PARMATMA EK | ढोंगी साधु


PARMATMA EK |  ढोंगी साधु
PARMATMA EK |  ढोंगी साधु  

१९७० च्या जानेवारी महिन्याची ही गोष्ट. १९६९ साली महानत्यागी बाबा जुमदेवजी चा मुलगा महादेव याने विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, नागपूर येथून बी.ई. ची परिक्षा प्रथम मेरीट क्रमांकाने उत्तीर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षणाकरिता परदेशात जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अमेरिकेतील नावाजलेल्या न्युयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये मेटॅलर्जी आणि मटेरियल सायन्स या विषयात एम.एस. च्या पदवी परिक्षेकरिता त्याला प्रवेश मिळाला. महादेव विमानाने अमेरिकेला जाणार होता. त्याला निरोप देण्याकरिता दिल्लीला महादेवबरोबर महानत्यागी बाबा जुमदेवजी, आई सौ. वाराणसी बाई, त्याची मावशी सौ. चंद्रभागाबाई निखारे, मामी सौ गंगूबाई बुरडे आणि त्याचा मित्र विठ्ठल राऊत इतके लोक गेले होते.

दिल्लीला विठ्ठल राऊतचा मोठा भाऊ राहत होता. त्याच्याकडे सर्व मंडळी थांबली होती. दोन दिवस सर्वांनी दिल्ली दर्शन केले. तेथील प्रेक्षणीय स्थळे पाहिलीत. ताजमहल, चारमिनार, जंतरमंतर, लाल किल्ला इत्यादी स्थळांना भेटी दिल्यात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीच्या विमानाने महादेवला अमेरिकेला जाण्यासाठी पालम विमानतळावर सोडले. नंतर परत सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी आपसात सर्वांनी विचार केला की, येथून जवळच हरिद्वार, हृषीकेश ही ऐतिहासिक तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामुळे ती तीर्थक्षेत्रे पाहून यावीत. ठरल्याप्रमाणे सर्वजण रेल्वे इषीकेश ला जाण्यासाठी सकाळीच निघाले. त्यांनी सोबत फराळाचे साहित्य घेतले होते.

जानेवारीचा महिना असल्यामुळे हृषीकेश खूप थंडी पडली होती. हृषीकेश रेल्वे स्टेशनपासून ऐतिहासिक स्थळापर्यंत जाण्यास घोडागाडी केली. त्या अगोदरच बाबांनी सर्व मंडळींना रेल्वे स्टेशनवरच सांगितले, आपण एकच भगवंताला मानतो. देव आपला आत्मा आहे. म्हणून कोणीही कोणत्याही देवळात नमस्कार करायचा नाही. आपण फक्त मानवाने तयार केलेली कलाकृती पाहू. मानवाच्या हाताने तयार झालेल्या दगडाच्या निर्जीव मुर्तीत परमेश्वर वास करीत नाही, तर तो सजीवांच्या आत्म्यात निरंतर वास करतो. ठरल्याप्रमाणे ते सर्वजण हषीकेश या गावी ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्याकरिता निघाले. रस्त्यात त्यांची गूजराथ येथून आलेल्या एका मारवाडी जोडप्याशी ओळख झाली होती. त्या सर्वानी सर्व स्थळे पाहिल्यानंतर सर्वांत शेवटी लक्ष्मणझूला पाहिला. ठरल्याप्रमाणे कोणत्याही देवळात कोणीही नमस्कार केला नाही. लक्ष्मणझूला पवित्र गंगा नदीवर बांधला आहे. त्या पुलावरुन ते गंगा नदीच्या दुसऱ्या काठावर गेले.


