Parmatma ek Anubhav आजचा अनुभव

                          ▶️आजचा अनुभव:-

👇🏿👇🏿👇🏿👇🏿

Parmatma ek Anubhav आजचा अनुभव
Parmatma ek Anubhav आजचा अनुभव 


⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕ 

    !!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
  !!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
               !!परमात्मा एक!!
            "माझा सत्य अनुभव"

          माझे नाव राजेश सुरेश चौधरी असून मी गवळी मोहल्ला मोठा बाजार भंडारा येथे माझी आई  सोबत वास्वत आहे व माझा सत्य अनुभव मालिकेत मानवधर्म एकता परिवार गृपवर आपल्या समोर सादर करत आहे.

                माझे वडील आम्हाला मी लहान होतो तेव्हाच सोडून गेले मी धारगाव ला हॉस्टेल मधे शिकलो माझी आई 2/3 घर चे काम करून मला पोसायची मला माझ्या आई चा खूप अभिमान आहे कि तिने मला लहानाच्या मोठा केला आज माझा मिस्कीन टॅंक गार्डन भंडारा येथे पानठेला आहे आणि आता माझी आई कुणाच्या घर चे काम पण नाही करत मी आणि माझी आई आम्ही दोघे पानठेला चालवतो  आम्ही अनेक मधे होतो एक मुलगी होती मी तिला पसंद करत होतो व आम्ही लग्नाचा पण ठरवलं ती सेवकाची मुलगी होती तर आम्हाला पण वाटलं कि आम्ही पण मार्गात गेल्या पाहिजे हा मार्ग खूप चांगला आहे आणि आम्ही मार्गात गेलोय आमचे मार्गदर्शक चौरागडे काकाजी (माळा कॉलनी मधे राहत होते.)

            आम्ही कार्यकर्ता काकाजी कडे गेलोत त्यांनी आम्हाला मार्ग बद्दल मार्गदर्शन दिले व घराची पूर्णपणे साफ सफाई करायला सांगितले आम्ही त्यांनी सांगितल्यानुसार साफसफाई केली आणि कार्य घ्यायला गेलोत काकाजींनी कार्य दिले त्यानंतर आम्ही घरी आलो व दुसऱ्या दिवशी पासून बाबा ची ज्योत लावायला सुरुवात केली काही महिन्या नंतर माझं लव्ह मेरिज झालं सगळं चांगल चालत होतय पण माहिती नाही कार्य चालू असायचे कि माझी पत्नी झगळेच करायची असं बरेच दा झालं एक दिवस मी तिला म्हटलं कि तू कार्या मधेच का बर झगळे करते. 


तुझं जर असिच राहीशील तर मी हा मार्ग सोडीन आणि तसंच झालं मी ज्योत लावायला बंद केल पण माझी पत्नी ज्योत लावत होती. 

          2019 ची वेळ असेल रात्री 2 ते 2:30  वाजता  मला मिर्गी चे झटके आले माझ्या पत्नीने मला बाबा हनुमानजी च्या नावाने तीर्थ बनून दिला व मी बेशुद्ध झालो  व मला सरकारी दवाखान्यात मधे भरती करण्यात आले मला सलाईन लावण्यात आले तेवढ्याच रात्रीला माझी सासू व माझा साळा मला भेटायला आले पण नर्स ने त्यांना भेटू नाही दिले मला राग आला मी सलाईन काढून फेकलं आणि नर्स जवळ गेलो आणि त्यांना म्हटलं कि ते इतक्या रात्रीला नागपूर वरून भेटीला आले आणि तुम्ही भेटू पण नाही देत आहात मी त्यांना म्हटलं कि मला आत्ताच  सुट्टी दया मला ह्या दवाखान्यात नाही राहायचं आहे. नर्स ने सुट्टी दिली आणि मग मला डॉक्टर पडोळे सरा कडे ऍडमिट केलंय तिथे पण मला सलाईन लागली व रात्र भर झोपलोय सकाळी उठलो माझे मित्र भेटीला आले एका मित्राने मला म्हटलं कि तुला काही बाहेरच आहे आणि माझी आई बघतोय हा सगळं एकदा माझ्या घरी चाल आम्ही सुट्टी घेतली व माझ्या मित्राच्या आई कडे गेलो त्यांनी मला सांगितलं कि तू सवारी मधे सापडला आहे म्हणून तुझी तबियत खराब झाली मी त्यानां म्हटलं याचा उपाय काय आहे त्यांनी मला एक धागा बनवून दिला व कमरेत बांधायला सांगितलं मग मी घरी आलो आणि माझी तबियत  सुधारली पण माझी तबियत काही महिन्या करिताच सुधारली होती मला 6 महिन्या नंतर पुन्ना मिर्गीचे झटके आले. खूप दवाखाने केले खूप लोकांना जवळची औषधी खाल्ली पण काहीच आराम नाही झालं मग माझ्या पत्नीने व माझ्या आईने ठरवलंय कि आपण परमात्मा एक हाच मार्ग स्विकार करू व आम्ही दुसरे  मार्गदर्शक बहघितले ते म्हणजे इस्त्रीजी केवट काकाजी (रा.गणेशपूर) त्याच्याकडे गेलो व त्यांनी आम्हाला कार्य दिले त्या नंतरही माझी तबियत खराबच राहत होती.


