराव यांची पत्नी) घरुन येताना दिसली. ती त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाली, महादेव तुझे डोळे लाल का दिसतात? त्याच वेळी महादेवने तिला विचारले, काकू, माझे बाबा कुठे आहेत? तेव्हा ती उत्तरली, अजून तुझे वडील बाहेरून परी आलेले नाहीत. तेव्हा तो घरुन बाहेर आला आणि अंगणात खाटेवर बसून वडिलांची वाट बपू लागला. हे सर्व त्याला स्वप्नातच दिसले. तेवढ्यात त्याला जाग आली. त्याच्या अंगात १०४ डिग्री ताप होता. तो उतून पाणी प्याला आणि विचार करु लागला की, मी सिनेमा पाहून आलो तेव्हा चांगला ठणठणीत होतो आणि आता एकाएकी असे का पडले? असा विचार करीतच पाणी पिऊन परत झोपला. पुन्हा स्वप्नचक्र सुरु झाले.
कारण परमेश्वराला त्याला काहीतरी शिकवायचे होते. त्याला स्वप्नात असे दिसले की, तो खाटेवर बसला असून भजन मंडळ भजन आटोपुन समोरच्या देवळातून बाहेर पडून आपआपल्या घरी निघून गेली. परंतु बाबा घरी आले नाहीत. स्वप्नातच त्याला बरे वाटत नव्हते.तो हळूहळू देवळासमोर गेला. देवळात जातना रस्त्यातच त्याची प्रकृती खूपच खराब झाली त्यामुळे त्याला चालणे कठीण झाले, तरी मोठ्या हिंमतीने व कष्टाने तो कसातरी देवळात गेला. हनुमानजीच्या मुर्तीसमोर उभा राहून तो खूप रडू लागला. त्याचे रडणे थांबेना. रडतरडतच तो म्हणू लागला. बाबा हनुमानजी माझा त्रास दूर करा. तेवढ्यातच त्याचे बाबाही तेथे आले. आणि त्याच्या पाठीवर थोपटून म्हणाले, महादेव, तू घरी जा, तुला काहीच होत नाही. आणि तेवढ्यातच त्याचे स्वप्न भंग झाले. तेव्हा त्याच्या अंगात ताप नव्हता. त्याला बरेही वाटत होते. प्रकृती पूर्वीसारखीच वाटत होती. हा काय चमत्कार असावा? असा स्वतःशीच विचार करुन तो पुन्हा झोपला,तो नेहन उठला, त्यावेळेस त्याला थोडा ताप होताच.
प्रातविधी उरकून चहा घेताना त्याने बाबांना वरील स्वप्नाची पूर्ण हकीकत सांगितली. ताप आल्यासारखे वाटते असेही त्याने सांगितले. तेव्हा बाबांनी त्याला डॉ. झोडेकडे जाऊन औषध घ्यायला सांगितले. तो डॉक्टराकडे जाऊन आला. त्याने औषध घेतले आणि त्याने बाबांच्या सल्ल्यानुसार घरीच आराम केला. त्या दिवशी तो बाहेर गेला नाही. त्या दिवसापासून त्याच्या मनात परमेश्वराबद्दल भक्ती निर्माण झाली आणि परमेश्वर ही काहीतरी अलौकीक शक्ती असून मानव सर्वेस्वा नाही तर परमेश्वरच सर्वेसर्वा आहे हे तो मानू लागला.

Leave a Comment