दुपारची वेळ होती. तेथे सर्वांनी आंघोळ केली. त्याच ठिकाणी त्यांना ते मारवाडी कुटुंब भेटले. ते पती पत्नी होते. मारवाडी समाजात अशी एक प्रथा आहे की जेव्हा ते तीर्थस्थानाला जातात तेव्हा त्या समाजाची बाई कोणत्याही माणसाला आपला बंधु मानते (जर तिचा भाऊ बरोबर नसेल तर) आणि त्या भावाला भेट म्हणून काही वस्तु प्रदान करते. त्यामुळे त्या बाईचा उध्दार होतो असा समज आहे. त्याप्रमाणे बाबांकडे त्या माणसाने बुजुर्ग या नात्याने बधून त्या बाईचा भाऊ बनून त्यांना भेट स्वीकारण्याबद्दल विनंती केली. ते जोडपेही वयस्कर होते. बाबांनी विचार करुन त्यांना होकर दिला. त्याप्रमाणे सर्वांच्या आंघोळी आटोपल्यावर त्या बाईने बाबांना आपला भाऊ मानून वस्तु भेट दिल्या आणि रीतिरिवाजाप्रमाणे त्यांची पुजा केली. त्यानंतर बाबांनी त्यांना परमेश्वराबद्दल मार्गदर्शन केले आणि त्याला टिकविण्याकरिता मानवाने नेहमी सत्य, मर्यादा, प्रेमाने वागले पाहिजे असा हितोपदेश केला. त्यानंतर बाबांनी त्यांना फराळ करण्याचा आग्रह केला. परंतु त्यांना संकोच वाटु लागला. त्यांना वाटले की हे बरोबर नाही, कारण आपण त्यांना भेट दिली म्हणून ते आपणास बोलवितात. यावर बाबांनी पुन्हा मार्गदर्शन केले की, या पृथ्वीतलावावर कोणत्याही मानवाने संकुचित विचार न ठेवता मानवा-मानवाने एकमेकांचे हृदय जिंकून एकता निर्माण केली पाहिजे. सर्व मानव परमेश्वराची लेकरे असल्यामुळे समान आहेत. मानव कर्मकर्ता आहे. म्हणून सर्वांचे विचार सारखेच असावयास पाहिजेत, जे परमेश्वराला प्रिय आहेत. त्यानंतर त्यांनी बाबांबरोबर फराळ केला आणि तेथून पुढे हरिव्दारला जाण्याकरिता त्या कुटुंबासहित रेल्वे स्टेशनवर गेले.
 हरिव्दारचे तिकीट काढून हरिव्दारला जाणार्या गाडीत सर्व मंडळी एकाच डव्यात बसली. त्या डव्यातील एका कंपार्टमेंटमध्ये एक महात्मा ऋषी बसले होते. त्याच कंपार्टमेंटमध्ये बाबा त्यांच्याजवळ बसले आणि समोरच्या बाकावर बायामंडळी बसली. बाबांची आणि त्या तपस्व्याची ओळख झाली. त्यानंतर त्या तपस्व्याने बाबांना विचारले की तुम्ही सर्वजण कोठुन येत आहात आणि कुठे निघाले आहात? तेव्हा बाबांनी उत्तर दिले, आम्ही नागपूरला राहतो. दिल्लीवरुन मुलाला अमेरिकेला जाण्यासाठी सोडले आणि हृषीकेश हे ऐतिहासिक स्थळ पाहण्यास आलो. तेव्हा त्या ऋषीने बाबांना प्रश्न केला की, आपण भगवंताचे मंदिर पाहिले काय? तेव्हा बाबा उत्तरले, आपण फार उत्तम प्रश्न विचारला. महात्माजी आम्ही येथील सर्व देवळे पाहिलीत. मानवाने बनविलेल्या कला पाहिल्यात, परंतु कोणत्याही देवळात नमस्कार केला नाही, कारण आम्हाला फक्त निर्जीव मुर्ती दिसल्यात, भगवंत दिसला नाही. तेव्हा ऋषीने म्हटले, आपण असे करावयास नको होते. त्यानंतर बाबा पुढे म्हणाले की या देशाची लोकवाणी काय आहे हे मला माहीत नाही. परंतु ज्या व्यक्ती परमेश्वराशी संबंधित असतात त्यांना असे वाटते की, देवळात प्रणाम न केल्यामुळे परमेश्वराचा अनादर होतो. म्हणून मी देवळात प्रणाम न केल्यामुळे परमेश्वराचा अपमान केला आहे असे आपल्याला वाटत असेल तर आपण

ब्रम्हांड चढवावे आणि त्या परमेश्वराला सांगावे की, हे परमेश्वरा, नागपूरवरुन एक व्यक्ती काही जणांना घेऊन या तीर्थक्षेत्राला आली आहे. तो दवेळात गेला पण तेथे असताना देखील त्याने तुला नमस्कार केला नाही. त्यानंतर जेव्हा परमेश्वर मला विचारेल तेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर मी त्याला देईल पण तुम्हाला देणार नाही. त्यानंतर तो महात्मा खूप विचारात पडला आणि ब्रम्हांड न चढवता विचाराअंती तो बाकावरुन खाली उतरला आणि बाबांच्या पायाशेजारी बसला. त्याने बाबांचे पाय धरले आणि म्हणाला, तुम्ही धन्य आहात आपल्यासारखा एकही तपस्वी मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. मी हिंदी भाषिक ब्राम्हण असून पदवीधर आहे आणि गेल्या तीस वर्षांपासून परमेश्वर प्राप्तीकरिता पहाडावर जाऊन हषीकेश, हरिद्वार यांसारख्या

