PARMATMA EK - परमात्मा एक मानव धर्माचा उगम
PARMATMA EK - परमात्मा एक मानव धर्माचा उगम
![]() |
PARMATMA EK - परमात्मा एक मानव धर्माचा उगम |
मध्यप्रदेशातील हुशंगाबाद जिल्ह्यात पचमढी तालुका आहे. हे गाव थंड हवेच्या ठिकाणाकरिता प्रसिध्द आहे. या तालुक्याचा संपूर्ण भाग सातपुडा पर्वताच्या टेकड्यांनी घेरलेला आहे. यापैकी एका टेकडीवर महादेवाचे पवित्र देवस्थान आहे. हिंदुधर्मातील काही लोकांचे ते दैवत म्हणून प्रसिध्द आहे. या टेकडीवर दरवर्षी दोनदा यात्रा भरते.
त्यापैकी महाशिवरात्रीची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात असते. येथे आलेल्या यात्रेकरुंच्या सर्व मनोकामना तेथे पूर्ण होतात असा समज आहे. या यात्रेला आलेल्यांपैकी काहीजण नवस करतात, काही नवस फेडतात, तर काहीजण कुलदैवत म्हणून प्रत्येक वर्षी भेट देऊन पूजा करतात. या यात्रेला जाणारे लोक शंकराचे भक्त असतात. यात्रेला जाताना ते नवीन वस्त्र परिधान करतात. पायात पादत्राण घालत नाहीत. दाढी, जटा वाढवतात.
काही लोक मोठमोठे त्रिशुल घेऊन जातात. एकंदरीत भक्तांचे वेष धारण करतात.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यावर १९४९ साली या यात्रेला जाण्याचे ठरविले. जाताना नवीन कपडे न घालता, साध्या मानसाप्रमाणे यात्रा करावी, जातांना कोणत्याही देवाला नमस्कार करु नये, फक्त एका परमेश्वराचीच पुजा करावी आणि त्या टेकड्यांवरचे फक्त नैसर्गिक दृश्य बघावे असे ठरवून बाबा, त्यांचे दोन बंधू श्री. नारायणराव आणि मारोतराव, त्यांचे पुतणे केशवराव आणि पहिला सेवक गंगारामजी रंभाड असे पाच जण यात्रेला जावयास निघाले. त्यांनी आपल्या बरोबर फराळाचे सामान घेतले होते. जाताना त्यांना पुढील चमत्कार अनुभवास आले.
यात्रेकरिता घरून निघाल्यावर महानत्यागी बाबा जुमदेवजी आणि गंगारामजी रंभाड यांच्या चैतन्य आत्म्यातून सारखा फूं फूं आवाज निघत होता. त्यांना रस्त्याने जात असताना पाहून वाटत होते की, मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांची जोडी चालली आहे.
ते गोळीबार चौक येथे आले असता बाबांच्यासमोर एक बाई कावराबावरा चेहरा करुन नाचत नाचत, आं आं करीत आली आणि तिने त्यांच्या रस्ता अडवला. तेव्हा बाबांनी गंगारामजींना आदेश दिला की, फंक मारो. त्याप्रमाणे त्यांनी एका भगवंताच्या नावाच्या मंत्राने (बाबा हनुमानजी) फूंक मारली. त्याबरोबर ती बाई खाली पडली आणि रस्ता मोकळा झाला. त्यानंतर बाबा इतवारी रेल्वे स्टेशनवर गेले आणि तेथून ते आगाडीने जुन्नारदेवला जाण्यासाठी निघाले.
गाडीत यात्रेला जाणाऱ्या लोकांची खूप गर्दी होती. त्यांत बाया, माणसे आणि लहान मुलेही होती. बाबांचे बंधु गाडीमध्ये या डब्यातुन त्या डब्यात सारखे फिरत होते. तेव्हा त्यांना काही डब्यांत काही यात्रेकरु तापाने फणफणत असल्याचे दिसले. ते त्यांना हात लावून त्यांचा ताप पाहत होते आणि बाबांजवळ येऊन त्यांना त्या लोकांच्या करुण अवस्थेबद्दल सांगत होते. त्याप्रमाणे बाबा गंगारामजींना आदेश होते की, जे तापाने फणफणत आहेत त्यांना थापड मारा. गंगारामजी बाबांच्या आदेशाचे पालन करीत होते.ताप असलेल्या लोकांना थापड मारताच त्यांचा ताप नाहीसा होत होता आणि आश्चर्य असे की संपूर्ण प्रवासात त्यांना पुन्हा ताप चढला नाही. त्या सर्वांचा प्रवास सुखाचा झाला. जुन्नारदेवला पोहचल्यावर बाबांसह सर्वांनी त्या दिवशी आराम केला.
दुसऱ्या दिवशी सर्वजण गडावर जाण्यास निघाले. सामानाकरिता एक हमाल केला होता. त्या पाच जणांचे सामानाचे ओझे खुप जड होते. त्यामुळे तो एकटा ते डोक्यावर वाहून नेऊ शकता नव्हता, तेव्हा बाबांनी गंगारामजींना आदेश दिला की,"सामानपर फूक मारो" तेव्हा बाबांच्या आदेशाप्रमाणे गंगारामजींनी फूक मारताच त्याच्या डोक्यावरचा भार एकदम हलका झाला. त्या हमालाने बाबांना सामानाचे ओझे हलके झाल्याचे सांगितले. तो धावत धावत गडावरच्या पायऱ्या चढू लागला आणि त्याने गडावर सामान पोहचवून दिले.
