परमात्मा एक मार्गामध्ये अंतरीचे बोल | PARMATMA EK


✍️परमात्मा एक मार्गामध्ये अंतरीचे बोल✍️


Parmatma ek image

परमात्मा एक मार्गामध्ये अंतरीचे बोल



                 महादेव कॉलेजमध्ये का आला नाही हे पाहण्यासाठी महादेवचा मित्र विठ्ठल राऊत रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरी आला होता. कारण तो त्या दिवशी आजारी असल्यामुळे बाबांच्या सल्ल्यानुसार कॉलेजला गेला नव्हता. त्याचा मित्र त्याला भेटायला आला तेव्हा तो अभ्यास करुन नुकताच झोपला होता. मित्र आल्याचे कळताच तो झोपेतुन उठला आणि मित्राशी गप्पागोष्टी करु लागला. बोलता बोलता तो त्याला म्हणाला, विठ्ठल, आपल्याला डॉक्टरांचे सर्टीफिकेट खोटे ठरवावयाचे आहे. यावेळेस महानत्यागी बाबा जुमदेवजी जेवण करीत होते. ते शब्द त्यांनी ऐकले. त्यांना खूप वाईट वाटले. ते विचार करु लागले, तेव्हा त्यांना वाटले हे शब्द त्याचे स्वतःचे नाहीत, तर बोलविता धनी वेगळाची' या म्हणीप्रमाणे हे शब्द त्याच्या अंतरात्मातून भगवंताने काढले आहेत. त्या रात्री सर्वजण आनंदाने झोपी गेले. 

         दुसरा दिवस उजाला. बाबा कॉन्ट्रक्टर असल्यामुळे ते सकाळीच कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दुपारी अकराच्या सुमारास बाबा घरी आले व आपल्या आसनावर विराजमान झाले. त्यापूर्वी महादेव आणि त्याचा मित्र डॉ. झोडेंकडून औषध घेऊन आले होते. महादेव औषध घेऊन नुकताच आतल्या खोलीत झोपला होता. परंतु एकाएकी महादेव कसा तरी करु लागला. त्याने डोळे फिरविले. त्यावेळेस त्याची आई घरातच होती. ती पण घाबरुन तेथे धावत आली आणि जोराने रडत रडत ओरडली की महादेव कसा तरी करतो आहे. त्याने डोळे फिरविले आहेत. हे ऐकुन बाबा आसनावरुन उठून आत गेले. बाबा आणि आई यांचे ते एकुलते एक अपत्य होते. तरीपण बाबा त्या परिस्थितीत अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी आपले मन कठोर केले आणि आईला म्हटले. तु रडू नकोस, ही वेळ रडण्याची नाही. संघर्षाची आहे. मानवी जीवन हे संघर्षमय आहे. मानवी जीवन संघर्षातुनच सुखी होते. संघर्ष करणे हे मानवाचे परम कर्तव्य आहे. म्हणून रडणे बंद कर आणि आपण आलेल्या परिस्थितीला तोंड देऊ. मानव हा कर्मकर्ता आहे. त्यामुळे त्याच्या हातुन चुका होणे स्वाभाविक आहे म्हणून आपण भगवंताला कापूर लावून झालेल्या चुकीची क्षमा मागू.

               महानत्यागी बाबा जुमदेवजी भगवान बाबा हनुमानजी कापराची ज्योत लावली आणि विनंती केली की, भगवान बाबा हनुमानजी, तुम्ही कर्म करीत नाही. आम्ही मानव कर्म करीत असतो. त्यामुळे आमच्या हातुन काही चुका होणे शक्य आहे. आमच्या हातुन काही चुका नकळत झाल्या असल्यास मी संपुर्ण दोषी आहे. तुम्ही निर्दोष आहात म्हणून मला क्षमा करा. परंतु बाबांनी विनंती करनही महादेवला आराम झाला नाही. तो.  तसाच होळे फिरवीत होता. तेव्हा बाबांनी आईला विनंती करुन क्षमा मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे आईने भगवंताला कापराची ज्योत लावून क्षमा मागितली. तरीपण त्याला आराम झाला नाही हे पाहून बाबा त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्याच्या कानात सांगितले की, महादेव, तुला बोलता येत नाही. तु डोळे फिरवले आहेस. तरी तु ज्या अवस्थेत आहेस त्याच अवस्थेत मनातल्या मनात बाबा हनुमानजी म्हणून त्याला अंतःकरणापासून क्षमा माग. याप्रमाणे बाबांनी महादेवला मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे त्याने बाबा हनुमानजीची क्षमा मागितली असता तो एकदम उठून उभा झाला आणि बाबांना म्हणाला, मला आता खूप बरे वाटते आहे. मला आता काहीही होत नाही याप्रमाणे महादेव परमेश्वरी साक्षात्काराची व चमत्काराची प्रचिती आली. तेव्हापासून त्याची देखील बाबा हनुमानजीवर श्रध्दा बसली.

