 |
| परमेश्वर म्हणजे काय? प्रथम सेवक परमत्मा एक |
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केल्यावर निचा लाभ अनेक गोरगरीब आणि दुःखी कष्टी लोकांना मिळू लागला. बाबांनी भगवंताला शब्द दिल्याप्रमाणे ते निष्काम भावनेने इमाने इतबारे भगवंताप्रती मानवाला जागविण्याचे कार्य करू लागले, त्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या जीवनात जे काही शारिरीक, आर्थिक भानसिक दुःख असेल त्यातून त्यांना मुक्त करुन त्यांना सुखी व समाधानी केले.
से अनेक लोकांनी त्याचा फायदा घेतला, त्यांतील काही लोक या मार्गाचे कटी (सेवक) बनले. त्यापैकी यामागचि प्रथम सेवक बनण्याचे श्रेय श्री. गंगारामजी रंभाड यांनी घेतले.
श्री. गंगारामजी रंभाड हे टिमकी येथे बाबांच्या मोहल्ल्यात राहणारे. बाबांच्या शेजारी गडीकर यांचा क्लब होता. तेथे कॅरम वगैरे करमणुकीची साधने होती. त्या मोहल्ल्यातील लोक सायंकाळच्या सुमारास फावल्या वेळात तेथे करमणुक करण्याकरिता जमा होत असत. बाबा देखील फावल्या वेळी तेथे जाऊन बसत असत.
तेथे ते परमेश्वराप्रती मानवाला जागविण्यासाठी नेहमी चर्चा करीत असत. बाबांची ही चर्चा ऐकून तेथील लोक त्यावर विचार करीत असत. त्यातील काही जण याचा लाभही घेत असत. याच क्लबमध्ये गंगारामजी रंभाड हे सुध्दा नेहमी येत असत आणि बाबांच्या चर्चेत सहभागी होत असत.
गंगारामजी रंभाड हे हिंदु संस्कृतीत वाढलेले. त्यांचे घराणे गुरुमार्गी होते. त्यांचे गुरुजी सोनारबाबा नावांचे होते तरीसुध्दा ते भूतबाधेने पीडित होते. त्याच्या अंगात भूत पलित येत होते. त्यामुळे खुप त्रस्त झाले होते. गुरुमार्गी असूनही त्यांचे गुरु त्यांना या दुःखातुन मुक्त करु शकले नाहीत. तेव्हा त्यांचा देवावरचा विश्वास उडाला होता. त्यांना दाटत होते की जगात देव नाही. सर्व गुरु सारखेच आहेत. नुसते देवाच्या नावावर लोकांना लुबाडून आपले पोट भरतात. ते देवाचे उपासक आहेत असे दाखवितात. ते याताड आहे. जे लोकांचे दःख दर करु शकत नाहीत, ते गुरु कसले आणि त्यांनी ज्या परमेश्वराची प्राप्ती केली आहे. तो जर या गुरुना मदत करीत नसेल तर तो परमेश्वर केला? या अनेक विचारामुळे त्यांचा परमेश्वरावरील विश्वास उडाला होता. त्यांनी गुरुच्या प्रयत्नाव्यतिरिक्त आपले दुख दूर करण्याकरिता समाजात सुरु असलेल्या जुन्या रुढीप्रमाणे अंधश्रध्देचा उपचार केला. डॉक्टरांवे औषधोपचार केले. पण काहीही उपयोग प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यांचे मन उद्विग्न झाले होते.
एक दिवस महानत्यागी बाबा जुमदेवजी क्लबमध्ये परमेश्वराबद्दल चर्चा करीत असताना गंगारामजी रंभाड यांनी बाबांना प्रश्न केला की जगात परमेश्वर नाही काय?
तेव्हा बाबांनी उत्तर दिले, "परमेश्वर नक्की आहे." परमेश्वर ही वस्तू दिसत नाही आणि ती कोणी पाहू शकत नाही. ती आत्मज्योत आहे. ती चोवीस तास जागृत असून चैतन्य आहे. गंगारामजींनी पुन्हा प्रश्न केला की, मी गुरुमार्गी आहे. माझ्या अंगात सैतान, भूतपलित येतात. ते काही केल्या निघत नाहीत. गुरु हा परमेश्वराचा उपासक असतो. तो परमेश्वराच्या साहाय्याने लोकांची भूत पलिते नष्ट करुन दुःख नाहीसे करतो. असे असतांना माझे दुःख का नाहीसे होत नाही? इतके बोलुन बाबांसमोर प्रश्न ठेवला की, भगवान आहे असे तुम्ही म्हणता तर मला तो दाखवू शकता काय? बाबा लगेच उत्तरले ठीक आहे. घरी चला मी तुम्हाला परमेश्वर दाखवितो. त्यानंतर बाबा आणि गंगारामजी रंभाड हे दोघेही गंगारामजीच्या घरी गेले.
