PARMATMA EK- ज्ञान पररस मर रस योगी | परमात्मा एक

PARMATMA EK- ज्ञान पररस मर रस योगी | परमात्मा एक 

PARMATMA EK- ज्ञान पररस मर रस योगी | परमात्मा एक
PARMATMA EK- ज्ञान पररस मर रस योगी | परमात्मा एक 

          १९८३ सालची घटना आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजी हे  आपल्या निवासस्थानी एक दिवस रात्री आपल्या असानावर झोपले होते. त्यांना झोपेत स्वप्न दिसले. त्या स्वप्नात त्यांना कोणीही व्यक्ती किंवा कोणतीही वस्तु दिसली नाही. फक्त त्यांना मोठमोठी अक्षरे लिहिलेली दिसलीत. त्यांच्या मुखातुन सारखे तेच तेच शब्द बाहेर पडत होते. ते शब्द होते "ज्ञान परस मर्रस योगी" जवळजवळ अर्धातासपर्यंत ते है शब्द वाचत होते. 

        त्यानंतर त्यांना जाग आली आणि त्यानंतरसुध्दा त्यांच्या मुखातुन तेच शब्द बाहेर पडत होते म्हणून बाबांनी आपल्या डायरीत त्या शब्दांची नोंद त्याच वेळेस करुन ठेवली. हे शब्द जरी त्यांना स्वप्नात दिसले तरी ते शब्द परमेश्वरानेच त्यांच्या मुखकमलातुन बाहेर काढले होते. त्यावर बाबांनी बराच विचार केला आणि नंतर ते सर्वांना सांगू लागले की, ज्याप्रमाणे परिस नावाच्या वस्तुचा लोखंडाला स्पर्श झाल्यावर ते लोखंड सोने बनते, त्याप्रमाणे ज्ञान हे परिसा सारखे आहे. या ज्ञानाला जो स्पर्श करतो त्याचे सोने होईल. म्हणजे तो महानज्ञानी होतो.

            परंतु मानवी जीवनात दैवीशक्तीकरिता मनाची एकाग्रता, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान याची अत्यावश्यकता आहे. हेच दैवी शक्तीचे उगमस्थान आहे. परमेश्वराला समोर ठेवून बाबांनी दिलेल्या "मरे या जिये भगवत नाम पर" या तत्वाप्रमाणे परमेश्वराच्या नावावर मेले तर भगवंत भक्ताच्या पाठीशी उभा होतो आणि परिसासारखे रस तयार होऊन तो ज्ञानी बनतो. जर तो परमेश्वराच्या चरणी मेला नाही तर रस तयार होत नाही. 

          म्हणून माणूस परमेश्वराच्या चरणी मेल्यावरच त्याचा रस तयार होतो आणि रस बनल्यावर ती व्यक्ती योग्यासारखी बनते. हा या मार्गातील सेवकांना प्रत्यक्षात आलेला अनुभव आहे. परमेश्वराच्या नावावर मरणारी व्यक्ती बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द, नियमाने वागली तर ती योगी बनते. अन्यथा तिला कितीही पुस्तकी ज्ञान असले तरी ती योगी बनु शकत नाही. त्याला परमेश्वराची साथ असणे आवश्यक आहे. कर्तव्याने आत्मानुभव येतो. आत्मप्रचिती होते. आत्मज्ञान वाढते. तेव्हाच तो ज्ञानी पुरुष होऊन योगी बनतो हे सिध्द होते.

No comments

Powered by Blogger.