परमत्मा एक मानव धर्म अनुभव PARMATMA EK
▶️आजचा अनुभव
👇🏿👇🏿👇🏿👇🏿
![]() |
परमत्मा एक मानवी अनुभव |
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
*!!भगवान बाबा हणुमानजी को प्रणाम!!*
*!!महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!*
*!!परमात्मा एक!!*
*"माझा सत्य अनुभव"*
माझे नाव- गुड्डु बंडुजी नेरकर असुन मी परिवारसह मु खमाटा येथे वास्तवत आहे आणि मी मानवधर्म एकता परिवार गृपवर अनुभव मालिकेत माझे सत्य अनुभव आपल्या समोर सादर करित आहे
🌹🙏🌹आपण जर मार्गात येतो तर सर्वप्रथम एखादा सेवकाकडे जातो. आणि तो सेवक नंतर परिसरातील मार्गदर्शका कडे/कार्यकर्त्याकडे नेतो. गेल्यावर सर्वप्रथम मार्गदर्शक मार्गात येण्याचे कारण काय हे सर्वप्रथम विचारतो. आणि दु:खाचे सर्व विचारपूस झाल्यावर आणि सर्व नियम सांगितल्यावर आपण हा परमात्मा एक मार्ग पकडतो. आणि कार्याची सुरुवात करतो.
🌻🙏🌻नंतर कार्याचे विधी पूर्ण झाल्यावर आपण हवन कार्य घडवितो. आणि नंतर चर्चा बैठकीला सुरुवात होतो, त्यावेळेस आपण आपले सर्व दुःखाचे निवरण सांगतो आणि अनुभव सांगतो
*🌹🌹माझे नाव गुड्डू नेरकर आहे आणि माझी पत्नी शितल तसेच मोठी मुलगी गार्गी आणि लहान मुलगा चिनु एवढ्या परीवाराचा एक छोटासा माझा परिवार आहे.🌹🌹*
मी अनेकामध्ये असतांना माझ्या मुलाची प्रकृती(तबीयत) चांगली नव्हती. असे त्यावेडेस एक दोन महीने असेच दु:खामध्ये गेले. मग माझ्या पत्नीने गावातील एका भगताकडे गेली. त्यावेडेस त्या भगतने सांगितले की, तुमच्या मुलाला ठोका लावलेला आहे. आणि हा ठोका साधासुधा नाही तर भयानक मोठा आहे . तर या ठोक्याला माझी शक्ति काम नाही करणार. कारण हा ठोका अधिक शक्तिशाली आहे . परंतु मी उपाय(विधी) सांगू शकतो तर ती विधी करुन पहा. झाले तर ठीक आहे.
त्या भगताने विधी सांगीतल्यावर मी ती विधी पूर्ण केलो. परंतु आराम काही झाला नाही. कारण माझ्या मुलाला झालेला ठोका अधिक शक्तिशाली होता.त्यामुडे मग मी कोणत्याही तांत्रिकाकडे, या मांत्रीकाकडे,आबा- बाबाकडे गेलोच नाही.
*मी आणि माझ्या पत्नीने विचार केला की, आपन परमात्मा एक मार्ग पकडावा. कारण याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. कारण आम्हाला माहीत आहे या मार्गात आल्यावर भुतबाधेचे नामोनिशान राहतच नाही. ईकडे तिकडे न भटकता आम्ही हा मार्ग घेण्याचा पूर्णपणे पक्का विचार केला.*
*मी आणि मिझी पत्नी माझ्या मोहल्यातील एका सेवकाकडे गेलो. मग त्यांनी गावातीलच एका मार्गदर्शकाकडे नेले. मार्गदर्शकांनी मार्गदर्शकांनी मला आणि माझ्या पत्नीला मार्गात येण्याचे कारण विचारले. आणि ते आम्ही पूर्ण पणे सांगितले. मग त्यांनी आम्हा सर्वांना या मार्गाचे नियम सांगितले. मग आम्ही सर्वांनी एक मत करून हा मार्ग पकडायचा असे सांगितले.*
*त्यांनी आम्हाला तीन दिवसाचे साधे कार्य दिले. पहील्या दिवशी सकाडीच उठून, आंघोड खरुन विंनती केली. आणि भगवंताला योग मागितला. ते कार्य करीत असतांना पहिल्या दिवशी माझा मुलगा विनंती आणि प्रार्थना करीत असतांना बसलाच नाही.आणि बसतच नव्हता. दुसऱ्या दिवशी विनंती आणि प्रार्थना केली. आणि भगवंताला योग मागितला. परंतु तिथेही माझा मुलगा विनंती आणि प्रार्थनेवर बसलाच नाही. आणि तिसऱ्या दिवशी माझा मुलगा काहीही त्रास न देता विनंती आणि प्रार्थना करीत असतांना आमच्यासोबत बसला.*
*🌻🌻त्या दिवसापासून माझ्या मुलाचे प्रकृती चांगली होत गेली. आणि पुढे काही त्रास देत नव्हता. आणि पुढे सर्व माझा मुलाचे दुःख नष्ट झाले.*
*धन्य ती कृपा महानत्यागी बाबा जुमदेवजीची की, एका भगवंताला प्रसन्न करून, मानव धर्माची स्थापना केली. आणि समाजातील दुःखी, कष्टी, गोर, गरीब लोकांसाठी हा मार्ग फुकट वाटून दिला.*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
माझ्या लिहिण्यात काही चूक झाली असेल मला क्षमा करावी.
सर्वांना माझा नमस्कार जी.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
*नाव:-गुड्डू बंडूजी नेरकर*
*मु:-खमाटा टाकळी पोस्ट. कोथुर्णा तहसिल+ जिल्हा भंडारा.*
*सेवक क्रमांक:- 53491*
*मार्गदर्शकाचे नाव :- देवरावजी भोपे मु.खमाटा टाकळी.*
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.
*•••••••••••••••••••••••••••••••••*
*--------------------------*
*--------------------------*
*[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]*
*भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...*
*गणेश दादा बिडकर :-9766573410*
*मोहन दादा आस्वले:-9764989883*
*रोशन दादा काटेकर :-8956656210*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment