परमात्मा एक अनुभव मालिका सादर करीत आहे. PARMATMA EK

 ▶️आजचा अनुभव▶️


Parmatma ek image,


⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕


    !! भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम !!

  !! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!

             !! परमात्मा एक !!


        " माझा सत्य अनुभव "


माझे नाव राजेंद्र महादेव ठाकरे असून मी गुलशन नगर नागपुर ला परिवारसह वास्तवत आणि मी मानवधर्म एकता परिवार गृपवर अनुभव मालिकेत माझा सत्य अनुभव आपल्या समोर सादर करत आहे,

 या मार्गात सर्वच लोक दुःखी येत असतात, दुःख आल्याशिवाय आणि तो ही आखरी स्टेज वर जेव्हा मानव येत असतो तेव्हा या मार्गाची आठवण इतर लोकांना येत असते त्यात आमचा कुटुंब ही आहे.


                  माझ्या कुटुंबात वादाची वाईट वेसण नव्हते, आणि आमचा परिवार हा सुखी आणि समाधानी होता, पण 2015 पासून आमच्या कुटुंबावर संकट यायला सुरुवात झाली, त्या आधी पासून वडिलांना छातीत भरल्या सारखे होत होते, त्यांची छाती भरल्या वाणी त्यांना वाटत होती, पण त्यांनी त्याकडे पाहिजे तेवढा लक्ष दिले नाही, 2015 च्या सप्टेंबर महिन्यात वडिलांना डोळ्याचा त्रास सुरू झाला, त्यांच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते, त्यावर औषध सुरू करून मेडिकल मध्ये डोळ्यावर ऑपरेशन करण्यात आले, आणि लगेच काही दिवसांनी त्यांच्या पायाला गँगरेल(म्हणजे त्यांच्या पायाला सळची बिमारी एक पाय निळे व्हायला सुरुवात झाली आणि दुसऱ्या पायाच्या काही बोटांना सुद्धा सळ लागली होती,असे अनेक दुःख मागोमाग यायला सुरुवात झाली, त्यावरही मेडिकल मध्ये उपचार सुरू झाला आणि त्यांचा तळपाय कापण्यात आला आणि दुसऱ्या पायाची एक बोट कापण्यात आले, आणि त्यांनंतर त्यांना भूतबाधा झाली. माझे वडील मागील 30 ते 40 वर्षांपासून पंडागिरी करीत असत, म्हणजे वैद्याच्या मागे राहत असत, आमच्या घरी ताजुद्दीन आणि बाबा फरीद, आणि नागदेवता आणि वाघोबा इतर देवांची नेहमीच पूजापाठ होत होती, मोहरमच्या दरम्यान तर दहा दिवस घरी सतत पूजापाठ होत होती, इतक्या देवांच्या सानिध्यात राहून सुध्दा माझ्या वडिलांना भूत बाधा झाली आणि हे सगळे देवता त्यांची प्रकृती आणि त्यांची भूतबाधा दूर करू शकले नाही हे सुद्धा मोठे कारण आहे परमात्मा एक मार्गात यायला.


वडिलांना आता भूतबाधेचा खूपच त्रास वाढला, त्यांना रात्री एक पांढऱ्या रंगाचे कपडे घालून एक बाई येऊन त्यांच्या छातीवर बसत होती आणि जोरजोराने त्यांच्या छातीवर मारत आहे असा त्यांना भास होत होता, जेव्हा त्यांना स्वप्नात ती बाई मारत होती तेव्हा त्यांच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नव्हता त्यांची खूपच दैनवाणी अवस्था होत होती तेव्हा, जेव्हा स्वप्नातून त्यांना जाग यायची तेव्हा ते खूपच घाबरून जायचे आणि बेशुद्ध होत होते, त्या बाईच्या भीतीने त्यांना रात्रभर झोप येत नव्हती आणि झोप आली तर ती बाई स्वप्नात येत होती, म्हणून वडील खूप वेळ्यासारखे करीत भूत स्वप्नात यायला नको म्हणून ते आपल्या डोक्यामागे मीठ आणि कोळसा ठेवत होते, आणि त्यानंतर त्यांनी आपली पेशाब डब्यात जमा करायचे आणि रात्रीला आपल्या पलंगाच्या चारही बाजूला ते टाकत होते तरीही काही फायदा झाली आणि काही दिवसांनी त्यांनी ती पेशाब समोरच्या दरवाज्यावर टाकायला सुरवात केली त्याना असे वाटायचे की दरवाज्यात पेसाब घातली तर भूत आपल्या जवळ येणार नाही,पण ही त्यांची भावना होती, हे सर्व प्रकार करूनही काही फायदा झाला आणि तो भूतबाधेचा प्रकार दररोज प्रमाणे सुरूच होता, त्यांची भूतबाधा आणि त्यांचे कृत्य यापासून आम्हाला फार त्रास व्हायचा घरात नेहमीच पेशाबची वास राहत होती, त्यामुळे आमचे नातेवाहिक सुद्धा यायचे पण जास्त वेळ बसत नव्हते.