             मला कळत नव्हतं कि माझ्या हाताने काय चुकी झाली आहे मी रोज बाबा हनुमानजी ला व महानत्यागी बाबा जुमदेवजीला आपल्या चुकीची माफी मागत होते तरीही मला मिर्गी येत होती त्यानंतर मी आपल्या  सासरांकडे  गेलो ते पक्कीचे सेवक आहेत त्यांना पण असं वाटलं कि कच्ची चे सेवक आहेत तर कोणी बाहेरच केल असेल त्यांनी मला 3 दिवस तीर्थ बनून दिले त्यानंतर त्यांनी मला म्हटलं कि काही बाहेरचा नाही आहे आहे जर बाहेरचा असता तर  सगळं निघून गेलं असत.


            पण त्यानंतर ही माझी मिर्गी येणे बंद नाही झाली मग मला मिर्गीची औषध खायला सांगितले आणि मी ती औषध खाल्ली 2महिने मला मिर्गी नाही आली परत मी आपल्या घरी आलो तेव्हा 15 दिवसाने माझी तबियत अजून खराब झाली म्हणजे मला अजुन मिर्गी आली त्यानंतर आम्ही रूम चेंज केला तरीही काही सुधारणा नाही झाली मी कार्यकर्ता काकाजींकडे गेलो आणि त्यांना सांगितलं कि मला मिर्गी येत आहे काकाजींनी मला सांगितले कि तुझ्या घरी काहीं न काही अशी वस्तू असेल जे आपल्या मार्गात नाही चालत आम्ही पूर्ण घर शोधला आणि काही वस्तू भेटले जे आपल्या मार्गात नाही चालत मी आपल्या पत्नीला म्हटलं जे काही वस्तू आहेत ते घरा बाहेर फेकून टाक काकाजीं नी मला 11दिवसाचे कार्य दिले व काकाजींनी म्हटलं कि आता तुला मिर्गी वगैरे नाही येणार बाबा हनुमानजी आहेत सगळं तेच पाहतील मग मी घरी आलो व कार्य चालू केले. 


               पण काही दिवसाने पुन्हा मिर्गी आली पण त्या रात्री मला 2 दा मिर्गीचे झटके आले तरी मी कार्य चालूच ठेवले जेव्हा कार्य समाप्त झाले त्यानंतर मी नागपूर ला दवाखान्यात गेलो आणि चेकअप केला त्यांनी गोळ्या दिले ते गोळ्या आता पण चालू आहेत पण गोळ्यां प्रेक्षा मला भगवंतावर विश्वास आहे षष्टी च्या हवनाला मी आपल्या आजे सासर्यान कडे गेलो आणि त्यांनी मला हवन कार्यात बसविला त्या दिवशीपासून मला मिर्गी आली नाही आहे आणि थोडा आराम झाले माझी हे मिर्गीची बिमारी माझे भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्याच कृपेनें दुर होईल पन आता आराम आहे सर्वांना माझा नमस्कार जी माझ्या लिहिण्यात व काही सांगण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी ला माफी मागतो. महानत्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मागतो.



सर्वांना माझा नमस्कार

सेवक :-राजेश सुरेश चौधरी
मु.:-गवळी मौहल्ला,मोठा बाजार,भंडारा
सेवक नं :-साधे कार्य 
मार्गदर्शक:-इस्त्रीजी केवट (रा.गणेशपूर)
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.
•••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]
भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
रोशन दादा काटेकर :-8956656210
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page ,Sharchat group}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


Video Anubhav clips :- 












No comments

Powered by Blogger.