महादेव त्याच्या मित्राजवळ बोलला होता की डॉक्टरांचे सर्टिफिकेट खोटे ठरवायचे आहे. तो शब्द भगवंताला पूर्ण करावयाचा होता. महानत्यागी बाबा जुमदेवजी च्या डोळ्यासमोरही तो शब्द सारखा फिरत होता. पंधरा मिनिटानंतर तो तसाच पुनः आजारी झाला आणि त्याची परिस्थिती पुनः पुर्वीसारखीच झाली परमेश्वराने या मार्गात हेच शिकवले आहे की माणसाने कुठे चुकते हे त्याने लक्षात द्यावे. म्हणून बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की, या मार्गात आल्यावर जा त्याला दुःख आले तर त्याने प्रथम आपली चुक शोधावी. त्याने आपले आत्मसंशोधन करावे, म्हणजे त्याची चुक लक्षात येते व त्या चुकीची क्षमा मागितल्यास त्यातुन त्याची सुटका होते.

              बाबांनी त्यांचे कनिष्ठ बंधु मारोतराव यांना डॉ. झोडेंना बोलविण्यास सांगितले, बाबांच्या शेजारी एक विठोबाजी धापोडकर नावाचे नाडीपरिक्षा करणारे वैद्य राहत होते. ते नाडीपरिक्षा कक्षन आयुर्वेदिक औषध देत असत. त्यांनाही बोलावून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे मारोतराव दोघांनाही बोलावावयास गेले. थोड्या वेळाने डॉ. झोडे घरी आले. त्यांच्या पाठोपाठ विठोबाजी वैद्य पण आले. डॉक्टरांनी महादेवला पूर्णपणे तपासले. ते बाहेर येऊन बाबांना म्हणाले, महादेवला धनुर्वात झाला आहे. त्याची काळजी द्या. या बिमारीची मुदत फक्त चार तास असते. तेव्हा बाबा डॉक्टरांना म्हणाले की, तुम्ही तसे सर्टिफिकेट द्या म्हणजे मी त्याला मेडीकल कॉलेज किंवा मेयो दवाखान्यात नेतो. त्याप्रमाणे डॉक्टरांनी बिमारीचे सर्टिफिकेट दिले आणि ते आपल्या दवाचान्यात निघून गेले. त्यानंतर आलेल्या वैद्यांनी त्यांची नाडीपरिक्षा केली. त्यांनी पण धनुर्वात असल्याबद्दल बाबांना सांगून काळजी घ्यावयास सांगितले. बाबा त्या मुलाला घरी तशाच परिस्थितीत सोडून घराच्या बाहेर पडले. त्यांनी मेडीकल कॉलेज, मेयो हॉस्पिटल आणि नागपूर महानगरपालिका आणि इतर ठिकाणी रुग्णवाहिकेकरिता फोन केला पण कुठेही रुग्णवाहिका मिळाली नाही. म्हणून बाबा घरी परत न येता तीन खंबा चौक, मोमीनपुरा येथे गेले. तेथे सायकल रिक्षा केला. तेथून रिक्षाने इतवारी पोस्ट ऑफीसजवळ आले. तेथे तो रिक्षा केला. तेथून रिक्षा सोडून दिला. तेथे अनेक ऑटोरिक्षावाले उभे होते. त्यातील एका ऑटोरिक्षावाल्यास ते म्हणाले एक सीरीयस केस आहे. टिमकी येथून ती मेडीकल कॉलेजमध्ये पोहचवायधी आहे. जे काही भाडे पडले ते देऊ. त्यांतील एक ऑटोरिक्षावाला तयार झाला. त्याने बाबांजवळ आपला रिक्षा आणला. बाबा त्यात बसून रंभाजी रोडवरील रामेश्वर तेलघाणीजवळ आले.


