सकाळची विनंती स्पष्टीकरण.. PARMATMA EK |
सकाळची विनंती स्पष्टीकरण :-
![]() |
सकाळची विनंती स्पष्टीकरण.. PARMATMA EK |
|
सकाळची विनंती :-
भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!
महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!
परमात्मा एक !!
भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानीन. मी माझ्या कर्मांनी चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, चार तत्व, तीन शब्द, पाच नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधीही विसरणार नाही.
सकाळची विनंती स्पष्टीकरण :-
भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. यावर आपल्या बुद्धीप्रमाणे विचारानुसार सांगत आहे.
महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी, मला दुःख सांगु नका. मी दुःख दुर करू शकत नाही. दुःख दुर करणारा व योग देणारा भगवान आहे.
मी भगवान दिला. तो तुमच्या जवळ आहे म्हणून जे काही सांगायचे आणि मागायचे असेल ते भगवंताला. मी (बाबा) फक्त विचार देतो, कार्य तुम्हाला करायचे आहे. बाबांचा संदेश आहे,
सेवक के (बाबा) शब्द भगवत् के शब्द, सेवककी मर्जी भगवत् की मर्जी हैं । बाबांच्या शब्दांचे पालन करण्यासाठी, बाबांच्या मर्जीनुसार आपण विनंती करतांना भगवान बाबा हनुमानजी यांनाच सांगतो.
मी जीवनात केलेली सर्व पूजा………बंद केले.
आम्ही हिंदू संस्कृती नुसार हिंदू धर्मातील अनादि काळापासुन आमचे पूर्वजांनी पूजत असलेल्या देवी-देवतांना मानून त्यांचे होम-हवन-कीर्तन, पूजा-पाठ, नवस-उपवास, तसेच पंडितांनी सांगितल्याप्रमाणे सर्व कर्मकांड (विधी) करून सुद्धा कोणत्याही देवी-देवतांनी आमचे दुःख निवारण केले नाही. उलट हे सर्व करता-करता आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास वाढतच गेला. हा अनुभव या मार्गात आलेल्या सर्वांनाच आलेला आहे. म्हणून…
मुश्किलों में जो साथ हुआ करते हैं…
हम उनके हक में भी दुआं करते हैं !
उन देव-देवीयोंसे उम्मीद कबतक करतें…
जिनके दरवाजे पर पहरे हुआ करते हैं !!
हमने अपने जीवन में कई बनाये मीत…
जब दिल जोड़ा एकसे तब सोये निश्चिंत !
म्हणजे…
आमच्या जीवनात आम्ही अनेक देवी-देवतांना आपला मीत बनवला व आपले समजून मनात ठेवून त्यांचे कार्य केले. पण शेवटी काय तर, म्हणतात ना, एक ना धड, भाराभर चिंध्या. कोणीही साथ दिली नाही व मदत केली नाही, दुःख दुर केले नाही. दुःख वाढतच गेले, शेवटी रात्रीची झोप उडाली होती. तेंव्हा…
एक साधै, सब सधे
सब साधे, सब जाय !
या म्हणी प्रमाणे आम्ही दुःख दुर होण्यासाठी सर्व देवी-देवतांच्या कार्यासाठी सर्व काही गमावले. त्रस्त झालो. जीव द्यायची वेळ आली. तेंव्हा……
"एक सेवक" भेटला,"एका बाबा" विषयी आणि त्यांनी प्राप्त केलेल्या "एक भगवंताच्या कृपेचे" अनुभव सांगु लागला.ते ऐकून प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात ना, मग एकदा प्रयत्न म्हणून सेवकांनी सांगितल्याप्रमाणे तिर्थ बनवून घ्यायला काय हरकत आहे.
बाबांच्या आदेशानुसार सेवकांनी सांगितल्याप्रमाणे तिर्थ बनवून घेतले, आणि दुःख कमी होऊ लागले. रात्रीला पुष्कळ दिवस काय तर पुष्कळ महिन्यांनंतर सुखाची झोप लागली. त्यानंतर बाबांच्या आदेशानुसार मार्गदर्शक सेवक कडून कार्य घडवून मानव धर्माच्या शिकवणीचे, विनंती - प्रार्थना तील शब्दांचे, तत्व, शब्द, नियमाचे कुटुंबात व सेवकात पालन केल्याने एक भगवंताने आमच्या कुटुंबातील सर्वांचे दुःख दुर केले. परंतु त्या करीता (मार्गात येण्यापूर्वी भगवंताच्या चरणांवर मरणे म्हणजे त्यांचे पाय धरत होतो.) भगवंताच्या नावावर मरण्याचा वचन द्यावे लागले. हे महत्त्वाचे. म्हणून अनुभवावरून म्हणतो…
घुट-घुट कर जीते जी मरना क्या मरना…
मरना तो सत्य है, मरनेसे क्यूँ डरना !
जीने की आरजूं में
मरें जा रहे हैं लोग
मरने का वचन देंके
सुख से जी रहे हम लोग !
दुनिया के लोगों…
मरने की भी एक बार
ख्वाहिश किया करो…
बाबा के आदेश पर
चलकर सुखसे जीया करो !
बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, चार तत्व, तीन शब्द, पाच नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो, याला जीवनात कधीही विसरणार नाही.
भगवान बाबा हनुमानजी की जय !
महानत्यागी बाबा जुमदेवजी की जय !
परमात्मा एक !!
सत्य, मर्यादा, प्रेम कायम करनेवाले,
अनेक वाईट व्यसन बंद करनेवाले,
मानव धर्म की जय !!
यानंतर विनंतीतील पुढच्या शब्दावर ( जुने विचार बंद केले. ) विचार सांगेन. चुक-भूल क्षमस्व.
🙏आपला संतोष🌷आमचा विश्वास🙏
🙏बोपचे कुटुंबाचा सप्रेम नमस्कार 🙏
सुर्याटोला रोड, गोंदिया वरून 🌹
🙏नमस्कार 🙏

Namskarji dada chhan
ReplyDeleteKitne bje winti krni chahiye
ReplyDelete