तीर्थस्थानी आणि हिमालयात जाऊन आराधना करीत आहे. पण मला अजून परमेश्वर प्राप्ती झाली नाही. तसेच आजतागायात हरिव्दार ते कन्याकुमारीपर्यंत मी खूप ऋषिमुनी पाहिलेत, महात्मा पाहिलेत परंतु तुमच्या ध्येयाचा एकही तपस्वी आढळला नाही. इतिहासात कालिदास एक महात्मा ऋषिमुनी होऊन गेला. त्याचे पण हेच धोरण होते. तेव्हा बाबा म्हणाले, तुलसीदासजींनी सुध्दा हेच म्हटले आहे की, 'पत्थर पुजे भगवान मिले, तो मैं पूजू पहार' तसेच 'ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय' असेही सांगितले. तेव्हा तो महात्मा बाबांना म्हणाला, आपण परमेश्वराला ओळखता. मला आपण भगवान कुठे आहे ते दाखवा. मी आपला दास बनून राहील.

त्या महात्माच्या जटा खूप वाढलेल्या होत्या. त्या केसांची छानपैकी डोक्यावर मध्यभागी चुंबड घातली होती. पोटापर्यंत दाढी वाढलेली होती. कानांत कुंडल घातले होते. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या आणि अंगात लाल रंगाची कफनी होती. हातात एक छोटीशी काठी आणि दानपात्र होते.

त्या महात्म्याने बाबांना खूप विनंती केली पण बाबा एकाएकी गहिवरले नाहीत. त्याला त्यांनी काहीही सांगितले नाही. त्याने बायांची खूप विनवणी केली. तो वाबांचे पाय सोडत नव्हता. त्याने त्यांच्या पायावर डोके टेकून दिले. तो डोके वर उचलत नव्हता. परंतु बाबा स्वतःच्या पाया कोणालाही पडू देत नाहीत म्हणून ते पाय सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. शेवटी बाबांनी त्याला उठवले आणि म्हटले, महात्माची तुम्हाला भगवंताला पाहायचे असेल तर माझा नागपूरचा पत्ता लिहून घ्या. माझी एक अट आहे. ती अट पूर्ण झाली तरच मी तुम्हाला भगवंत दाखवीन. तेव्हा तो उठून पुन्हा बाबांच्या शेजारी बसला आणि पुढे काय करावयाचे याबद्दल मार्गदर्शन करण्याची त्याने बाबांना प्रार्थना केली. तेव्हा बाबा त्याला म्हणाले की, तुम्हाला प्रथम दाढी, जटा काढाव्या लागतील. कफनी, कुंडले फेकुन द्यावी लागतील. तुमचा वेष बदलून माझ्यासारखी साधी राहणी स्वीकारावी लागले. तुम्ही तीस वर्षे तपश्चर्या करुन भगवंताला प्राप्त करु शकले नाही ही फार दुःखाची आणि शरमेची गोष्ट आहे. कारण या तुमच्या वेषाने या संपूर्ण संसाराला भुलविले आहे. तुम्ही लोकांना परमेश्वराच्या नावाखाली लुबाडता. तुम्ही तीस वर्षांचे तपस्वी जर या देशात परमेश्वराच्या नावावर आंधळे आहात तर संपूर्ण जग आंधळे आहे असे मी

समजतो. हे ऐकल्यावर त्या तपस्व्याने बाबांना म्हटले या देशात होत असलेल्या कुंभमेळ्यात निरनिराळ्या प्रकारचे तपस्वी, महा मा, मुनी येतात. सर्व लोक देवळात जाऊन प्रणाम करतात. त्याला भोग चढवितात. परंतु तुम्ही असे केले नाही. म्हणजेच तुम्ही परमेश्वराला नक्क ओळखता हे सिध्द होते. म्हणून आपण मला परमेश्वर दाखवत नसेल तरी निदान त्याबद्दल मार्गदर्शन करावे अशी विनंती त्याने केली. तेव्हा बाबा म्हणाले, मी तुम्हाला माझा पत्ता दिला आहे. त्या पत्त्यावर आपण मी सांगितल्याप्रमाणे साध्या वेषात या. मी आपणास तेथेच मार्गदर्शन करुन परमेश्वर दाखवीन. ही चर्चा सुरु असतानाच हरिव्दार आले. त्याने बाबांचा पत्ता लिहून घेतला. परंतु बाबांनी त्याला परमेश्वराबद्दल मार्गदर्शन केले नाही.

