पाच नियम परमात्मा एक | PARMATMA EK |
पाच नियम परमात्मा एक
![]() |
पाच नियम परमात्मा एक |
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्म या मार्गातील सेवकांना भगवत्प्राप्तीकरिता तसेच निष्काम कर्मयोग साधण्याकरिता चार तत्व, तीन शब्द आचरणात आणण्याकरिता सांगितले आहे. सेवकांनी ते आचरणात आणल्यावर, सुरुवातीला त्यांना या भगवतकृपेचा पूर्ण लाभ मिळाला. परंतु कालांतराने काही सेवकांच्या कुटुंबात पुन्हा दुःख निर्माण होऊ लागले. त्यांच्या संपुर्ण भावना नाहीशा झाल्या नव्हत्या. त्यामुळे ते भावनेच्या आहारी जात होते. त्यांच्या मनात शंकाकुशंका येत होत्या. या मार्गात येणाऱ्या सेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. नवीन धर्म असल्यामुळे त्यांची एकता व संघटना असणे आवश्यक होते. बाबांच्या निवासस्थानी शनिवारी होणाऱ्या निराकार बैठकीत बाबा विदेह अवस्थेत असताना त्यांच्या मुखकमलातुन असे उद्गार निघाले की, या मार्गात येणारे
सेवक बुध्दिहीन आणि श्रमिक आहेत.त्यांना त्यांच्या जीवनात परिश्रमाचा लाभ मिळत नाही. म्हणून बाबांनी त्यांना जीवनात चालण्याकरिता, त्यांची गृहस्थी उंच आणण्याकरिता, मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता, बाबांनी विदेहावस्थेत असताना बंधनाच्या रुपात त्यांना आचरणात आणण्याकरिता खालील पाच नियम दिलेत.
१) ध्येयाने एक परमेश्वर मानणे.
२) सत्य, मर्यादा, प्रेम सेवकांत तसेच कुटुंबात कायम करणे.
३) अनेक वाईट व्यसने बंद करणे.
(दारु, टॉनिक, सट्टा, जुआ, लॉटरी, पटाची होड, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे, स्त्रीयांनी मुलांना व पतीदेवांना वाईट शब्दांत दोलू नये. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करणे.)
४) कुटुंबात व सेवकांत एकता कायम करणे.
५) मानव मंदिर सजवण्याकरिता (दान देणे) आपले कुटुंब मर्यादित ठेवणे याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करणे.
वरील नियमांचे मानवाने पालन केल्यास त्याला जीवनात सुख, शांती व समाधान मिळते आणि त्याचे लक्ष फक्त एका भगवंताकडे असते. त्यांच्या मनात इतर भावना निर्माण होत नाहीत. वाईट भावनेचा नाश होतो. अंधश्रध्दा नाहीशी होते. शंकाकुशंका नष्ट होतात. अनेक वाईट मार्गांनी जाणारा पैसा वाचतो आणि त्याच्या आयुष्याची प्रगती दिवसेंदिवस होत जाते. त्याचे मनोधैर्य वाढते. वाईट व्यसन बंद झाल्यामुळे शारीरिक सुख मिळते. कुटुंबात सत्य मर्यादा आणि प्रेम निर्माण होते. जीवनात अनेक पुजा बंद केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि हाच परमेश्वरी प्रवाह मानवामध्ये निर्माण होऊन तो आत्मप्रचीती देतो. आत्मानुभव येतो. त्यामुळे आत्मबल वाढते आणि भगवंत जवळ राहतो, दुःख निर्माण होत नाही. त्यामुळे मानवाला आपले भविष्य उज्ज्वल बनविता येते,

Leave a Comment