PARMATMA EK- Parmatma Ek Anubhav

👉▶️आजचा अनुभव परमात्मा एक          


PARMATMA EK- Parmatma Ek Anubhav
PARMATMA EK- Parmatma Ek Anubhav


⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
!! भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम !!
!! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
          !! परमात्मा एक !!

         "माझा सत्य अनुभव"


   माझे नाव गणेश विश्वानथजी नागपुरे' आहे. आज मी "माझा अनुभव" मानवधर्म एकता परिवार गृप चा या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव 'मार्गात येण्याचे कारण' सादर करीत आहे.
मार्गात येण्या अगोदर माझ्या कुटुंबात माझे आई वडील, माझी पत्नी , माझा मुलगा ,व लहान भाऊ त्यांची पत्नी असा छोटासा कुटुंब.               
          मार्गात येण्याचे कारण असे आहे की, एका एकी माझ्या गळ्याच्या आवाज बोलता बोलता बंद पडला. मला असे वाटले की गडा बसला असेल. मी मिठाचा पाणी गरम करून गुळल्या केल्या  पण काहीही आराम पडत नव्हता घरघुती उपाय सर्व प्रकारचे केले पण आराम पडत नव्हता. काही लोक म्हनायचे की तुम्ही जाणत्या कडे जाउन पहा.    
                                    मी व माझी पत्नी जाणत्या कडे गेलो जानत्या म्हणाला की या वेक्तीचा घट बांधला आहे व याचा करार केला आहे. त्यावर उपाय काय? तर त्या जाणत्यांनी हवन करायला सांगितले आम्ही म्हणालो की ठीक आहे करून टाकू हवन केले पण आराम नाही .असे काही दिवस निघून गेले पण काही आराम लागला नाही .मग आम्ही डॉक्टरांची कडे गेलो.   डॉक्टर साहेब यांनी सांगितले की यांचा गड्याचा एक्सरे काडवं लागेल डाॅव्टरानीं सांगितले की गड्याला लकवा झाला आहे.    

                              डॉक्टर साहेब म्हणाले की,यांचा गड्याला लकवा झालेला आहे. यांचा ऑपरेशन करावा लागेल ऑपरेशन करिता 3 लाख रुपये खर्च लागेल.पण ग्यारेंटी नाही  2 वर्षे पण लागू शकते. मी खूप विचार करत होतो आणि रडत पण होतो. असं कस झाले हे समजे ना दिवस असेच निघून गेले त्यानंतर मला जाणीव झाली.         आपण सर्व परमात्मा एक मार्गात जाऊ.माझी पत्नी हिला या मार्गाविषशी थोडी पार जाणीव होती.      
          कारण तिच्या वडीला कडे हा परमात्मा एक  मार्ग होता.                      मग माझ्या परिवारातील सर्वांनी विचार केला आणि माझा आईचे मामे भाऊ मा.श्री हेमराजजी जंगडे मु.खराबी यांना आम्ही बोलावले व त्यांना सर्व काही सांगितले.     

                    आम्हाला या परमात्मा एक  मार्गात यायचे आहे .त्यांनी सांगितले की या मार्गात मरावे लागते. मी म्हणालो ठीक आहे.तुम्ही तुमच्या घराची साफ सफाई करून घ्या व नंतर आपण मार्गदर्शक यांच्या कडे जाऊ मी म्हणालो ठीक आहे ती तारिख होती 12 मे 2014 ही होती आणि मार्गदर्शक मा.श्री मारोतरावजी राऊत यांच्याकडे सर्व परिवार सह गेलो त्यांनी उद्यापासून म्हणजे 13 मे 2014 या दिवशी पासून साधे कार्य सुरु कराण्यास सांगितले.    

             आम्ही 3 दिवसाचे साधे कार्य सूरु केले पण काही फायदा झाला नाही. आमच्या कडे माझ्या भाच्या राहत होता आणि तो झोपून राहायचा आणि आम्ही कार्य करायचे. मग आम्ही गुरुजी कडे गेलो व सर्व हकिकत सांगितले गुरुजी म्हणाले त्या मुलाला त्यांचा घरी पाठून द्या आम्ही माझ्या भाच्याला त्यांच्या घरी पाठविले नंतर गुरुजी नी 3 दिवसाचे कार्य दिले या कार्यामध्ये थोडासा आराम झाला.     
            मग 7 दिवसाचे साधे कार्य दिले त्या नंतर 11 दिवसाचे कार्य दिले या 11दिवसात माझा  पूर्ण पणे आवाज आला.      गुरुजी चे म्हणणे होते की तू भजन गायसिल का आणि सुंदर आवाज येईल आणि खंरच त्यांचे म्हणणे झाले .त्यादिवशी काहीतरी भवनात कार्यक्रम होता आणि घराजवळ ची मंडळी भजन म्हणत होती मला असं विचार आलं की आपण सुद्धा त्या भजन मंडळीत बसावं व आपण सुध्दा भजन मनु लागु .

                      त्यानंतर त्याग सुरू केले. आणि सुखी समाधान झाले.  कोठे गेले 2 वर्षे आणि ते 3 लाख  बिना पैसा मध्ये आराम झाला धन्यवाद    . याकरिता "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजींचे" यांचे खुप-खूप आभार मानतो.

लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर "भगवान बाबा हनुमानजी" व "महानत्यागी बाबा जुमदेवजी" यांना क्षमा मागतो.

नमस्कार...!

नाव :- गणेश विश्वनाथ जी नागपुरे
पत्ता :- प्लॉट क्र.435, नंदनवन के डी के कॉलेज मेन रोड लाइन नं.7 नागपूर
गट क्रमांक :- 8
सेवक क्रमांक :- 44413
मार्गदर्शक :- श्री.बजरंगजी आंबटकर
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.

•••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]

        भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...

गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
रोशन दादा काटेकर :-8956656210
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

सौजन्य :-

"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page ,Sharchat group}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

No comments

Powered by Blogger.