घरी गेल्यावर बाबांनी त्यांना कापूर आणि अगरबत्ती आणावयास सांगितली.
कापूर आणि अगरबत्ती आणल्यावर ते बाबांच्या समोर बसले. बाबांनी अगरबत्ती लावली. कापूर ज्योत लावली. कापूर विझल्यावर गंगारामजी दोन्ही डोळ्यांना अश्रृंची धार लागली. ते खूप रडू लागले ते काहीच बोलत नव्हते. काही वेळाने ते शांत झाले.
बाबांनी त्यांना समजावले. गंगारामजी, भगवंताची ज्योत लावली. त्यासमोर ती ज्योत कमी पडली. त्यामुळे तिची प्रखरता कमी झाली. भगवंताने तुमची आत्मज्योत चैतन्य केली. म्हणून तुम्ही खूप रडू लागले असे बाबांनी निरुपण केले. कारण माणूस जरी सर्व व्यवहार करतो तरी व्यवहार करतांना माणसाला वाटते की आपण जागृत आहो व जे करतो ते चांगले व सत्य करतो. परंतु काही वेळेस त्याचे मन काही व्यवहार करतांना ग्वाही देत नाही. आणि मनात सारखे काहीतरी विचार करीत असतो. तेव्हा तो खरे व्यवहार करीत नाही म्हणून त्याचे मन त्याला सारखे डिवचत असते. म्हणजेच त्याची आत्मज्योत जागृत होऊन त्याचा आत्मा त्याला शांत बसू देत नाही. आणि हीच त्याची खरी आत्मप्रचिती आहे आणि हाच आत्मा परमात्म्याचा एक भाग आहे. हाच परमात्मा खरा 'परमेश्वर' आहे तो चोवीसही तास मानवाजवळ जागृत असून चैतन्य आहे.
जेव्हा मानवाच्या आत्म्याला काही गोष्टी पटत नाहीत तेव्हा मानव भयभीत होतो आणि त्याचे आत्मबल कमी होते. त्यामुळे त्यावर भयभीत करणारी दुसरी कल्पनारुपी शक्ती स्वार होते. तिला तो भूत समजतो आणि म्हणून ही कल्पनारुपी शक्ती भयामुळे त्याचा मनातून केव्हाही निघत नाही.
भयभीत झालेले लोक जेव्हा बाबांकडे येतात तेव्हा बाबा त्यांना मार्गदर्शन करीत असतात की, अचेतन शक्ती आहे. मानवाला तेव्हाच सेवक मानले जाते जेव्हा त्याचा आत्मा चैतन्य बनतो आणि तो आत्मा त्याला जागृत करतो. जरी माणसाला असे वाटत असेल की, साक्षात्कार मिळाला म्हणजे आत्मा चैतन्य झाला पण यांस बाबा कधीही मान्य करीत नाहीत. कारण मानव स्वभाव असा आहे की, तो मोह, माया, अहंकार यामध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे त्यांच्यात या गोष्टी फार लवकर तयार होतात आणि तो अचेतन होऊ शकतो. कारण बाबा विदेहावस्थेत असतांना परमेश्वराने त्यांच्या सह संपूर्ण मानवाला बेईमान म्हटले आहे हे बाबांना त्याने शिकविले आहे. म्हणून बाबा नेहमी सांगतात की, जोपर्यंत मानव परमेश्वराबद्दल जागृत होत नाही. तोपर्यंत त्याचा आत्मा चैतन्य होऊ शकत नाही.
बाबांनी परमेश्वराचे जे संतुलन केले आहे. जी जागृती आत्म्यातुन मिळाली आहे ती खरी भगवंताची शक्ती आहे. ती निराकार आहे. बाबांनी तिला आकार करुन दाखविली आहे. ती अदृश्य आहे. तिला कोणीही पाहू शकत नाही. तिचे फक्त गुण दिसतात. परंतु बाबांनी त्या शक्तीला पाहीले आहे. बाबांनी विश्वाएवढा एकच डोळा पाहिला आहे. ती अफाट शक्ती आहे. तीच खरी आत्मज्योत आहे. ती प्रत्येक मानवात आहे आणि तोच परमेश्वर आहे. त्याचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे.
Leave a Comment