म्ही त्यांना प्रथम त्यांच्याच वैद्यकडे घेउन जाण्याचा प्रयत्न केला पण माझ्या वडिलांचा त्यांच्या सोबत काही कारणा वरून वाद झाले होते, तरी आम्ही त्यांना फोन केले पण ते आले नाही, मग आम्ही नागपूरच्या वैद्यकडे जात होतो पण काहीच फायदा झाला नाही, बरेच वैद्य केले पण फायदा काहीच झाला नाही, मग आम्हाला माहीत झाले की मध्यप्रदेश मध्ये बोनकट्टा या गावी नावाजलेला एक वैद्य आहे, माझ्या आतोबहिणीसोबत वडिलांना बोनकट्टा या गावी घेउन गेलो त्याने त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांना पाच वेळा यायला सांगितलेले तीन वेळा जाऊन सुध्दा काहीच आराम झाला नाही वेळ आणि पैसा फुकट जात होता, पण फायदा काहीच झाला नाही. मग काही दिवसांनी त्याच वैद्यांचा फोन आला की 15 हजार रुपये आणि एक कोंबडा द्यावे लागणार आम्ही तुमचा घर बांधून देऊन मग मी त्यांना सरळ प्रश्न केला की आम्ही हे सर्व द्यायला तयार आहोत पण मग वडिलांना पूर्ण आराम लागणार का तर त्यांनी या माझ्या प्रश्नावर सकारात्मक उत्तर दिले नाही म्हणजे त्यांनी नकार दिला मग त्यांचा नादच सोडला.


हे वडिलांचे प्रकार सुरू असतांनी दुसरे आणि तिसरे संकट आमची वाट पाहत होते, दुसरे संकट असे की माझ्या मुलगा विहान हा तेव्हा  तीन महिन्यांच्या होता, थंडीचे दिवस असल्यामुळे त्याला सर्दी आणि खासी झाली दवाखान्यात त्याला घेउन गेलो पण आराम होत नव्हता, तो रविवार दिवस होता आणि सर्व दवाखाने सुद्धा बंद होते कारण माझ्या मुलाला निमोनिया सारखे लक्षण दिसत होते त्याची छाती दाटली होती आणि त्याला स्वास घायला त्रास होत होता, एक दवाखाना सुरू दिसला त्या डॉक्टर ला आम्ही विहान ला दाखविले पण त्याने औषध द्यायला मनाई केली आणि तुरंत याला भरती करायला सांगितले त्याचा जन्म डागा हॉस्पिटल मध्ये झाला होता म्हणून डॉक्टरांनी त्याला डागा मध्ये भरती करा असे सांगितले भरतीचा नाव घेताच मी फार घाबरलो आणि माझ्या पत्नीने तर रडायलाच सुरवात केली, मी भगवंताचा जाप करायला सुरुवात केली आणि जो पर्यंत विहान भरती झाला नाही तो भगवंतालाच पाचारण करीत होतो, कारण घरच्या पूर्वीच्या वातावरण पाहून मी आधीच घाबरलो होतो आणि आता हे नवीन संकट त्यामुळे मी पूर्णपणे तुटून गेलो होतो, डॉक्टर यांनी त्याला तपासून औषध दिले आणि संध्याकाळ पर्यंत त्याला थोडे बरे वाटायला सुरवात झाली तेव्हा कुठे जीवात जीव आला, मुलाला सहा दिवस हॉस्पिटलमध्ये भरती ठेवावे लागले, यानंतर माझी आई कामावरून घरी येत असतांनी तिला कुत्र्याने चावले असे एकामागोमाग संकट यायला सुरुवात झाली, या सर्व प्रकारामुळे मी आणि माझा कुटुंब सर्वच तुटून गेले होते. 