           ऑटोरिक्षा तेथेच रस्त्यावर ठेवून घरी पायीच परत आले. तेव्हा महादेव उठून बसला होता. कुटुंबातील सर्व लोकांनी कापूर लावून भगवंताला विनंती केली की, भगवंता, मानवी प्रयत्नांना यश देण्याचा अधिकार तुलाच आहे. म्हणून मनोच्या प्रकृतीला आराम पडू द्या. त्यानंतर बाबा, आई, महादेव आणि बाबांच्या जेष्ठ वहिनी श्रीमती सीताबाई ऑटोरिक्षाकडे जायला निघाले. मनो पायीच रिक्षापर्यंत गेला. ते सर्व रिक्षात बसले. त्यानंतर ऑटोरिक्षा चालू झाला. जवळच शंभर फुटांवर रस्त्यात हनुमान जी मंदिर आहे. त्या मंदिरासमोर ऑटोरिक्षा आपोआपच बंद पडला. जवळ जवळ पंधरा मिनिटे ऑटोरिक्षा सुरु करण्याचा प्रयत्न केला, पण तो सुरु झाला नाही. त्यानंतर तो आपोआपच सुरु होऊन गोळीबार चौकाकडून मेडीकलकडे जाण्यास निघाला. गोळीबार चौकात डॉ. झोडे यांच्या दवाखान्यासमोर तो ऑटोरिक्षा पुनः बंद पडला. तेथे दहा मिनिटे तो चालू करण्यात पुनः गेले. चालू झाल्यावर तो पुढे गेला. गांधीवाग फवारा चौकात पुन्हा तो बंद पडला. तेव्हा बाबांना खूप राग आला. ते त्या ऑटोरिक्षा चालकावर खूप रागावले आणि म्हणाले की मी तुम्हास अगोदरच सांगितले होते की, सीरीयस केस आहे. मेडीकल कॉलेजला पोहचवायची आहे. तेव्हा आपण का सांगितले नाही की, माझी गाडी खराब आहे. दुसरी घेऊन जा. ते पुढे म्हणाले, ही गाडी जीवघेणी आहे. तुम्हाला कोणाच्या जीवाची पर्वा नसते. फक्त पैसे पाहिजे असतात. अशा गाडीला लाथ मारुन तिची तोडमोड केली पाहिजे. असे म्हणताच ती गाडी पुनः सुरु झाली. तेथून ती सरळ निघाली आणि मेडीकल कॉलेजला पोहोचली. तेथे डॉक्टरांनी मनोला तपासले. 

तेव्हा बाबांनी तेथील डॉक्टरांना विचारले की, माझ्या मुलाला कोणता आजार झाला आहे? तेव्हा संपुर्ण तपासाअंती कोणतीही बिमारी नसल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तेव्हा बाबांनी त्यांना डॉ.झोडेंनी दिलेले सर्टिफिकेट दाखविले. डॉ. झोडे M.B.B.S. असल्यामुळे त्यांचे सर्टिफिकेट पाहून सर्व डॉक्टरांना आश्चर्य वाटले. ते सर्व विचारात पडले. त्यांनी घनुर्वाताच्या वाडत फोन केला आणि पाच मिनिटांनी त्यांना सांगितले की, बाहेर रुग्णवाहिका उभी आहे. आपण त्याला धनुर्वाताच्या वार्डात घेऊन जा. मनोला त्या वाति नेण्यात आले. वार्ड इन्वार्ज डॉक्टरांनी त्याला बेड दिला, मरीयस केस समजून डॉक्टरांनी फटाफट तपासणे सुरु केले. त्यांनी वरिष्ठ वटरांनाही बोलाविले, त्यांनीही त्याला तपासले. जेव्हा वार्ड इन्थार्ज डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांना बाबांनी विचारले की, डॉक्टरसाहेब, मुलाला कोणती बिमारी आहे? तेव्हा डॉक्टर उत्तरले की, सीरीयस केस आहे. तेव्हा बाबांनी पुन्हा विचारले, डॉक्टर , आपल्या पुस्तकात सीरीयस नावाची बिमारी आहे काय? त्यावर डॉक्टरांनी काहीच उत्तर दिले नाही. 