ही चर्चा सुरु असतानाच बाबांनी त्याला एक प्रश्न विचारला होती की, महात्माजी या देशाची एक लोकवाणी आहे, परंतु मी प्रत्यक्ष पाहिले नाही. ती अशी की, तपस्वी लोकांना त्यांची साधना सुरु असताना भगवान त्यांना जेवणाचे ताट आणून देतो. नंतर तो जेवण करतो आणि भगवंतच त्याचे सर्व पूर्ण करतो. कारण तपस्या करताना तो स्वयंपाक करु शकत नाही आणि जेवण केल्याशिवाय तो जीवंत राहू शकत नाही. म्हणून तुम्ही सत्य सांगा की, तुम्ही तपस्या करताना तुम्हाला भगवंताने जेवणाचे ताट आणून दिले काय? नाहीतर तुम्ही जेवण कसे घेतले किंवा इतके दिवस उपाशी राहून जगले कसे, ते प्रथम मला समजावून सांगा. तेव्हा तो महात्मा एकदम अवाक झाला आणि त्याने बाबांना नम्रपणे उत्तर दिले. आपण जी लोकवाणी ऐकली आहे ती खोटी आहे. भगवान जेवणाचे ताट आणून देत नाही. आम्हा तपस्वी लोकांच्या दर्शनाकरिता लोक आमच्या आश्रमात येतात. तेव्हा आम्ही त्यांना सारखे पाच हजार, दहा हजार रुपये द्या. भगवान तुमची मनोकामना पुर्ण करील असा आशिर्वाद देतो. अशाप्रकारे तीस वर्षात करोडो रुपये कमविले. अतोनात पैसा मिळविला, परंतु इतके दिवस तपश्चर्या करुनही भगवान पाहायला मिळाला नाही. त्याला प्राप्त करता आले नाही. हरिव्दार आल्यावर सर्वजण डब्यातुन खाली उतरले. त्या महात्म्याने बाबांचा पत्ता लिहून घेतले पण बाबांचे म्हणणे असे आहे की, आजपर्यंत तरी तो महात्मा त्यांना भेटायला आला नाही. यावरुन बाबा आपल्या सेवकांना नेहमी मार्गदर्शन करुन जागवितात. त्यांनी याबद्दल सेवकांना खालीलप्रमाणे उपदेश दिला आहे.

उपदेश बाबा हरिव्दारला उतरल्यावर तेथे ते सर्व मंदिरात जाऊन आलेत. परंतु कोणत्याही मंदिरात त्यांनी प्रणाम केला नाही. कारण ते म्हणतात की, देवळात भगवान विराजमान नाही, तर तो प्रत्येक आत्म्यामध्ये विराजमान आहे. लोकांच्या दृष्टीला, देवाळांतच भगवान पाहण्याची सवय झाली आहे. पण त्यांना चैतन्ययुक्त आत्म्यात असलेला देव दिसत नाही. लोक देवळात निर्जीव मुर्तीला भगवान समजून त्याला भोग चढवितात. ही या देशाची प्रथा आहे. याची मला खूप खंत वाटते. या अंधश्रध्देमुळे अशा ढोंगी व्यक्ती, लोकांना भगवंताचा धाक दाखवून लुबाडण्याचे कार्य करतात. तरीपण लोकांच्या लक्षात ते देखील येत नाही, याचे दुःख वाटते. या देशात जे घडत आहे त्यामुळे




नैतिकतेचे पतन होत आहे आणि देशात अधर्म होत आहे. भारतात अनेक धर्म आहेत. भारतीय लोक सुसंघटित आहे. भगवंताने वेळोवेळी आकारात येऊन जे जे सत्य आहे ते ते दाखविले आहे. या देशाचा इतिहास या लोकांना माहित आहे असे असूनही बाबा आणि लोक हे पाहत आहेत की सर्वच धर्माचे लोक सत्य सोडून असत्याकडे धावत आहेत आणि लोक असत्याकडे धावत असल्यामुळे या देशाची स्थिती बिघडली आहे. असत्य भगवंताला आवडत नाही. या देशात भ्रष्टाचार होत आहे. सर्वच धर्माचे लोक भगवंताविषयी मार्गदर्शन करतात. तरीपण या देशातील सत्य नाहीसे झाले आहे असे का? प्रत्येक धर्मातील लोक(धर्मगुरु) आपआपल्या धर्मातील लोकांना जागवत का नाहीत, की सत्य हेच केवळ परमेश्वराला प्रिय आहे आणि सत्य नेहमीकरिता निर्माण करायचे आहे आणि सत्य जर निर्माण झाले नाही तर देशाचे नक्कीच पतन होणार आहे. सत्याला जागविल्यास या देशाला लाभ होणार आहे. म्हणूनच बाबा सत्याला जागविण्याचे कार्य करतात.