हे सर्व प्रकार बाबा हनुमानजी आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना पाहावले गेले नाही आणि त्यांनी आपली एक सेविका आमच्या घरी पाठविले, माझी आतोबहीन ही मार्गात होती याची कल्पना मला होती, आणि या मार्गात तिच्या मुलाची फिट ची बिमारी ही दुरुस्त झाली होती हे ही सुद्धा माहीत होते पण या सर्व प्रकारा मुळे माझे लक्षच परमात्मा एक मार्गाकडे गेले नाही नाहीतर आमचे दुःख पाच महिन्या आधीच दूर झाले असते. माझी आतो बहीण जेव्हा आमच्या घरी माझ्या वडिलांना पाहायला आली तेव्हा तिने सर्व प्रकार पाहिल्यावर आणि आमच्या कुटुंबातील दुःख तिला माहीत झाल्यावर सर्व प्रथम तुम्ही परमात्मा एक मार्गात यायला पाहिजे असे तिने सांगितले, आणि या मार्गात आल्यावर तुमचे सर्व दुःख दूर होतील हे सांगितले. आम्ही सर्व कुटुंबीयांनी विचार केला आणि सर्वांनी परमात्मा एक मार्गात आपण जाऊन असा निर्धार केला माझ्या आतो बहीण सोबत आम्ही दिघोरी परिसरातील जेष्ठ मार्गदर्शक माननीय रमेशजी मने काकाजी यांच्याकडे गेलो, काकाजी जवळ आपल्या कुटुंबातील सर्व दुःखाची उजळणी केली, आमचे सर्व दुःखाचे वर्णन काकाजी यांनी एकूण मानव धर्माचे नियम तत्व शब्द आणि नियम, सर्व छान प्रकारे समजावून सांगितले, आणि घरातील सर्व देवीदेवतांची फोटो, पुराणे धागेदोरे, आणि सर्व घराची छान प्रकारे सफाई करून आणि अजून पूर्ण विचार करून दुसऱ्या दिवशी यायला सांगितले, मग आम्ही घरची सर्व साफसफाई घरून आणि पुराण्या देवीदेवतांची फोटो कन्हान नदीत विसर्जन केले आणि दुसऱ्या दिवशी काकाजी कडे गेलो दुसऱ्या दिवशी काकाजी यांनी छान मार्गदर्शन करून आम्हाला तीन दिवसाचे साधे कार्य दिले, घरी आल्यावर आम्ही सकाळी पाच वाजता सर्व जण आंघोळ करून आणि घरचा झुडुपोचा करून पाच वाजता जेव्हा परमात्मा एक मार्गाची आणि बाबा हनुमानजी, बाबा जुमदेवजी यांच्या नावाची ज्योत जेव्हा आमच्या घरी लागली तेव्हाच आमच्या घरचे सर्व दुःख दूर झाले, दुसऱ्या दिवशी वडिलांची भूतबाधा पूर्ण पणे दूर झाली त्यांना ती बाई स्वप्नात येणे बंद झाले आणि आमच्या घरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

               खरच खूपच महान मार्ग आहे आपला परमात्मा एक मार्ग आमचे सहा महिन्याचे दुःख एका दिवसात दूर झाले, बाबा हनुमान जी आणि बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने आता आम्ही सुखी आणि समाधानी आहोत, महान त्यागी बाबा जुमदेवजी हे खूपच महान व्यक्ती आहेत त्यांनी खूप कष्ट घेउन ही दैवी शक्ती प्राप्त केली आणि आमच्या सारख्या गरीब आणि दुःखी लोकांना सुखी केले.


बाबा जुमदेवजी अमर रहे, अमर रहे.



 सेवक :-राजेंद्र महादेव ठाकरे 

 पत्ता :- गुलशन नगर नागपूर

 सेवक नं.:-साधे कार्य

 मार्गदर्शक :-  रमेशजी मने दिघोरी नागपूर

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.


••••••••••••••••••••••••••••••••

-------------------------

--------------------------

[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]


भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...


 गणेश दादा बिडकर :-9766573410

 मोहन दादा आस्वले:-9764989883

 रोशन दादा काटेकर :-8956656210

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


सौजन्य :-

"अॅडमिन,सेवक,सेविका",

मानवधर्म एकता परिवार,

[Watts app group & Facebook page , sharechat group}

युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.

©®


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.