          तेव्हा बाबा म्हणाले, डॉक्टर, मी लिहून देतो की, जोपर्यंत विमारीचे पूर्णपणे निदान होत नाही तोपर्यंत मी त्याला औषध देऊ देणार नाही. मुलगा माझा आहे. काही कमीजास्त झाल्यारा त्याथी संपूर्ण जबाबदारी माझी आहे. तेव्हा डॉक्टरांनी बाबांना मुर्ख म्हटले. त्यावर बाबा म्हणाले की, मी महामूर्ख आहे. त्यानंतर बाबांनी एका सेवकाला आईकडे पाठवून निरोप घ्यायला सांगितले की, मनोला, कोणालाही औषध देऊ देऊ नका. इन्चार्ज डॉक्टरांशी वाद घातल्यामुळे ते डॉक्टरांच्या खोलीत निपून गेले कारण वाद निर्माण झाल्यामुळे बाबांना वाटत होते की, तो औषध देईलय. वरिष्ठ डॉक्टर मनोला पासून आणि औषधोपचार करण्यास सांगून दुसरीकडे निघून गेले होते. म्हणून त्याने वरिष्ठ डॉक्टरांना फोन करुन बोलविले. त्या इन्चार्ज डॉक्टराने पुन्हा तपासले. पण त्यांना निदान करता आले नाही. त्या वाती इतर रोग्यांना भेटण्याकरिता लोक येत होते. त्यांतील काही सुशिक्षित लोक म्हणू लागले की, मुलाचे वडील किती मुर्ख आहेत. मुलगा एवढा सीरीयस असूनसुध्दा ते त्याला औषध देऊ देत नाहीत. हे शब्द बाबांच्या कानावर पडताच ते त्या लोकांना सांगू लागले की खरोखरच मी महामुर्ख आहे. नुसताच मुर्ख असतो तर डोक्यावर हात ठेवून बसलो असतो. तुमच्याशी बोललो नसतो. लोक मात्र आश्चर्यच करीत बसलेत. वरिष्ठ डॉक्टर आल्यावर वार्ड इन्चार्जने त्यांच्याकडे औषध देऊ न देण्याबद्दल तक्रार केली. तक्रारीत डॉक्टरांनी सांगितले की, बिमारीचे पुर्णपणे निदान करा आणि त्यानंतर औषध द्या, अन्यथा देऊ नका. निदान केल्याशिवाय औषध दिले तर त्याचा जीव जाईल असे मुलाचे वडील म्हणतात.

               सर्व डॉक्टरांनी तपासले असतानाही रोगाचे अचुक निदान झाले नाही. हे सर्व पाहून बाबा मनाशी म्हणाले की, परमेश्वर मनोची परिक्षा घेत आहे. थोड्या वेळाने घरचे काही लोक मनो ज्या बेडवर होता तेथून बाबांजवळ आईचा निरोप सांगण्याकरिता धावत आले. आईचा निरोप ऐकुन वाबा त्यांच्यावर रागावले आणि म्हणाले, "तुम्ही मला काहीही सांगू नका, तुम्ही जा, मी येतो आहे." इतके बोलल्यावर बाबांनी मनोच्या वेडजवळ जाऊन त्याला विचारले, तुला काय झाले? तेव्हा तो वाबांना म्हणाला मी जगु शकत नाही. त्यावर बाबा त्याला म्हणाले, महादेव तुला काहीच होत नाही. तु घाबरु नकोस तेव्हा तो बाबांना पुन्हा म्हणाला, मला खरोखरच काहीच होत नाही. तेव्हा मनोने थोडा विचार केला आणि बाबांना म्हणाला मला काहीही होऊ नये याकरिता काय करावे लागेल, तेव्हा बाबांनी त्याला मार्गदर्शन केले की, तु भगवान बाबा हनुमानजीला समोर ठेवून त्यांचे चिंतन कर आणि घैर्याने काम घे. सर्व काही ठीक होईल. एवढे बोलून बाबा बेडजवळून निघून गेले आणि डॉक्टरांच्या खोलीत जाऊन उभे राहिले. तो शांत पडून राहिला.

बाबांना शंका वाटत होती की, डॉक्टर काहीतरी उलटेसीधे करतील. त्यांची अट होती की, जोपर्यंत रोगाचे निदान पुर्ण होत नाही तोपर्यंत औषध देऊ द्यायचे नाही. ते डॉक्टरांवर लक्ष ठेवूनच उभे होते. परंतु दोघेही आपसांत बोलत नव्हते. वेळ जात होती. 


