परमात्मा एक मानव धर्मातील आईची ममता PARMATMA EK
मानव धर्मातील आईची ममता
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि तेव्हापासून ते भगवंताच्या प्रती लोकांना जागृत करण्याचे कार्य निष्काम भावनेने करीत आहेत. या कृपेचा लाभ अनेकांना मिळत असल्यामुळे या मार्गात अनेक सेवक येत आहेत. त्या सर्वांना अनेक प्रकारचे फायदे उदाहरणार्थ, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक तसेच पुत्रप्राप्ती, इत्यादी गोष्टींचा लाभही त्यांना मिळत आहे. त्याचबरोबर त्यांना अनेक चमत्कारीक अनुभव येत आहेत, बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केल्यावरही भगवंत त्यांची कधीकधी परिक्षा घेतात. त्यातील हा एक प्रसंग आहे.
सन १९५१ च्या एप्रिल महिन्याची ही घटना आहे. बाबांच्या जेष्ठ वहिनी श्री.बाळकृष्णरावांची पत्नी श्रीमती सीताबाई यांना स्वप्नात बाबा हनुमानजी यांनी आकाशात उडत असतानाच्या स्थितीमध्ये दर्शन दिले आणि आकाशवाणी केली की, सेवकाच्या (बाबाच्या) पाच भावांच्या कुटुंबात जी बाई गरोदर आहे त्या बाईला मुलगाच होणार आहे आणि त्याचे आयुष्य फक्त तीन महिन्यांचे राहणार आहे. त्यानंतर तो इहलोक सोडून जाईल.
या वेळेस श्री. नारायणराव यांच्या पत्नी सात महिन्यांच्या गरोदर होत्या. ती दाई नऊ महिने पूर्ण झाल्यावर १ जुलै १९५१ रोजी प्रसुत झाली आणि त्यांनी एका गोंडस पुत्ररत्नाला जन्म दिला. भविष्यवाणी खरी ठरली. श्री. नारायणरावांकडे येणारे पहिलेच अपत्य आणि तेही पुत्र असल्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद झाला. बाळाला पाळण्यास घालण्यात आले. गरीब परिस्थिती असूनही मुलांचे बारसे थाटात पार पडले. मुलगा दिवसेंदिवस वाढत होता. छान खेळत होता. त्याला कधी ताप आला नाही. सर्दी झाली नाही. दुध पीत नाही किंवा सारखा रडतो अशी कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे तो सर्वांचा आवडता होता. त्याचे कौतुकही तितकेच होत होते. तो तीन महिन्याचा होईपर्यंत त्याला काहीही त्रास झाला नाही.
'भगवंताची लीला न्यारीच' या म्हणीप्रमाणे झालेल्या भविष्यवाणीप्रमाणे तीन महिने पूर्ण झाले आणि दुसऱ्याच दिवशी तो एकाएकी आजारी पडला. त्याचे शरीर एकदम थंड पडले. शरीराची हालचाल बंद झाली. डॉक्टरांच्या उपायाला यश येत नव्हते.
सकाळची वेळ होती. त्या मुलाचे वडील नाराणराव त्याला घेऊन महानत्यागी बाबा जुमदेवर्जीकडे आले. वडील खूप रागात होते. ते मुलाच्या मोहमायेत गुंतले होते.
त्यांच्याबरोबर कुटुंबातील इतर मंडळी पण गोळा झाली. त्यांनी या मुलाला बाबांच्यासमोर खाली झोपवले. ते रागारागाने म्हणाले, आपल्या घरात बाबा (भगवंत) आहेत तर हा मुलगा जगायाला पाहिजे तरच खरा परमेश्वर आहे. अन्यथा परमेश्वरप्राप्ती खोटी आहे.बादांना परमेश्वराबद्दल असे उद्गार ऐकून खूप वाईट वाटले. त्यांच्यासमोर फार मोठा प्रश्न उपस्थित झाला. कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीचे असे विचार योग्य नाहीत असे त्यांना वाटले.
