PARMATMA EK- परमात्मा एक अनुभव
▶️आजचा अनुभव.
![]() |
| PARMATMA EK- परमात्मा एक अनुभव | |
👇🏿👇🏿👇🏿👇🏿
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
!!भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम!!
!!महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम!!
!!परमात्मा एक!!
"माझा सत्य अनुभव".
माझे नाव संजय तेलंगे असुन मी परिवार व माझा परिवार आम्ही पती पत्नी तीन मुले एक मुलगी सहा जनांचा परिवार मध्ये मु.कोंढाळी येथे वास्तवत आहे.
आज मी माझा सत्य अनुभव मानवधर्म एकता परिवार या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गत येण्याचे कारण सादर करीत आहे.
मी परमात्मा एक मार्गाला 2007 ला जुळलो मला दारू व्यसन होते आणी व्यसन ईतके होते की जेवनाची ही परवा राहात न्हवती परिथिती खुब हलाखीची होती.पैसे खुब कमवायचे पर ते अपुरे जायचे मी समाजामध्ये कलाकार असल्यामुळे इतराच्यां पेक्षा मला जास्तच पैसे मिळत होते.पन व्यसनापासून बर्बाद होत होते.
घराजवळ एक सेविका अर्चना रामदास जी ठाकरे रहात होते त्यांच्या सोबत माझे बोलन चांलन होती. ते माझ्या पत्नी ला सांगत होते की परमात्मा एक मध्ये येऊन जा या मध्ये सर्व व्यसन पासुन मुक्त होते व सुख शांती मिळते.त्या प्रमाणे मला माझी पत्नी मला सांगत होती.पन मी लक्ष्य देत नव्हतो.दिवस जात गेले आणि माझी प्रकृती खलावली.अगोदर टि बी ची बिमारी झाली त्याचात पिलीया ची बिहारी पन झाली.
डाॅ. कडे गेले त्यानी 60,000 रु खर्च सांगीतले की पिलीयाचे पन आॅफरेशन करावे लागेल मनुन. मग मी आणि माझी पत्नी नागपूर लता मंगेशकर हास्पिटल ला गेलो तिथे सर्व टेस्ट केल्या व दुसरा दिवसी रिपोर्ट करीता बोलाविले होते आणि आम्ही घरी आलो पैसे नसल्यामुळे मी रिपोर्ट आणायला गेलोच नाही सर्व रिपोर्ट तिथेच राहिल्या.
रोजच्या प्रमाणे सकाळी चार वाजता उठलो आणि दारू प्यायला गेलो सात वाजता घरी आलो.माझ्या आगनात घराजवळचीच सेविका अर्चना ताई बसलेली दिसली मी तिला म्हणालो की मला परमात्मा एक मार्गामध्ये यायचे आहे. मग मला सर्व मार्गा विषयी समजावून सांगीतले व शब्द दिला मी त्याचं दिवसी साफ सफाई करायला लागले व पत्नीने सर्व करु लागले कारण माझे जिवन फक्त दारूच्या बोतल वर होते.
हाता पायावर सुझन आलेली होती जेवन पन बरोबर चालत नव्हत शरीर खुब खराब होत चालले होते. वाचण्याची शक्यता कमी होती असे मला ही वाटत होता असी परिस्थिती लक्षात घेता पक्का विचार केलो. नंतर त्या सेवकीन अर्चाना ताईने मार्गदर्शक श्री धनराजजी नेहारे काकाजी मु. काटोल यांना फोन केले आणि विचारपुस केले आणि दुसरा दिवसी काटोल ला जाण्याचे ठरविले आणि मला सांगीतले की दारू प्यायची नाही उदयाला संकाळीच जायचे.मी अनेकात असल्यामुळे मी सेविका अर्चाना ताईच्या शब्दावर लक्ष दिले नाही त्यामुळे काटोल जाता वेळी संडासच्या बाहानने गेलो व दारू पिऊन घेतली नंतर मार्गदर्शका कडे सर्व परिवार गेलो त्याच सेविका अर्चना ताईने आमची सर्वाची टिकीट खर्च पन केला.आणि मार्गदर्शक काकाजीनी सर्व विचार पुस करुन समाजावून सांगीतले आणि तीन दिवसाचे कार्य दिले. व परत घरी आलो पुजेचे सर्व सामुग्री त्याच सेविका बाईने घेऊन दिली.