बाबा नेहमी मार्गदर्शन करताना सांगतात की, माझ्या या मार्गाच्या मार्गदर्शनाचा जे लाभ घेतात ते मुठभर सुध्दा भीक मागत नाहीत, तर स्वतः कष्ट करुन स्वावलंबी होतात. मी भगवान नाही तर भगवंताने आपला परिचय माझ्या आत्म्यात दाखविलेला आहे. म्हणून मी मानवांच्या (लोकांच्या) आत्म्यामध्ये भगवंत पाहतो आहे आणि याची ओळख त्या मानवाला करुन देतो आहे. या देशाचे पतन होत आहे. या देशात अधर्म सुरु आहे. त्याला बाबा आपल्या मार्गदर्शनाने थांबविण्याचे कार्य करीत आहेत. या महान कार्याकरिताच भगवंताने महानत्यागी बाबा जुमदेवजींचे आपल्याबरोबर घेतले आहे. म्हणजेच बाबा भगवंताच्या रुपात लोकांना सत्य मार्गावर चालविण्याकरिता शिकवीत आहेत. त्यांना सत्याविषयी जागृत करीत आहेत. कारण देशाची संपूर्ण समस्या बाबांच्या समोर आहे. म्हणून बाबांनी त्याग केला आहे. ते निष्काम भावनेने परमेश्वराचे कार्य करतात.

बाबा कोणाकडूनही गुरुपुजा घेत नाहीत. प्रत्येकाच्या आत्म्यात परमेश्वर असल्यामुळे आपल्या पायावर कोणालाही डोके ठेवू देत नाहीत. स्वतःच्या प्रपंचाचा संपूर्ण खर्च ते स्वतः करतात. ते कोणाकडेही भीक मागत नाहीत आणि मार्गातील सेवकांना मागू देत नाहीत. बाईला फार लांब उभे ठेवतात. त्यामुळे स्पर्श करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

ते कोणाशीही खोटे व्यवहार करीत नाहीत. मानव हा बुध्दीजीवी प्राणी आहे. त्यामुळे भगवंताची खरी ओळख त्यालाच आहे. मानवाच्या नर आणि नारी या दोनच जाती आहेत. म्हणून हे दोन प्राणी परमेश्वराला जागवू शकतात. प्रत्येक माणूस किंवा बाई हे कार्य करु शकते. बाबा नेहमी सत्कर्म करतात आणि सेवकांनाही सत्कर्मे करायला लावतात. भगवंताने आपल्याला निर्माण केल्यामुळे आपला सर्वांचा विधाता हा एकच भगवान आहे असे ते सांगतात म्हणून परमेश्वराने आपल्या आत्म्यातुन आपल्या मनाला आत्मप्रचिती, आत्मानुभव आणि आत्मज्ञान दिले आहे. हे सत्य आहे. हे ज्ञान प्रत्येक मानवाला दिले आहे. म्हणून ते प्रत्येक मानवाला जागविण्याचे कार्य करतात. मानव आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालविण्यासाठी सतत जीवन व्यतीत करतो आणि त्याच्या कुटुंबात चालण्याकरिता त्या सर्वांनी सत्य, मर्यादा, प्रेमाची वागणूक केली पाहिजे. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबात परमेश्वर टिकतो कारण त्याला हेच प्रिय आहे. बाबा सांगतात की, या देशात मर्यादा पुरुषोत्तम राम याची माला जपतात. रामाने रावणाला (सैतानाला) संपविले आहे. त्याच्या सैतानी शक्तीला नष्ट केले आहे. हे इतिहासात लिहिलेले आहे. तरी त्याच्या नावाची माला जपणारे हे मुर्ख लुच्चे ऋषी, महात्मे त्यांच्याप्रमाणे सत्य व्यवहार का करीत नाहीत याचे बाबांना खूप दुःख होते. म्हणून बाबा सत्याचे प्रमाण हे ९९ टक्के किंबहुना १०० टक्के होऊन सैतानी वृत्तीचा नाश करण्याकरिता स्वतः निष्काम भावनेने झटत असून आपल्या सेवकांना सुध्दा झटायला सांगतात. त्याप्रमाणे लोकांनी अध्यात्म लक्षात ठेवुन व्यवहार करावयास पाहिजे. ज्यामुळे संपुर्ण जग या कलियुगातुन पुन्हा सत्ययुगाकडे शांततेने वाटचाल करील.

No comments

Powered by Blogger.