                 डॉ. झोडेंच्या म्हणण्याप्रमाणे चार तास संपत आले होते. धनुर्वाताच्या केसवर चार तासांत उपचार झाले नाहीत तर तो रोगी दगावतो असे डॉक्टरांचे निदान आहे. बाबा आणि सर्व लोकांचे लक्ष डॉक्टर आणि मनोकडे सारखे होते काही वेळाने बाबांनी घडाळ्यात पाहिले तेव्हा दवाखान्यात अॅडमीट करुन चार तास झाले होते काही लोक बाबांकडे घाईने आले. परंतु ते बाबांशी बोलायला घाबरत होणे, कारण बाबांनी भगवान बाबा हनुमानर्जीची प्राप्ती केली असून त्यांच्या शब्दांत महानशक्ती आहे, ते स्वयम् सिध्द आहेत, हे त्यांना माहीत होते. तरीपण हिंमत करुन ते बाबांकडे गेले. बाबा त्यांना घाईने येतांना पाहून रागावले आणि म्हणाले, "मला माहीत आहे. तुम्ही मला सांगू नका" आणि त्यांनी त्यांना हात हलवून सांगितले की, "मी येतो आहे असे त्याला सांगा." त्याप्रमाणे महादेवजवळ ती मंडळी येऊन सांगू लागली, बाबा येत आहेत त्याप्रमाणे बाबा त्याच्या बेडजवळ आलेत आणि त्यांनी त्याला विचारले, काय झालं तुला? तेव्हा तो बाबांना म्हणाला, बाबा मी जीवंत राहू शकत नाही. तेव्हा बाबांनी विचारले, जीवंत न राहण्याचे कारण काय? तो उत्तरला, पाहा, माझे दोन्ही डोळे वर चढले आहेत. तेव्हा बाबांनी त्याच्याकडे पाहून म्हटले तुझे दोन्ही डोळे ठिकाणावर आहेत. तु पुन्हा पुन्हा तेच ते सांगू नकोस. हे चांगले नाही. तुला काहीही होत नाही. मग मी आता काय करु असे पुन्हा महादेवने बाबांना विचारले असता बाबा म्हणाले, तु फक्त भगवंताला बाबा हनुमानजीला समोर ठेव व चिंतन कर. इतके बोलुन बाबा डॉक्टरांच्या ऑफीसकडे गेले. ऑफीसमध्ये येऊन डॉक्टरांना ते म्हणाले, "अॅडमीट करायला साडे चार तास झालेत, आपण रोगाचे निदान करु शकले नाही म्हणून आमची केस आम्हाला परत करा." तेव्हा डॉक्टर बाबांना म्हणाले की, "पागल झाला आहात काय? केस परत नेऊन काय करणार?" तेव्हा बाबांना खूप राग आला. ते डॉक्टरांना म्हणाले, "डॉक्टर आता मला पागल म्हणू नका. तुम्ही पागल झाले आहात. आपण मला यापुर्वी मुर्ख म्हणालात. मी स्वतःला महामुर्ख म्हणवून घेतले. पण लक्षात ठेवा, लोक मला बाबा म्हणतात. मी आपल्या अधिकारात आलो म्हणून मला काहीही बोलु नका. बाबांना ओळखा नाहीतर तुमचे फार मोठे नुकसान होईल. माझी केस मला परत करा." तेव्हा डॉक्टरांना खुप राग आला. 

            डॉक्टरांनी रजिस्टर बाबांच्या समोर सहीकरिता ठेवले आणि म्हटले, "यावर सही करा, पुन्हा जर केस आणली तर मी पुनः ती परत घेणार नाही." असे तावातावाने डॉक्टरांनी बाबांना सांगितले. तेव्हा बाबांनी त्यांना म्हटले की, "मी पुन्हा केस तुमच्याकडे आणणार नाही. गरज पडली तर खाजगी दवाखान्यात घेऊन जाईन." असे सांगून बाबांनी रजिस्टरवर सही केली. सर्व कागदपत्र घेऊन बाबा महादेवच्या बेडजवळ आले आणि आईला म्हणाले, "चला, आपण घरी जाऊ.' त्यावेळेस महादेव झोपला होता. बाबांनी पाहिले होते की, जेव्हा रजिस्टरवर त्यांनी सही केली तेव्हाच त्याला झोप लागली. आई बाबांना म्हणाली, "आताच महादेव झोपला आहे. थोडे हळू बोला" बाबाचे बोलणे ऐकून महादेव जागा झाला, हे पाहताच बाबा त्याला म्हणाले, "चल महादेव, आपण घरी जाऊ."त्यावेळेस महादेव बाबांना म्हणाला की, "माझा उपचार येथे होत नाही, म्हणून आपण घरी जाऊ, आता मला बरे वाटते" यांनतर बाबा आईला म्हणाले की, "तु महादेवला कपडे घालून दे, कारण तो आजारी आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की केस सीरीयस आहे." हे ऐकून महादेव स्वतःच उठून उभा राहिला आणि आईला म्हणाला, "दे माझे कपडे, मी स्वतःच घालतो, मी कुठे सीरीयस आहे?" कपडे घातल्यावर ते सर्व वार्डाच्या बाहेर यावयास निघाले. तेव्हा बाबा महादेव ला म्हणाले, "मी तुला धरुन हळूहळू रिक्षाजवळ घेऊन जातो. कारण डॉक्टर म्हणतात तु सीरीयस आहेस." त्याप्रमाणे बाबांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला, "नको, मी स्वतःच रिक्षापर्यंत पायी चालतो" आणि स्वतः चालत चालत रिक्षाजवळ आला.