वाटेत एक बाई आपल्या चार चिमुकल्या मुलांना घेऊन रस्त्याच्या कडेला बसली होती. ती खूप रडत होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ती मदतीकरिता आवाज देत होती. ती रडून रडून खूप कासावीस झाली होती. परंतु गडावर येणारे जाणारे लोक तिच्याकडे लक्ष न देता आपल्या धुंदीतच जात ते तिच्याकडे लक्ष देत नव्हते. हे दृश्य बाबांना रात्री बाराच्या सुमारास गड चढताना दिसले. बाबा तेथेच थांगले आणि त्यांनी गंगाराम ना आदेश दिला की, ती बाई का रडते ते विचारा. बाबांच्या आदेशाचे पालन करुन ते त्या बाईजवळ गेले आणि त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले असता ती दाई त्यांना म्हणाली, मी खूप वेळेपासून सर्वाना आवाज देते, पण मला कोणीच मदत करीत नाही. माझी चारही मुले तापाने फणफणत आहेत. माझी परिस्थिती खूप खराद आहे. तेव्हा आपण मदत करा अशी तिने त्यांना विनवणी केली. गंगारामजींनी परत येऊन त्या बाईच्या रडण्याचे कारण बाबांना सांगितले तेव्हा त्यांना बाबांनी सांगितले की, त्या सर्व मुलांच्या गालादर थापड मारा. त्याप्रमाणे त्यांनी त्या सर्वांना थापड मारताच ते सर्द उठून उभे झालेत. त्या सर्वांचा ताप नाहीसा झाला. वरील सर्व कार्य दादांनी गंगारामर्जीना एका भगवंताच्या नावाने म्हणजे बाबा हनुमानजींच्या नावाने करण्यास सांगितले परंतु शंकरजीच्या (महादेवाच्या) नावाने कोणतेही कार्य करु नये असे स्पष्ट दादाला, त्यानंतर बाबा गडावर पोहचले. तेथे त्यांनी देवळात न जाता बाजूलाच एका परमेश्वराची ज्योत लावली. अशाप्रकारे बाबांना एका भगवंताची प्रचिती आली. त्यांनी परमेश्वर पाहिला नाही. परंतु त्यांच्या चैतन्य आत्म्यातून जे शब्द निघाले ते त्यांनी अनुभवले आणि गडावर फिरुन नैसर्गिक दृश्य पाहिले.
बाबा गडावरुन खाली यायला निघाले तेव्हा त्यांना रस्त्यावर देवाज्ञा झालेल्या लोकांचे ढेर दिसत होते. ते पुढे न जाता त्या ढेरांसमोर उभे राहन त्यांच्या पार्थिव देहावर बाबा हुनुमानजींच्या नावाने फूक मारीत आणि त्यांना मुक्त करीत होते. ते पार्थिव देह फुक मारताच आकाशात विजेप्रमाणे लखलखत उडत जात असतानाचे दृश्य सर्वजण पाहत होते. अशाप्रकारे बाबांनी सर्वांना मुक्त केले. ही खरी भगवंताची लीला होती. पण बाबा मात्र निमित्य होते आणि हाच खरा या देशात परमेश्वराने बाबांच्या (मानवाच्या) डातून घडवलेला मानवधर्म आहे आणि तोच या मार्गाचा उगम आहे.
गडावरून खाली उतरताना बाबा एका भगवंताचे गाणे गात होते. तेव्हा इतर लोकांनी त्यांना गाणे का गात आहात? असे विचारले असता ते त्यांना उत्तर देत होते की. परत जाताना आम्ही आल्याबरोबर भगवंत घेऊन जात आहोत. तुम्ही भगवंताला गडावरच ठेवले आणि रिकाम्या हाताने जात आहात. म्हणून तुम्ही गाणे गात नाही,यात्रेला जाणारे लोक नपीन कपडे घालणे, कपडे न धुणे, दाढी जटा वाढविणे अशा अनेक भावना बाळगत होते. परंतु बाबांनी वरील प्रकाराच्या कोणत्याही भावना बाळगत होते.
परंतु बाबांनी वरील प्रकाराच्या कोणत्याही भावना बाळगल्या नाहीत आणि त्यांनी त्या सर्व गोष्टी पाळल्या नाहीत. तेव्हा इतर लोक त्यांना सांगत होते की, यात्रेकरुंना हे सर्व वज्ज्य आहे. तुम्ही या गोष्टींचा स्वीकार कसा केला! तेव्हा बाबा त्यांना मार्गदर्शन करीत होते की, आमचे मन शुध्द आहे. भगवंत आमच्याजवळ आहे. शुध्द मन, स्वच्छ शरीर, शुध्द वागणूक आणि स्वच्छ कपडे हे भगवंताला प्रिय आहेत. भगवंत आमच्याजवळ असल्यामुळे ते आम्ही करीत आहोत. तुमच्याजवळ भगवंत आहे काय? ते पाहा.
तुमच्याजवळ वरील गोष्टीचा अभाव आहे. म्हणून भगवंत जवळ ठेवण्याकरिता त्या गोष्टींचा स्वीकार करा आणि त्या वर्ज्य समजू नका. त्यानंतर बाबा गडावरुन खाली उतरले आणि सरळ नागपूरला आले.
मानव धर्माचा उगम या सातपुडा पर्वतावर महाशिवरात्रीच्या पर्वावर झाला आणि बाबा नागपुरला आल्यावर त्यांनी रीतसरपणे या मानव धर्माची स्थापना केली. अशाप्रकारे महानत्यागी बाबा जुमदेवजी हे या देशातील 'मानवधर्माचे' संस्थापक आहेत.

Leave a Comment