संकाळी दुसरा दिवस पुजेचे मांडवी वगेरे समझने करिता आपल्या पतीला मज्जे रामदास जी ठाकरे यांना पाठविले व संकाळची विनंती पार पडली.असे करत करत तिन.सात एकविस दिवसाचे कार्य झाले पन माझी प्रकृती जास्त खराब हायला लागली उठू हि नाही शकत होते जेवन ही थोडे फार करत होते मग माझ्या मनात शंका उत्पन्न झाली की आपन आता मरणार म्हणुन मी माझ्या पत्नीला आवाज दिला आणि म्हटले की त्या सेवकीन ताईला बोलवुन आन तर तिने बोलवून आनली व मी म्हटले की तु तर सांगत होती की तिन दिवसा मध्ये सुख शांती मिळते म्हणुन मी या मार्गात आलो आता तुम्ही सांगा काय करायचा या मार्गात मला तिन सात एकविस दिवसाचे कार्य झाले पन माझी प्रकृती जास्त खराब झाली मला काही तरी सांगा या मार्गात सेविका ताई बोलली की असे होऊ शकतच नाही तु काहीतरी चुक केलं तेव्हा च असे घडले त्याचं वेळी माझ्या लक्षात आले की मी मार्ग घेण्यासाठी जात होते तेव्हा मी दारू पिऊन मार्गदर्शक काकाजी कडे गेलो होतो म्हणुन. त्याच वेळी मी आपली चुक स्विकार केली व शब्दातुन मोकळा झालो.
आणि बोलता बोलताच मला झोप लागेली.व दोन तासांनी मला जाग आला त्यावेळी इतकी भुक लागलेली होती की पन घरी त्यावेळी जेवन पन नव्हते त्याचं सेविका ताई कडुन जेवन आनले आणि जेवण केले.मनाला खुब शांती वाटली . म्हणुन बाबांनी सागीतले की शब्द हा मोलाचा आहे शब्द सांभाळून बोला शब्द रुपी परमेश्वर आहे.त्यावेळसच मला शब्दाची जानीव झाली.नंतर आम्ही सर्व परिवार सोबत मार्गदर्शक काकाजी कडे गेलो.मी केलेली चुकीची व शब्दाची सोडवणुक केले.आणि पुन्हा मार्गदर्शक काकाजीनां मला कार्य दिले त्याप्रमाणे आमचे कार्य आनंदाने पार पडत असतानी पुन्हा माझ्या लहान मुलांवर बिमारीने झेप घातली पन तो रोज संकाळी शाळेत जात होता अचानक शाळेतुन आल्यावर तो तिरछा पाहु लागला.आणि डोळे बारीक पडले व नाटकाचा सारखा वेडा हातोडा झालेला माझ्या पत्नीला दिसला तर ती माझा जवळ आली व महत्वाचे की यांच्या चेहरा व डोळयावर लक्ष करा तर मी त्याच्या चेहरा कडे पाहिला तर एक साईड थोडा तिरछा गेलेला होता.
तर मी बाबांच्या पाठा जवळ गेलो आणि कापूर अगरबंती लावली भगवंताला सांगीतले की बाबा यांनी काय कर्म केले हे मला माहीत नाही परंतु मी आपनास विनंती करते की मानव हा चुकीचा पात्र आहे बाबा कर्म करत असताना मानव हा चुकतेच तरी बाबा हा चुकला असेल तरी याला माफ करा बाबा यांच्यावर आलेले संकट दुर करा बाबाची रक्षा आणि बाबा हनुमान जी म्हणुन फुका मारतो बाबा यांचे ताबडतोब दुख दुर करा बाबा असे म्हणुन फुंका व रक्षा दिली तर पहा परमेश्वर फार दळयावू आहे पलामध्ये त्यांचं दुःख दुर झाले.फक्त आपल्याला भगवंतावर विश्र्वास पाहीजे व स्वताहावर ही विश्वास पाहीजे.
माझ्या या अनुभव सांगण्यात किवां लिहिण्यात चुक भुल झाली असेल तर भगवान बाबा हनुमान जी तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी ला माफी मागतो.
सर्वांना नमस्कार जी.....
नाव:-संजय दादा तेलंगे
मु.पो.कोढाळी जिल्हा.नागपुर
सेवक क्रं.:-३४९३२
मार्गदर्शक:-श्री मान.धनराजजी नेहारे काकाजी मु.काटोल
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ,वर्धमाननगर,नागपूर.
•••••••••••••••••••••••••••••••••
--------------------------
--------------------------
[टिप :- वरिल अनुभवाची कुणिही काँपी करु नये, त्यापेक्षा जास्तीतजास्त शेअर करावा.]
भगवतकार्याच्या या गृपला जुडण्याकरिता व आपले परमेश्वरिकृेचे अनुभव सेवकांपर्यत पोहोचवीण्याकरिता खालील सेवक दादांशी संपर्क साधावा...
गणेश दादा बिडकर :-9766573410
मोहन दादा आस्वले:-9764989883
रोशन दादा काटेकर :-8956656210
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
सौजन्य :-
"अॅडमिन,सेवक,सेविका",
मानवधर्म एकता परिवार,
[Watts app group & Facebook page ,Sharchat group}
युवा आणि जेष्ठ सेवकांचा समुह,
परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपुर.
©®
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Leave a Comment