ते निराकार अवस्थेत आले आणि कुटुंबातील लोकांना उद्देशुन म्हणाले,"बाबा हनुमानजीने उस बाई को बताया की बच्चा तीन महिनेका आयुष्य लेकर आनेवाला है। अद उसका तीन महिने आयुष्य पुरा हुआ है। इसे जाना है। अब इसे किसका आयुष्य दे।"आणि आदेश दिला की, "परिवारके लोग एक कतार में खडे हो जाओ। और जिसकी इच्छा हो वह कहे की मेरा आयुष्य इसे दे दो।" त्याप्रमाणे सर्व जण पुरुषमंडळी आणि स्त्रिया हे एका ओळीत वेगवेगळे उभे राहिले. सगळीकडे स्तब्धता होती. सर्व विचारमग्न झाले.कोणाच्याही तोंडातून शब्द निघाला नाही की,माझे आयुष्य या मुलाला द्या. कारण सर्वाना आपआपले प्राण प्रिय होते. प्रत्येकाला वाटत होते की, आपण चूप जगावे आणि हे स्वाभाविकही आहे. काही वेळाने त्या मुलाच्या आईने बाबांना विनंती केली की, बाबा मला विचार करायला दोन तासांची मुदत द्या. बाबांनी तिला दोन तासांची मुदत दिली. निराकार दैठक संपलर. मुलगा तेथेच पडून राहिला.
दोन तासांनी पुन्हा त्याच ठिकाणी निराकार बैठक झाली. मुलगा तसाच अचेतन स्थितीत पडला होता. सर्वजण जमले होते. बाबा निराकारमध्ये आले आणि कुटुंबातील लोकांना म्हणाले, " परिवार के लोग सुनो, बच्चे को आयुष्य मिल गया.
त्यानंतर पुढील काहीच सांगितले नाही. बाबांचे शब्द त्यांच्या मुखकमलाव्दारे बाहेर पडताच त्या अचेतन मुलाने एकदम जोरात रडायला सुरुवात केली. तेव्हा सर्वजण थक्क झाले. त्या मुलाला कोठून आयुष्य मिळाले याबाबतीत बाबांनी कोणत्याही प्रकारचा उल्लेख केला नाही. अशाप्रकारे 'भगवंताची लीला न्यारीच" ही म्हण बाबांनी सिध्द करुन दाखवली आणि 'परमेश्वर खरा आहे हे पण दाखवून दिले.
पंधरा दिवसानंतर त्या मुलाची आई अचानक आजारी पडली. खूप औषधोपचार केले. घरच्या मंडळींनी भगवंताला विनंती केली. पण तिचा काहीही उपयोग झाला नाही. त्या बाईने जी दोन तासांची मुदत मागितली होती, त्यामागील कारण, तिची इच्छा काय होती हे तिने कोणालाही सांगितले नव्हते. शेवटी काही दिवसांनी ती परमेश्वराला प्रिय झाली. ती हे जग सोडून गेली. मुलगा अजूनही कायम आहे.
तेव्हा बाबांनी सांगितले कीया बाईने आपले आयुष्य तिच्या मुलाला दिले. तिने प्रत्यक्षात सर्वांसमक्ष जरी सांगितले नव्हते तरी तिने भगवंताला तशी विनंती केली होती.
यावरुन 'आईची ममता' किती महान (थोर) आहे, तसेच एकाचे आयुष्य संपवून ते दुसऱ्यास देता येते हे या उदाहरणावरुन या मार्गाने सिध्द केले आहे. खरोखरच हा मार्ग (मानवधर्म) इतरांच्या तुलनेने 'जगावेगळा मार्ग' आहे.
कायम असलेल्या मुलाचे नाव अशोक असून आज तो चाळीस वर्षाचा आहे. तो सुखी आणि समाधानी असून सर्वगुणसंपन्न आहे.

Leave a Comment