तत्पुर्वी बाबांनी मारोतरावांना रिक्षा आणावयास सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी रिक्षा आणून वार्डासमोर उभा ठेवला होता. सर्वजण वार्ड बाहेर येऊन रिक्षाजवळ आले. त्यानंतर आई आणि महादेव रिक्षाने घरी परत आलेत. बाबांबरोबर आलेली सेवक मंडळी आणि त्यांच्या कुटुंबातील लोक बसने गोळीबार चौरस्ता येथे आले आणि आपआपल्या घार गेले.घरी परत आल्यावर बाबांनी आईला विचारले, "महादेव जेवला काय?" तेव्हा आईने बाबांना सांगितले की, "नाही, तो जेवला नाही. त्याने फक्त एक कप कॉफी घेतली आणि तो झोपला आहे." तेव्हा बाबा म्हणाले, "ठीक आहे. त्याला आराम करु दे." थोड्या वेळाने महादेवचे मामा श्री. सोमाजी बुरडे हे त्यांच्या घरी आले. बाबांनी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली. ती ऐकुन त्यांना वाईट वाटले. महादेव त्या रात्री शांतपणे झोपला. त्याला काहीही त्रास झाला नाही.


दुसऱ्या दिवशी सकाळी झापुन उठल्यावर तो बाबांना म्हणाला, "बाबा, तुम्ही मला भगवंत दाखविला. माझा इतर देवांना मानण्याचा भार कमी झाला. तेव्हापासून तो एकाच परमेश्वराला मानू लागला. त्यापुर्वी मनोने दवाखान्यातुन आल्यावर भगवान बाबा हनुमानजीला कापराची ज्योत लावून विनंती केली होती की, "भगवान बाबा हनुमानजी मी आपणांस भगवान नाही असे म्ळटले होते. परमेश्वर कोणी नाही.मानव सर्वेसर्वा आहे. असेही म्हटले होते. ही माझी फार मोठी चुक झाली आहे. त्यामुळे मला खुप त्रास झाला तरी आपण मला क्षमा करा. यापुढे मी एकच भगवंताला मानीन. परमेश्वर हा सर्वेसर्वा आहे. मानव कुणीही नाही."त्याचप्रमाणे त्याच्या अंतरात्म्यातुन जे शब्द निघाले त्यामुळे डॉक्टरांचे सर्टिफिकेट खोटे ठरले. ते "अंतरीचे बोल" आहेत म्हणून शब्द हाच परमेश्वर आहे हेही सिध्द होते. तसेच बाबांच्या शब्दांचा अनादर करणे हा परमेश्वराचाच अनादर आहे हेही त्या प्रसंगापासून शिकावयास मिळते.


परमेश्वराचा हा चमत्कार पाहून परमेश्वर वेळेनुसार परिस्थिती पाहुन मानवाच्या भावनेनुसार कार्य करतो व त्याला शिकवितो तो महान दयाळू आहे. त्याची महानशक्ती आहे. हाच महादेव आज डॉ. मनो ठुब्रीकर या नावाने अमेरिकेत व्हर्जिनिया मेडीकल सेंटर, व्हर्जिनिया येथे असोसिएट प्रोफेसर ऑफ सर्जरी म्हणून कार्यरत आहे. डायरेक्टर ऑफ सर्जीकल रिसर्च या संस्थेत तो जगातील नावाजलेल्या शास्त्रज्ञांमध्ये सातव्या क्रमांकाचा शास्त्रज्ञ आहे. हीच त्याला परमेश्वरांनी दिलेली देणगी आहे.





No comments

Powered by Blogger.